उत्तम अन्न देखता दिठ
2233.
उत्तम अन्न देखता दिठी । ठेवी पोटी जतन ते ॥१॥
तान्हुल्याची वाहे चिंता । जेवी माता बाळाते ॥२॥
न कळे तया उत्तम कडु । परी परवडु माता दावी ॥३॥
एका जनार्दनी तैसा देव । घेत धांव भक्ताघरी ॥४॥