🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७३३
📿 नामावाचूनि काही दुजे
733.
नामावाचूनि काही दुजे येथे नाही | वेगी लवलाही राम जपा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ | पावसी केवळ निजपद ॥२॥
ध्रुव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध | नामेचि विदगत पावले देखा ॥३॥
नामा म्हणे राम वाचे जया नाम | संसाराचे श्रम हरे नामे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७३३
📿 रामनाम जपे शिव तो स्
733.
रामनाम जपे शिव तो स्मशानी । वाल्मिक तो मुनी नाम जपे ॥१॥
गणिका तारिली रामनाम घेता । पातकी तत्त्वता उद्धरिले ॥२॥
रामनाम सुख शिव जाणे तत्वता । येरांसी महत्व न कळे नाम ॥३॥
साधनांचे सार नाम मुखी गात । रामनाम म्हणता कार्यसिद्धि ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७३४
📿 गाणे गाती रे सुगडे |
734.
गाणे गाती रे सुगडे | तया हासती दुधडे ॥१॥
नाम गोड नाम गोड | होय जन्माचा निवाड ॥२॥
हासे त्यासी हासू द्यावे | गात आपण असावे ॥३॥
नामा म्हणे जे हासती | त्यांची कुळे नरका जाती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७३४
📿 नाम उत्तम चांगलें ।
734.
नाम उत्तम चांगलें । त्रिभुवनी ते मिरविलें ।
जे शंभुनें धरिले । निजमानसीं आदरे ॥१॥
धन्य मंत्र रामनाम । उच्चारितं होय सकाम ।
जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणियां ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७३५
📿 नाम एकचि तारक | रामन
735.
नाम एकचि तारक | रामनामे शुद्ध मुख |येणे उद्धरती तिन्ही लोक | कुळांसहित वैकुंठ ॥१॥
धन्य धन्य ते कुळ | रामनामे नित्य निर्मळ |जो उच्चारी सर्वकाळ | धन्य जन्म तयाचा ॥२॥
एक हरी एक तत्त्व | तेथे धरोनिया शुद्ध सत्त्व |नाना काय करिसी कवित्व | राम नाम उच्चारी ॥३॥
नामा म्हणे नाम मंत्र | हाती न घे आणिक शस्त्र |रामकृष्ण हे वक्त्र | उच्चार इतुकेचि पुरे आम्हा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७३५
📿 एक नाम वाचे । सदा जप
735.
एक नाम वाचे । सदा जपे श्रीरामचे ॥१॥
तेणे तुटेल बंधन । आन नाही पै साधन ॥२॥
नामा परते साधन । नाही नाही उत्तम जाण ॥३॥
नाम जपे चंद्रमौळी । जपी तपी ते सकळीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७३७
📿 जग तरि आम्हा देव । प
737.
जग तरि आम्हा देव । परि हे निंदितो स्वभाव ॥१॥
येतो हिताचा कळवळा । पडती हाती म्हणूनी काळा ॥धृपद॥
नाही कोणी सखा । आम्हा निपराघ पारिखा ॥२॥
उपक्रमे वदे । तुका वर्मासी ते भेदे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७३८
📿 मंत्रांचा पै मंत्र ह
738.
मंत्रांचा पै मंत्र हरी हरी उच्चार | न लागे तो विचार करणे काही ॥१॥
सुफळ नाम गाढे वाचेसि उच्चारू | केशव हाचि करू सर्वांभूती ॥२॥
नाही यासी पतन न होईल बंधन | नित्य हेचि स्नान रामनामे ॥३॥
नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालू नका ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७३८
📿 अहर्निशी ध्यान शंकर
738.
अहर्निशी ध्यान शंकर धरींज्याचेंआ । तो श्रीराम वाचे का रे नाठविसी ॥१॥
रामनाम म्हणता तुटेल बंधन । होईल खंडन कर्माकर्मी ॥२॥
रामनामे गणिका नेली मोक्षपदा । तुटती आपदा गर्भवास ॥३॥
रामनाम जप नित्य ती समाधी । एका जनार्दनी उपाधि तुटोनि गेली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७३९
📿 गंगा न देखे विटाळ ।
739.
गंगा न देखे विटाळ । तेचि रांजणीही जळ ॥१॥
अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥धृपद॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिका लोका ॥२॥
तुका म्हणे आगीविण । बीज वेगळे तो भिन्न ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७४०
📿 करिता हरिकथा नाम सुख
740.
करिता हरिकथा नाम सुखरासी | उद्धार जीवाशी एका नामे ॥१॥
ते हे रामनाम जप तू सप्रेम | जप हा सुगम सुफळ सदा ॥२॥
नामेचि तरले नामेचि तरले | नाम म्हणता गेले वैकुंठासी ॥३॥
नामा म्हणे एक नामेसी विनटे | ते वैकुंठीचे पेठे पावले देखा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७४०
📿 रामनामेंसुख अत्यंत ज
740.
रामनामेंसुख अत्यंत जे आहे । म्हणोनि मना ध्याये नित्य नाम ॥१॥
सुखाचिया गोडी जया नाही ठावीं । ते ते नर असोनिया देही प्रेतवत ॥२॥
शंकर जाणोनि स्मशानी राहिला । अनुभव तो त्याला तोचि जाणे ॥३॥
एका जनार्दनी सुखाचेंजें सुख । रामनाम देख पवित्र मुखी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७४१
📿 हरिविण देह मळीण सर्व
741.
हरिविण देह मळीण सर्वथा | मंगळाची कथा रामकृष्ण ॥१॥
कथा करी कोणी ऐकती जे जन | वैकुंठभुवन हाता आले ॥२॥
वेदशास्त्रा सार नामाचा उच्चार | अंती पैल पार दाखवितो ॥३॥
जन्मोनिया जगी अलिप्त असावे | नाम ते स्मरावे म्हणे नामा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४२
📿 काय ह्याचे घ्यावे ।
742.
काय ह्याचे घ्यावे । नित्य नित्य कोणे गावे ॥१॥
केले हरीकथेने वांज । अंतरोनी जाते निज ॥धृपद॥
काम संसार । अंतरी हे करकर ॥२॥
तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लड ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४३
📿 वदे साक्षत्वेसी वाणी
743.
वदे साक्षत्वेसी वाणी । नारायणी मिश्रित ॥१॥
न लगे काही चाचपावे । जाता भावे पेरीत ॥धृपद॥
भांडार त्या दातियाचे । मी कैचे ये ठायी ॥२॥
सादावीत जातो तुका । येथे एकाएकी तो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७४३
📿 सर्वकाळ पुण्याच्या र
743.
सर्वकाळ पुण्याच्या राशी | हरीनाम आलिया जिव्हेसी |नित्य तप अनुष्ठानाच्या राशी | कोटी यज्ञासी लाभ जाला ॥१॥
धन्य धन्य त्याचा वंश | जे जे रतले नामास |रामनामी नित्य सौरस | ते विष्णुदास पवित्र ॥२॥
पवित्र ते स्वधर्मी | ज्यासी सर्वकाळ नामी |तयाचे नाम पूर्णकामी | मनोरथ पुरतील ॥३॥
नामा जपे नाम हरीचे | सार्थक केले संसाराचे |ओझे फेडिले पूर्वजन्माचे | हरीस्मरण केलिया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४४
📿 ऐसी जिव्हा निकी । वि
744.
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल का न घोकी ॥१॥
जेणे पाविजे उद्धार । तेथे राखावे अंतर ॥धृपद॥
गुंफोनि चावटी । तेथे कोणा लाभे भेटी ॥२॥
तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७४४
📿 नामी नारायण | होय भक
744.
नामी नारायण | होय भक्तांचे आधीन ॥१॥
न मागता भक्ति | नामापासी चारी मुक्ती ॥२॥
भुलो नये जाण | नाम वैकुंठी निशाण ॥३॥
नामा म्हणे ऐसे प्राणी | सम होती नारायणी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७४४
📿 आन नाही दुजा हेत । स
744.
आन नाही दुजा हेत । सदा रामनाम जपत ॥१॥
धन्य धन्य ते शरीर । पावन देह चराचर ॥२॥
अनुग्रहासाठी । हरिहर लाळ घोटी ॥३॥
एका जनार्दनी देव । तेथे तिष्ठे स्वयमेव ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७४५
📿 सदा फळ सुफळ वाचेसी ग
745.
सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ | वंदी कळिकाळ शास्त्र सांगे ॥१॥
ब्रह्मांडनायक ऐसे जे कवतुक | तेचि नाम एक श्रीकृष्ण ऐसे ॥२॥
आदी अंत पाहता नाही पै सर्वथा | परिपूर्ण सरिता अमृताची ॥३॥
नामाम्हणे का करिसी संकेत | उद्धरिले पतित युगायुगी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७४५
📿 अहर्निशी म्हणता । ते
745.
अहर्निशी म्हणता । तेथे न बाधे काळ सत्ता ॥१॥
वरीष्ठा वरिष्ठ नाम । तिही लोकी ते उत्तम ॥२॥
असो भलते याती । परी मुखी नाम जपती ॥३॥
वंद्य होती हरिहरा । देवा इंद्रादिका थोरां ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४६
📿 मानामान किती । तुझ्य
746.
मानामान किती । तुझ्या क्षुल्लक संपत्ती ॥१॥
जा रे चाळवी बापुडी । कोणी धरितील ती गोडी ॥धृपद॥
रिद्धीसिद्धी देसी । आह्मी चुंभळे नव्हो तैसी ॥२॥
तुका म्हणे ठका । ऐसे नागविले लोका ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७४६
📿 आता आहे नाही पाहता क
746.
आता आहे नाही पाहता क्षण एक | संपत्तीचे सुख विषय हा ॥१॥
हित ते आचरा हित ते विचारा | नामी भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीच्या बळे एक जाले आंधळे | वेढिले कळिकाळे स्मरण नाही ॥३॥
एक विद्यावंत जातीच्या अभिमाने | नेले तमोगुणे रसातळा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४७
📿 पाहातोसी काय । आता प
747.
पाहातोसी काय । आता पुढे करी पाय ॥१॥
वरी ठेवू दे मस्तक । ठेलो जोडूनि हस्तक ॥धृपद॥
बरवे करी सम । नको भंगो देऊ प्रेम ॥२॥
तुका म्हणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४८
📿 भक्त ऐसे जाणा जे देह
748.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारूनि ॥१॥
विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥धृपद॥
निर्वाणी गोविंद असे मागेपुढे । काहीच साकडे पडो नेदी ॥२॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलिया भय नरका जाणे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७४८
📿 अखंड वाचे नाम । तया
748.
अखंड वाचे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
रामनाम वदता वाचे । ब्रह्मासुख तेथे नाचे ॥२॥
राम नाम वाचे टाळी । महादोषा होय होळीं ॥३॥
दो अक्षरासाठीं । ब्रह्मा लागे पाठोपाठी ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८›
📿 अभंग क्र. ७४९
📿 प्राण जाये प्रेत न ब
749.
प्राण जाये प्रेत न बोले चित्रीचे लेप न हाले ।
तैसे दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी वो करी हे शब्दची वाउगे ठेले रया ॥१॥
आता आपणिया आपण विचारी ।
शेखी प्रकृति ना पुरूष निर्धारी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७४९
📿 तोचि ही क्षुल्लके सख
749.
तोचि ही क्षुल्लके सखी सहोदरे । नाही विश्वंभरे वोळखी तो ॥१॥
नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होता सकळ मिथ्या ॥धृपद॥
रवि नुगवे तो दीपिकाचे काज । प्रकाशे ते तेज सहज लोपे ॥२॥
तुका म्हणे देहसंबंधे संचिते । कारण निरुते नारायणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७४९
📿 वैखरी वाचा वदे रामकृ
749.
वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगी त्याचा ॥१॥
आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचे चरण चुरी ॥२॥
शिव विष्णु ब्रह्मा इंद्रादिक देव । करिती गौरव त्याचा बहु ॥३॥
जनार्दनाचा एका सांगतसे उपाव । धरा नामी भाव दृढ जनी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७५०
📿 ब्राह्मण हो तुम्ही स
750.
ब्राह्मण हो तुम्ही सर्व नारीनर|सर्वासी आधार नाम सत्य ॥१॥
नामाविण गति न सरे आणिक|वैकुंठनायक बोले मुखे ॥२॥
परि तेंचि नाम पहावे शोधुनी|चौ-यांशीची खाणी तेंव्हा चुके ॥३॥
नामा म्हणे आता सद्गुरू वंदुनी|नाम घ्या शोधुनि सत्य मुक्त ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७५०
📿 घ्या रे रामनामाची का
750.
घ्या रे रामनामाची कावड भाई । शिव हरहर वदा भाई ॥१॥
अकार उकार मकार तिचा पाया । उभारिले त्रिगुण तनयां ॥२॥
हरिहर कावड घेता खांदी । तुटे जन्ममरण व्याधी ॥३॥
घेऊनि कावडी नाचे एका । एका जनार्दनी आवडी देखा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७५१
📿 ब्राह्मणा न कळे आपुल
751.
ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म|गवसे परब्रह्म नामे एका॥१॥
लहान थोरांसी करितो प्रार्थना|दृढ नारायणा मनी धरा॥२॥
सर्वांप्रति माझी हेचि पै विनंती|आठवा श्रीपति आपुले मनीं॥३|केशव नारायण करावे आचमन|तेचि संध्या स्नान कर्म तया॥४॥
नामा म्हणे हेंचि करा नित्य भजन|ब्रह्मार्पण साधन याचे पायीं॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७५१
📿 श्रुतिशास्त्रां अति
751.
श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरी । क्रीडतु राम ॥१॥
क्षण एक नमस्कारा । नातुडे सुरवरा । तो रिसा आणि वानर क्षेम देतो राम ॥२॥
चरणी शिळा उद्धरी । नामे गणिका तारी । तो कोळियाचे घरी । पाहुणा राम ॥३॥
शिवाचें निजध्येय । वाल्मिकाचें गुह्मा । तो भिल्लणीचीं फळे खाय । श्रीराम ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७५२
📿 जळे माझी काया लागला
752.
जळे माझी काया लागला वोणवा । धाव रे केशवा मायबापा ॥१॥
पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जाले ॥धृपद॥
फुटोनिया दोन्ही भाग होऊ पाहे । पाहातोसी काय हृदय माझे ॥२॥
घेऊनि जीवन धावे लवलाही । कवणाचे काही न चले येथे ॥३॥