🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ भावार्थ रामायण›📖 रामायण विशेष माहिती›📂 ग्रंथ माहिती›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीभावार्थरामायण
1.
श्रीभावार्थरामायण
नाथांच्या जीवनांतील अखेरच्या कालखंडातील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण होय. उदात्त मानवीय मूल्यांची जननी असलेल्या, भारतीय संस्कृति व सभ्यतेच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या, सर्वाधिक लोकप्रियता लाभलेल्या आदिकवी वाल्मीकि रचित ’रामायण’ या ग्रंथावर प्राकृत भाषेत टीका असलेला हा ग्रंथ ’भावार्थ रामायण’
नाथांनी आपल्या निर्मळ अंतःकरणाने, विशुद्ध आचरणाने अखंड हरिचिंतनाने व उत्कट भावभक्तीने प्रभू श्रीरामाच्या हृदयामध्ये भरतासम स्थान निर्माण केले. प्रभूंनी प्रसन्न होऊन रामायणाचा भावार्थ शब्दबद्ध करण्याचा आदेश दिला, सद्गुरुकृपांकित नाथांनी विवेकपूर्ण भक्तीभाव व अनन्य प्रेम निष्ठेने ओथंबलेल्या आपल्या विचार भावनांना शब्दरूप दिले, आणि नित्यनूतन, चिरंतन, भावभक्ती समृद्धीपूर्ण असे ’भावार्थ रामायण’ साकार झाले. भावार्थ रामायणाने जिज्ञासू व आर्त भक्तांच्या मनबुद्धीची तृप्ती झाली. पढित्यांचे गर्वाहरण झाले. ज्ञान-विज्ञान, विवेक-वैराग्य, गुरूसेवा, गुरुकृपा या सार्यांना प्रभू श्रीरामचंद्राच्या भक्तीरसात रंगून जाऊन आपला जन्म सार्थकी लावू इच्छिणार्या धर्मप्रवण अबालवृद्धांसाठी आणि साक्षेपी, पुरुषार्थी अशा धीर-वीर वाचकांसाठी श्रीसंत एकनाथांनी कोदंडधारी रामायणाचे चरित्र भावार्थ रामायणात गायले.
’भावार्थ रामायण’ एक प्रासादिक महाकाव्य आहे. महाराष्ट्र शारदेच्या कंठातील कौस्तुभमणी आहे. या ग्रंथात भक्ती-भावगंगा दुथडी भरून वाहते आहे. ग्रंथातील ओवीबद्ध उत्कट प्रसंगातून नाथांच्या दिव्य प्रतिभेची, प्रभुदत्त प्रज्ञेची व रामभक्तीची साक्ष ठायी-ठायी लक्षित होते. ग्रंथात गंगेचे ज्ञानपावित्र्य आहे. यमुनेचे भावमाधुर्य आणि सरस्वतीचे मांगल्यनिधान प्रकर्षाने जाणवते आहे. ही शुद्ध, सात्त्विक, अनिर्वचनीय कलाकृती रामभक्तीवर अधिष्टीत असल्याने या ग्रंथातील विचार आणि भाव त्रिकालबाधित व विश्वव्यापक झाले आहेत.
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 संस्कृत आरती संग्रह›
📿 अभंग क्र. १
📿 11.
11.
श्री- अक्कलकोट- स्वामिनः आरतिः ॥
जय देव जय देव, स्वामिन् जय जय हे ॥ जगद्गुरो जय हे ॥
आर्तिक्यम् तव पदयोः दासोऽहम् कुर्वे ॥ जय देव जय देव ॥धृ॥
जन्म गृहीत्वा मानवयोनौ गुरुवर्य
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 तीर्थांच्या आरत्या›
📿 अभंग क्र. १
📿 2.
2.
॥ बद्री नाथ जी २ ॥
पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम |
निकट गंगा बहत निर्मल श्री बद्रीनाथ विश्व्म्भरम |
शेष सुमिरन करत निशदिन धरत ध्यान महेश्वरम |
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›
📿 अभंग क्र. १
📿 झाली संध्या संदेह मा
1.
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम ह्रदयीं शेजे आला ॥धृ॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । असीपदें एकत्र जेथे होती । स्वानुभव स्नान हे मुक्तास्थिती ॥१॥ सद्बुद्धीचे घालुनि शुद्धासन । वरी सद्गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हा । भक्ति बहीण धावूनि आली गांवा । आता संध्या कैसी मी करू केव्हा ॥३॥ सहज कर्मे झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन । ऐसे ऐकता निवती साधुजन । एका जनार्दनी बाणली निज खुण ॥४॥
🙏 पालखी सोहळा दिंडी नंबर›📚 संतांचे पालखी सोहळे›📖 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा›📂 ज्ञानेश्वर म. सोहळा ( उपलब्ध सेवा )›
📿 अभंग क्र. १
📿 संत ज्ञानेश्वर महारा
1.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा सरकारच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज पालखी सेवा समिती अर्थात संस्था कमिटीच्या वतीने तसेच दिंडी चालक आणि दिंडी मालक यांच्या वतीने तथा समाजातील उदार दानशूर यांच्या वतीने आणि सरकारी पातळीवर तथा समाजसेवी संस्था वेगवेगळे मंडळे यांच्या वतीने भोजन अन्न वस्त्र निवारा पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध असतात ज्या गावांमध्ये पालखीचा मुक्काम असतो तेथे स्थानिक पातळीवरील सर्व गावकरी मंडळी ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका तथा गावातील उदार गावकरी यांच्याकडून विनामूल्य सेवा वारकऱ्यांसाठी उपलब्ध असतात
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत निळोबा निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 मार्ग दाउनि गेले आधी
2.
मार्ग दाउनि गेले आधी । दयानिधी संत पुढे ॥१॥
तेणेचि पंथे चालो जाता । न पडे गुंता कोठेंकाही ॥२॥
मोडोनिया नाना मते देती सिद्धांते सौरसु ॥३॥
निळा म्हणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 बोले तैसा चाले । त्य
2.
बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ॥१॥
अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन ॥२॥
त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडूनि कर ॥३॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत जनाबाई निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 गंगा गेली सिधूपासी ।
2.
गंगा गेली सिधूपासी । त्याने अव्हेरिले तिसी ॥१॥
तरी ते सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्ठला ॥२॥
जळ कोपे जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी म्हणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत निवृत्तीनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 नित्य नाम वाचे तोचि
2.
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचे शुद्ध पुण्य इये जनी ॥१॥
रामनाम कीर्ती नित्यमंत्र वाचे । दहन पापाचे एका नामे ॥२॥
ऐसा तो नित्यता पढे तत्वनाम । नाही तयासम दुजे कोणी ॥३॥
निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे । नित्यता तै सोपे रामनाम ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण पहिले अभंग ११›
📿 अभंग क्र. २
📿 वचन ऐका कमळापती । मा
2.
वचन ऐका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥
कर जोडितो कथेकाळी । आपण असावे जवळी ॥२॥
घ्यावी घ्यावी माझी भाक । जरी का मागेन आणिक ॥३॥
तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 दत्त जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 धरी अवतार विश्व तारा
2.
धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनसूया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनी पूर्ण तिथि ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव काळ ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २
📿 आधिल्या भ्रतारे काम
2.
आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलिये ॥१॥
रात्रंदिवस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आता । रातले अनंता तुका म्हणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा›
📿 अभंग क्र. २
📿 नावडे जे चित्ता । ते
2.
नावडे जे चित्ता । तेचि होसी पुरविता ॥१॥
का रे पुरविली पाठी । माझी केली जीवेंसाठी ॥२॥
न करावा संग । वाटे दुरवावे जग ॥३॥
सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 संत सदन महिमा›
📿 अभंग क्र. २
📿 वैष्णवाघरी देव सुखाव
2.
वैष्णवाघरी देव सुखावला । बाहीर न वजे दवडोनी घातिला ॥१॥
देव म्हणे माझे पुरतसे कोडा । संगती या गोड वैष्णवांची ॥२॥
जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनी पाहे तव घराभीतरी ॥३॥
कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनी पडली मिठी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 त्र्यंबकेश्वर महात्म्य›
📿 अभंग क्र. २
📿 वाचे म्हणता गंगा गंग
2.
वाचे म्हणता गंगा गंगा । सकळ पापे जाती भंगा ॥१॥
दृष्टी पडता ब्रह्मगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥२॥
कुशावर्ती करिता स्नान । त्याचे वैकुंठी राहणे ॥३॥
नामा म्हणे प्रदक्षिणा । त्यासी जन्म नाही पुन्हा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 विठ्ठल नाम नुच्चारिस
2.
विठ्ठल नाम नुच्चारिसी । तरी रवरव कुंडी पडसी ॥१॥
विठ्ठल नाम उच्चारी । आळसु न करी क्षणभरी ॥२॥
विठ्ठल नाम तीन अक्षरे । अमृतपान केले शंकरे ॥३॥
रखुमादेविवरा विठ्ठले । महापातकी उध्दरिले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 रविवारचे अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 भीमातीरी एक वसविले न
2.
भीमातीरी एक वसविले नगर । त्याचे नांव पंढरपूर रे ।
तेथील मोकाशी चार भुजा त्यासी । बाईला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊ त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसांवा रे ।
पुढे गेले ते निधाई झाले । वानितील त्यांची सीमा रे ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 शनिवारचे अभंग›
📿 अभंग क्र. २
📿 काम घातला बांदोडी ।
2.
काम घातला बांदोडी । काळ केला देशोधडी ॥१॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥२॥
शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्यांड जो पुच्छे ॥३॥
रामरायाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. २
📿 अगाध हे कीर्ति विठ्
2.
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकाची काय सांगो ॥१॥
पुराणे भागली नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥
शेषादिका जेथे न कळेचि अंत । तेथे मी पतित काय वानू ॥३॥
चोखा म्हणे माझा नाही अधिकार । कैसा हा विचार होईल नेणो ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २
📿 अवधे सुखाचे सांगाती
2.
अवधे सुखाचे सांगाती । दुःख होता पळती आपोआप ॥१॥
भार्या पुत्र भगिनी माता आणि पिता । हे अवघे सर्वथा सुखाचेचि ॥२॥
इष्ट आणि मित्र स्वजन सोयरे । सुखाचे निधरि आप्तवर्ग ॥३॥
अंतकाळी कोणी नये बरोबरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २
📿 आपुलिया ब्रीदा आपण स
2.
आपुलिया ब्रीदा आपण सांभाळी । तूंचि माझा बळी मायबाप ॥१॥
तुम्हांविण कोणा जाऊ मी शरण । का हो अभिमान नये माझा ॥२॥
हीन याती दीन पतीत आगळा । म्हणोनि कळवळा नये माझा ॥३॥
बंका म्हणे आहे पंढरीनिवासा । तुजविण आशा दुजी नाही ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. २
📿 अजब सलुनी प्यारी मृग
2.
अजब सलुनी प्यारी मृगया नैनो । ते मोहन वश कीधो रे॥धृ०॥
गोकुळ मा सौ बात करेरे बाला का न कुबजे वश लीधो रे॥१॥
मनको सो करी ते लाल अंबाडी अंकुशे वश कीधो रे॥२॥
लवींग सोपारी ने पानना बीदला राधांसु रारुयो कीनो रे॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २
📿 नये जरी तुज मधुर उत्
2.
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥१॥
नाही तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥धृपद॥
देवापाशी मागे आवडीची भक्ति । विश्वासेशी प्रीति भावबळे ॥२॥
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २
📿 अरे कान्हा अरे कृष्ण
2.
अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा । काय मी वर्णू तुझ्या रुपाची शोभा ॥1॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी । भावे भक्ती करोनी शरण आलो पायी ॥2॥
आकळे तुझा महिमा न ब्रह्मादिका । साधु आणि संता नामे सापडसी एका ॥3॥
सकळ तीर्थांचे मंडण अवघे तुझे पायी । अनंत तीर्थे घडली राया तुझे ठायी ॥4॥