भक्तिभावार्थ अर्पिला
2238.
भक्तिभावार्थ अर्पिला । देव सर्वांगी धरिला ॥१॥
रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळा ॥२॥
भक्त अर्पिता आवडी । देव जाणे त्याची गोडी ॥३॥
भक्तभाव जाणोनि पाही । एका जनार्दनी राहे देही ॥४॥