काय वहिनीने दिधले आम
2237.
काय वहिनीने दिधले आम्हांसी । दाखवा वेगेसी कृष्ण म्हणे ॥१॥
सोडियेली तेव्हा मुष्टी तंदुळिका । रुक्मीणीनाइका पुढे ठेवी ॥२॥
घेऊनि ते पोहे मुखामाजी टाकी । मागे ते भीमकी धरोनी हात ॥३॥
ब्रम्हदिक देव उभे पोह्यांसाठी । नाही त्या लल्लाटी नामा म्हणे ॥४॥
