🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३४४
📿 उठले निवृति संतांच्य
1344.
उठले निवृति संतांच्या दरुशना | पंढरीचा प्रेमा घरा आला ॥१॥
केली प्रदक्षिणा वंदिले चरण | जाला अभिमान नामवासी ॥२॥
देवाचे जवळी आम्ही निरंतर यासी अधिकार नमस्कारा ॥३॥
नित्य समागम हरिच्या चरणी हे आणि आम्ही देवभक्त ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३४४
📿 नामपाठ श्रेष्ठ तीर्थ
1344.
नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचे ते तीर्थ । वदे तू चितारहित सर्वकाळ ॥१॥
काळाचे ते काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥
जनार्दनाचा एका काळा बांधी चरणी । म्हणोनी जनार्दनी विनटला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३४५
📿 कैसा तू देखिला होसील
1345.
कैसा तू देखिला होसील गोपाळी । पुण्यवंता डोळी नारायणा ॥१॥
तेणे लोभे जीव जालासे बराडी । आम्ही ऐशी जोडी कई लाभो ॥धृपद॥
असेल ते कैसे दर्शनाचे सुख । अनुभवे श्रीमुख अनुभविता ॥२॥
तुका म्हणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणक्षणा होते ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३४५
📿 उठले ज्ञानेश्वर केले
1345.
उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन | मस्तकी चरण नमस्कारिले ॥१॥
नामा म्हणे आम्हा वडिल अधिकारू | यासाठी नमस्कारू योग्य आहे ॥२॥
आम्ही देवापाशी असतो सर्वकाळ | येऊनी सकळ वंदिताती ॥३॥
वैष्णवांचे भार देव सुरगण येताती शरण पंढरिसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३४५
📿 नामपाठ श्रेष्ठ तीर्थ
1345.
नामपाठ श्रेष्ठ तीर्थाचें ते तीर्थ । वदे तू चितारहित सर्वकाळ ॥१॥
काळांचे ते काळ नामपाठ गात । काळ हा तयास नमस्कारी ॥२॥
जनार्दनाचा एका काळा बांधी चरणी । म्हणोनी जनार्दनी विनटला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३४६
📿 आले ते सोपान वंदिले
1346.
आले ते सोपान वंदिले या पायी | पांडुरंगा ठायी मानियेला ॥१॥
रंजल्यागांजल्याचा घेतला समाचार | संतामाया थोर अनाथांची ॥२॥
आमुचे मायबाप भेटलेति आज | समाधान सहज आलिगिता ॥३॥
नामा म्हणे मज कळले याचे प्रेम देव केले श्रम काय गुणे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३४६
📿 नामपाठ यश कीर्ति नाम
1346.
नामपाठ यश कीर्ति नामपाठे । तो जाय वैकुंठा हेळामात्रें ॥१॥
न करी रे जना आळस मानसी । नामपाठ अहर्निशी जपे सदा ॥२॥
जनार्दनाच एका सांगतो आदरे । नामपाठ स्मरे वेळोवेळां ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३४७
📿 काय माझा पण होईल लटि
1347.
काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोका दाविली ते ॥१॥
खरी करूनिया देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥धृपद॥
आणीक म्या कोणा म्हणवावे हाती । नये काकुलती दुजियासी ॥२॥
तुका म्हणे मज येथे चि ओळखी । होईन तो सुखी पायानींच ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३४७
📿 अखंड जयाला देवाचा शे
1347.
अखंड जयाला देवाचा शेजार | का रे अहंकार नाही गेला ॥१॥
मान अपमान वाढविसी हेवा | दिवस असता दिवा हाती घेसी ॥२॥
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ | आंधळे पा डोळे का बा जाले ॥३॥
कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी | अद्यापि नरोटी राहिली का ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३४८
📿 तुम्हा आम्हा जव जालि
1348.
तुम्हा आम्हा जव जालिया समान । तेथे कोणा कोण सनमानी ॥१॥
उरी तो राहिली गोमटे गौरव । ओढे माझा जीव पायापाशी ॥धृपद॥
नेणपणे आम्ही आळवू वोरसे । बोलवितो रसे शब्दरत्ने ॥२॥
तुका म्हणे लळे पाळी वो विठ्ठले । का हे उरविले भेदाभेद ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३४८
📿 निवृती ज्ञानदेव सोपा
1348.
निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई | म्हणती ज्ञान कायी कथुनिया ॥१॥
भक्तीचिया बळे देव पै जिंकिला | ऋणाईत केला कैसा येणे ॥२॥
धन्य ते भाविक नामा आणि कबीर | रोहिदास चांभार बहिरा पिसा ॥३॥
त्यांची पायधुळी वंदिता कपाळी | वंशही समूळी उद्धरती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३४९
📿 नको माझे मानू आहाच त
1349.
नको माझे मानू आहाच ते शब्द । कळवळ्याचा वाद करीतसे ॥१॥
कासयाने बळ करू पायापाशी । भाकावी ते दासी करुणा आह्मी ॥धृपद॥
काय मज चाड असे या लौकिके । परी असे निके अनुभवाचे ॥२॥
लांचावल्यासाठी वचनाची आळी । टकळ्याने घोळी जवळी मन ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३४९
📿 जालासी हरिभक्त तरी आ
1349.
जालासी हरिभक्त तरी आम्हा काय | आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥
घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे ॥२॥
गुरुविण तुज नव्हेचि गा मोक्ष होशिल मुमुक्षु साधक तू ॥३॥
आत्मतत्व दृष्टी नाहींच पा केली | तंववरी ब्रह्मबोली बोलुनि काय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५०
📿 जन्मा आलीयाचा लाभ ।
1350.
जन्मा आलीयाचा लाभ । पद्मनाभ दरुषणे ॥१॥
म्हणउनि लवलाहे । पाय आहे चिंतीत ॥धृपद॥
पाठीलागा येतो काळ । तू कृपाळु माउली ॥२॥
बहु उसंतीत आलो । तया भ्यालो स्थळासी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५०
📿 बोलोनिया येणे वाढविल
1350.
बोलोनिया येणे वाढविला डांगोरा | अंतरींचा कोरा गुरुविण ॥१॥
संतांचा सन्मान कळेना जयासी | राहुनि देवापाशी काय केले ॥२॥
परिसा झाकण घातले खापर | नाही जाले अंतर बावनकस ॥३॥
खदिरांगारी श्रृंगारी हिलाल | अंतरीचे काळे गेले नाही ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५१
📿 अमृत टाकुन कांजीची आ
1351.
अमृत टाकुन कांजीची आवडी | साजेना झोपडी काय त्याला ॥१॥
खरासी अखंड गंगेचे हो स्नान | गेले वायांविण जिणे त्याचे ॥२॥
पोपळयापरित दिसती रानगुंजा | श्रृंगाराच्या काजा न येती त्या ॥३॥
आनारा परिस चोखट इंद्रावन | चवी कडुपण हीन त्याचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३५१
📿 नामपाठ नारायण वदे सर
1351.
नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाच तो काळ नारायण ॥१॥
नारायण गाय नारायण ध्याय । नारायण पाहे सर्वाठायीं ॥२॥
जनार्दनाचा एका नारायणीं प्रेम । आणिक नाही प्रेम दुजा कांही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५२
📿 उसाचे सेजारी येरंडाच
1352.
उसाचे सेजारी येरंडाचे झाड | नाही त्याचा पाड गोडी आली ॥१॥
कर्पुरासी जाला दीपाचा शेजार | काय गुणे सार राहिल त्याचा ॥२॥
सागरी लवण टाकिले नेऊन काय गुण खडेपण उरले त्याचे ॥३॥
तैसा नामदेव विठोबाच्या जागा काय गुणे या गा कोरेपण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५३
📿 याचा तव हाचि मोळा ।
1353.
याचा तव हाचि मोळा । देखिला डोळा उदंड ॥१॥
नेदी मग फिरो मागे । अंगा अंग संचरे ॥धृपद॥
का गा याची नेणा खोडी । जीभा जोडी करितसे ॥२॥
पाघरे ते बहु काळे । घोंगडे ही ठायीचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५३
📿 संत पाहुणेरा सज्जनाच
1353.
संत पाहुणेरा सज्जनाचे घरी पूजा करिता वरी डोई काढी ॥१॥
करिता सन्मान अंगी भरे ताठा देवा मे करंटा असुनी काय ॥२॥
अहंता हा खुंट वाढविला चित्ती | न साहे संगती सज्जनाची ॥३॥
पंढरीचे भूषण सांगतो जनांसी | नाही या मनासी तीळ बोध ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३५३
📿 नामपाठ गोविंद हाचि ल
1353.
नामपाठ गोविंद हाचि लागो छंद । न करी भेदाभेद हृदयामाजीं ॥१॥
गोविंद नाम गाय गोविंद नाम गाय । गोविंद नाम गाय हृदयी सदा ॥२॥
जनार्दनाचा एका हृदयी ध्यायें सच्चित्ता । गोविंद गीती सुख जोडे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५४
📿 प्रसिद्ध हा असे जगा
1354.
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥
तरी वाटा न वजे कोणी । नारायणी घरबुडी ॥धृपद॥
बहुता ऐसे केले मागे । लाग लागे लागेना ॥२॥
हो का नर अथवा नारी । लाहान थोरी आदर ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५४
📿 चौदाशे वरुषे शरीर के
1354.
चौदाशे वरुषे शरीर केले जतन | बोधाविण शिण वाढविला ॥१॥
नाही गुरुमंत्र नाही उपदेश | 'परमार्थासि दोष लावियेला ॥२॥
स्वहिताचे कारण पडियेले जेव्हा | शरण आला तेव्हा आळंकापुरी ॥३॥
गैनीनार्थे गुज दिले निवृत्तीला | निवृत्तीचा जाला ज्ञानदेव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५५
📿 न संडावा आता ऐसा वाट
1355.
न संडावा आता ऐसा वाटे ठाव । भयासी उपाव रक्षणाचा ॥१॥
म्हणऊनि मने वळियेले मन । कारियाकारण चाड नाही ॥धृपद॥
नाणावी उपाधि करूनिया मूळ । राखता विटाळ तेचि व्हावे ॥२॥
तुका म्हणे येथे न वेचे वचन । निजी निजखूण सांपडली ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५५
📿 निवृत्तिदेव म्हणे ऐस
1355.
निवृत्तिदेव म्हणे ऐसे म्हणा नये | धन्य भाग्ये पाहे संत आले ॥१॥
आपुले स्वहित करावे आपण | मतांच्या सन्माना चुको नये ॥२॥
धन्य हो ते नर राहाती पंढरी श्वान त्यांचे घरी सुखे व्हावे ॥३॥
नामदेवा संगे देवाचा हो वोढा | प्रेमे केला वेडा पांडुरंग ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५६
📿 सत्तेचे भोजन समयी आत
1356.
सत्तेचे भोजन समयी आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी ॥१॥
वर्मेंभ्रम नेला जाले एकमय । हृदयस्थी सोय संग झाला ॥धृपद॥
कोथळीस जमा पडिले संचित । मापल्याचा वित्त नेम झाला ॥२॥
तुका म्हणे धणी ऐसा झालो आता । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५६
📿 कुलालाचे कुंभ भाजल्य
1356.
कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती | काय आहे संगती पाणियाची ॥१॥
मेणाची पुतळी घेता करी बरी | अग्निचे शेजारी राहे कैशी ॥२॥
तैसा अधिरासी काय संतसंग | मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥
ते आजि नवल देखियेले डोळा | दगड जैसा जळा वेगळेपण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३५६
📿 नामपाठ त्रिविक्रम वद
1356.
नामपाठ त्रिविक्रम वदे तू रे वाचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥१॥
बळीये द्वारी त्रिविक्रम उभा । नाम पाठें उभा तुजपुढे ॥२॥
जनार्दनाचा एका त्रिविक्रमीं वंदी । साधन उपाधी नेणे आन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५७
📿 देईल ते उणे नाही । य
1357.
देईल ते उणे नाही । याचे काही पदरी ॥१॥
पाहिजे ते संचित आता । येथे सत्ता करावया ॥धृपद॥
गुणा ऐसा भरणा भरी । जो जे चारी ते लाभे ॥२॥
तुका म्हणे देवी देव । फळे भव आपुला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५७
📿 कुलाल आपल्या घरी भाज
1357.
कुलाल आपल्या घरी भाजवी भाचरी | म्हणे जे होईल हरि कृपावंत ॥१॥
हरीसि वरदळ लावितो निशिदिनी | धाडिला म्हणोनि तुम्हांपाशी ॥२॥
तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ | नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥
राखावे ते ब्रीद करावे पावन | धाडा बोलावणे गोरोबाला ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३५७
📿 नामपाठे वामन अक्षरे
1357.
नामपाठे वामन अक्षरे ती तीन । आणिक योगसाधन आन नाही ॥१॥
वदे तू वामन वदे तू वामन । विषय वमन करुनि सांडि ॥२॥
जनार्दनाचा एका नसे तो पारखा । वामन तेणे सखा जोडियेला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५८
📿 तेव्हा होतो भोगाधीन
1358.
तेव्हा होतो भोगाधीन । तुम्हा भिन्न पासूनि ॥१॥
आता बोलो नये ऐसे । आनारिसे वेगळे ॥धृपद॥
सन्मुख जालो स्वामीकडे । भव आंगडे निराळे ॥२॥
चिंतिले ते चिंतामणी । फिटे धणी तो द्यावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५८
📿 गोरा जुनाट पे जुने |
1358.
गोरा जुनाट पे जुने | हाती थापटणे अनुभवाचे ॥१॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी | वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥
सोह शब्द विरक्ति डवरली आंतरी | पाहाता आंबरी अनुभव ॥३॥
म्हणे मुक्ताबाई घालू या लोटांगण | जाऊ द्या शरण अव्यक्तासी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३५८
📿 नाम ते सार श्रीधरांच
1358.
नाम ते सार श्रीधरांचे वाचे । कोटी जन्माचें दोष जाती ॥१॥
जपे तू आवडी धरुनिया गोडी । युगाऐसीं धडी करुनियां ॥२॥
जनार्दनी एका श्रीधर निजसखा । नोहे तो पारखा जनार्दनी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३५९
📿 केला कइवाड संतांच्या
1359.
केला कइवाड संतांच्या आधारे । अनुभवे खरे कळो आले ॥१॥
काय जीवित्वाची धरुनिया आशा । व्हावे गर्भवासा पात्र भेणे ॥धृपद॥
अबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया । रांडा रोटा वाया करू नये ॥२॥
तुका म्हणे बळी देता ते निधान । भिकेसाठी कोण राज्य देतो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३५९
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६०
📿 निवृत्तिदेव म्हणे चल
1360.
निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधी | अचळ हे आदि समाधी असे ॥१॥
सद्गुरुप्रसादे बोधिली नेटकी गुहे गौप्य ताटी आड केली ॥२॥
दंड चक्राकार बांधिली चौकुन | आंत संतजन करिती वास ॥३॥
ऐसे गुंफेमध्ये नाही नामदेव म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६०
📿 नाम ते सोपे पद्मनाभ
1360.
नाम ते सोपे पद्मनाभ पाठ । करी तू बोभाट दिवसनिशी ॥१॥
चौसष्ट घडियामाजीं जपे नामावली । कळिकाळ टाळी मारु न शके ॥२॥
जनार्दनाचा एक नामी तो निर्भय । कळिकाळ वंदी पाय जन्मोजन्मी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३६१
📿 करिता विचार सापडले व
1361.
करिता विचार सापडले वर्म । समूळ निश्रम परिहाराचे ॥१॥
मज घेऊनिया आपणासी द्यावे । साठी जीवे भावे नारायणा ॥धृपद॥
उरी नाही मग पडदा का आला । स्वमुखेचि भला करिता वाद ॥२॥
तुका म्हणे माझे खरे देणे घेणे । तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६१
📿 परस्परे गुह्य करिती
1361.
परस्परे गुह्य करिती भाषण | म्हणती महाधन गांवा आला ॥१॥
रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार | नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥
श प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणे | दीप त्रिभुवनी एक जाला ॥३॥
निवृत्तिदेव म्हणे कुलालाचे चक्र | अंतर बाहेर एक ऐसे जाले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६१
📿 दामोदर गावा दामोदर प
1361.
दामोदर गावा दामोदर पहावा । दामोदर सांठवा हृदयमाजीं ॥१॥
गोपीराजी ध्यान दामोदरी मन । चुकलें बंधन नाम घेता ॥२॥
जनार्दनाचा एका दामोदरी मिनला । कृतकृत्य झाला उभय लोकी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६२
📿 हांसोनि सोपाने खुणाव
1362.
हांसोनि सोपाने खुणावित्या खुणा | नामदेव पाहुणा आला असे ॥१॥
तयासी हो पाक पाहिजे पवित्र | भाजले की कोरे कळो नेदी ॥२॥
मुक्तिकेचे पारखी तुम्ही आहा देवा | भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥
आनंदे डुल्लती करावरी कर | नेशो राहिले कोरे कोण्या गुणे ॥४॥
1363. नामदेव पायरी...
वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य पूर्ण झाले तेव्हा संत नामदेव महाराजांनी विठ्ठलापाशी संजीवन समाधी घेण्याची इच्छा प्रकट केली. जेव्हा ही गोष्ट त्यांच्या परिवाराला समजली, तेव्हा आई, वडील, मुले आणि सुना यांनी त्यांच्यासमवेत समाधी घेण्याचे ठरविले. शके १२७२ आषाढ वद्य त्रयोदशी दिवशी संत नामदेव महाराजांसह त्यांच्या परिवारातील चौदाजणांनी संजीवन समाधी घेतली. संत नामदेवांनी पायरीची जागा का निवडली तर विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या संतांची चरण धूळ आपल्या अंगावर पडावी ही त्यामागील शुद्ध भावना होती म्हणून त्यांनी मंदिरा बाहेरील पायरीपाशी संजीवन समाधी घेतली कि जी आज नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे भाविक प्रथम नामदेव पायरीचे दर्शन घेतात आणि मग विठ्ठल दर्शनला मंदिरात जातात.
विठ्ठल मूर्ती.
वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेनुसार विठ्ठलाची मूर्ती ना बसवली आहे, ना घडवली आहे तर ती स्वयंभू आहे. मात्र मूर्ती विज्ञान अभ्यासक ग. ह. खरे यांच्या मते मूर्ती पाचव्या शतकातील असावी. त्याबाबत एकमत नाही. आक्रमणाच्या वेळी ही मूर्ती काढून सुरक्षित ठिकाणी ठेऊन बडव्यांनी पुन्हा बसवली आहे. मूर्ती समचरण आहे देवाने कमरेवर दोन हात ठेवले आहेत कारण हा संसाररूपी भवसागर भक्तांसाठी कमरे एवढा आहे हे सांगण्यासाठी देवाने कमरेवर हात ठेवले आहेत अशी कल्पना शंकराचार्य यांनी केली आहे. कंठहार, मस्यकुंडले, डोक्यावर किरीट आहे आणि जो महादेवाच्या पिंडीसारखा आहे अशी आख्यायिका सांगितली जाते कि भगवान शंकर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले तेव्हा मस्तकावर विराजमान झाले हातात कमळ आहे कारण कृष्ण अवतारात दैत्यांचा संहार केल्यानंतर कृष्णाने शस्त्रे खाली ठेवली कृष्णाचा दुसरा अवतार म्हणजे पांडुरंग त्यामुळे कृष्णाने भक्तांच्या स्वागतासाठी कमळ हातात घेतले आहे पांडुरंगाची मूर्ती सुंदर आहे म्हणून देवाला मदनाचा पुतळा म्हंटले जाते.
विष्णुपद
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६३
📿 जोहारियाचे पुढे मांड
1363.
जोहारियाचे पुढे मांडियेले रत्न | आता मोला उणे येईल कैसे ॥१॥
तैसे थापटणे पारखियाचा हात | वाफ जाल्या घात वाया जाती ॥२॥
प्रथम थापटणे निवृत्तीच्या माथा | डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥
तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर | आता कैचे कोरे उरे येथे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६३
📿 वासुदेव नाम प्रातःका
1363.
वासुदेव नाम प्रातःकाळी वाचे । धन्य जन्म त्यांचे सुफळ सदा ॥१॥
वाहता टाळीं मुखी नाम सार । वासुदेव उच्चार करी आधी ॥२॥
जनार्दनाचा एका एकपणे देखा । जनार्दन सखा जोडियेला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३६४
📿 ज्याने आड यावे काही
1364.
ज्याने आड यावे काही । त्याचे नाही बळ आता ॥१॥
मन येथे साह्य जाले । हरीच्या धाले गुणवादी ॥धृपद॥
चुकुर तो गेला काळ । जाले बळ संगाचे ॥२॥
तुका म्हणे धरू सत्ता । होईल आता करू ते ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६४
📿 संतसमागम फळला रे मला
1364.
संतसमागम फळला रे मला | सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥
अतीथि आदर केला मुक्ताबाई | लांकडाने डोई फोडिली माझी ॥२॥
देवाने गोंधळ घातला गरुडपारी भिजली पितांबरी अश्रुपाती ॥३॥
माझे माझे म्हणोनि गाईले गान्हाणे | कळले संतपण हेंचि तुमचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६४
📿 नाम जप वाचा प्रद्युम
1364.
नाम जप वाचा प्रद्युम्न साचा । न करी नामाचा आळस कदा ॥१॥
संसारयातना जाती पा निर्धारे । नाम निरंतर जपे आधी ॥२॥
जनार्दनाचा एका त्रैलोक्याचा सखा । झाली पूर्ण कृपा जनार्दन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३६५
📿 देवासी तो पुरे एकभाव
1365.
देवासी तो पुरे एकभाव गाठी । तोचि त्याचे मिठी देईल पायी ॥१॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनिया ॥धृपद॥
काही नेघे शिरी निमित्ताचा भार । न लगे उत्तर वेचावेचि ॥२॥
तुका म्हणे जीवे पडिलिया गाठी । मग नाही मिठी सुटो येत ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६५
📿 उद्विग्न मनी करी दीघ
1365.
उद्विग्न मनी करी दीघ ध्वनी | नाही माझे कोणी सखे ऐसे ॥१॥
वैराग्य कसवटी सोसवेना घाये | पळावया पाये मार्ग काढी ॥२॥
जाले चाळाचूळ मनांत चंचळ | युगा ऐसे पळ वाटतसे ॥३॥
नामा म्हणे जावे पळोनिया आता संतसंग होता भाजतील ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६५
📿 नाम अनिरुद्ध जगी ते
1365.
नाम अनिरुद्ध जगी ते प्रसिद्ध । ओहं सोहं बोध गिळोनि गाय ॥१॥
अहंकार सांडी नाम मुखें मांडी । साधन देशधडी करुनी जपे ॥२॥
जनार्दनाच एक साधन सारुनी । जनार्दनचरणीं विनटला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३६६
📿 लौकिकासाठी या पसाऱ्य
1366.
लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा । काही नाही देवा लागो येत ॥१॥
ठेवावा माथा तो नुचलावा पायी । ठांयींचिये ठांयी हालो नये ॥धृपद॥
डहुळिल्या मने वितुळले रूप । नावऐसे पाप उपाधीते ॥२॥
तुका म्हणे देव प्रीतीने कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६६
📿 अंतर बाहेर भाजू आम्ह
1366.
अंतर बाहेर भाजू आम्ही कुंभ भरू निरालंब सगळेची ॥१॥
अह सोह उर्ध्व लाउनी फुंकणी | नेत्रद्वारे फुंकुनी जाळ करू ॥२॥
जीवित्व काढूनि शिव घडू अंगा | प्रिय पांडुरंगा आवडेल ॥३॥
म्हणे मुक्ताबाई पळायाचे पाही | आसन स्थिर नाही नामयाचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३›
📿 अभंग क्र. १३६६
📿 नामपुरुषोत्तम घेई तू
1366.
नामपुरुषोत्तम घेई तू आवडी । यातना कल्पकोडी नाही तुज ॥१॥
नाम हे आठवी नाम हे आठवी । हृदयी सांठवी पुरुषोत्तम ॥२॥
जनार्दनाचा एका पारखी नेटका । पुरुषोत्तम सखा जोडिलासे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३६७
📿 नाही होत भार घातल्या
1367.
नाही होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥१॥
ऐसा नाही मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरले ॥धृपद॥
उतावीळ असे शरणागत काजे । धावा केशीराजे आइकता ॥२॥
तुका म्हणे हित चिंतन भरवसा । नेदी गर्भवासा येऊ देऊ ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 श्री नामदेव व श्री ज्ञानदेवादी संतांची भेट अर्थात नामदेवाचा भक्ती गर्वपरिहार›
📿 अभंग क्र. १३६७
📿 न पुसता संता निघाला
1367.
न पुसता संता निघाला तेथुनी | पैलपार इंद्रायणी प्राप्त जाला ॥१॥
मार्गे पुढे पाहे पळत तांतडी | आला उठाउठी पंढरिसी ॥२॥
कळवळोनि कंठी धरिली विठल मूर्ती | नको देऊ हाती निवृत्तीच्या ॥३॥
ज्ञानदेव सोपान बोलाविला गोरा | जुनाट म्हातारा जाळू आला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १३६८
📿 उपजो मरो हे तो आमुची
1368.
उपजो मरो हे तो आमुची मिरासी । हे तू निवारिसी तरी थोर ॥१॥
उभा राही करी खरा खोटा वाद । आम्ही जालो निंद लंडपणे ॥धृपद॥
उभयता आहे करणे समान । तुम्हा ऐसा म्हणे मी ही देवा ॥२॥
तुका म्हणे हाती सापडले वर्म । अवघाची भ्रम फेडिन आता ॥३॥