वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 234. नक्र उद्धार

नत्र्कोउध्दार.

🙏 4. संत नामदेव · ABH-083885 · अभंग क्र. २२४८

2248.
नत्र्कोउध्दार.

नक्र बोले ऐके ह्रषिकेशी । नाममात्रे तारिले गजेंद्रासी ।
काय कृपे झाले मजविशी । आता कैसा बा मोकलूनि जासी ॥१॥
कळले तुझे देवपण आता । सोदी ब्रीद आपुले दीनानाथा ॥ध्रु०॥
दीनानाथ म्हणविसी कशासाठी । द्वैतभाव त्वा धरियेला पोटी ।
कैसे पाप लाविले माझे पाठी । तुझे रूप देखिले आजि द्दष्टि ॥२॥
दिनानाथ बोलती वेद चारी । साधुसंत गाताती नानापरी ।
सत्य ब्रीद मिरवत चराचरी । सोडी ब्रीद आपुले झडकरी ॥३॥
रज मात्रे तारिली अहिल्या शिळा । नामे करुनि उद्धरिले अजामेळा ।
पापी कैसा मी घननीळा । तुझे रूप देखिले म्या आजि डोळा ॥४॥
न्याय ब्रीद घेईन तुझे आता । पापी कैसा मी सांग दीनानाथा ।
कैसे पाप मारिले माझ्या माथा । अझूनि लाज का नये तुझ्या चित्ता ॥५॥
नक्र बोले देवासी हांसू आले । निंदा नोहे स्तवन माझे केले ।
दीनानाथे तात्काळ उद्धरिले । विष्णुदास नामा कौतुक बोले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग