संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५६०
📿 नववा बैसे स्थिररूप ।
2560.
नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरुप ॥१॥
संत तया दारी । तिष्ठताती निरंतरी ॥२॥
पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ॥३॥
शोभे चंद्रभागा तीर । गरुड हनुमंत समोर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६१
📿 कई ऐसी दशा येईल माझ्
2561.
कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायाचे चिंतन । अवसान ते क्षण नाही मधी ॥धृपद॥
कई ऐसा पात्र होईन लाभासी । नेणो हृषीकेशी तुष्टईल ॥२॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन ते नित्य प्रेमसुख ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५६१
📿 मूळची एक सांगतो खूण
2561.
मूळची एक सांगतो खूण । एक आधी मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिले पांचें परिपूर्णं ॥१॥
ते भरुनी असे उरले । सर्वा ठायी व्यापियलें । जळी स्थळीं सर्व भरले । शेंखीं पाहता नाही उरले ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावले समाधान । नाही उरले भिन्नाभिन्न ॥३॥
शरण एका जनार्दनी । खुण बाणलीं निजमनी । व्यापक दिसे तिही त्रिभुवनी । गेला देहभाव विसरुनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६२
📿 नाही वागवीत जाणिवेचे
2562.
नाही वागवीत जाणिवेचे ओझे । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥
आज्ञा ते प्रमाण हा मनी निर्धार । येणे फिटे भार निश्चयेसी ॥धृपद॥
आळीकर आम्ही एकविध चित्ते । तैसे होऊ येते मायबापे ॥२॥
तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५६२
📿 एक एक म्हणती सकळ लोक
2562.
एक एक म्हणती सकळ लोक । पाहता एका एक हारपलें ॥१॥
एकाविण एक गणीत नाही देख । ते नित्य वोळख निजे आत्मीया रे ॥२॥
त्वंपद असिपद नाही । ठायींच्या ठायी निवोनि पाही ॥३॥
सच्चिदानंद तिन्ही नाम माया । सूक्ष्म कारण तेथे भुलुं नको वाया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६३
📿 काय नाही माझे अंतरी
2563.
काय नाही माझे अंतरी वसति । व्यापक हा भूती सकळा नांदे ॥१॥
चित्तासी प्रसाद होईल चळण । तेचि ते वळण मनासही ॥धृपद॥
सर्व शिक्त जीवी राहिल्या कुंटित । नाही केले होत आपुले ते ॥२॥
तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती । नाचवी नाचती जडे तैसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५६३
📿 लक्ष गांवें तरणी । प
2563.
लक्ष गांवें तरणी । पृथ्वी व्यापी निज करणीं । तो साक्षी अलिप्तपणीं । जोथींच्या तेथे ॥१॥
तैसा आत्म देही । म्हणती त्यासी ज्ञान नाही । तो व्यापुनी सर्वा ठायी । साक्षत्व असे ॥२॥
सदगुरुमुखींचा विचार । जयासी झाला साक्षत्कार । उदेरा ज्ञानभास्कर ।
अज्ञानतिमिरीं ॥३॥ हिरवा पिवळा । संगे रंग जाला निळा । स्फटिक या वेगळा । आत्मा तैसा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६४
📿 देवाचे निर्माल्य कोण
2564.
देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥
वाहिले देह हे देवा एकसरे । होईल ते बरे तेणे द्वारे ॥धृपद॥
होता भार त्याची निवारली खंती । येथे आता रिती साठवण ॥२॥
तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६६
📿 काय करू सांगतांही न
2566.
काय करू सांगतांही न कळे वर्म । उपस्थित भ्रम उपजवितो ॥१॥
मन आधी ज्याचे आले होईल हाता । तयावरी सत्ता केली चाले ॥धृपद॥
अभुकेचे अंगी चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥
तुका म्हणे आप राखावे आपणा । संकोचोचि कोणा नये आता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २५६६
📿 झाली संध्या संदेह मा
2566.
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयी शेजें आला॥धृ०॥
गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदें एकत्र जेथे होती । स्वानुभाव स्नान हे मुक्तास्थिती ॥१॥
सद्बुद्धीचे घालुनि शुद्धासन । वरी सदगुरुची दया परिपुर्ण ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६८
📿 अनुभवाचे रस देऊ आर्त
2568.
अनुभवाचे रस देऊ आर्त भूता । सोडू चोजविता पुढे पोती ॥१॥
देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणी आपुलिया ॥धृपद॥
आधी भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाही ॥२॥
तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत । ते नाही लागत पसरावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५६९
📿 काय मज एवढा भार । हे
2569.
काय मज एवढा भार । हे वेव्हार चालवाया ॥१॥
उकल तो जाणे धणी । मज भोजनी कारण ॥धृपद॥
चिंता ज्याची तया शिरी । लेंकरी ते खेळावे ॥२॥
तुका म्हणे शेवट झाला । देव या बोला भोगिता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कारण देह - अभंग २५६९›
📿 अभंग क्र. २५६९
📿 कारण देह - अभंग
2569.
कारण देह - अभंग
आता कारण जे अज्ञान । तेंहीं गेले वोसरोन । बोधाचे आसन । बैसलें तेथे ॥१॥ कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयी प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥ ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसें पै भरला । मग सर्वांठायीं देखिलां । आत्मबोध ॥३॥ एका जनार्दनी आत्म्याची भेटी । तेथे उडाली त्रिगुण । मग बोधासी राहटी । जेथे तेथे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५७०
📿 एकांती लोकांती करू ग
2570.
एकांती लोकांती करू गदारोळ । लेश तो ही मळ नाही येथे ॥१॥
घ्यावे द्यावे आह्मी आपुलिया सत्ता । न देखो पुसता दुजा कोणी ॥धृपद॥
भांडाराची किल्ली माझे हाती आहे । पाहिजे तो पाहे वान येथे ॥२॥
तुका म्हणे आम्हा विश्वासाच्या बळे । ठेविले मोकळे देवे येथे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५७१
📿 स्मरणाचे वेळे । व्हा
2571.
स्मरणाचे वेळे । व्हावे सावध न कळे ॥१॥
पडिलो विषयांचे ओढी । कोणी न दिसेसे काढी ॥धृपद॥
भांडवल माझे । वेच झाले भूमी ओझे ॥२॥
तुका म्हणे कळे । तूचि धावे ऐसे वेळे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५७२
📿 पाहा हो देवा कैसे जन
2572.
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचिते ॥१॥
एक नाही एका ऐसे । दावी कैसे शुद्ध हीन ॥धृपद॥
पंचभूते एकी राशी । सूत्रे कैसी खेळवी ॥२॥
तुका म्हणे जे जे जाती । त्याची स्थिति तैशी ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५७३
📿 कोणाचिया न पडो छंदा
2573.
कोणाचिया न पडो छंदा । गोविंदासी आळवू ॥१॥
बहुतांची बहु मते । अवघे रिते पोकळ ॥धृपद॥
घटापटा डहुळी मन । होय सीण न करू ते ॥२॥
तुका म्हणे पांडुरंग । भरू भाग आला तो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५७४
📿 एकवेळ करी या दुःखावे
2574.
एकवेळ करी या दुःखावेगळे । दुरिताचे जाळे उगवूनि ॥१॥
आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥धृपद॥
बहु दूरवरी भोगविले भोगा । आता पांडुरंगा सोडवावे ॥२॥
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळूनि सांडी मस्तक हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३›
📿 अभंग क्र. २५७५
📿 मंत्रतंत्राची कथा को
2575.
मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥
ऐसा कलीमाजी अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥
वेदशास्त्री नाही चाड । वाया करिती बडबड ॥३॥
एका जनार्दनी धर्म । अवघा कलीमाजी अधर्म ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५७६
📿 आम्हा सकळा हे । तुझ्
2576.
आम्हा सकळा हे । तुझ्या नामाचेंचि बळ ॥१॥
करू अमृताचे पान । दुजे नेणो काही आन ॥धृपद॥
जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥
तुका म्हणे देवा । तुझे पायी माझा हेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३›
📿 अभंग क्र. २५७७
📿 कोणासी न कळे अवघे जह
2577.
कोणासी न कळे अवघे जहाले मूढ । म्हणती हे गुढ वाया शास्त्र ॥१॥ आपुलाला धर्म नाचरती जनी । अपीक धरणी पीक न होय ॥२॥ अनावृष्टी मेग न पडे निर्धार । ऐसा अनाचार कलीमाजी ॥३॥ एका जनार्दनी नीचाचा स्वभाव । न कळे तया भाव कोण कैसा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३›
📿 अभंग क्र. २५७८
📿 पंडित शास्त्री होती
2578.
पंडित शास्त्री होती नीच याती । त्यांचे ऐकताती नीति ते धर्म ॥१॥ स्वमुखें ब्राह्मण न करती अध्ययन । होती भ्रष्ट जाण मद्यपी ते ॥२॥ नीचाचें सेवक करती घरोघरी । श्वानाचिये परी पोट भरती ॥३॥ एका जनार्दनी आपुलीं स्वधर्म । सांडुनियां वर्म होती मुढ ॥४॥
२५७९
या पोटाकारणें न करावे ते करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचे मुखें ॥२॥ श्रेष्ठवर्ण होउनी नीचकर्म करिती । कांही न ते भीती पुण्यपापा ॥३॥ एका जनार्दनी सांडोनि आचार । करिती पामर नानामतें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३›
📿 अभंग क्र. २५८१
📿 अल्प ते आयुष्य धन कल
2581.
अल्प ते आयुष्य धन कलीं । मर्यादा हे केली संतजनीं ॥१॥ जनमय प्राण न घडें साधन । नोहे तीर्थाटन व्रत तप ॥२॥ असत्याचे गृह भरले भांडार । अवघा अनाचार शुद्धबुद्ध ॥३॥
एका जनार्दनी म्हणोनि । येते कींव । बुडताती सर्व महाडोहीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३›
📿 अभंग क्र. २५८२
📿 कोण मानील हा नामाचा
2582.
कोण मानील हा नामाचा विश्वास । कोण होईल उदास सर्वभावे ॥१॥ कलियुगामाजीं अभाविक जन । करती उच्छेदन भक्तिपंथा ॥२॥ नानापरीचीं मतें नसती दाविती । नानामंत्र जपती अविधीनें ॥३॥ एका जनार्दनी पातकाची राशी । नाम अहर्निशी न जपती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३›
📿 अभंग क्र. २५८३
📿 वंदुं अभाविक जन । ऐक
2583.
वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पै होती ॥१॥
न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिले ॥२॥ यज्ञ यागादिक दान । कोणा न कळे महिमान । अवघे जाहले अज्ञान । न कळे कांही ॥३॥ लोपले मंत्र औषध । गाईस न निघे दुग्ध । पतिव्रता ज्या शुद्ध । व्यभिचार करिती ॥४॥ ऐसियानें करावे काय । तिही ध्यावें विठ्ठल पाय । एका जनार्दनी ध्याय । विठ्ठल नाम आवडी ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५८४
📿 कल्याण या आशीर्वादे
2584.
कल्याण या आशीर्वादे । जाती द्वंद्वे नासोनि ॥१॥
आश्वासिले नारायणे । प्रेमदाने अंतरिच्या ॥धृपद॥
गेली निवारोनि आता । सकळ चिंता यावरी ॥२॥
तुका म्हणे गाता गीत । आले हित सामोरे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५८४
📿 वेषधार्याच्या भावना
2584.
वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८
कलिमाजीं दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकूं । फजीतखोर ऐसे देव तयाचे तोडावर थुंकु ॥३॥ एका जनार्दनी सर्वभावे सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५८५
📿 भक्त रागेला तवकें ।
2585.
भक्त रागेला तवकें । देव फोडोनि केले कुटकें ॥१॥ कटकट मूर्ति मागुती करा । मेण लावुनी मूर्ति जडा ॥२॥ न तुटे न जळे कांही न मोडे । त्या देवाचे केले तुकडे ॥३॥ रांडवा म्हणती आगे आई । कैसा देव फोडिला बाई ॥४॥ जवळींच शुद्ध असता देवो । भक्तांसी पडीला सदेवो ॥५॥ शाळीग्रामक शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥६॥ चवदा गांठींचा बांधिला दोरा । तोही अनंत नेला चोरा ॥७॥ अनंतासी अंतु आला । भक्ता तेथे खेदु जाहला ॥८॥ एका जनार्दनी भावो । नाही तंव कैंचा देवो ॥९॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५८६
📿 बरवे ऐसे आले मना । न
2586.
बरवे ऐसे आले मना । नारायणा या काळे ॥१॥
देव आह्मा प्राणसखा । झाले दुःखा खंडण ॥धृपद॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यासी फळ आले ॥२॥
तुका म्हणे निजठेवा । होईल देवा लाधलो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५८७
📿 प्रेमे पूजी मेसाबाई
2587.
प्रेमे पूजी मेसाबाई । सांडोनिया विठाबाई ॥१॥
काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥
आपुलीये इच्छेसाठी । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥
तैसी नोहे विठाबाई । सर्व दीनाची ती आई ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५८८
📿 पात्र शुद्ध चित्त ग्
2588.
पात्र शुद्ध चित्त ग्वाही । न लगे काही सांगणे ॥१॥
शूर तरी सत्यचि व्हावे । साटी जीवे करूनि ॥धृपद॥
अमुपच सुखमान । स्वामी जन मानवे ॥२॥
तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनी परिपाक ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५८८
📿 सांडोनिया विठाबाई ।
2588.
सांडोनिया विठाबाई । का रे पूजितां मेसाई ॥१॥
विठाबाई माझी माता । चरणी लागो इचे आता ॥२॥
अरे जोगाई तुकाई । इजपुढें बापुड्या काई ॥३॥
एका जनार्दनी माझी आई । तिही लोकी तिची साई ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५९०
📿 पूजिती खंडेराव परत भ
2590.
पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥
लावुनि भंडार दिवटा घेती हाती । विठ्ठल म्हणता लाजती पापमती ॥२॥
ऐसियासी भाव सांगावा तो कवण । एका जनार्दनी काय वाचा शरण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९१
📿 आता हेचि सार हेचि सा
2591.
आता हेचि सार हेचि सार । मूळबीज रे आइका ॥१॥
आवडीने आवडी उरे । जे ज्या झुरे ते त्यासी ॥धृपद॥
प्रेमाचिया सूत्रदोरी । नाही उरी उरवी ॥२॥
तुका म्हणे चिंतन बरे । आहे खरे खऱ्यापे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५९१
📿 फजितीचे देव मागती घु
2591.
फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥
नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसी आम्ही ध्याऊं ॥२॥
अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणे मारिती पशुघात ॥३॥
एका जनार्दनी जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचे काळे तोंड ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९२
📿 केला तैसा अंगीकार ।
2592.
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवी ॥१॥
होऊ अंतराय बुद्धी । कृपानिधी नेंदावी ॥धृपद॥
आम्ही तरी जड जीव । कैचा भाव सपुरता ॥२॥
अनन्यभावे घ्यावी सेवा । आम्हा देवा घडेसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५९२
📿 म्हणती देव मोठे मोठे
2592.
म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगडगोटे ॥१॥
कषाट नेणती भोगिती । वहा दगडातें म्हणती ॥२॥
जीत जीवा करुनि वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥
रांदापोरें मेळ जाला । एक म्हणतो देव आला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९३
📿 सोसे बहुगर्भवासी । म
2593.
सोसे बहुगर्भवासी । मेलो असो उपवासी । नाही सखी ऐसी । येथे कोण भेटली ॥१॥
करी करी रे स्वहित । देह तव हे अनित्य । नाही दिले चित्त । सोडवू मोहापासोनि ॥धृपद॥
पाळी तोंडींचिया घासे । तेचि होय अनारिसे । ज्या नव्हे ऐसे । खेदी परि सोडवीना ॥२॥
तुका म्हणे धनमाने । माझ्या बाटलो मीपणे । नाही दिला मने । देखो लाभे हा लाभ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९४
📿 इच्छिती तयांसी व्हाव
2594.
इच्छिती तयांसी व्हावे जी अरूप । आम्हासी स्वरूप स्थिती चाड ॥१॥
आता नव्हे माझा भाव अनारिसा । पावलानी इच्छा गोवियेली ॥धृपद॥
लेंकरासी कोठे जाणत्याची परी । करू येते दुरी धरावया ॥२॥
लागली न सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगू नका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५९४
📿 प्रतिमेचा देव केला ।
2594.
प्रतिमेचा देव केला । काय जाणे ती अबला ॥१॥
नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२॥
न कळेचि मुढा वर्म । कैसे जाहलेंसे कर्म ॥३॥
प्रतिमा केलीसे आपण । तेथे कैचे देवपण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९५
📿 आम्हा भाविकांची जाती
2595.
आम्हा भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरो शकेचि ना ॥१॥
जाणे माउली त्या खुणा । क्षोभ उपजो नेंदी मना । शांतवूनि स्तना । लावी अहो कृपाळे ॥धृपद॥
तुज अवघे होऊ येते । परी मज वाटो नये चित्ते । उपासने परते । नये काही आवडो ॥२॥
करू रूपाची कल्पना । मुखी नाम नारायणा । तुका म्हणे जना । जनस्थळ देखता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २५९५
📿 देव दगडाचा भक्त तो म
2595.
देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥
खरेपणा नाही देवाचे ते ठायी । भक्त अभाविक पाही दोन्ही एक ॥२॥
एका जनार्दनी ऐसे देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९७
📿 किती रांडवडे । घालून
2597.
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥
माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासिया जवळी ॥धृपद॥
काही न मागता भले । होईल तेचि काम केले । नसावे आथिले । काही एका संकल्पे ॥२॥
तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २५९९
📿 काय वृंदावन माखियेले
2599.
काय वृंदावन माखियेले गुळे । काय जिरे काळे उपचारिले ॥१॥
तैसी अधमाची जातीच अधम । उपदेश श्रम करावा तो ॥धृपद॥
न कळे विंचासी कुरवाळिले अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥
तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६०२
📿 आता तुझे नाम गात असे
2602.
आता तुझे नाम गात असे गीती । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥
अन्नवस्त्रचिंता नाही या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥धृपद॥
सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडा या बंदी सुटलोंसे ॥२॥
घ्यावा द्यावा कोणे करावा सायास । गेली आशापाश वारोनिया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २६०२
📿 देव देही आहे सर्व ते
2602.
देव देही आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे ॥१॥
ऐसे ते भुलले देवा विसरले । तपताती वहिले करुनी कष्ट ॥२॥
देवाची ती भेटी नाही जाहली तया । शिणताती वाया कर्महीन ॥३॥
एका जनार्दनी जवळी असोनी देव । कल्पनेंन वाव केला मने ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६०३
📿 कामक्रोध माझे लाविये
2603.
कामक्रोध माझे लावियेले पाठी । बहुत हिंपुटी झालो देवा ॥१॥
आवरीता तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्ती आश्चर्य हे ॥धृपद॥
तुझिया विनोदे आम्हा प्राणसाटी । भयाभीत पोटी सदा दुःखी ॥२॥
तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हासे कोण समर्थासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २६०३
📿 सर्वात्मक भरला देवो
2603.
सर्वात्मक भरला देवो । तेथे न ठेविती भावो ॥१॥
ऐशी भुललीं कर्मासी । आचरती ती दोषासीं ॥२॥
सर्व ठायी व्यापक हरी । कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥
ऐसे अभागी ते हीन । भोगीताती जन्मपतन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २६०४
📿 देव सर्वाठायी वसे ।
2604.
देव सर्वाठायी वसे । परि न दिसे अभाविका ॥१॥
जळीं स्थळीं पाषाणीं भरला । रिता ठाव कोठे उरला ॥२॥
जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥३॥
एका जनार्दनी नाही भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २६०५
📿 लटिक्या भावाचें । दे
2605.
लटिक्या भावाचें । देवपण नाही साचे ॥१॥
भाव नाही जेथे अंगी । देव पाहता न दिसे जगी ॥२॥
सर्व काळ मनी कुभाव । जैसा पाहे तैसा देव ॥३॥
लटिकी भंड फजिती । एका जनार्दनी निश्चिती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६०६
📿 कासया वाचूनि झालो भू
2606.
कासया वाचूनि झालो भूमी भार । तुझ्या पायी थार नाही तरी ॥१॥
जाता भले काय डोळियांचे काम । जव पुरुषोत्तम न देखती ॥धृपद॥
काय मुख पेव श्वापदाचे धाव । नित्य तुझे नांव नुच्चारिता ॥२॥
तुका म्हणे आता पांडुरंगाविण । न वांचता क्षण जीव भला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६०७
📿 नको मज ताठा नको अभिम
2607.
नको मज ताठा नको अभिमान । तुजवीण क्षीण होतो जीवा ॥१॥
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवी मज ॥२॥
तुका म्हणे तुझे झालिया दर्शन । मग निवारण होईल सर्व ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २६०७
📿 ब्रह्मा एक परिपूर्ण
2607.
ब्रह्मा एक परिपूर्ण । तेथे नाही दोष गुण ॥१॥
पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महादोषी ॥२॥
ब्रह्मी नाहे दोष गुण । पाहती ते मुर्ख जाण ॥३॥
जे गुणदोषी देखती । एका जनार्दनी नाडती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६०८
📿 चाल घरा उभा राहे नार
2608.
चाल घरा उभा राहे नारायणा । ठेवू दे चरणांवरी माथा ॥१॥
वेळोवेळा देई क्षेमआलिंगन । करी अवलोकन कृपादृष्टी ॥धृपद॥
प्रक्षाळू दे पाय बैसे माजघरी । चित्त स्थिर करी पांडुरंगा ॥२॥
आहे त्या संचिते करवीन भोजन । काय न जेवून करिसी आता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वेषधार्याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८›
📿 अभंग क्र. २६०८
📿 मी तेचि माझी प्रतिमा
2608.
मी तेचि माझी प्रतिमा । तेथे नाही आन धर्मा ॥१॥
तेथे असे माझा वास । नको भेदे आणि सायास ॥२॥
कलियुगीं प्रतिमेपरतें । आसना साधन नाही निरुते ॥३॥
एका जनार्दनी शरण । दोन्ही रूपे देव आपण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६१०
📿 अनंताचे मुखी होसील ग
2610.
अनंताचे मुखी होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हा ॥१॥
माझे कोठे आले होईल विचारा । तरीच अव्हेरा योग्य झालो ॥धृपद॥
सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥
तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६११
📿 न करावी चिंता । भय ध
2611.
न करावी चिंता । भय धरावे सर्वथा ॥१॥
दासा साहे नारायण । होय रक्षिता आपण ॥धृपद॥
न लगे परिहार । काही योजावे उत्तर ॥२॥
न धरावी शंका । नये बोलो म्हणे तुका ॥३॥