🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ९३
📿 आता कणकण न करी वाउगी
93.
आता कणकण न करी वाउगी । होणार ते जगी होउनी गेले ॥१॥
दारी परवरी झालोसे पोसणा । तुम्हांसी करूणा न ये कांही ॥२॥
होयाचे ते झाले असो का उदास । धरोनिया आस राहो सुखी ॥३॥
चोखा म्हणे मज हेचि बरे दिसे । न लावी पिसे जीवा कांही ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ९३
📿 छैल बिराणे लाख को हे
93.
छैल बिराणे लाख को हे अपणे काज न होइ ।
ताके संग सीधारता हे, भला न कहसी कोइ ।
वर हीणो आपणो भलो हे, कोढी कुष्टि कोइ ।
जाके संग सीधारता है, भला कहै सब लोइ ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९३
📿 अतिवादी नव्हे शुद्ध
93.
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाही ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचे वचन न मानी जो ॥धृपद॥
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवो नये ॥२॥
अर्थ :
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९३
📿 विठो सर्वाचा भार । ह
93.
विठो सर्वाचा भार । हृदयी घ्या रे निरंतर ॥
विठोबा हा काळाचा काळ । महा भलासि कृपाळ ॥
सत्य वचन निर्धार । शरण जावे रघुवरा ॥
बोधला म्हणे हे सती । साक्षे रखुमाईचा पती ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ९३
📿 गहेरी करके बिन खुदाई
९३.
गहेरी करके बिन खुदाई । उपर मंडप छाये मारकंडे ते कवन काई ॥१॥
जीन तीर्णधर मूड बुलाए । हमरो कर्ता राम सनेही । काहेरे नर गर्व करत है । बिनस जाय कूठी देही ॥२॥
मेरी मेरी कयरो करते दूर जो धनसे भाई । बारह जो जन छत्र चलेथा । देही गिरजन खाई ॥३॥
सब सोनेकी लंका होती । रावणसे अदकाई । कहाभयो दरबाधे हाती खीनमे भई पराई ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 वत्सासुर व बकासुर वध›
📿 अभंग क्र. ९३
📿 वत्सासुर व बकासुर वध
93.
वत्सासुर व बकासुर वध.
चालियेल तेव्हा गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदाने ॥१॥
वत्साचिया वेषे वत्सासूर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥
पाहोनिया ऐसे तयासी मारिले । झोंकोनिया दिल्हे आकाशाते ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ९४
📿 पंढरीच्या राया । माझ
94.
पंढरीच्या राया । माझी विनवणी पाया ॥1॥
काय वर्णू हरिच्या गोष्टी । अनंत ब्रह्मांडे याचे पोटी ॥2॥
सेना न्हावी याचे घरी । अखंड राबे विठ्ठल हरी ॥3॥
राम चिंता ध्यानी मनी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९›
📿 अभंग क्र. ९४
📿 पदपदार्थ संपन्नता ।
94.
पदपदार्थ संपन्नता । व्यर्थ टवाळी का सांगता ।
हरीनामी नित्य अनुसरता । हे सार सर्वार्थी ॥
हरिनाम सर्व पंथी । पाहावे न लागे ये अर्थी ।
जे अनुसरले ते कृतार्थी । भवपंथा मुकले ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ९४
📿 आता याचा संग (अर्थ)
94.
आता याचा संग (अर्थ) पुरे पुरे देवा । येऊ द्या कनवाळा तुम्हालागी ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझे तो हरि कांही न चाले ॥२॥
वारंवार करूणा करितो देवराया । का न ये कनवाळा तुम्हांलागी ॥३॥
चोखा म्हणे आता न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग २›
📿 अभंग क्र. ९४
📿 डर गयोरी मन मोहनपास,
94.
डर गयोरी मन मोहनपास, डर गयोरी मन मोहनपास॥१॥
बीरहा दुबारा मै तो बन बन दौरी । प्राण त्यजुगी करवत लेवगी काशी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हरिचरणकी दासी॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९४
📿 शब्दा नाही धीर । ज्य
94.
शब्दा नाही धीर । ज्याची बुद्धि नाही स्थिर ॥१॥
त्याचे न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥धृपद॥
संतासी जो निंदी । अधम लोभासाठी वंदी ॥२॥
तुका म्हणे पोटी । भाव अणीक जया ओठी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९४
📿 विषये पाहे विख । याच
94.
विषये पाहे विख । याचे मानाल सुख । आवडी खाऊ जाता पुढे ।
भोगसिल दुःख । तुझे तु भोगसिल । जन पाहती कौतुक ॥
विषये पाही विख । जे जे सेवित गेले ।
बळेच उडी टाकुनी । आपण बुडाले ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ९५
📿 जंबु या द्वीपामाजी ए
95.
जंबु या द्वीपामाजी एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नांव ।
चला जाऊ तया ठाया । कांही भोजन मागाया ॥१॥
विठोबाचा धर्म जागो । त्याची चरणी लक्ष लागो ॥२॥
ज्यासी नाही पंख पाय तेणे करावे ते काय । शुध्द भाव धरोनिया पंढरपुरासी जावे ।
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नामसंकीर्तन महात्म्य > अभंग ८५ ते १०९›
📿 अभंग क्र. ९५
📿 सर्वव्यापक सर्व देही
95.
सर्वव्यापक सर्व देही आहे । परी प्राणीयांसी सोय न कळे त्याची ॥
परमार्थ तो कडु विषय तो गोडु । तया अवघडु संसार ॥
नामाचे साधन जिव्हे लावी बाण । तया प्रेमे वैकुंठ जवळी असे ॥
सुलभ आणि सोपारे केलेंसे दातारे । आम्ही एकसरे उच्चरिले ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ९५
📿 आता याचा छंद नकोसा ह
95.
आता याचा छंद नकोसा हा झाला । वोकुठा आला संसाराचा ॥१॥
विटले जे अन्न घेतसे चिळशी । तैसे ये विषयी झाले असे ॥२॥
आता हे अवघे दु:खाचे प्रकार । न सोसवे धीर धरवेना ॥३॥
चोखा म्हणे आता पुरे याचे जिणे । पुढील ते पेणे अंतरले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९५
📿 चोरे चोराते करावा उप
95.
चोरे चोराते करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागे वेचिता पाउले । होईल आपुले तिच्या ऐसे ॥धृपद॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥
अर्थ :
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९५
📿 विश्वास धरावा मनी ।
95.
विश्वास धरावा मनी । मग पुरवीत आहे धनी । उपमन्यालागोनि । कैसे केले ॥
अज्ञान लेकरु । परि केलासे निर्धारु । दिधला क्षीरसागरु । त़यालागी ॥
ऐसा कृपासिंधु । अनाथाचा बंधु । बहुतांसि आनंदु । केला त्याने ॥
जे जे ऐकत होतो कानी । ते पाहिले नयनी । बोधला चरणी विनटला ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ९५
📿 पाडपडोसन पुछले नामा
९५.
पाडपडोसन पुछले नामा । काप है छानछवाई हो । तो पै दुगुणी मजुरी देउ । मोको बेडी देउ बताई हो ॥१॥
रिबाई बेडी देनन जाई । देख बेडी रह्यो समाई ॥ध्रु०॥
हमारे बेडी प्राण धारा बेडी प्रत । मजुरी मागे जो कोई छान छवाने हो ।
लोक कुटुंब सब हूते तोरे । तो आपन बेडी आवे हो ॥२॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ९५
📿 योगियांचे धन ते ब्रह
95.
योगियांचे धन ते ब्रह्म संपन्न । तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥
हरीरूप माये सर्वाघटी आहे । दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥
चिंति अजामेळा नाम आले मुखा । तो वैकुंठीच्या सुखा देत हरि ॥३॥
निवृत्तिचे धन जगाचे जीवन । नाम नारायण तरुणोपाव ॥४॥
96.
म्हणऊनि शरण जावे । सर्वभावे देवासी ॥१॥
तो हा उतरील पार । भव दुस्तर नदीचा ॥२॥
बहु आहे करुणावंत । अनंत हे नाम ज्या ॥३॥
तुका म्हणे साक्षी आले । तरी केले प्रगट ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग २›
📿 अभंग क्र. ९६
📿 राग प्रभाती
96.
राग प्रभाती
थे तो पलक उघाड़ो दीनानाथ,मै हाजिर-नाजिर कद की खड़ी॥
साजणिया दुसमण होय बैठ्या, सबने लगू कड़ी ।
तुम बिन साजन कोई नहि है, डिगी नाव मेरी समंद अड़ी॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९६
📿 मांडवाच्या दारा पुढे
96.
मांडवाच्या दारा पुढे । आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचे तोंड ॥धृपद॥
समय न कळे । काय उपयोगी ये वेळे ॥२॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९६
📿 सकाळी उठोनी हरिचे ना
96.
सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा । नाम उच्चारिता तुटे पातक थारा ॥
हरिचे जे नाम ज्याच्या येईल वाचे । ते नर सदैव भाग्याचे । ते ऐक जीव दैवाचे ॥
हरिचे जे नाम जे जे उच्चारित गेले । हरिरुप होऊन ते नर वैकुंठी ठेले ॥
बोधला म्हणे देवा नाम उच्चारित गेलो । नाम उच्चारिता विठ्ठल पायी विनटलो ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ९६
📿 जो राज दे तब कबन बढा
९६.
जो राज दे तब कबन बढाई । जो भीक मंगावे तव क्या घटा जाई ॥१॥
तू हर भज मन मेरे पद निर्बाना । बहूर न होये तेरा आबज जोना ॥२॥
सब ते उपाई परम पुलाई । जिस तू देवे तिसे भुजाई ॥३॥
सतगुरू मिले तब संसार जाई । किसहू पुजू दुजा नजर न आई ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ९७
📿 चोखामेळा संत भला । त
97.
चोखामेळा संत भला । तेणे देव भुलवीला ॥1॥
भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटी ॥2॥
चोख्यामेळ्याची करणी । तेणे देव केला ऋणी ॥3॥
लागा विठ्ठल चरणी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ९७
📿 आता कोठवरी करू विवंच
97.
आता कोठवरी करू विवंचना । का हे नारायणा तुम्हा न कळे ॥१॥
सांपडलो जाळी गुंतलोंसे गळी । जीव हळहळी वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलो हाती । बहुत फजीति होय तेणें॥ ॥३॥
नेणो कैसे दु:ख पर्वतायेवढे । सुख राई पाडे झाले मज ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९७
📿 संसार महाझट । तेथे भ
97.
संसार महाझट । तेथे भव खटपट । उणे पुरे बोलता रे । कहि न भरे पोट । संसार हा महाझट ॥
धन वित्त पुत्र नारी । आवघी मिळोनी धरा । दया धर्म न धर त्याने केला मातेरा ॥
सदा हाल हाल मोठी दयाधर्म नाही पोटी । प्रपंची वेढिले रे पाहिले माया जाळ मिठी ॥
आता तरी हित करी । स्वहित विचारी व्यर्थ तू पडो । नको पाहे मायेचे घरी ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 राधाविलास - अभंग ७८ ते १०२›
📿 अभंग क्र. ९७
📿 गोकुळी गोमाई गवळणी ।
97.
गोकुळी गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणी । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥
कृष्णा पाहता मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागले ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥
सर्वें एके होती शेजारीण । आली सदनासी धांवुन । गोमाईसी वर्तमान । अवघे विदित केले ॥३॥
राखी लपवी आपुल्या सुना । सुनेचें नख दृष्टी पडुं देइना । जर का येशील माझे सदना नासिका चुना तीन बोटे ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ९७
📿 वेदबीज साचे संमत श्र
97.
वेदबीज साचे संमत श्रुतीचे । गुह्य या शास्त्रांचे हरि माझा ॥१॥
तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु । कृष्ण मुक्ती देतु देतु जीवघाते ॥२॥
अर्जुना साहाकारी द्रौपदी कैवारी । तो विदुराचे घरी अन्न मागे ॥३॥
निवृत्तिचे धन गोकुळी श्रीकृष्ण । यादव सहिष्णु हरि माझा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , आंधळे अभंग›
📿 अभंग क्र. ९८
📿 धर्म अर्थ काम मोक्ष
98.
धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरु । हस्त पाद शरीर व्यथा पंगु झालो मी पुढारु ।
तिमिर आले पुंढे मायामोहो उदारु । तेणे मी जात होतो मग सहज भेटला सद्गुरु ॥१॥
धर्म जागो सद्गुरु महिमा जेंणे तुटे भवव्यथा । हाचि धर्म अर्ध काम येर ते मी नेघे वृथा ॥२॥
एक नाम कृष्ण याचे दान देई सद्गुरु । वेदशास्त्र मथन केले परि नव्हेचि पुढारु ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९८
📿 कन्या गौ करी कथेचा व
98.
कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावे ॥१॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशी कारण नाही देवा ॥२॥
आशाबद्ध नये करू ते करिती । तुका म्हणे जाती नरकामधी ॥३॥
अर्थ :
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९८
📿 सकळाचे डाळ मुळ आवघाच
98.
सकळाचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ । न कळे त्याचि कळ ब्रह्मादिका ॥
जया जैसा भाव त्यासि तैसा देव योगिया । अनुभव घेऊनि राही ॥
उदक पाहे जीवन तेथे । वसवी लवण दोहीस भिन्नपण कैचे तेथे ॥
जैसे पाहे चाळविता बुधि पाहे खेळविता । ज्याचा जैसे चिता उपावो करि ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 राधाविलास - अभंग ७८ ते १०२›
📿 अभंग क्र. ९८
📿 दही दुध चोरुनी दे सर
98.
दही दुध चोरुनी दे सर्वांना । ऐसे मज सांगताती । आई मज मारुं नको । नाही नाही म्या पाहिली माती ॥१॥
ते न ऐकिलें म्हणोनि मजवर । रुसले सांगाती । बळीरामही जो भेटला । तोही माझा पक्षपाती ॥२॥
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें । आम्ही भजूं दीनराती ॥३॥
99.
भावे गावे गीत । शुद्ध करुनिया चित्त ॥१॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥२॥
आणिकांचे कानी । गुण दोष मना नाणी ॥३॥
मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. ९९
📿 माझा लोभ नाही देवा ।
99.
माझा लोभ नाही देवा । तुझी करी ना मी सेवा ॥1॥
नाही अंगी थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥2॥
रामा येऊनि काय करिसी । तुझे बळ आह्मांपासी ॥3॥
नाही सामर्थ्य तुज हरी । जनी ह्मणे धरिला चोरी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. ९९
📿 आपुल्या आपण सांभाळोन
99.
आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावे । आहे नाही ठावे तुम्हा सर्व ॥१॥
वायांचि करणे लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणे हे ॥२॥
अंगा नाही आले तंव ते साहाले । खादले पचले तरी ते हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचे तुम्हासी सांगणे । माझे यांत उणे काय होते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ९९
📿 हरीहरा भेद । नाही कर
99.
हरीहरा भेद । नाही करू नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ॥धृपद॥
भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥२॥
उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ९९
📿 सकळ सखियास करित़से व
99.
सकळ सखियास करित़से विनंती । समजावुनि द्या मज ॥
रामाचे भेटीला मन हे उदासीन । नव्हे समाधान काही केल्या ॥
व्यर्थ माझा देहे । जात असेवाया । भेटावया देवराया जिवलगा ॥
मग सकळिका मिळोनी एकरुप जाल्या । घेउनी राम आल्या घरा माझ्या ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 ब्रह्मदेव गर्व परिहार›
📿 अभंग क्र. ९९
📿 ब्रह्मदेव गर्वपरिहार
99.
ब्रह्मदेव गर्वपरिहार
गडी आणि रमापती । तेव्हा आनंदे जेविती ॥१॥
कोणी मांडिताती पाने । वरी ठेविताती अन्ने ॥२॥
कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥