उमटती वाणी । वाटे ना
2243.
उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥१॥
बरे सेवन उपकारा । द्यावे घ्यावे या उत्तरा ॥धृपद॥
सरळ आणि मृद । कथा पाहावी ते उर्ध ॥२॥
गात जात तुका । हाचि उपदेश आइका ॥३॥
अर्थ :
माझ्या वाणीद्वारे वाणी वाटे नामाच्या ध्वनी उमटत आहेत. नाम सेवन करणे आणि दुसऱ्याला ऐकवणे हा परउपकार आहे हे चांगले आहे त्यामुळे नाम घ्यावे व द्यावे त्याचा असाच व्यवहार करावा. असे हे नांव आणि हरी कथा सरळ आणि मृदू आहे ते आपल्याला नेहमी उर्ध्व गतीला नेत असते. तुकाराम महाराज म्हणतात मी हरी नामाची कथा आणि हरीचे नाम गात या जीवन मार्गात जात आहे तरी सर्वांनी हा उपदेश ऐकावा.
