संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७४६
📿 गौळणी बांधिती धारणास
3746.
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥
धावोनिया मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठी ॥धृपद॥
तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी । भोळेपणालागी भीक मागे ॥२॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७४८
📿 हा गे माझे हाती । पा
3748.
हा गे माझे हाती । पाहा कवळ सांगाती ॥१॥
देवे दिला खातो भाग । कराल तर करा लाग ॥धृपद॥
धाले ऐसे पोट । वरी करूनिया बोभाट ॥२॥
तुका म्हणे घरी । मग कैंच्या या परी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संन्यासी ३७४८›
📿 अभंग क्र. ३७४८
📿 संन्यासी ३७४८
3748.
संन्यासी ३७४८
अहो तुम्ही संन्यासीजाला । कामक्रोधजवळींचा नाही गेला । व्यर्थ का विनाश केला । सावध होई ॥१॥ संसार व्यर्थ सांडिला । मुलाबाळातुटी पाडिला । नारायण नाही जोडीला । सावधहोई ॥२॥ वर वर शेंडी बोडी । जानवें तोडुनी धोत्रेफाडी । हाती घेऊनी दंड लाकडी । सावध होई ॥३॥ वर वर म्हणसी नारायण । अंतरी विषयावरीध्यान । कासया संन्यास घेऊन । सावध होई ॥४॥ आता एक विचार।धरी तुं संतांचा आधार । एकाजनार्दनी तत्पर । सावध होई ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७४९
📿 अवघे अवघीकडे । दिले
3749.
अवघे अवघीकडे । दिले पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥
का रे धरिला अबोला । माझा वाटा देई मला । सिदोरीचा केला । झाडा आता निवडे ना ॥धृपद॥
भूक लागली अनंता । का रे नेणसी जाणता । भागलो वळिता । गाई सैरा ओढाळा ॥२॥
तुका करुणा भाकी । हरी पाहे गोळा टाकी । घेता झाला सुखी । भीतरी वाटी आणीका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोपदार ३७४९ ते ३७५०›
📿 अभंग क्र. ३७४९
📿 चोपदार ३७४९ ते ३७५०
3749.
चोपदार ३७४९ ते ३७५०
चोपदार आला चोपदार आला ॥धृ.॥ माझे चोपदाराचें रहाणे । आकाश स्वर्ग पहाणे ।
चतुर्मुख चकीत होऊन । निराकारीची वस्ती दिधलीविष्णुनें ॥१॥ शंख चक्र गदा घेऊन । महादेवी शून्य द्वारपाळ जाण । कळीकाळा टाकीन छेदुन । रंडीचंडी शक्ति टाकीन भेदुन । चोपदार आहे मी जाण॥२॥ आम्हांस नाही उपाय । आम्हांसं नाही बापना माय । खरीचाकरी कोठे करावी । एका जनार्दनीदृढ धरावी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चोपदार ३७४९ ते ३७५०›
📿 अभंग क्र. ३७५०
📿 चोपदार प्यारे । हम त
3750.
चोपदार प्यारे । हम तो चोपदार प्यारे ॥धृ.॥ देखो सरकारनका दस्त । क्यौरे भाई हुवामदमस्त ॥१॥ जब आईगी साहेबकी चिटी । जाबदेना खुन हैं उलटी । बात बोलने लगे मिठी । चीटीलेगैरे ॥२॥ एका जनार्दन की पायी । वो त्रैलोक्यनकासाई । उनकी क्याकहुं बराई । वोही सबसे न्यारा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कोल्हाटीण ३७५१ ते ३७५२›
📿 अभंग क्र. ३७५१
📿 कोल्हाटीण ३७५१ ते ३७
3751.
कोल्हाटीण ३७५१ ते ३७५२
आनंदी सद्गुरु पूर्ण परात्पर अभेदनमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठाव तेणे मज दाखविला ज्ञानांजनघालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला । पूर्ण बोध । पाठविला ॥१॥ कोल्हाटीण झाले बाई मीकोल्हाटीण झाले ॥धृ.॥ प्रवृत्तीचे वस्त्र फेडुनीसुखा सुखी रिझलें । परात्पर पर पुरुष पाहूनित्यापाशी मी गेले । अंग संगती करून त्याचे सुखम्यां हरविलें । अधरामृत म्या सेविले । कोल्हाटीणझालें ॥२॥ आशा मनशा तृष्णा ह्या तिन्ही मेळविल्यारांडा । भाव चोहटा वेळू तेथे लावियेला झेंडा । करून उलट प्राणाचा क्रोध तो मारिला मेंढा । ब्रह्मरंध्रीं मिसळलें आला अमृत लोंढा । मग तोअहंकार मेंगा त्यांनी या भुलविलेंसोंगा॥को० ॥३॥ मागे सारून कामे मारिली उफराटी उडी । भ्रांतिलुगडे फिटुनि गेले काया झाली उघडी । पूर्णअनुभव कळुनी त्यासी मांडिली फुगडी । मदनमोहना दादुला घेउन झाले ते हिजडी॥को० ॥४॥ परद्वार म्या केले जन्मसार्थक झाले । पंचवीसदादुले हाती धरुनी उठविले । अंतरगृह सावलीतयेऊनि निश्चळ बसलें । एका जनार्दनी एकी एकपणमुरालें । जन्मजरामरण हरलें॥को० ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७५३
📿 पाहा रे तमासा तुमचा
3753.
पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥
जागा रे गोपाळानो ठायी ठायी जागा । चाहुलीने भागा दूर मजपासूनि ॥धृपद॥
न रिघता ठाव आम्हा ठावा पाळतिया । भयाभीत वाया तेथे काय चांचपाल ॥२॥
तुका म्हणे हाता चडे जीवाचिये साठी । मिटक्या देता गोड मग लागते शेवटी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७५४
📿 डाई घालुनिया पोरे ।
3754.
डाई घालुनिया पोरे । त्यांची गुरे चुकवीली ॥१॥
खेळ खेळता फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥धृपद॥
मारिती माया घेती जीव । नाही कीव अन्याया ॥२॥
तुका कान्होबा मागे । तया अंगे कळो आले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 भटीण ३७५३ ते ३७५४›
📿 अभंग क्र. ३७५४
📿 मी भटीण आले रे भटा ।
3754.
मी भटीण आले रे भटा । नकोकरूं रिकाम्या चेष्टा । काय बोलतोसि चावटा । उगीच चेष्टा करू नको ॥१॥ म्या भटणीने तुज. पाळिले । पाळिल्याचे बरेच उपकार फेडिले । माझे मज आणुन दिले । त्यांत तुझे काय गेले रेभटा ॥२॥ मजपासूनि वेद की रे झाले । ते म्यांतुझ्या हाती दिधले । शंकासुराने चोरून नेले । माझ्याच भयाने ते परत आणिले रे भटा ॥३॥ त्याच्याच आधाराने मी बोलत आहे । काय रे- मस्ती तुसी आली आहे । मस्ती तुझी भटा ठाऊकआहे । आपले अंतरी शोधुनी पाहे रे भटा ॥४॥ लहानाचा थोर तुला म्या की रे केला । नवअवताराच्या हाती मला । दहावा कलंकी राहिला । तोही जाइल विलया रे भटा ॥५॥ एका जनार्दनींकारण । भटाचें हरपले मीपण । उगाच गेला मौनधरून । चैतन्यरूप पाहिले रे भटा ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७५६
📿 अवघेचि गोड झाले । मा
3756.
अवघेचि गोड झाले । मागीलये भरी आले ॥१॥
साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥धृपद॥
थडिये पावता तो वाव । मागे पाहाता ठाव ॥२॥
तुका म्हणे गेले । स्वप्नींचे जागे झाले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 जगझोडी ३७५६›
📿 अभंग क्र. ३७५६
📿 जगझोडी ३७५६
3756.
जगझोडी ३७५६
जग झोडी जग झोडी । नांव ठेविलेंलाडी ॥१॥ पाल मांडिले वेशीपाशी । आला गेला
भोगितो मशी ॥२॥ नाही लागत अडका रुका॥कामलाटा फुकाचें फुका ॥३॥ एका जनार्दनी जोडी । याची संगत मी न सोडी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७५७
📿 तुज सवे येतो हरी । आ
3757.
तुज सवे येतो हरी । आम्हा लाज नाही तरी । उचलिल्या गिरी । चांग तई वांचलो ॥१॥
मोडा आता खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फाकल्या ओढाळ । नाही तेच आवरा ॥धृपद॥
चांग दैवे यमुनेसी । वांचलो बुडता । निलाजिरी आम्ही । नाही भय धाक या अनंता ॥२॥
खातो आगी माती । आता पुरे हा सांगाती । भोवता भोवेल । आम्हा वाटते हे चित्ती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७५८
📿 नको आम्हासवे गोपाळ ।
3758.
नको आम्हासवे गोपाळ । येऊ ओढाळा तुझ्या गाई ॥१॥
कोण धावे त्यांच्या लागे । मागे मागे येरझारी ॥धृपद॥
न बैसती एके ठायी । धावती दाही दाही वाटा ॥२॥
तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शंखीण डंखीण ३७५८ते ३७५९›
📿 अभंग क्र. ३७५८
📿 शंखीण डंखीण ३७५८ते ३
3758.
शंखीण डंखीण ३७५८ते ३७५९
बाहात्तर कोटी कात्यायनी । त्यांतया शंखिणी डंखिणी । तृष्णा वासना पापिणी । जन्मो जन्मी गोविती ॥१॥ मोही कुंकुम कपाळीलावून । विशाल स्वरूप अवगुण लोकांलागीभय दावून । भाविक जन भेडसावी ॥२॥ तृषासनविशाळ । जग मोहियेलें अनुमाळ । घालुनियांमायाजाळ । जग थईथई नाचवी ॥३॥ जग पडलेंभ्रांतींत । विसरले आपुले स्वहित । यांत आहेआपुला घात । हे तो कदा न समजती ॥४॥ वरबेगडाचा रंगा । काय भुललासी जगा । होयगुरुपदीं जागा । याच लागी प्रवृत्ती ॥५॥ एकनाथाचेंविंदान । एकाजनार्दनी जोडे ज्ञान । त्यागूनी गुणअपमान चरणी ध्यान लाविले ॥६॥
3759.
हाट करुनी घरासी आणली बसलीवसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघालीवसवसुनलागेपाठीरे ॥१॥ शंखीण बाबा डंखीण । त्या घरी शंखीण बाबा डंखीण रे ॥धृ.॥ चौशेरांचावरण भात केला वर भाजीचा गोळा रे । मोठ मोठेघास घेती भुरळ फिरवी डोळा रे ॥२॥ आठ भाकरीबारापोळ्या धिरडीखादली सोळारे पाणी पिऊनीढेकर दिला मराठी तिचा मोळा रे ॥३॥ बारा सोळालुंगडी नेसली येईना पाठी पोटी रे । नव खणाचीचोळी शिवली उराशी येईना गांठी रे ॥४॥ एकाजनार्दनीं म्हणे बाबा ऐशी बाईल केली रे । तिच्याभयाने सर्व दैवते पळुनियां गेली रे ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७५९
📿 मागायास गेलो सिदोरी
3759.
मागायास गेलो सिदोरी । तुझ्या मायेघरी गांजियेलो ॥१॥
तुजविण ते नेदी कोणा । सांगता खुणा जिवे गेलो ॥धृपद॥
वायाविण केली येरझार । आता पुरे घर तुझी माया ॥२॥
तुका म्हणे तू आम्हा वेगळा । राहे गोपाळा म्हणउनी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुलगी ३७६०›
📿 अभंग क्र. ३७६०
📿 मुलगी ३७६०
3760.
मुलगी ३७६०
आरते येग धाकुटे मुली । हीच कायतुमची बोली ॥१॥ घरादाराचे हितकर्ते । फुटक्या
मडक्याचे भोक बुजवितें ॥२॥ अटक मटक नऊवाटा । येऊन बसे दहा दारवंटा ॥३॥ दहा दारवंटातें कोण । तुझ्यांत गेले दोन ॥४॥ फटक माझे सवती । तुला सहाजण सोबती ॥५॥ पडले षडविकारांच्याहाती । सद्गुरुचे पाय धरी चित्ती ॥६॥ सद्गुरु कायदेईल ग मला । तन मन धन अर्पण करील त्याला ॥७॥ संसार जाईल सारा । उद्यां येईल काळाचाफेरा ॥८॥ आम्हीनर नारी पतिव्रता । विष्णुवर करूंसत्ता ॥९॥ एका जनार्दनी केला संग । योगीखेळविला पांडुरंग ॥१०॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७६२
📿 अवघी मिळोनि कोल्हाळ
3762.
अवघी मिळोनि कोल्हाळ केला । आता होता म्हणती गेला ॥१॥
आपल्याला रडती भावे । जयासवे जयापरी ॥धृपद॥
चुकलो आम्ही खेळता खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥
तुका म्हणे धावती थडी । न घाली उडी आत कोणी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७६३
📿 भ्याली जिवा चुकली दे
3763.
भ्याली जिवा चुकली देवा । नाही ठावा जवळी तो ॥१॥
आहाकटा करिती हाय । हात डोके पिटिती पाय ॥धृपद॥
जवळी होता न कळे आम्हा । गेल्या सीमा नाही दुःखा ॥२॥
तुका म्हणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सौरी ३७६२ ते ३७७०›
📿 अभंग क्र. ३७६३
📿 सहा दादुले केले परि
3763.
सहा दादुले केले परि म्या ऐसा नाहींदेखिला दादुला । काया वाचा रमलेंत्याशीं परी म्यांऐसा नाही देखिला दादुला ॥१॥ सौरी झाले सौरीसखे बाई झाले त्याची नवरी ॥धृ.॥ नग्न होऊनीभोगिला पुरुषम्यां ऐसा नाही देखिला दादुला । देतोगोड गोड खाया परीम्या ऐसा नाही देखिला दादुला॥श केला संसार गोड परीम्या ऐसा नाही देखिलादादुला । याचे मनाची पुरविली खोड परींम्यां ऐसानाहीं देखिला दादुला ॥३॥ ऐसी सौरी झाले परीम्या ऐसा नाही देखिला दादुला । एका जनार्दनींनमिले पायी ऐसा नाही देखिला दादुला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सौरी ३७६२ ते ३७७०›
📿 अभंग क्र. ३७६५
📿 सौरी झाले बाई आता कर
3765.
सौरी झाले बाई आता करु गत काई । बसवी झालेबाई आता भिन्नभेद नाही ॥१॥ कासरालावुन सासरा मारला दादला टाकुन आले । आत्मलिंग पाहुनिया मदनमस्त झाले ॥२॥ बांधुनबुचडा उघडा माथा विभुतीचा पट्टा । आला गेलाम्हटला नाही धरल्या चारी वाटा ॥३॥ उभी शिंदळघाली गोंधळ हाचि लाभ मोठा । मागे पुढे पाहुं नकावेगीं कामलाटा ॥४॥ लहानथोरम्हटला नाही झालेमी वेडी । एका जर्नादनी बसवी झाले परद्वारगोडी ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७६६
📿 धाव कान्होबा गेल्या
3766.
धाव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण काई ॥१॥
आपुलियांचे वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥धृपद॥
मागता आधी द्यावा डाव । बळिया मी तो नाही भाव ॥२॥
तुका म्हणे ऐशा सवे । अनुसरावे जीवेंभावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७६७
📿 आणीके काय थोडी । परि
3767.
आणीके काय थोडी । परि ते फार खोटी कुडी ॥१॥
सदा मोकळीच गुरे । होती फजीत ती पोरे ॥धृपद॥
सदा घालिती हुंबरी । एक एकाचे न करी ॥२॥
तुका म्हणे घरी । माय वेळोवेळा मारी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सौरी ३७६२ ते ३७७०›
📿 अभंग क्र. ३७६७
📿 सांड रांड गमजा नको क
3767.
सांड रांड गमजा नको करू बोल । भक्तिवीण ज्ञान गेले किती करिशी फोल ॥१॥ जन्मा आली व्यर्थ गेली भक्ति नाही केली । माझेमाझें म्हणोनिया गुंतोनिया मेंली॥टिळा टोपीघालुनी माळा म्हणती आम्ही संत । परस्त्रीदेखोनियां चंचळ झाले चित्त॥जगालागीं ज्ञानसांगे म्हणती आम्ही साधु । पोटी दया धर्म नाही तेजाणावें भोंदु॥४॥संत म्हणतील निंदा केली निंदानोहे भाई । शरण एका जनार्दनी लागतसे पायी ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सौरी ३७६२ ते ३७७०›
📿 अभंग क्र. ३७६८
📿 न करी वो चाळा स्वैरी
3768.
न करी वो चाळा स्वैरीचीया बोला । वेधला जीव नि:संगपणे खातीनवा गोळा ॥१॥ ऐसे नव्हे भले कोणा मानवलें । जग जगी हांसतीमोडीताती डोळे ॥२॥ फुकटचि संग स्वैरीयेचा बरा । दिवाण दारी फजिती थोरी वहातसे वारा ॥३॥ पडले मोकळे ढुंगण आता कैसा संग । मागे पुढेफजिती झाली अठरा झाले दंग ॥४॥ एका जनार्दनींस्वैरी झाली संतपाय धरा । नाही तरी उभ्या बाजारी फजितीचाथारा॥५।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सौरी ३७६२ ते ३७७०›
📿 अभंग क्र. ३७६९
📿 होउनी स्वैरी लुगडें
3769.
होउनी स्वैरी लुगडें फेडी भलत्यासवें हांसे । हांसत हांसत घर घेतलें कोण मजपुसे ॥१॥ लागला मज चाळा का हो घालतांडोळा । फजितीचा वाटा आला नित्य नवागोळा ॥२॥ मागे पुढे न पाहे कांही म्हणेलकोणी । एका जनार्दनी शरण कायावाचामनीं ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७७०
📿 (गौळणींची अवस्था)
3770.
(गौळणींची अवस्था)
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥
एकांती एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सौरी ३७६२ ते ३७७०›
📿 अभंग क्र. ३७७०
📿 भोळा दादुला बाई म्या
3770.
भोळा दादुला बाई म्या केला । संसार सारा नागविला ॥१॥ सौरी होऊन गेलेंसुख नाही झाले । पुनरपि संसारी मी हो आले ॥२॥ चार पांच साहा अठरांसी रतलें । त्यांचे संगें मनचावट हो झाले ॥३॥ एकाएकी संतसंग झाला । एका जनार्दनी संसार तुटला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७७१
📿 (गौळणींची अवस्था)
3771.
(गौळणींची अवस्था)
स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशी सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथे चि त्याचा जीव वो ॥१॥
आपआपणाशी करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७७२
📿 (गौळणींची अवस्था)
3772.
(गौळणींची अवस्था)
आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरी चित्ती वो ॥१॥
सर सर परती झालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सासुरवास ३७७१ ते ३७७२›
📿 अभंग क्र. ३७७२
📿 वृद्धपणी शांती धरा त
3772.
वृद्धपणी शांती धरा तुम्ही सासुबाई । नरम गरम मागू नका अंती सुख नाही ॥१॥ रात्रंदिवस विचारिता जीव दिक् जाला । मायलेकीराहा तुम्ही मज नेऊन घाला ॥२॥ प्रपंचाचें ताकतुम्ही सांचविलें घरी । संचिताचें दुग्ध लोणीगमाविलें चोरी ॥३॥ वासनेच्या बिडालीका कोंडुनीबाहेर ठेवा । नवहीं द्वारे गुप्त करा ज्ञानदीप लावा ॥४॥ प्राप्त भूमी चारी तुम्ही हात करा वेगी । कल्पनेचीरहाटी होडा धन्य तोचि योगी ॥५॥ चारी मुक्तीत्याचे माथा काळ झेंप घाली । विश्वासाने जाऊंनका जीव मुक्ति झाली ॥६॥ अहेवमणी गळांतुम्ही व्यर्थ बांधियेला । बारा सोळा पुत्र जालेदादला नाही केला ॥७॥ वांझ तुम्ही पुत्र व्यालेतुमचे तुम्हा साजे । इतर स्त्रिया करू म्हणतीमरती लोकलाजे ॥८॥ क्षणिक तुम्ही वृद्ध पहाक्षणिक तरुण बोले । एका जनार्दनी शरण त्यानेरूप केले ॥९॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७७४
📿 (गौळणींची अवस्था)
3774.
(गौळणींची अवस्था)
आजि नवल मी आले येणे राणे । भेटी अवचिती नंदाचिया कान्हे ।
गोवी सांगती वो सकळ ही जन । होते संचित आणियेले तेणे वो ॥१॥
गेले होउनि न चले आता काही । साद घालिता जवळी दुजे नाही ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अष्टपादी ३७७५›
📿 अभंग क्र. ३७७५
📿 अष्टपादी ३७७५
3775.
अष्टपादी ३७७५
पहिले कोठेच नव्हते काही । चंद्र सूर्यतारा नाही । अवघे शुन्यच होते पाही । कान्होबा तेंरेतें रे ते ॥१॥ तेथे एक ढालगज निर्माण झालीं । तिने पहा एवढी ख्याती केली । इंद्रादिकास म्हणेबाहुली । अमरपुरीतिचीघरकुलीं । कान्होबा ॥२॥ ती मुळची कर्णकुमारी । तिचा बाप तो ब्रह्मचारी । तो जन्मला तियेचे उदरी । ऐसीपहातांनवलपरी॥कान्होबा ॥३॥ तिने बापची दादला केला । कोणवाईटम्हणेया बोला । अवघे तिच्याच बोलणेचाला । तरी कैवल्य सुख तुम्हांला॥कान्होंबा ॥४॥ तोतियेसी शिवला नाही । वांझ गीण झाली पाही । व्याली पाचपंचवीस पोरे तिही । ऐसे तियाचे नवलपाही । कान्होंबा ॥५॥ ऐसी व्याली सकळ सृष्टी । न पडता भ्रताराचे दृष्टी । एका जनार्दनी या गोष्टी । विचारा सद्गुरूच्या मुखीं॥कान्होबा ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७७८
📿 (गौळणींची अवस्था)
3778.
(गौळणींची अवस्था)
नका काही उपचार माझ्या शरीरा । करू न साहावे बहु होतो उबारा ।
मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कान्होंबा ३७७८›
📿 अभंग क्र. ३७७८
📿 कान्होंबा ३७७८
3778.
कान्होंबा ३७७८
पहिले कोठेच नव्हते कांही । चंद्रपर्य तारा नाही । अवघे शून्यच होते पाही । कानोबा ते रे ते रे ते ॥१॥ तेथे एक ढालगजनिर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली । इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी तिचीघरकुली॥कानोबा० ॥२॥ ती मूळची कर्णकुमारी । तिचा बाप तो ब्रह्मचारी । तो जन्मला तियेचेउदरीं । ऐसी पाहता नवलपरी॥कानोबा० ॥३॥ तिने बापची दादला केला । कोण वाईट म्हणेया बोला । अवघे तिच्याच बोलणे चाला । तरीकैवल्यसुख तुम्हांला॥कानोबा० ॥४॥ तो तियेसीशिवला नाही । वांझ गर्भिण झाली पाही । व्यालीपांच पंचवीस पोरे तीही । ऐसे तियेचे नवलपाही । कानोबा० ॥५॥ ऐशी व्याली ते सकळसृष्टी । न पडता भ्रताराचे दृष्टी । एका जनार्दनी यागोष्टी । विचारा सद्गुरुच्या मुखी । कानोबा० ॥६॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांखरू ३७७९›
📿 अभंग क्र. ३७७९
📿 पांखरू ३७७९
3779.
पांखरू ३७७९
कृष्णा एक पाखरू आहे । तेमुखाविणचारा खाये रे । डोळे नाही परी ते पाहे । वाचेवीणस्वयें गाये रे ॥१॥ सख्या त्याचे नांव कान्होंबा । कृष्ण म्हणती सर्व रे । त्याचे वास्तव्य कोठे आहे । पर नाही परी ते उडे रे ॥२॥ तिही लोकी हिंडतें । त्रिभुवन त्याला थोडेरे ॥३॥ त्याचे नखांत आकाशबुडे । तो सन्मुख चहुकडें रे ॥४॥ अहो त्यालामायबाप दोन्ही नाही रे । एकपणेंवीण पहातीजनार्दनाचे पायी रे ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७८०
📿 (गौळणींची अवस्था)
3780.
(गौळणींची अवस्था)
काय उणे का करीतोसी चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परेपरता तू पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसू या जनांचे आघात ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पिंगळा ३७८० ते ३७८३›
📿 अभंग क्र. ३७८०
📿 पिंगळा ३७८० ते ३७८३
3780.
पिंगळा ३७८० ते ३७८३
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा । डौर फिरवितोडुगडुग ऐका ॥धृ.॥ वरल्या आळीलातुम्हीं सावध रहावे । पाटीलबुवाला मग लावुन सवे । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥१॥ मधल्याआळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधामग पडेल पुरें । नाही तरी पाटलोंबा तिची पळतीलगुरें ॥२॥ आणिक बारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिची पाच पोरेंलागतील देशोधडीं ॥३॥ आणिक एक ऐका कैंचेनवल झाले । गांवच्या पांड्यांनी पाटलासीनागविलें । साऱ्या कागदाचे शुन्य एकच केले ॥४॥ हिंडता फिरतांना एक शकुन सांगे । त्याच्या सत्तेनेह्या आळीस वागे । संता घरचा बा एक तुकडामागे ॥५॥ हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटी बा काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीबा आमुचे काय जाईल ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७८१
📿 (गौळणींची अवस्था)
3781.
(गौळणींची अवस्था)
आलिये धावति धावति भेट होईल म्हुण । तव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥
आता काय करू सांग वो मज भेटेल कैसा । हरीलागी प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥धृपद॥
लाविती उशीर बहुती बहु ओढिती ओढा । सांभाळिता सांग असांग दुःख पावल्ये पीडा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वटवाघूळ ३७८४›
📿 अभंग क्र. ३७८४
📿 वटवाघूळ ३७८४
3784.
वटवाघूळ ३७८४
पूर्वी पंक्तीस केला भेद । नाही । अंत:करण शुद्ध । झाले वटवाघूळ प्रसिद्ध ॥१॥ वटवाघुळ झाले बाई । करावे काई । उपायनाहीं ॥धृ.॥ वट वाघुळीचा जन्म घेऊन । घेतलेउरफाटे टांगुन । तोंडी नरक भरला जाण ॥१॥वटवाघळीची यातना मोठी । भोगिल्या लक्षचौयाऐंशी कोटी । जन्ममरणाच्या तुटल्यागांठी ॥३॥ एका जनार्दनी वटवाघुळ झालें॥सद्गुरूला शरण गेले । जन्ममरण चुकविले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७८७
📿 (गौळणींची अवस्था)
3787.
(गौळणींची अवस्था)
होते बहुत दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी ।
व्हावी भेटी ते झाली गोविंदासी । आता सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥
स्थिर स्थिर मजसी साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७८८
📿 (गौळणींची अवस्था)
3788.
(गौळणींची अवस्था)
एकली राना गोविंदा सवे । गेले ठावे ते झाले ॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाही विषम जवळी आतळले ॥धृपद॥
नव्हती देखिली म्या वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सर्प ३७८७ ते ३७८८›
📿 अभंग क्र. ३७८८
📿 वासुकी सर्प मोठा दार
3788.
वासुकी सर्प मोठा दारुण । क्रोधेबैसला बिळी जाऊन । सहज मी तेथे केले गमन । तमोगुणें घातले सारवण । तेथून नष्ट आला धावून । त्याने मजवर झडप घातली जाण ॥१॥ सापचावला । अगागागा । अबाबाबा । अताताता । अरेरेरे । साप चावला ॥२॥ याची जात मोठी कठिण । मायाभुली पडला येऊन । माझे जडावलें मन॥गरगर गिरकी आली दारुण । साप चावला ॥३॥ या गिरकीचें नाही भय । मी केले सहस्र अन्याय । तोचि दडपिला हा पाय । आता कोण वांचवीलठाव । साप चावला ॥४॥ माझा देवावर हवाला । सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र तुज देई । तोचतला सोडवील । यम करील काई । पावशीलचिंतामणी । एका जनार्दनी पायी ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७८९
📿 (गौळणींची अवस्था)
3789.
(गौळणींची अवस्था)
गोरस घेउनी साते निघाल्या गौळणी । तव ती कृष्णाची करणी काय करी तेथे ।
झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधी दान माझे सारा मग चाला पंथे ॥१॥
सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे सर जाऊ दे परता । मुळी भेटलासी आता ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७९०
📿 (गौळणींची अवस्था)
3790.
(गौळणींची अवस्था)
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ॥१॥
उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥धृपद॥
तुझिये अंगी घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचे बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७९४
📿 (गौळणींची अवस्था)
3794.
(गौळणींची अवस्था)
खेळता मुरारी जाय सरोवरा तिरी । तव नग्नचि या नारी तेथे देखियेल्या ।
मांडिले विंदान ख्याल सुखाचे संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पाया पडता रे न सोडी नेदी साउला रे ॥धृपद॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७९५
📿 (गौळणींची अवस्था)
3795.
(गौळणींची अवस्था)
धरिला पालव न सोडी माझा येणे । काही करिता या नंदाचिया कान्हे ।
एकली न येते मी ऐसे काय जाणे । कोठे भरले या अवघड राने रे ॥१॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरी ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कुत्रे ३७९५›
📿 अभंग क्र. ३७९५
📿 कुत्रे ३७९५
3795.
कुत्रे ३७९५
ये रे कुत्तु ये । आम्हा विटाळ करूनको । आपली भाकर घे । दे रे धन्या दे । विटाळराहीला । तुजखाली । आवरुन आपला घे आताहे कुत्रेमातलें । मीच म्हणूनीगुंतले । फार कुस मोठीकेली । जीवा तुझी खोटी झाली । उपाशी मरतोपाही बरे । अमृताचे सारें । घर एक सकाळ कायखासी । तूच मुद्दल कोठे रहाशी । एवढे ज्ञान झालेकोठे । सद्गुरुचे देणे मोठे । सद्गुरु तुला आहेकारे । सर्वाचंटी तोच की रे । आम्ही तर म्हणतोकुत्रा तुला । अविद्येने धतोरा दिला । ब्राह्मणाशीअविद्या म्हणसी । देहे ब्राह्मण कैसा होशी । श्रेष्ठजन्म वेद बोलती । येवढे भले तरी का मरती । हरिभक्ता अमर होती । ते कळे कैसे आपण व्हावेतैसे । होईनासी कारे । जात गोत पाहीनाशी की रे । हे तुला ज्ञान कशाने झाले । एका जनार्दन गुरुकृपेकळो आले ॥१॥