🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 चोखामेळा›
📿 अभंग क्र. २२६७
📿 संत चोखामेळा
2267.
संत चोखामेळा
चोखामेळियाने पाजियेले दही । पडो दिले नाही उणे त्याचे ॥१॥
तयाचे चरित्र परिसावे सादर । करितो नमस्कार सतजना ॥२॥
तयाची जे कांता तयाच सारिखी । भावार्थ नेटकी आवडीची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२६८
📿 नागर गोडे बाळरूप । त
2268.
नागर गोडे बाळरूप । ते स्वरूप काळीचे ॥१॥
गाईगोपाळांच्या संगे । आले लागे पुंडलीका ॥धृपद॥
ते हे ध्यान दिगांबर । कटी कर मिरवती ॥२॥
नेणपणे उगे चि उभे । भक्तीलोभे राहिले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 चोखोबाचे स्त्रीचे बाळंतपण›
📿 अभंग क्र. २२६८
📿 चोखोबाचे स्त्रीचे बा
2268.
चोखोबाचे स्त्रीचे बाळंतपण
चोखोबाचीकांता असे ती गर्भिण । झाले तीस पूर्ण नव मास ॥१॥
करूनि विनंति पतिसी बोलत । असावे साहित्य घरामाजी ॥२॥
ऐकूनिया चोखा करीत विचार । कोणे ऐसा घोर वागवावा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२६९
📿 विठ्ठलनामाचा नाही ज्
2269.
विठ्ठलनामाचा नाही ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्ये ॥१॥
तयासी बोलता होईल विटाळ । नव जाये तो जळस्नान करिता ॥धृपद॥
विठ्ठलनामाची नाही ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥
तुका म्हणे मज विठोबाची आण । जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५›
📿 अभंग क्र. २२६९
📿 उद्धव अक्रूर गोपाळ स
2269.
उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा ॥१॥
गुहक बिभीषण नळनीळ देखा । ऐशी भक्तामालिका शोभतसे ॥२॥
एका जनार्दनी घेता त्याचे नाम । सर्व हरती कामक्रोधादिक ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग›
📿 अभंग क्र. २२७०
📿 ऐकोनिया कानी अचळी भर
2270.
ऐकोनिया कानी अचळी भराव्या । आणोनिया द्याव्या आम्हापाशी ॥१॥
शालिवाहन शके बाराशे साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥
वैशाख वद्य पंचमी सुदीन । गुरुवारी प्रयाण करी चोखा ॥३॥
चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळ धर्म देव चोखा माझा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५›
📿 अभंग क्र. २२७०
📿 गोपाळ गौळणी शोभती त्
2270.
गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । ते सुख परिक्षिती संतजन ॥१॥
ऐसे अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचा तो मेळ । दावीत सकळ वैभव हरिभक्ता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२७१
📿 पुराणप्रसिद्ध सीमा ।
2271.
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥
मागे जाळी महा दोष । पुढे नाही गर्भवास ॥धृपद॥
जे निंदिले शास्त्रे । वंद्य जाले नाममात्रे ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनी नामठसा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५›
📿 अभंग क्र. २२७१
📿 पुढे कालीमाजीं होणार
2271.
पुढे कालीमाजीं होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव पाहे ॥१॥
पाहता पाहता समाधि उन्मनी । गेलासे बुडोनि सुखमाजीं ॥२॥
एका जनार्दनी नाठवेचि कांही । देहीच्या विदेही होउनी ठेलो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२७२
📿 नाम घेता न लगे मोल ।
2272.
नाम घेता न लगे मोल । नाममंत्र नाही खोल ॥१॥
दोंचि अक्षरांचे काम । उच्चारावे राम राम ॥धृपद॥
नाही वर्णाधमयाती । नामी अवघी चि सरती ॥२॥
तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२७३
📿 नाम घेता वाया गेला ।
2273.
नाम घेता वाया गेला । ऐसा कोणे आइकिला ॥१॥
सांगा विनवितो तुम्हासी । संत महंत सिद्ध ॠषी ॥धृपद॥
नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२७४
📿 फुकाचे ते लुटा सार ।
2274.
फुकाचे ते लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥
नाही गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषाचे ॥धृपद॥
उदंड भावे उदंड घ्यावे । नाम गावे आवडी ॥२॥
तुका म्हणे घरिच्या घरी । देशा उरी न सीणीजे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५›
📿 अभंग क्र. २२७४
📿 उतरावया धरा भार । घे
2274.
उतरावया धरा भार । घेतिला अवतार इहीं जगें ॥१॥
ते हे बळिये रामकृष्ण । केलेंक कंदन दैत्यासी ॥२॥
केला जो जो कीर्तिघोष । उच्चारिता निर्दोष होती प्राणी ॥३॥
एका जनार्दनी कृपाळु । भक्त स्नेहाळू समर्थ ते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५›
📿 अभंग क्र. २२७५
📿 उतरावया धरा भार । धर
2275.
उतरावया धरा भार । धरी अवतार कृपाळूं ॥१॥
पाळीतसे भक्तलळा । नोहे वेगळा वेगळीक ॥२॥
जया आवडे जे कांही । देता न म्हणे थोडे कांही ॥३॥
पुरवी इच्छा जैसी आहे । मच्छ कच्छ तयासाठीं होय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२७६
📿 तुझा दास ऐसा म्हणती
2276.
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करी माझा ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हे आता जतन करी नाम ॥धृपद॥
माझे गुण दोष पाहाता न लगे अंत । ऐसे माझे चित्त मज ग्वाही ॥२॥
नेणे तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तू देवा अंतरीचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२७७
📿 जाणावे ते काय नेणावे
2277.
जाणावे ते काय नेणावे ते काय । ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥१॥
करावे ते काय न करावे ते काय । ध्यावे तुझे पाय हे चि सार ॥धृपद॥
बोलावे ते काय न बोलावे ते काय । ध्यावे तुझे पाय हे चि सार ॥२॥
जावे ते कोठे न वजावे आता । बरवे आठविता नाम तुझे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२७७
📿 अष्टांग साधन धूम्रपा
2277.
अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती ॥१॥
परि ते न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोलताती ॥२॥
शाब्दिकाचा शब्द कुंठित ते ठायी । वाउगें कांही बाही बोलु नये ॥३॥
एका जनार्दनी संतकृपा होता । ब्रह्माज्ञान तत्त्वता घर रिघे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२८०
📿 तुझा शरणागत झालो मी
2280.
तुझा शरणागत झालो मी अंकित । करी माझे हित पांडुरंगा ॥१॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आता सांभाळी मायबापा ॥धृपद॥
अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनिया मात विश्वासलो ॥२॥
न करावी निरास न धरावे उदास । देई याचकास कृपादान ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे›📂 संतांची आरती›
📿 अभंग क्र. २२८२
📿 संताची आरती.
2282.
संताची आरती.
गुण आणि गंभीर रणधीर | तया योग्य साजे केशव शरीर |
तैसा अमृतराज हा विसोबा खेचर | बोलोनि अबोलपणा न कल्पी ऐसा सार ॥१॥
जय जय आरती या हरिदासाच्या भक्ता | दिंडी पुढे डोलत पंढरिनाथा ॥ धृ ॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२८३
📿 पुण्य परउपकार पाप ते
2283.
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाही जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणीक हे वर्म नाही दुजे ॥धृपद॥
गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥२॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२८४
📿 न वजे वाया काही ऐकता
2284.
न वजे वाया काही ऐकता हरीकथा । आपण करिता वाया न वजे ॥१॥
न वजे वाया काही देवळासी जाता । देवासी पूजिता वाया न वजे ॥धृपद॥
न वजे वाया काही केलिया तीर्थ । अथवा का व्रत वाया न वजे ॥२॥
न वजे वाया जाले संतांचे दर्शन । शुद्ध आचरण वाया न वजे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२८६
📿 वर्म जाणे तो विरळा ।
2286.
वर्म जाणे तो विरळा । तयांचीं लक्षणे पै सोळा । देही देव पाहे डोळा । तोचि ब्रह्माज्ञानीं ॥१॥
जन निंदो अथवा वंदो । जया नाही भेदाभेद । विधिनिषेधाचें शब्द । अंगी न बाणती ॥२॥
कार्य कारण कर्तव्यता । हे पिसे नाही सर्वथा । उन्मनी समाधी अवस्था । न मोडे जयाची ॥३॥
कर्म अकर्मचा ताठा । न बाणेचि अंगी वोखटा । वाउग्या त्या चेष्टा । करीना कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२८७
📿 जीवनावाचूनि तळमळी मा
2287.
जीवनावाचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥
न सापडे जाले भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥धृपद॥
मातेचा वियोग जालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥२॥
सांगावे ते किती तुम्हासी प्रकार । सकळांचे सार पाय दावी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२८७
📿 जप तप निष्ठा नेम । ऐ
2287.
जप तप निष्ठा नेम । ऐसा साधिला दुर्गम ॥१॥
तरी ब्रह्माज्ञान नये हाता । क्रोध भरें अधिक चित्ता ॥२॥
ब्रह्माज्ञानाची प्रौढी । न घडेचि अर्थ घडी ॥३॥
एका जनार्दनी शरण । कोठे नाही दुजेपण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२९०
📿 प्रीति नाही राया वर्
2290.
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभी जालो तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥धृपद॥
राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥२॥
बत्तर खोडी परी देवमण कंठी । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२९०
📿 भावना अभावना निमाली
2290.
भावना अभावना निमाली अंतरी । वाया हावभरी नाही मन ॥१॥
कामक्रोध ज्याचे दमोनियां गेले । इंद्रियें समरसलीं एके ठायी ॥२॥
एकपणे सर्व होऊनियां मेळा । रतलें गोपाळाचरणीं मन ॥३॥
तोचि ब्रह्माज्ञानी जगामाजीं धन्य । एका जनार्दनी चरण वंदी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२९१
📿 करावा उद्धार किंवा घ
2291.
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहे देवा ॥१॥
निरसने माझा होईल संदेह । अवघे चि आहे मूळ पायी ॥धृपद॥
राहिलो डीकोनी काही चि न कळे । कोणा नेणो काळे उदय भाग्य ॥२॥
तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसे कीव देवराया ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२९१
📿 भक्तीचे उदरी जन्मले
2291.
भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान । भक्तीनेंक ज्ञानासी दिधले महिमान ॥१॥
भक्ति ते मुळ ज्ञान ते फळ । वैराग्य केवळ तेथीचें फुल ॥२॥
फुल फळ दोनी येरयेरा पाठी । ज्ञान वैराग्य तेविं भक्तिचें पोटी ॥३॥
भक्तिविण ज्ञान गिवसिती वेडे । मूळ नाही तेथे फळ केवी जोडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२९२
📿 आलिया भोगासी असावे स
2292.
आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालूनिया ॥१॥
मग तो कृपासिंधु निवारी साकडे । येर ते बापुडे काय रंक ॥धृपद॥
भयाचिये पोटी दुःखाचिया रासी । शरण देवासी जाता भले ॥२॥
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता । चिंतावा तो आता विश्वंभर ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२९२
📿 नित्य काळ जेथे नामाच
2292.
नित्य काळ जेथे नामाचा घोष । तेथे जगन्निवास लक्ष्मीसहित ॥१॥
ब्रह्माज्ञान तेथे लोळती अंगणी । सेवुनी पायवणी घरी राहे ॥२॥
विष्णुदास तयाकडे न पाहाती फुका । नाम मुखी देखा रामकृष्ण ॥३॥
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम । तया घरी पुरुषोत्तम सदा वसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२९४
📿 निर्वैर व्हावे सर्वभ
2294.
निर्वैर व्हावे सर्वभूतांसवे । साधन बरवे हेचि एक ॥१॥
तरीच अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेविण ॥धृपद॥
सोइरे पिशुन समान चि घडे । चित्त पर ओढे उपकारी ॥२॥
तुका म्हणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केले होय ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२९४
📿 अर्थ तो विवाद ज्ञान
2294.
अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हा उघड समाधी नाममात्रें ॥१॥
हेंचि निरुपण उद्धवा श्रीकृष्ण । सांगतसे खुन जीवींची ते ॥२॥
स्तुति अथवा निंदा परस्त्री परधन । तेथे कदा मन घालु नये ॥३॥
एका जनार्दनी हेचि ब्रह्मज्ञान । यापरतें साधन आन नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २२९६
📿 तापल्यावाचून नव्हे अ
2296.
तापल्यावाचून नव्हे अळंकार । पिटूनिया सार उरले ते ॥१॥
मग कदाकाळी नव्हे शुद्ध जाति । नासे शत्रु होती मित्र ते चि ॥धृपद॥
कलेवर बरे भोगू द्यावे भोगा । फांसिले ते रोगा हाती सुटे ॥२॥
तुका म्हणे मन करावे पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२९८
📿 ऐसे हे वचन ऐकोन । श्
2298.
ऐसे हे वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसे अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥
हा शब्द अलोलिक । श्रवणी झाले सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥
पंचभुते तिन्ही गुण । स्थुल सुक्ष्म कारण । हे अपरोक्ष अज्ञान । पंचीकरण ॥३॥
यासी तो जाणता साक्षित्वे देखता । तोचि अपरोक्ष ज्ञाता । जाणावा पै ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २२९९
📿 सदगुरु तोचि जाण । जो
2299.
सदगुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देहत्रय निरसुन । परमपदीं ठेवी ॥१॥
जेणे देहत्रय निरसिले । ज्ञान अग्नीमाजीं जाळिलें । अच्युतपद प्राप्त केले । त्यासी वेळ नाही ॥२॥
निराकार निरामय । निर्भय ते अद्वय । तयामाजीं लिंगदेह । मरुनियां गेले ॥३॥
एका जनार्दनी प्राप्ती । जै लिंगदेहाची होय शांती । मग सायुज्यमुक्ति । पाया लागे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०३
📿 अभ्यासी द्रष्ट आटला
2303.
अभ्यासी द्रष्ट आटला । अहं सोहंचा घोट भरला । साक्षित्व देखोनि विराला । वास्तुमाजीं ॥१॥
जो जो वस्तु झाला केवळ । तेंचि अंतःकरण निश्चळ । त्रिगुणाची तळमळ । हारपोनि गेली ॥२॥
हारपलें ब्रह्मांड । हारपले पिंड - अंड । वस्तु झाला अखंड । त्यासी खंड नाही ॥३॥
एका जनार्दनी जाण । द्वैत गेले मावळोल । मग वस्तुचि परिपुर्ण । भरली असे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६›
📿 अभंग क्र. २३०४
📿 या देहा अमंगळा । पास
2304.
या देहा अमंगळा । पासुनी आत्मा वेगळा । ऐसा ज्ञानाचा डोळा । प्रत्यक्ष दिसे ॥१॥
ज्ञान म्हणजे शुद्ध सत्वगुण । जेथे द्वैत प्रकृतीचें अधिष्ठान । जी पासाव सव्वीस लक्षणे । बोलिलें षोढशाध्यायी ॥२॥
ते दैवी प्रकृतीचें घरी । परमात्मा राज्य करी । तो जयाएं अंगिकारी । तो सुटला गा ॥३॥
या पुरुषाचे बेचाळीस कुळ । पद पावले अढळ । आत्मतत्त्वी सकळ । मिळणी आली ॥४॥