वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 238. मिराबाई

संत मीराबाई.

🙏 4. संत नामदेव · ABH-083910 · अभंग क्र. २२५१

2251.
संत मीराबाई.

राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायी रत सदा ॥१॥
मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीने देवा पूजिताती ॥२॥
सवे मिराबाई जात असे नित्य । वेधलेंसे चित्त कृष्णपायी ॥३॥
मिरा गुणवंती लावण्याची खाणी । आवडे ती मनी मायबापा ॥४॥
म्हणती देवा इचा करावा सांभाळ । हांसे ते वेल्हाळ मिराबाई ॥५॥
मायबापे मज केले कृष्णार्पण । हरुषले मन फार तिचे ॥६॥
वरिला म्या आता द्वारकेचा नाथ । समाधान चित्त झाले माझे ॥७॥
आनंदाने करी देवाचे पूजन । नाचे उल्हासाने प्रेमे डोले ॥८॥
संत आणि साधु येती कीर्तनासी । आनंद मानसी होय तिच्या ॥९॥
संतांचिया पायी मिरा असे लीन । अहोरात्र ध्यान देवाजीचे ॥१०॥
समारंभ ऐसा होता नित्यानित्य । आनंदभरित मायबाप ॥११॥
धन्य मिराबाई भक्तीची आवडी । लागलीसे गोडी देवाजीची ॥१२॥
सज्जन अंतरी संतोष मानिती । निंदक निंदिती तिजलागी ॥१३॥
राजियाने कन्या केखोनि उपवर । द्यावे इशी घर करोनिया ॥१४॥
बोले मिराबाई ऐका तुम्ही ताता । वरिला म्या आता चक्रपाणी ॥१५॥
उभयता तुम्ही केले कृष्णार्पण । ते का हो स्मरण विसरले ॥१६॥
त्यानेम केआ असे माझा अंगिकार । नका पाहू वर दुजा आता ॥१७॥
देवाविण मज नावडे आणीक । मोठे आहे सुख देवापायी ॥१८॥
फार गोडी त्याते वर्णितांचि नये । बोलू आता काय एक मुखे ॥१९॥
तेव्हा मातापिता करिदी उत्तर । बौद्ध अवतार देव झाले ॥२०॥
नामी रूपी त्याच्या असो द्यावे चित । असे सर्व हित प्रपंचाचे ॥२१॥
ओळखूनि रूप करावा संसार । सर्व व्यवहार असे त्यचा ॥२२॥
ऐकोनिया ऐसे खहिताचे ठायी । बोले मिराबाई पितयासी ॥२३॥
आधी ज्याने केले अमृत प्राशन । नावडे त्या धुण कदाकाळी ॥२४॥
मुंगिये लागली साखरेची गोडी । आवडीने उडी घालीतसे ॥२५॥
राजहंस पक्षी मोतीयांचा चारा । आणिक इतरा न सेविती ॥२६॥
तैसा म्या वरिला असे हा गोविंद । नका करू शोध आणिकांचा ॥२७॥
हरि विणे कांहि नेणे मी आणीक । सर्वही जनलोक माझे बाप ॥२८॥
तुम्ही म्हणा बौद्ध झाले चक्रपाणी । संशय हा मनी न धरावा ॥२९॥
भाविकासी द्दश्य अभाविका बौद्धा । मोठा हा सावध नारायण ॥३०॥
लक्षस असे ज्याचे देवाजीचे पायी । येऊनिया राही ह्रदयांत ॥३१॥
त्याचा सर्व धंदा करी चक्रपाणी । बोलिले पुराणी व्यासादिक ॥३२॥
संशय चित्तांत नका धरू आता । सर्व हा जाणता पांडुरंग ॥३३॥
नाम्यासंगे जेवी आवडी हा जाणा । कैसे त्या म्हणा बौद्ध आता ॥३४॥
एकनाथा घरी बाहतसे पाणी । कैसा चक्रपाणी बौद्ध झाला ॥३५॥
कबीराचे मागी विणितसे शेले । जाटाचे राखिले शेत तेणे ॥३६॥
आणिकही कामे भक्तांघरी करी । काय त्याची थोरी वर्णू आता ॥३७॥
राजा म्हणे मिरा समजली पूर्ण । परी जग दूषण ठेविताती ॥३८॥
म्हणोनिया त्याने केली बंदोबस्ती । प्रवेश तो संती न होयची ॥३९॥
मिराबाई म्हणे अहो पांडुरंगा । कांहो संतसंगा अंतरले ॥४०॥
संतांचे संगती आनंद सोहळा । दाखवाल डोळा केव्हा देवा ॥४१॥
कनवाळु मोठी सांवळी विठाई । नेई मिराबाई कीर्तनासी ॥४२॥
श्रुत झाली वार्ता तेव्हा राजियासी । जाते कीर्तनासी मिराबाई ॥४३॥
क्रोधावून नृप बोले त्या कांतेला । देई विष प्याला निरालागी ॥४४॥
लौकिकाची लाज सांडियेली तिणे । उपाय करणे हाचि आता ॥४५॥
तेचि वेळी प्याला भरोनिया विष । आली मंदिरास तेव्हा तिच्या ॥४६॥
येई मिराबाई लाविले दूषण । ऐसे सर्व जन बोलताती ॥४७॥
म्हणोनिया नृपे दिला विष प्याला । कुळासि लाविला डाग तुवा ॥४८॥
बोले मिराबाई सांवळ्या अनंता । तू एक जाणता पांडूरंगा ॥४९॥
गेला तरी जावो सुखे माझा प्राण । निवारी दूषण राजियाचे ॥५०॥
म्हणोनिया नृपे दिला विष याला । ही लाज तुजला देवराया ॥५१॥
मिरा त्यचे पाटी झाली अपवित्र । बोलती सर्वत्नजग ऐसे ॥५२॥
कळेल हो तैशी राखी याची लाज । वारंवार तुज काय सांगू ॥५३॥
करूनिया तेव्हा कृष्णाचे चिंतन । प्याली आवडीने विष प्याला ॥५४॥
नाही बाधा झाली तयाची ते वेळी । मूर्ति झाली काळी देवाजीची ॥५५॥
येऊनिया नृपे विलोकिले डोळा । आणिक सकळा जनानी ते ॥५६॥
धन्य मिराबाई वंदिती चरण । जन्मले निधान वंशामाजी ॥५७॥
मिरा वनमाळी नव्हेचि वेगळी । निश्चय सकळी संती केला ॥५८॥
बोले मिराबाई अहो चक्रपाणी । का तुझी जाचणी सोसितसा ॥५९॥
प्रेमे अश्रुनीर वाहे तिचे डोळा । माझा कळवळा तुम्हा आला ॥६०॥
सांवळे सकुमार गोजिरे चरण । इच्छितसे मन पहावया ॥६१॥
भकांची आवडी पुरवी केशव । पूर्ववत देव झाला तेव्हा ॥६२॥
निळी रेषा असे अद्याप ते कंठी । देता प्रीति मिठी पाहती लोक ॥६३॥
धन्य मिराबाई धन्य तिची भक्ति । करिताती स्तुति साधुसंत ॥६४॥
संतांचा तो दास बोले शिंपिनामा । त्याने दिला प्रेमा सदा मज ॥६५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग