देखिला सुदामा आपुल्य
2234.
देखिला सुदामा आपुल्या नयनी । मग चक्रपाणी उठे त्वरे ॥१॥
सिंहासना खाली टाकोनिया उडी । कर द्वय जोडी नमनालागी ॥२॥
भेटूनिया तेव्हा धरिला हस्तकी । बैसवी मंचकी वैडुर्याच्या ॥३॥
म्हणे रुक्मिणीसी आणी उदकाला । पुजू या द्विजाला सन्मानेंसी ॥४॥
नामा म्हणे देवे चरण प्रक्षाळिले । आंचळी पुसीले आपुलिया ॥५॥
