संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५१९
📿 डोळले सिणले पाहता वा
1519.
डोळले सिणले पाहता वाटुली | अवस्था दाटली हृदयामाजी ॥१॥
तू माझी जननी सखिये सांगातिणी | विठ्ठले धांवोनी देई क्षेम ॥२॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज | क्षुधे पीडिलो मज विसरलीसी ॥३॥
तू माझी कुरंगिणी मी तुझे पाडस | गुंतले भवपाश सोडी माझा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५२१
📿 एक एका साह्य करू । अ
1521.
एक एका साह्य करू । अवघे धरू सुपंथ ॥१॥
कोण जाणे कैसी परी । पुढे उरी ठेविता ॥धृपद॥
अवघे धन्य होऊ आता । स्मरविता स्मरण ॥२॥
तुका म्हणे अवघी जोडी । ते आवडी चरणांची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५२१
📿 कृपावंत समर्थ म्हणून
1521.
कृपावंत समर्थ म्हणूनि करी आत | येईन सांवरत पांडुरंगे ॥१॥
मज का विसंबली विठ्ठल माउली | तनु तृषावली जीवनेंविण ॥२॥
तू माझे जीवन नाम जनार्दन | हृदयी भरी पूर्ण प्रेमरस ॥३॥
अमृताच्या करे कांसवीच्या भरें| कुरवाळी त्वरे देह माझा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५२२
📿 फलकट तो संसार । येथे
1522.
फलकट तो संसार । येथे सार भगवंत ॥१॥
ऐसे जागवितो मना । सरसे जनासहित ॥धृपद॥
अवघे निरसूनि काम । घ्यावे नाम विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५२२
📿 तू माझी माउली मी वो
1522.
तू माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तू माझी गाउली मी तुझे वासरू | नको पान्हा चोरू पांडुरंगे ॥२॥
तू माझी हरिणी मी तुझे पाडस | तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज | चारा घाली मज पांडुरंगे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५२४
📿 असंती काटाळा हा नव्ह
1524.
असंती काटाळा हा नव्हे मत्सर । ब्रम्ह ते विकार विरहित ॥१॥
तरि म्हणा त्याग प्रतिपादिलासे । अनादि हा असे वैराकार ॥धृपद॥
सिजले हिरवे एका नावे धान्य । सेवनापे भिन्न निवडे ते ॥२॥
तुका म्हणे भूती साक्षी नारायण । अवगुणी दंडण गुणी पुजा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५२५
📿 आपुले आपण जाणावे स्व
1525.
आपुले आपण जाणावे स्वहित । जेणे राहे चित्त समाधान ॥१॥
बहुरंगे माया असे विखुरली । कुंठिंतचि जाली होता बरी ॥धृपद॥
पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी । भाव विश्वंभरी समर्पावा ॥२॥
तुका म्हणे गेला फिटोनिया भेद । मग होतो देव मनाचाचि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५२६
📿 संत श्रेष्ठ संत श्रे
1526.
संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ । पातकी नष्ट तारिती ॥१॥
ऐसा आहे अनुभव । पुराणीं पहाहो निर्वाहो ॥२॥
वेद शास्त्र देती ग्वाही । संत श्रेष्ठा सर्वा ठायी ॥३॥
एका जनार्दनी संत । ब्रह्मादिका न कळे अंत ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५२७
📿 उडाली पक्षिणी गेली अ
1527.
उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळाजवळी ठेवूनिया ॥१॥
तसे माझे मन राहो का ईश्वरी | मग सुखे संसारी असेना का ॥२॥
धेनु चरे वनी वच्छ असे घरी चित्त बच्छावरी ठेवुनि फिरे ॥२॥
दुडीवरी दुडी सखिसी गोष्टी करी | चित्त दुडीवरी ठेवूनिया ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५२८
📿 येई वो कृपावंते अनाथ
1528.
येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारी भवव्यथे पांडुरंगे ॥१॥
मी बाळक भुकाळु तू माउली कृपाळु | करी माझा सांभाळु पंढरिराया ॥२॥
माझे माहेर मे नित्य आठवे अंतरी | सखा विटेवरी पांडुरंग ॥३॥
मी देह तू चैतन्य मी क्षुधार्त तू अन्न | मी तृषार्त तू जीवन पांडुरंगा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५२८
📿 तुटती बंधनें संतांच्
1528.
तुटती बंधनें संतांच्या दारुशनें । केले ते पावन जगी बहु ॥१॥
महा पापराशी तारिले अपार । न कळे त्यांचा पार वेदशास्त्रां ॥२॥
वाल्मिकादि दोषी तारिले अनुग्रही । पाप तेथे नाही संत जेथे ॥३॥
पापताप दैन्य गेले देशांतरीं । एका जनार्दनी निर्धारी सत्य सत्य ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५२९
📿 उदापरणें संत भले । प
1529.
उदापरणें संत भले । पापी उद्धरिले तात्काळ ॥१॥
ऐसे भावे येता शरण । देणे पेणे वैकुंठ ॥२॥
ऐसे उदार त्रिभुवनी । संतावांचुनीं कोण दुजे ॥३॥
एका जनार्दनी शरण । संत पतीतपावन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५३०
📿 येणे जाणे तरी । राहे
1530.
येणे जाणे तरी । राहे देव कृपा करी ॥१॥
ऐसे तव पुण्य नाही । पाहाता माझे गाठी काही ॥धृपद॥
भय निवारिता । कोण वेगळा अनंता ॥२॥
तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५३०
📿 प्रेमपिसे भरले अंगी
1530.
प्रेमपिसे भरले अंगी | गीते छंदे नाचो रंगी ॥१॥
कोणे वेळे काय गाणे हे तो भगवंता मी नेणे ॥२॥
वारा धावे भलतेया तैसी माझी रंगछाया ॥३॥
टाळ मृदंग दक्षिणेकडे | आम्ही गातो पश्चिमेकडे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५३१
📿 भल्याचे कारण सांगावे
1531.
भल्याचे कारण सांगावे स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥
परी आम्ही असो एकाचिये हाती । नाचवितो चित्ती त्याचे तैसे ॥धृपद॥
वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार । होती उपकार अगणित ॥२॥
तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुले उचित केले संती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५३२
📿 तुझ्या पायी चित्त रं
1532.
तुझ्या पायी चित्त रंगलेसे माझे | नाही केशिराजे ऐसे केले ॥१॥
उठविता काय होईल संतोष मज अभाग्यास मोकलीले ॥२॥
प्रपंच काबाडी न घाली मज दृढ | नको वार्ड कोड झणी देवा ॥३॥
नामा म्हणे भावे विनंति समस्ता | नको भंगू आता प्रेमपान्हा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५३२
📿 कृपासिंधु ते संत । त
1532.
कृपासिंधु ते संत । तारिती पतीत अन्यायी ॥१॥
न पहाती गुणदोष । देती समरस नाममात्रा ॥२॥
तारिती भवसिंधूचा पार । एक उच्चार स्मरणे ॥३॥
एका जनार्दनी धन्य संत । अनाथ पतीत तारिती ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५३३
📿 बोलू ऐसे बोल| जेणे ब
1533.
बोलू ऐसे बोल| जेणे बोले विठ्ठल डोले ॥१॥
प्रेम सर्वांगाचे ठायीं| वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
परेहूनि परते घर| तेथे राहू निरंतर ॥३॥
सर्वांचे जे अधिष्ठान | तेंचि भाझे रूप पूर्ण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५३५
📿 संतांची स्तुति ते दर
1535.
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगे । पडिल्या प्रसंगे ऐसी कीजे ॥१॥
संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्ती । फाको नये वृत्ति अखंडित ॥धृपद॥
दास्यत्व ते असे एकविध नावे । उरो नये जीवे भिन्नत्वेसी ॥२॥
निज बीजा येथे तुका अधिकारी । पाहिजे ते पेरी तये वेळी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५३५
📿 तुझे प्रेम माझे हृदय
1535.
तुझे प्रेम माझे हृदया आवडी | चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥
कशासाठी शीण थोडक्याकारणे | काय तुज उणे होय देवा ॥२॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा | काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥
नामा म्हणे मज अनाथा सांभाळी | हृदयकमळी स्थिर राहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५३६
📿 सेजेचा एकांत आगीपाशी
1536.
सेजेचा एकांत आगीपाशी कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥
राहो अथवा मग जळो आगीमधी । निवाड तो आधी होऊनि गेला ॥धृपद॥
भेणे झडपणी नाही येथे दुजे । पादरधिटा ओझे हतियारे ॥२॥
तुका म्हणे मज नाही जो भरवसा । तोवरी सहसा निवाड तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५३७
📿 अभागी असोत चांडाळ ।
1537.
अभागी असोत चांडाळ । संतदरुशनें तात्काळ उद्धरती ॥१॥
हा तो आहे अनुभव । स्वयमेव संत होती ॥२॥
पापतापां माहामारी । कामक्रोधाची नुरे उरी ॥३॥
एका जनार्दनी लीन । संत पावन तिही लोकी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५३८
📿 तरी हाव केली अमुप व्
1538.
तरी हाव केली अमुप व्यापारे । व्हावे एकसरे धनवंत ॥१॥
जालो हरीदास शूरत्वाच्या नेमे । जाली ठावी वर्मे पुढिलांची ॥धृपद॥
जनावेगळे हे असे अभिनव । बळी दिला जीव म्हणऊनि ॥२॥
तुका म्हणे तरी लागलो विल्हेसी । चालतिया दिवसी स्वामी ॠणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५३८
📿 यातिहीन असो भला । जो
1538.
यातिहीन असो भला । जो या गेला शरण संता ॥१॥
त्यांचे जन्ममरण चुकलें । पावन जाहलें तिही लोकी ॥२॥
उत्तम अधम न म्हणती । समचि देती सर्वांसी ॥३॥
शरण एका जनार्दनी । केले पावन दीनालागुनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५४०
📿 ग्रंथाचे ते अर्थ नेण
1540.
ग्रंथाचे ते अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयी ॥१॥
नाही भेद म्हणून भलतेचि आचरे । मोकळा विचरे मनासवे ॥२॥
तुका म्हणे विषा नांव ते अमृत । पापपुण्या भीत नाही नष्ट ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 स्मरण नाम›
📿 अभंग क्र. १५४०
📿 तू आकाश मी शामिका |
1540.
तू आकाश मी शामिका | तू लिंग मी साळुंखा |तू समुद्र भी चंद्रिका | स्वय दोन्ही ॥१॥
तू वृंदावन मी चिरी | तू तुळशी मी मंजिरी |तू पांवा मी मोहरी | स्वय दोन्ही ॥२॥
तू चांद मी चांदणी | तू नाग मी पचिणी |तू कृष्ण मी रुक्मिणी | स्वये दोन्ही ॥३॥
तू नदी मी थंडी | तू तारू मी सांगी |तू धनुष्य मी भातोडी | स्वये दोन्ही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५४१
📿 कायावाचामने जाला विष
1541.
कायावाचामने जाला विष्णुदास । कामक्रोध त्यास बाधीतना ॥१॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचे ॥२॥
तुका म्हणे चित्त करावे निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५४१
📿 संत मायबाप म्हणता ।
1541.
संत मायबाप म्हणता । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥
मायबाप जन्म देती । संत चुकविती जन्मपंक्तीं ॥२॥
मायबापापरीस थोर । वेदशास्त्री हा निर्धार ॥३॥
शरण एका जनार्दनी । संत शोभती मुगुटमणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५४३
📿 हरीचे नाम कदाकाळी का
1543.
हरीचे नाम कदाकाळी का रे नये वाचे । म्हणता रामराम तुझ्या बाचे काय वेच ॥१॥
पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ ॥धृपद॥
द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती ॥२॥
तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता । राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५४३
📿 मोक्ष मुक्तीचें ठेवण
1543.
मोक्ष मुक्तीचें ठेवणें । देती पेणे संत ते ॥१॥
नाही सायासांचे कोड । नलगे अवघड साधन ॥२॥
नको वनवनांतरी जाणे । संतदरुशनें लाभ हाता ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतसमान देवाच्या ॥४॥