संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७१०
📿 ज्ञान ध्यान वर्म शाब
2710.
ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती ॥१॥
राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा कृष्ण सदा ॥२॥
एका जनार्दनी राम कृष्ण मनी । भजा आसनी शयनी सर्वकाळ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७१२
📿 मार्ग चुकले विदेशी ए
2712.
मार्ग चुकले विदेशी एकले । तयावरी झाले दिशाभुली ॥१॥
हाती धरुनिया पावविले घरा । त्याच्या उपकारा काय द्यावे ॥२॥
तैसा मी कुडकुडा होतो केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥धृपद॥
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाही सांभाळिली भूमि शुध्द ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७१३
📿 अनेक दोषाचे काट । जे
2713.
अनेक दोषाचे काट । जे जे गादले निघोंट ।
होती हरीनामे चोखट । क्षण एक न लगता ॥१॥
तुम्ही हरी म्हणा हरी म्हणा । महादोषाचे छेदना ॥धृपद॥
अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळी रतला ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७१३
📿 जया अनुताप वैराग्य ।
2713.
जया अनुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी ॥१॥
वरे अरी दांभिक आचार । तया म्हणती पवित्र नर ॥२॥
जया बोले मनुष्य मरे । तया म्हणती सिद्धत्व खरें ॥३॥
एका जनार्दनी बोध । अभाविकासी हाचि खेद ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७१५
📿 जैसा निर्मळ गंगाओघ ।
2715.
जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरी ॥१॥
प्रेम वाढे ग्रासोग्रासी । ब्रम्हरसी भोजन ॥धृपद॥
तृप्तीवरी आवडी उरे । ऐसे बरे प्रकार ॥२॥
तुका म्हणे पाख मन । नारायण ते भोगी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७१५
📿 अभाविक यासी न रुचे भ
2715.
अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा ॥१॥
असोनि संसारी प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार सदा ॥२॥
जगी अपकीर्ति फजितीचें जिणें । सदा ते लपणें श्वानापरी ॥३॥
एका जनार्दनी ऐसे ते पामर । भोगिती अघोर कल्पकोटी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७१७
📿 का रे न भजसी हरी । त
2717.
का रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥१॥
होईल यमपुरी । यमदंड यातना थोरी ॥धृपद॥
कोण झाली लगबग । काय करिसि तेथे मग ॥२॥
का रे भरला ताठा । करिती वोज नेता वाटा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७१७
📿 केलिया कर्मा येत असे
2717.
केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥
जेथे राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥
एका जनार्दनी नामाच्या उच्चारा । न करिता अघोरा जाती प्राणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७१८
📿 ब्राह्मणाचें तीर्थ घ
2718.
ब्राह्मणाचें तीर्थ घेता त्रास मोठा । प्रेमे पितो घोटा घटघटा ॥१॥
हातें मोर्या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥२॥
गाईस देखुनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड वाटे ॥३॥
एका जनार्दनी ऐसे झाले प्राणी । जन्मोनिया जनीं व्यर्थ आले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७१९
📿 काय विनवावे कोणे तो
2719.
काय विनवावे कोणे तो निवाड । केले माझ्या कोड वचनाचे ॥१॥
आहो कृपनिधी गुणाच्या निधाना । माझ्या अनुमाना नयेचि हे ॥धृपद॥
बहुत करुणा केलेसे भाषन । एक ही वचन नाही आले ॥२॥
माझी काही सेवा होईल पावली । निश्चिंती मानिली होती ऐसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७२०
📿 लाजोनिया काळे राहिले
2720.
लाजोनिया काळे राहिले लिखित । नेदिता ही चित्त समाधान ॥१॥
कैसे सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥धृपद॥
एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळो येतो ॥२॥
होत्या आपल्या त्या वेचूनिया शक्ती । पुढे झालो युक्तिकळाहीन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७२२
📿 साता पाचा तरी वचना स
2722.
साता पाचा तरी वचना सेवटी । निरोप का भेटी एक तरी ॥१॥
का नेणे निष्ठुर केले नारायणा । न देखे हे मना येता काही ॥२॥
तुका म्हणे ऐसा न देखे निवाड । कडू किंवा गोड फळ पोटी ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७२३
📿 कासया हो माझा राखिला
2723.
कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड का एक केला नाही ॥१॥
मग तळमळ न करिते मन । झाले ते कारण कळो येते ॥२॥
तुका म्हणे केला पाहिजे निवाड । वैद्यासी ते भीड मरणरोग्या ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७२४
📿 वाया ऐसा जन्म गेला ।
2724.
वाया ऐसा जन्म गेला । हे विठ्ठला दुःख वाटे ॥१॥
नाही सरता झालो पायी । तुम्ही जई न पुसा ॥धृपद॥
का मी जीतो संवसारी । अद्यापवरी भूमिभार ॥२॥
तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७२५
📿 ऐसे कोण पाप बळी । जे
2725.
ऐसे कोण पाप बळी । जे जवळी येऊ नेदी ॥१॥
तुम्हा तव होईल ठावे । नेदावे का कळो हे ॥धृपद॥
कोण झाला अंतराय । का ते पाय अंतरले ॥२॥
तुका म्हणे निमित्याचा । आला सुचा अनुभव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७२५
📿 वेद तो प्रमाण । वचन
2725.
वेद तो प्रमाण । वचन करी जो अप्रमाण ॥१॥
तो स्वहिता नाडला । जन्मोजन्मी कुडा जहाला ॥२॥
वेदाची जे मर्यादा । नायकेचि जो कदा ॥३॥
वेदें सांगतिलें कर्म । करी सदा तो अधर्म ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७२६
📿 जन्मला जो प्राणी । र
2726.
जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी ॥१॥
महापाताकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥
सदा परद्वारी हिंडे । नाम घेतो कान कोडे ॥३॥
करू नये तेंचि करी । सदा परद्रव्य हरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७२८
📿 भक्तिहीन जन्मला पशु
2728.
भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा ॥१॥
नाही कधी संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥
मुखी नये रामनाम । सदा काम प्रपंचीं ॥३॥
एका जनार्दनी ते नर । जन्मोनी पामर भूभार ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७२९
📿 मानी नामाचा कंटाळा ।
2729.
मानी नामाचा कंटाळा । तया वोंगळा न पाहावे ॥१॥
सदा त्याचे विषयी ध्यान । वाचे बोले भलते वचन ॥२॥
आलिया तो घरा । तया न द्यावा पै थारा ॥३॥
ऐसा चांडाळ जन्मला । वाया भूमीभार पै जाहला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३०
📿 आता मी पतित ऐसा साच
2730.
आता मी पतित ऐसा साच भावे । कळो अनुभवे आले देवा ॥१॥
काय करावे ते रोकडेंचि करी । राहिली हे उरी नाही दोघा ॥धृपद॥
येर येरा दृष्टी द्यावे या उत्तरा । यासी काय करा ग्वाही आता ॥२॥
तुका म्हणे मेलो सांगता सांगता । तेचि आले आता कळो तुम्हा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७३०
📿 शिकविले नाईके वचन ।
2730.
शिकविले नाईके वचन । वारितां करी कर्म जाण ॥१॥
न देखे आपुले गुणदोष । पारावियाचे बोले निःशेष ॥२॥
न करावे ते करी । न बोलावें ते बोले निर्धारी ॥३॥
न मानी स्वयातीचा आचार । सदा करी अनाचार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३१
📿 काय तुज मागे नाही जा
2731.
काय तुज मागे नाही जाणवले । माझे नाही केले हित काही ॥१॥
डोळे झाकुनिया होसी अबोलणा । तेव्हा नारायणा आता कैसा ॥धृपद॥
न कळे उचित न संगता स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥
तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा । तरि का आधी देवा वारू नये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७३२
📿 कस्तुरी परिमळ नाशितस
2732.
कस्तुरी परिमळ नाशितसे हिंग । ऐसा खळाचा संग जाणिजेती ॥१॥
साकरेचे आळा निंब जो पेरिला । शेवटी कडू त्याला फळे पत्रें ॥२॥
चंदनाचे संगेकं हिंगण वसती । परी चंदनाची याती वेगळीच ॥३॥
एका जनार्दनी हा अभाविकाचा गुण । वमनासमान लखुं आम्ही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३४
📿 आत्मिस्थति मज नको हा
2734.
आत्मिस्थति मज नको हा विचार । देई निरंतर चरणसेवा ॥१॥
जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा । हेचि गोडी आम्हा देई देवा ॥धृपद॥
काय सायुज्यता मुक्तीची हे चाड । देव भक्त कोड तेथे नाही ॥२॥
काय ते निर्गुण पाहो कैशा परी । वर्णु तुझी हरी कीर्ती कैसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३५
📿 चाले दंडवत घाली नारा
2735.
चाले दंडवत घाली नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनिया ॥१॥
बैसविला पदी पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरी आज्ञा त्याची ॥२॥
तुका म्हणे आहे ठायीचाचि मान । आता अनुमान कायसा तो ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७३५
📿 न ये मनासी अभागिया ग
2735.
न ये मनासी अभागिया गोष्टी । म्हणे बोलती चावटी बहु बोल ॥१॥
सांगता सांगता बुडतसे डोहीं । पुढीलाची सोई नेणती ते ॥२॥
वाचेसि स्मरण नाही कधी जाण । सदा मद्यपान बडबडतसे ॥३॥
एका जनार्दनी नायके सांगता । कोण याच्या हिता हित करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३६
📿 समर्थाचे बाळ पाघरे व
2736.
समर्थाचे बाळ पाघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥
समर्थासी लाज आपुल्या नावाची । शरण आलियाची लागे चिंता ॥२॥
जरी तुज काही होईल उचित । तरी हा पतित तारी तुका ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३७
📿 न करी रे मना काहीच क
2737.
न करी रे मना काहीच कल्पना । चिंती या चरणा विठोबाच्या ॥१॥
येथे सुखाचिया अमुपची रासी । पुढे कल्पनेसी ठाव नाही ॥धृपद॥
सुखाचे ओचिले साजिरे श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाही ॥२॥
तुका म्हणे येथे होईल विसावा । तुटतील धावा पुढिलिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७३८
📿 काय करू मज नागविले आ
2738.
काय करू मज नागविले आळसे । बहुत या सोसे पीडा केली ॥१॥
हिरोनिया नेला मुखीचा उच्चार । पडिले अंतर जवळीच ॥धृपद॥
द्वैताचिया कैसा सापडलो हाती । बहुत करती ओढाओढी ॥२॥
तुका म्हणे आता आपुलिया सवे । न्यावे मज देवा सोडवूनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७३८
📿 निर्दय मानसी मारितात
2738.
निर्दय मानसी मारिताती दूत । का रे चुकलेति रामनाम ॥१॥
प्रपंचाचे कामीं करूनि हव्यास । विसरला मुखास नाम घेता ॥२॥
म्हणोनि वोढिती तोडिती निष्ठुर । दय ते अंतरा न ये त्यांच्या ॥३॥
एका जनार्दनी निर्दय साचार । नाही आन विचार तये ठायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७४०
📿 हेचि सर्वमुख जपावा व
2740.
हेचि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वाया ॥१॥
हेचि एक सर्वसाधनांचे मूळ । आतुडे गोपाळ येणे पंथे ॥धृपद॥
न लगती काही तपाचिया रासी । करणे वाराणसी नाना तीर्थे ॥२॥
कल्पना हे तिळ देही अभिमान । नये नारायण जवळी त्याच्या ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७४१
📿 माझे विषयी तुज पडतो
2741.
माझे विषयी तुज पडतो विसर । नको धरू दूर पांडुरंगा ॥१॥
तुझा म्हणवितो हेचि लाज तुला । आता झणी मला विसरेसी ॥२॥
तुका म्हणे तुझी माझी नाही उरी । आता केली खरी देवराया ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७४१
📿 का रे जन्मला अभागी ।
2741.
का रे जन्मला अभागी । प्रीति न धरी पांडुरंगीं ॥१॥
उत्तर चांगलें रे मुख । रामनाम न म्हणती विख ॥२॥
उत्तम क्रूर ते दिसती । दानधर्म न घडे हाती ॥३॥
उत्तम पद ते शोभती । परि तीर्थयात्रे न जाती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७४२
📿 भूमीभर वाया । का रे
2742.
भूमीभर वाया । का रे जन्मली ही काया ॥१॥
न घडे वाचे नामस्मरण । जिव्हा नव्हे चर्म जाण ॥२॥
न घडे करे दानधर्म । कर नोहेती सर्प जाण ॥३॥
पायी तीर्थयात्रा न घडे । पाय नोहेते ते केवळ लाकडें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७४३
📿 आयुष्य ते तीन भाग जा
2743.
आयुष्य ते तीन भाग जाहलें । परी मुखी राम न बोले ॥१॥
सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्माज्ञान ॥२॥
चित्त शुद्ध झाले नाही । ज्ञान कोरडे सांगोनी कायीं ॥३॥
उपाधीचा निषेध भेद । सदा वाद अपवाद ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७४५
📿 लागे तुझी सोय करी ऐस
2745.
लागे तुझी सोय करी ऐसे काही । माझे विठाबाई माऊलिये ॥१॥
पतितपावन म्हणविसी जरी । अव्हेर न करी तरी माझा ॥धृ॥
नाही तरी ब्रीद टाकी सोडूनिया । न धरिसी माया जरी माझी ॥२॥
बोलियेला बोल करावा साचार । तरी लोक बरे म्हणतील ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७४५
📿 क्रोधयुक्त अंतःकरण ।
2745.
क्रोधयुक्त अंतःकरण । तेणे नासे स्वधर्माचरण ॥१॥
ऐसे द्वेषे बांधलें घर । ते ठायी क्रोध अनिवार ॥२॥
ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो का नारी ॥३॥
स्वभाव बाधी सत्य जाण । शरण एक जनार्दनी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७४६
📿 अज्ञानीं विश्वासे सा
2746.
अज्ञानीं विश्वासे साधून्सी वंदी । ज्ञानिया तो सदा तया निंदी ॥१॥
ऐशी उभयतांचि क्रिया । पाहता चर्या एकची ॥२॥
वंदुं निंदूं कोणी ऐसा एक भाव । तेथे तो देव वसे सदा ॥३॥
ज्ञान अज्ञानाचा निवाडा होय । एका शरण जनार्दनी जाय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७४९
📿 पाहाता हे बरवे झाले
2749.
पाहाता हे बरवे झाले । कळो आले यावरी ॥१॥
मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥धृपद॥
विसावले अंग दिसे । सरिसे सरिसे अनुभव ॥२॥
तुका म्हणे बरे झाले । देवे नेले गवसूनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७५०
📿 नाशिवंत शरीर ओंगळ ओख
2750.
नाशिवंत शरीर ओंगळ ओखंटें । परी तया भेटे कर्म धर्म ॥१॥
अशाश्वत शाश्वत हेंचि उमगा मनी । तया चक्रपाणी धांवे मागे ॥२॥
देहींचे देहपण देहाचिये माथा । कर्म धर्म सत्ता देहालागीं ॥३॥
एका जनार्दनी कर्म धर्म पाठी । वायीं भ्रम पोटी घेती जीव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७५१
📿 श्रमपरिहारा । मूळ झा
2751.
श्रमपरिहारा । मूळ झालो दातारा ॥१॥
देह निवेदूनि पायी । झालो निष्काम उतराई ॥धृपद॥
आपली ते सत्ता । येथे असो नेदी आता ॥२॥
राहिला निराळा । तुका खटपटी वेगळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७५२
📿 पाठवाल तेथे गर्जेन प
2752.
पाठवाल तेथे गर्जेन पवाडे । काहि देहाकडे नावलोकी ॥१॥
म्हणउनि मागे कंठींचा सौरस । पावतील नास विघ्ने पुढे ॥धृपद॥
कृपेच्या कटाक्षे न भिये कळिकाळा । येता येत बळाशक्तीपुढे ॥२॥
तुका म्हणे गुढी आणीन पायापे । होईल ते सोपे नाम तुझे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७५४
📿 नव्हे मी आहाच आशेचे
2754.
नव्हे मी आहाच आशेचे बांधले । जे हे टोंकविले नारायणा ॥१॥
अंतर तो तुम्हा बरे कळो येते । वेव्हार उचिते चाळवीजे ॥धृपद॥
मने कल्पीले आवरीता पाप । संकल्पी विकल्प याचि नावे ॥२॥
तुका म्हणे आम्हा न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७५५
📿 ताके कृपण तो जेवू का
2755.
ताके कृपण तो जेवू काय घाली । आहाच ते चालीवरी कळे ॥१॥
काय तुम्हा वेचे घातले साकडे । माझे आले कोडे आजिवरी ॥धृपद॥
सेवेंविण आम्ही न लिंपोत्या कार्या । झाला देवराया निर्धार हा ॥२॥
तुका म्हणे तुझी राखावया ब्रीदे । येणे अनुवादे गर्जतसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७५५
📿 हीन जे पामर नावडे वा
2755.
हीन जे पामर नावडे वाचे नाम । सदा कामीं काम प्रपंचाचें ॥१॥
भोगिती यातना न सुटे कल्पकोडी । चौर्यांयशीची बेडी दृढ पायी ॥२॥
जैसे कर्म केले तैसेक फळ आले । कुंथतां वाहिले भार माथा ॥३॥
एका जनार्दनी संशय न धरावा । आला तो भोगावा विषमकाळ ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७५६
📿 जन्मोनी प्राणी नाम न
2756.
जन्मोनी प्राणी नाम न घेत वाचे । त्याचिया जन्माचें व्यर्थ वोझे ॥१॥
प्रसवोनी तया वांझ तो जननी । बुडविली दोन्ही कुळें त्याने ॥२॥
पूर्वज पतनी पडती बेचाळीस । नाम न ये मुखास ऐसा प्राणी ॥३॥
एकाजनार्दनी पतित दुराचारी । यम तया अघोरीं घालितसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७५७
📿 सुलभ कीर्तने दिले ठस
2757.
सुलभ कीर्तने दिले ठसावूनि । करिता धरणी उरी कोण ॥१॥
आता न टळावे केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥धृपद॥
एका नेमे कोठे दुसरा पालट । पादर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥
तुका म्हणे किती बोलसील उणे । एकाच वचने खंड करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७५८
📿 जेथे माझी दृष्टि राह
2758.
जेथे माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथेचि हे मन गुंडाळते ॥१॥
टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविले अन्न ओकविते ॥धृपद॥
तुम्हासी का कोडे कोणी ये विशीचे । नवलाव याचे वाटतसे ॥२॥
तुका म्हणे वेगी उभारा जी कर । कीर्ती मुखे थोर गर्जईन ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७५८
📿 नरदेह प्रमाण शतवर्षे
2758.
नरदेह प्रमाण शतवर्षे म्हणती । अभागी घालविती वाया जाण ॥१॥
न करी भजन न जाय पंढरीं । अभाविक दुराचारी सदा मनी ॥२॥
जनार्दनाचा एक न पाहे त्याचे मुख । नरदेही देख पशुवत ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७५९
📿 अभागियां नावडे वैष्ण
2759.
अभागियां नावडे वैष्णवांचा संग । सदा तो उद्योग परनिंदेचा ॥१॥
ऐसे जे पामर भोगिती अघोर । सुटिका निर्धार नोहे त्यासी ॥२॥
जन्मोनी मरती पुन्हा जन्मा येती । होतसे फजिती मागे पुढे ॥३॥
एका जनार्दनी नरकाचे बिढार । यमाचे ते घर माहेर केले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७६०
📿 कोठे आम्ही आता वेचाव
2760.
कोठे आम्ही आता वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनिया ॥१॥
न करावी सांडी आता टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥धृपद॥
घरोघरी झाल्या ज्ञानाचिया गोष्टी । सत्यासवे गाठी न पडावी ॥२॥
तुका म्हणे आम्हा भाकिता करुणा । भलताचि शाहाणा शोध काढी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६०
📿 ऐसे कृपण मनाचे । ते
2760.
ऐसे कृपण मनाचे । ते या पंढरीसी न वचे ॥१॥
पापीयासी पंढरपुर । नावडे ऐसा निर्धार ॥२॥
ब्रह्माज्ञान पाषांडियां । नावडे काया वाचा जीवेंसी ॥३॥
विषयी जो दुराचारी । तया नावडे ज्ञानेश्वरी ॥४॥