वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

माझे लेखी देव मेला ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078296 · अभंग क्र. २२३८

2238.
माझे लेखी देव मेला । असो त्याला असेल ॥१॥
गोष्ट न करी नांव नेघे । गेलो दोघे खंडोनी ॥धृपद॥
स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥
तुका म्हणे निवांत ठेलो । वेचित आलो जीवित्व ॥३॥

अर्थ :
माझ्या लेखी आता देव मेला आहे ज्याच्यासाठी तो आहे असे वाटत असेल त्याच्यासाठी तो खुशाल असो. देवाविषयी कोणतीही वाच्यता करणे किंवा त्याचे नांव मी आता घेणार नाही कारण आमच्या दोघातील ही द्वैताची उपाधी आता खंडित होऊन गेली आहे. मी आजवर देवाची स्तुती आणि निंदा करण्याचा व्यवहार उदंड केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवाची सेवा आणि भक्ती करण्यातच माझे जीवित्व खर्च झाले आहे परंतु आज आमच्यातील द्वैहित नाहीसे झाले त्यामुळे मी निवांत झालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग