संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग›📂 एकादशी अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 एकादशी व्रत सोमवार न
5.
एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥१॥
काय करू बहु वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ॥२॥
हरिहरासी नाही बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥
तुका म्हणे नाही नारायणी प्रीति । कोण त्यांची गति होईल नेणो ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 पुंडलिक स्तुती महात्म्य›
📿 अभंग क्र. ५
📿 पंढरीचे वारकरी । ते
5.
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले ॥२॥
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥३॥
तुका म्हणे खरे झाले । एका बोले संतांच्या ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 संत तेचि जाणा जगी ।
5.
संत तेचि जाणा जगी । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकी सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी ॥३॥
मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. ५
📿 (घोंगडीची रूपके)
5.
(घोंगडीची रूपके)
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशी ते ही होते ॥१॥
माझियाचा माग दावा । केला गोवा उगवो द्या ॥धृपद॥
व्हावे ऐसे निसंतान । घेईन आन तुजपाशी ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरीत प्रवेश करतांनाचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 अवघे जेणे पाप नासे ।
5.
अवघे जेणे पाप नासे । ते हे असे पंढरीसी ॥१॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥२॥
अवघी सुखाचीच राशी । पुंडलिकाशी वोळली ॥३॥
तुका म्हणे जवळी आले । उभे ठेले समचरणी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरीत प्रवेश केल्यानंतरचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 करोत तपादि साधने । क
5.
करोत तपादि साधने । कोणी साधोत गोरांजने ॥१॥
आम्ही न वजो तया वाटा । नाचू पंढरी चोहटा ॥२॥
पावोत आत्मस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥३॥
तुका म्हणे छंद । आम्हा हरीच्या दासा निंद्य ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 भवसागर तरता । का रे
5.
भवसागर तरता । का रे करीतसा चिंता ।
पैल उभा दाता । कटी कर ठेवुनिया ॥१॥
त्याचे पायी घाला मिठी । मोल नेघे जगजेठी ।
भावा एका साठी । खांदा वाहे आपुल्या ॥धृ॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 सोमवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 शिव भोळा चक्रवर्ती ।
5.
शिव भोळा चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्ती ॥१॥
वाचे वदता शिवनाम । तया न बाधी क्रोध काम ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखता प्रत्यक्ष ॥३॥
एका जनार्दनी शिव । निवारी कळी काळाचा भेव ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 रविवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 बाराहि सोळा गडियांचा
5.
बाराहि सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
जतिस्पद राखो जाणे टिपरिया घाई । अनुहत वाय मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहु रे ॥२॥
सा चहु वेगळा अठरा निराळा । गाऊ वाजवू एक चाळा रे ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 शनिवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ५
📿 मी तो अल्पमती हीन ।
5.
मी तो अल्पमती हीन । काय वर्णु तुमचे गुण ।
उदकी तारिले पाषाण । हे महिमान नामांचे ॥१॥
नाम चांगले माझे कंठी राहो भले ।
कपिकुळ उध्दरिले । मुक्त केले राक्षसा ॥२॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७›
📿 अभंग क्र. ५
📿 तुज सगुण म्हणो की नि
5.
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ॥
अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥
तुज स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एक गोविंदु रे ॥
तुज आकारू म्हणो की निराकारू रे । आकारू निराकारू एकु गोविंदु रे ॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५
📿 आणिक देवाचे न करा सा
5.
आणिक देवाचे न करा साधन । वाया होय शीण आदि अंती ॥१॥
आपुलिया पोटा आणिका पीडिती । ते काय पुरविती मन इच्छा ॥२॥
रीटी सुठी लागी पीडिताती जगा । हेचि त्यांचे अंगा देवपणा ॥३॥
म्हणोनि तयांचे नका पडू भरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५
📿 इतुक्या माजी चोखा घर
5.
इतुक्या माजी चोखा घरासी तो आला । वृत्तांत निवेदिला सोयराई ॥१॥
येरू म्हणे हे काय अनुचित केले । बोल ते लाविले आपणासी ॥२॥
जातिचे तो महार जग जाणताती । आपुली फजिती आपुल्या हाते ॥३॥
कासयाचा पुत्र कोणाचा तो कोण । आपुले कारण साधी आधी ॥४॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ५
📿 आपण वाढवावे आपण बुडव
5.
आपण वाढवावे आपण बुडवावे । ऐसी रिती बरवे तुमचे घरी ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समथार्च्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उकच्छष्टाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हा ॥३॥
क मर्मेळा म्हणे पंढरीनिवासा । उगा हा फांसा लवकरी ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ५
📿 आजि सुचिन्हे दिसती स
5.
आजि सुचिन्हे दिसती स्पुरति बाहे । आजी भेटिला येईल कृष्ण माये वो ॥
यालागि हारुष वाटतो माझे मनि वो । आजि भेटिला येईल आमचा धणि वो ॥
बैसोनि सांगन गुज गोस्टी वो । उठोन आवडिने गळा घालिन मिठी वो ॥
प्रीती लोळणी घालिन पाया वरी वो । लोक म्हणती निलाज जाली पोरे वो ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय ५ वा›
📿 अभंग क्र. ५
📿 🕉अध्याय ५ नवनाथ भक्त
5.
🕉अध्याय ५ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय पाचवा - फलश्रुति 👉 घरात पिशाच्चसंचार होणार नाही. ती घरात असतील तर त्रासून निघून जातील.
श्रीगणेशाय नमः
🙏 संस्कृत ग्रंथ›📚 सार्थ पंचदशी (विद्यारण्यतीर्थ)›📖 पंचदशी परिच्छेद एकूण १५›📂 पञ्चमः परिच्छेदः - महावाक्यविवेकः›
📿 अभंग क्र. ५
📿 पञ्चमः परिच्छेदः - म
5 पञ्चमः परिच्छेदः - महावाक्यविवेकः
येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च ।
स्वाद्वस्वादू विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥१॥
अर्थ :
गुरु - आता तुला चार वेदांतील चार महावाक्यांचा अर्थ क्रमेंकरून सांगतो. त्यांत प्रथमतः ऋग्वेदापैकी ऐतरेयारण्यकोपनिषदांतील ''प्रज्ञानं ब्रह्म'' या महावाक्यांतील '''प्रज्ञान'' शब्दाचा अर्थ सांगतो. ज्या चैतन्याच्या योगेंकरून हा जीव पहातो, ऐकतो, वास घेतो, बोलतो व हे गोड आणि हे कडू असे रसनाद्वारें जाणतो, त्यास ''प्रज्ञान'' असे म्हटले आहे. शिष्य - "प्रज्ञान'' या शब्दाचा अर्थ समजला. आता ब्रह्म म्हणजे काय ते कृपा करून सांगा. ॥१॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. ६
📿 हरि बोलो भाई हरि बोल
6.
हरि बोलो भाई हरि बोलो भाई । हरि ना बोले वांकु राम दुर्हाई ॥१॥
काहेकु पढता खिन खिन गीता । हरिनाम लिया सो सब कुछ होता ॥२॥
मेरा मेरा कर कर क्या फल पाया । हरिके भजन बिना झुठ गमाया ॥३॥
कहत कबीर हरिगुन गाना । गावत गाचत वैकुंठ जाना ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 अजानवृक्षांची पाने ज
6.
अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान ।
त्यासी साध्य होईल ज्ञान । जेथे संशय नाही ॥१॥
ज्ञानेश्र्वरी तीन सप्तके । जो श्रवण करील विवेके ।
तो होय ज्ञानी अधिके । येथे संशय नाही ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 मनुष्य करिसी तरी भक्
6.
मनुष्य करिसी तरी भक्तीचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥१॥
श्वान करिसी तरी उच्छिष्टाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥२॥
पक्षी करिसी तरी चारियाचेनि मिषे । तुझे द्वारी वसे ऐसे करी ॥३॥
झाड करिसी तरी तुळसोचेनि मिषे । तुझे द्वरी वसे ऐसे करी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत मीराबाई निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 मै अपने तो नारायणकी
6.
मै अपने तो नारायणकी । हो गयी आपही दासी ॥१॥
विषका प्याला राजाजीने भेजा । पीबत मीरा हासी ॥२॥
लोग कहे मीरा भई रे बावरी । बाप कहे कुल नासी ॥३॥
मीराके प्रभु गिरिधन नागर । हरिचरणकी दासी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 गुणा आला विटेवरी । प
6.
गुणा आला विटेवरी । पितांबरधारी सुंदरजो ॥१॥
डोळे कान त्याचे ठायी । मन पायी राहो हे ॥२॥
निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयाची ॥३॥
तुका म्हणे समध्यान । ते हे चरण सुकुमार ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 हरिहरा भेद । नाही कर
6.
हरिहरा भेद । नाही करू नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ॥धृ॥
भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥
उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण पहिले अभंग ११›
📿 अभंग क्र. ६
📿 आता तुम्ही कृपावंत ।
6.
आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥
गोमटे ते करा माझे । भार ओझे तुम्हांसी ॥२॥
वंचिले ते पायांपाशी । नाही यासी वेगळे ॥३॥
तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 दत्त जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 दत्त माझा दीनानाथ ।
6.
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागी उभा सतत ॥१॥
त्रिशुळ घेऊनिया करी । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥
भाळी चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानु ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्री राम जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 रावणे हे केले लग्नाम
6.
रावणे हे केले लग्नामाजी विघ्न । असे की स्मरण तुजलागी ॥१॥
आणि रे धनुष्य मारीन रावणा । लंका बिभीषण देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा । पायवाट करा जावयासी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 नृसिंह जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 मानव शरीर सिंह वदन ह
6.
मानव शरीर सिंह वदन हरि । गुरगुर तो करी देवराव ॥१॥
अवतार वेळा वैशाख मासी । चतुर्दश संधीसी अर्ध बिंबी ॥२॥
घरी ना मंदिरी सभे ना बाहेरी । उंबरीयावरी मारियेला ॥३॥
शस्त्राने न मरे ऐसा वर होता । म्हणोनि नखे त्याचा अंत केला ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 हनुमान जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 ऋष्यमूक पर्वती अंजनी
6.
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानी सावधान ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ६
📿 न देखे न बोले नाइके
6.
न देखे न बोले नाइके आणीक । बैसला हा एक हरि चित्ती ॥१॥
सासुरे माहेर मज नाही कोणी । एक केले दोन्ही मिळोनिया ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा›
📿 अभंग क्र. ६
📿 नाही विचारीत । मेघ ह
6.
नाही विचारीत । मेघ हगणदारी शेत ॥१॥
नये पाहो त्याचा अंत । ठेवी कारणापे चित्त ॥२॥
वर्जीत गंगा । नाही उत्तम अधम जगा ॥३॥
तुका म्हणे मळ । नाही अग्नीसी विटाळ ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 एक आपण साधू झाले । य
6.
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचे गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हा । विश्व ब्रह्म होइल तेव्हा ॥३॥
ऐसा उमज आदिअंती । मग सुखी व्हावे संती ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. ६
📿 (घोंगडीची रूपके)
6.
(घोंगडीची रूपके)
नाही तुझे उगा पडत गळा । पुढे गोपाळा जाऊ नको ॥१॥
चाहाड तुझे दाविन घरी । बोलण्या उरी नाही ऐसी ॥धृपद॥
तुम्हा आम्हा पडदा होता । सरला आता सरोबरी ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ६
📿 तिन्ही देव जैसे परब्
6.
तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे । जगी सुर्य जैसे प्रकाशले ॥१॥
धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥२॥
उपजतांचि ज्ञानी हे वर्म जाणोनी । आले लोटांगणी चांगदेव ॥३॥
प्रत्यक्ष पैठणी भेटी केला वाद । बोलविला वेद म्हैशीपुत्रा ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ६
📿 अंगिकार करी तयाचा वि
6.
अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागी ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥
अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥
चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ६
📿 आनंद सोहळा आषाढी पंढ
6.
आनंद सोहळा आषाढी पंढरी । कीर्तन गजरी वाळुवंटी ॥१॥
होतो जयजयकार आनंद सोहळा । अमृत गळाला वैष्णवासी ॥२॥
नाठवे भावना देहाचा विसर । विठ्ठल उच्चार संतजनी ॥३॥
तेथे जीवे भावे प्रेमाची आरती । लोटांगणी जाती सोयरा भावें॥81
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ६
📿 उपाधीच्या भेणे आलोंस
6.
उपाधीच्या भेणे आलोंसे शरण । काया वाचा मने सहित देवा ॥१॥
तू माझा मायबाप सकळ वित्त गोत । तू माझे गणगोत पंढरिराया ॥२॥
तू माझी साउली तू माझी गाउली । प्रेमाची माउली तूंचि माझी ॥३॥
बा म्हणे तुज विकिला जीव प्राण । काया वाचा मन सत्य देवा ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ६
📿 ऐकोनिया मात चोखा सां
6.
ऐकोनिया मात चोखा सांगे तिसी । पूर्ण नव मासांसी भरियेले ॥१॥
साहित्य सामुग्री नाही कांही घरी । म्हणोनी निर्धारी बोलियेली ॥२॥
ऐसा हा घोर कोणे वागवावा । म्हणोनी तुझे गांवा वेगे आलो ॥३॥
निर्मळा म्हणे अनुचित केले । तुम्हा काय वहिले म्हणो आता ॥४॥