🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पांडुरंगाचा वियोग›
📿 अभंग क्र. ३०१
📿 येथ तो दुःखाचे डोंगर
301.
येथ तो दुःखाचे डोंगर आठवती । वाटतसे खंती मना माझ्या ॥१॥
का हो पंढरीराया परदेशी केले । कोणी न देखे आपुले काय करू ॥२॥
आठवे पंढरी आठवे महाद्वार । संतांचा भार आठवतो॥ ॥३॥
आठवतो नामा पुंडलिक सखा । चोखा म्हणे देखा तळमळ वाटे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रीराम माहात्म्य›
📿 अभंग क्र. ३०१
📿 विरंचीचा बाप क्षीरसा
301.
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी | घ्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥
परेहूनिपर वैखरीहूनि दुरी | कौसल्येचे उदरी तोचि असे ॥२॥
बोलियेले जे जे नव्हे असत्य वाणी | न येऊ दे मनी शंका कांही ॥३॥
माझे हे संचित धन्य धन्य आता | पाहीन मी कांता लक्षुमीच्या ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 हरिश्चंद्र आख्यान›
📿 अभंग क्र. ३०२
📿 ऋषि म्हणेरे समर्था ।
302.
ऋषि म्हणेरे समर्था । असो स्वप्नीची हे वार्ता ॥1॥
इच्छा धरुन आलो येथे । औट तुक दे कनकाते ॥2॥
कृपा करुन द्याल जरी । उदक घाली माझे करी ॥3॥
दया करा आम्हावरी । आले पाहिजे नगरी ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३०२
📿 येथील हा ठसा । गेला
302.
येथील हा ठसा । गेला पडोनिया ऐसा ॥१॥
घरी देवाचा अबोला । त्यासि तेचि सवे त्याला ॥ध्रु॥.
नाही पाहावे लागत । एका एकीच ते रिते ॥२॥
तुका म्हणे जन । तयामध्ये येवढे भिन्न ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रीराम माहात्म्य›
📿 अभंग क्र. ३०२
📿 उत्तम हा चैत्रमास |
302.
उत्तम हा चैत्रमास | ऋतु वसंताचा दिवस ॥१॥
शुक्लपक्षी ही नवमी | उभे सुरवर ते व्योमी ॥२॥
माध्यान्हासी दिनकर | पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रिभुवनी | माझे वंशी चक्रपाणि ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३०२
📿 नीच कामे न धरी लाज ।
302.
नीच कामे न धरी लाज । धांवे देखोनि भक्तांचे काज ।
ऐसा सांवळां चतुर्भुज । रुप धरी गोजिरे ॥१॥
उच्छिष्ट गोपाळांचे खाये । वळत्या त्यांचे देणे आहे ।
राखुनी गोधनें माय । मागे मागे हिंडतसे ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 पांडुरंगाचा वियोग›
📿 अभंग क्र. ३०३
📿 रूदन स्फुंदन अहर्निश
303.
रूदन स्फुंदन अहर्निशी करी । परी वाचे हरी हरी जप सदा ॥१॥
न लागे गोड खाता पाणी पिता । आवडी सर्वथा पंढरीची ॥२॥
निद्रा न लागे करी ऊठी बसी । म्हणे देवा ऐसी तुटी का केली ॥३॥
दिन रात हेचि होय मनी चिंता । चोखा म्हणे आता काय करू ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३०३
📿 नटवर नागर नन्दा भजो
303.
नटवर नागर नन्दा भजो रे मन गोविन्दा
श्याम सुन्दर मुख चन्दा भजो रे मन गोविन्दा ।
तू ही नटवर तू ही नागर तू ही बाल मुकुन्दा
सब देवन मे कृष्ण बड़े है ज्यू तारा बिच चंदा ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३०३
📿 करिता देवार्चन । घरा
303.
करिता देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥धृपद॥
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३०३
📿 न देखता कृष्णवदन । उ
303.
न देखता कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन ।
न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहता ॥१॥
कोठे गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण ।
गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहता ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३०४
📿 प्रकरण :- ॥ नामदेव स
304.
प्रकरण :- ॥ नामदेव स्तुती॥
अखंड ते चित्त वेडावले मन । कोण आवरोन धरी यासी ॥१॥
काय बा करावे काय बा करावे । वोखटे सांगावे कवणापाशी ॥२॥
न करावे ते करिताहे बळे । आमुचिये मेळे न मिळेची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३०४
📿 ज्यांची खरी सेवा । त
304.
ज्यांची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥
करिता स्वामीसवे वाद । अधिक अधिक आनंद ॥धृपद॥.
असावा तो धर्म । मग साहो जाते वर्म ॥२॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३०४
📿 सांवळा देखिला नंदाचा
304.
सांवळा देखिला नंदाचा । तेणे आनंदाचा पुर झाला ॥१॥
काळी घोंगडी हातामध्यें काठी । चारितो यमुनातटीं गोधनें तो ॥२॥
एका जनार्दनी सावंळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहता होती ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३०५
📿 अनुभवे सार पाडिला वि
305.
अनुभवे सार पाडिला विसर । केला संवसार देशधडी ॥१॥
कैसे हे लाघव गुरूराया केले । मज दावियेले माझे हित ॥२॥
बहु काळवरी वाहातसे चिंता । ती आजि सर्वथा दूर केली ॥३॥
चोखा म्हणे या नामयाचे पाय । न विसंबे वो माय जन्मोजन्मी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३०६
📿 अवे वर्म कळले आता ।
306.
अवे वर्म कळले आता । बोलता लाज वाटे चित्ता ॥१॥
ही बरी नव्हे गोष्टी । अंतर बाहेर करी दृष्टी ॥२॥
वर्म आले नाही हाता । तोंवरी वाव सर्वथा ॥३॥
नामा म्हणे चोखियासी । खूण कळली नाही तुसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३०६
📿 जयांचे उदारपण काय वा
306.
जयांचे उदारपण काय वानु । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु ।
वेधीं विधियेलें आमुचे मनु । तो हा देखिला सावळा श्रीकृष्ण ॥१॥
मंजुळ मंजुळ वाजवी वेणु । श्रुतीशास्त्रा न कळे अनुमानु ।
जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया गोवळा म्हणती कान्हू ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रीराम माहात्म्य›
📿 अभंग क्र. ३०८
📿 भांडारी येऊनि करिती
308.
भांडारी येऊनि करिती प्रार्थना | द्विजांसी दक्षिणा काय द्यावी ॥१॥
जया लागे जितुके तितुके त्याने घ्यावे | तुम्ही न रहावे उभे तेथे ॥२॥
धांवताती तेव्हा विप्र सकळिक | एकावरी एक पडताती ॥३॥
करू नका घाई सर्वांसी पुरेल | न राहे दुर्बळ यांत कोणी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३०९
📿 असंग हा संग होतसे अन
309.
असंग हा संग होतसे अन्याय । कवण तो उपाय न सुचे यासी ॥१॥
अवघाचि मातेरा केलासे देहाचा । साच ते सुखाचा नाश केला ॥२॥
बीज ना फळ फोलकट झाले । सेवटासी आले रिते माप ॥३॥
मोजिता मोजिले दृष्टिने पाहिले । चोखा म्हणे गेले वांयाविण ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३०९
📿 मै गिरधर के घर जाऊ ।
309.
मै गिरधर के घर जाऊ ।
गिरधर म्हांरो सांचो प्रीतम देखत रूप लुभाऊं॥
रैण पड़ै तबही उठ जाऊ भोर भये उठि आऊ ।
रैन दिना वाके संग खेलू ज्यू त ।ह्यू ताहि रिझाऊं॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३०९
📿 मुखे बोले ब्रम्हज्ञा
309.
मुखे बोले ब्रम्हज्ञान । मनी धन आणि मान ॥१॥
ऐशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा ॥धृपद॥.
पोटासाठी संत । झाले कलीत बहुत ॥२॥
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३०९
📿 मागे पुढे उभा हाती घ
309.
मागे पुढे उभा हाती घेउनी काठी वळत्या धांवे पाठी गाईमागें ॥१॥
गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥
वासना ते देवे जाया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३॥
ब्रीद ते साच करावे आपुलें । म्हणोनिया खेळे गोपाळांत ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३१०
📿 आजि सोनियाचा दिवस धन
310.
आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥
माझे मज दिले माझे मज दिले । माझे मज दिले प्रेमसुख 1 ॥२॥
बहुत आटणी करिता दाटणी । सुखाचे सुख मनी कोंदाटले ॥३॥
माझा मज देव दावियेला देही । मी तू पण गेले ठायींच्या ठायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३१०
📿 एक वेळ प्रायिश्चत्त
310.
एक वेळ प्रायिश्चत्त । केले चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नावे दोष । त्याचे ओस पाडिले ॥धृपद॥
अनुतापे स्नानविधि । यज्ञ सिद्धी देहहोम ॥२॥
जीवशिवा होता चुका । तेथे तुका विनटला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७›
📿 अभंग क्र. ३१०
📿 तिही त्रिभुवनी सत्ता
310.
तिही त्रिभुवनी सत्ता जयाची । तो गोपाळाचि उच्छिष्टे खाय ॥१॥
खाउनी उच्छिष्ट तृप्तमय होय । यज्ञाकडे न पाहे वांकुडे तोंडे ॥२॥
ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनी काही काळों नेदी ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३११
📿 आपुले आपण करावे कारण
311.
आपुले आपण करावे कारण । दुजीयासी खूण न कळेचि ॥१॥
जयाचा ठेवा तो तयासीच ठावा । येरा कळे हेवा त्याचा कांही ॥२॥
जयाची खूण तयासीच ते ठायी । येरा नेणे जीवी सोय त्याची ॥३॥
चोखा म्हणे माझा नामया तो भला । उगाणा दाविला अनुभवाचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३११
📿 त्रैलोक्य पिळता उबगल
311.
त्रैलोक्य पिळता उबगला नाही । आमचे त्या काई असे ओझे ॥१॥
पाषाणाचे पोटी बैसला दुर्दुर । तया मुखी चारा कोण घाली ॥धृपद॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥