संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय ४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ४ था
ऋषभदेवांचे राज्यशासन -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
नाभीच्या पुत्राचे शरीर जन्मापासूनच भगवान विष्णूंच्या वज्र, अंकुश, इत्यादी चिन्हांनी युक्त होते. समता, शांती, वैराग्य, ऐश्वर्य इत्यादी महान गुणांमुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच होता. हे पाहून मंत्री इत्यादी अधिकारी, प्रजा, ब्राह्मण आणि देवता यांना प्रकर्षाने वाटू लागले की, यांनीच पृथ्वीचे राज्य करावे. त्यांचे सुंदर आणि सुडौल शरीर, विपुल कीर्ती, तेज, बल, ऐश्वर्य, यश, पराक्रम, आणि शौर्य या गुणांमुळे महाराज नाभीने त्यांचे नाव ऋषभ (श्रेष्ठ) असे ठेवले. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २२ वा
भिन्न-भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन -
परीक्षिताने विचारले -
आपण जे सांगितलेत की, जरी भगवान सूर्य राशींकडे जात असताना मेरुपर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले तरी खरे पाहाता त्याची गती उजवीकडे असत नाही, हे आम्ही कसे जाणावे ? (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १८ वा
भिन्न-भिन्न वर्षांचे वर्णन -
श्रीशुक म्हणाले -
भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रश्रवा आणि त्याचे मुख्य-मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधिनिष्ठेने हृदयात स्थापित करून या मंत्राचा जप करीत अशा प्रकारे स्तुती करतात. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १७ वा
गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती -
श्रीशुक म्हणाले -
राजा, बळिराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला, तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठयाच्या नखाने ब्रह्मांडरूप कढईचा वरचा भाग फुटला. त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूची जी जलधारा आत आली, तिने ते चरणकमल धुतल्याने त्यातील केशर त्यात मिसळून (ती) लाल झाली. त्या निर्मल धारेचा स्पर्श होताच संसारातील सर्व पापे नष्ट होतात आणि तरी ती धार नेहमी निर्मळच राहते. दुसर्या कोणत्याही नावाने उल्लेख न करता तिला "भगवत्पदी" असेच म्हणतात. ती धार हजारो युगे होऊन गेल्यानंतर स्वर्गाच्या शिरोभागी असणार्या ध्रुवलोकात उतरली. तिला "विष्णुपद" असे म्हणतात. वीरव्रत परीक्षिता, त्या ध्रुवलोकात उत्तानपादाचा पुत्र परम भागवत ध्रुव राहातो. तो दररोज वाढत्या भक्तिभावाने हे "आमच्या कुलदेवतेचे चरणोदक आहे" असे समजून आजही ते जल मोठया आदराने मस्तकी धारण करतो. त्यावेळी प्रेमभरामुळे त्याचे हृदय अत्यंत सद्गदित होते आणि भावोद्रेकाने बळेच मिटून घेतलेल्या त्याच्या दोन्ही डोळ्यांतून निर्मल पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांच उभे राहातात. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २ रा
आग्नीध्र-चरित्र -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
अशा रीतीने पिता प्रियव्रत तपश्चर्येत गढून गेल्यानंतर राजा आग्नीध्र त्याच्या आज्ञेचे पालन करीत जंबुद्वीपातील प्रजेचे धर्मानुसार पुत्रवत पालन करू लागला. एकदा पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्तीसाठी पूजासाहित्य घेऊन अप्सरांचे क्रीडास्थान असलेल्या मंदराचलाच्या एका दरीत तो गेला आणि एकाग्र चित्ताने प्रजापतींचे पती श्रीब्रहदेव यांची तपश्चर्येने आराधना करू लागला. आदिदेव भगवान ब्रह्मदेवांनी त्याची अभिलाषा जाणून आपल्या सभेतील गायिका पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेला त्याच्याकडे पाठविले. आग्नीध्राच्या आश्रमाच्या जवळ एक अतिशय रमणीय असे उपवन होते. तेथे ती अप्सरा विहार करू लागली. त्या उपवनामध्ये निरनिराळ्या घनदाट वृक्षांच्या फांद्यांवर सुवर्णलता पसरलेल्या होत्या. त्यांच्यावर पुष्कळ प्रकारच्या जमिनीवरील पक्ष्यांच्या जोडया मधुर आवाजात कूजन करीत होत्या. त्यांच्या किलबिलाटाने आनंदित झालेले पाणकोंबडे, करडुवा, कलहंस इत्यादी पाणपक्षी वेगवेगळ्या तर्हेने कूजन करीत होते. त्यामुळे तेथील कमल-पुष्पांनी सुशोभित निर्मल सरोवरे दुमदुमली होती. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १६ वा
भुवनकोशाचे वर्णन -
परीक्षित म्हणाला -
जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत तारागणांसह चंद्र दिसतो, तेथपर्यंतच्या भूमंडलाचा विस्तार आपण सांगितला. मुनिवर्य, त्यातही आपण असेही सांगितले की, महाराज प्रियव्रतांच्या रथाच्या चाकांच्या सात खडडयांपासून सात समुद्र तयार झाले होते. ज्यांच्यामुळे सात द्विपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले. आता मी या सर्वांचे परिमाण अणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो. कारण, जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते, तेच त्यांच्या वासुदेव संज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतम स्वरूपामध्येसुद्धा तल्लीन होणे शक्य आहे. म्हणून गुरुवर्य, याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय ९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ९ वा
भरताचा ब्राह्मणकुळात जन्म -
श्रीशुक म्हणतात -
शम, दम, तप, स्वाध्याय, वेदाध्ययन, दान, संतोष, सहनशीलता, विनय, विद्या, मत्सर न करणे, आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्या, शील, आचार, रूप, औदार्य इत्यादी गुणयुक्त नऊ पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून एक पुत्र आणि एक कन्या असे जुळे झाले. या दोघांपैकी जो पुत्र होता, तोच परम भागवत राजर्षि-शिरोमणी भरत होता. मृगशरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता, असे सांगतात. भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्येसुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्मपरंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजनसंगतीने आपला पुन्हा अधःपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण, स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते, ते श्रीभगवंतांचे चरणकमलयुगल हृदयात सतत धारण केले. दुसर्यांना मात्र तो स्वतःला वेडा, मूर्ख, आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवी. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय ८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ८ वा
भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म -
श्रीशुक म्हणतात -
एकदा भरत गंडकीमध्ये स्नान करून नित्य-नैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत तीन मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता. राजा, त्याचवेळी तहानेने व्याकूळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली. ती पाणी पीत असतानाच जवळच गर्जना करणार्या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली. स्वभावतःच भित्री अशी ती साशंक नजरेने आजूबाजूला पाहात जात असता जेव्हा तिच्या कानावर ती भीषण आरोळी पडली, तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले. तहान तर अजून भागली नव्हती; परंतु आता तर प्राणावर बेतले होते. म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय ११›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ११ वा
राजा रहूगणाला भरताचा उपदेश -
जडभरत म्हणाला -
राजा, तू अज्ञानी असूनसुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहाता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस. म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकांत तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यवहाराला तत्त्वज्ञानी पुरुष तत्त्वविचाराच्या वेळी सत्यरूपाने स्वीकारीत नाहीत. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाहीत. कारण वेदवाक्येसुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेली आहेत. राग-द्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्त्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती, खरे पाहाता त्यातसुद्धा झालेली नाही. गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्त्वज्ञान समजावून सांगण्यास साक्षात उपनिषद्-वाक्येसुद्धा समर्थ नाहीत. जोपर्यंत मनुष्याचे मन सत्त्व, रज किंवा तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो. हे मन वासनामय, विषयासक्त, गुणांनी प्रेरित, विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या सोळा कलांमध्ये प्रमुख आहे. हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवाचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते. हेच मायेचे आवरण असलेले मन संसारचक्रामध्ये गुंतवणारे आहे. हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुख-दुःख आणि याव्यतिरिक्त मोहरूप अशा फलांची प्राप्ती करून देते. जोपर्यंत हे मन असते, तोपर्यंतच जागेपणीचे आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे, असे सांगतात. विषयासक्त मन जीवाला संसार-संकटात टाकते. तेच विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते. जसे तुपाने भिजलेली वात खाणार्या दिव्यातून धूर असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते, तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्त्वामध्ये विलीन होते. त्याचप्रमाणे विषय आणि कर्मांमध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहाते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्त्वामध्ये विलीन होते. (१-८)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १९ वा
किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
किंपुरुषवर्षामध्ये श्रीलक्ष्मणांचे थोरले बंधू आदिपुरुष, सीता-हृदयाभिराम भगवान श्रीरामांच्या चरणसान्निध्यात रमलेले परम भागवत श्रीहनुमान अन्य किन्नरांसह अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करतात. तेथे अन्य गंधर्वांसहित आर्ष्टिषेण आपले स्वामी भगवान श्रीरामांची परम कल्याणमय जी गुणगाथा गातात ती श्रीहनुमान ऐकतात आणि स्वतः या मंत्राचा जप करीत त्यांची अशी स्तुती करतात. "आम्ही पवित्रकीर्ती भगवान श्रीरामांना नमस्कार करतो. सत्पुरुषांची लक्षणे, शील, आणि आचरण यांनी युक्त अशा आपणांस नमस्कार. संयमी व लोकाराधनतत्पर अशा आपणांस नमस्कार. साधुत्वाच्या परीक्षेत कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणार्या आपणांस नमस्कार. ब्राह्मणभक्त महापुरुष महाराज श्रीरामांना नमस्कार." (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २१›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २१ वा
सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
परिमाण आणि लक्षणांसहित ह्या भूमंडलाचा एकूण विस्तार एवढाच सांगितला आहे. याच्याच आधाराने विद्वान लोक द्युलोकाचेही परिमाण सांगतात. जसे द्विदल धान्याच्या दोन दलांपैकी एकाचे स्वरूप जाणल्याने दुसर्याचेसुद्धा जाणता येते, त्याचप्रमाणे भूलोकाच्या परिमाणानेच द्युलोकाचेसुद्धा परिमाण जाणून घेतले पाहिजे. या दोन्हींच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे. हे या दोघांचे संधिस्थान आहे. याच्या मध्यभागी असणार्या ग्रह आणि नक्षत्रांचा अधिपती भगवान सूर्य आपली उष्णता आणि प्रकाश यांनी तिन्ही लोकांना तापवीत आणि प्रकाशित करीत असतो. तो उत्तरायण, दक्षिणायन आणि वैषुवत नावाच्या अनुक्रमे मंद, जलद आणि समान गतीने समयानुसार मकर इत्यादी राशींमध्ये वर, खाली आणि समान स्थानात राहून दिवस-रात्रींना मोठे, लहान किंवा समान करतो. जेव्हा सूर्य मेष किंवा तूळ राशीमध्ये असतो, तेव्हा दिवस-रात्री समान होतात. जेव्हा वृषभ इत्यादी पाच राशींत असतो, तेव्हा दरमहा रात्र एक-एक घटका कमी होत जाते आणि त्याच हिशेबाने दिवस मोठा होतो. जेव्हा वृश्चिक इत्यादी पाच राशीत असतो, तेव्हा दिवस आणि रात्र यांमध्ये याच्याविरूद्ध परिवर्तन होते. अशा प्रकारे दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा होत जातो अणि उत्तरायण सुरू होईपर्यंत रात्र मोठी होत जाते. (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १३ वा
संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती -
जडभरत म्हणाला -
(ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापार्यांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम अरण्यात पोचावा त्याप्रमाणे) मायेने संसारातून तरून जाण्यास कठीण अशा प्रवृत्तिमार्गात ढकललेला हा जीवसमूह, सुखरूप धनाच्या आशेने रज, तम, सत्त्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसाररूप अरण्यात जाऊन पोहोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. हे राजा, त्या अरण्यात (प्रपंचविषयक) कुबुद्धी असणार्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे सहा चोर बळेच लुबाडतात. (म्हणजेच धर्मासाठी वापरावयाचे द्रव्य स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात.) लांडग्यांनी कळपातील मेंढराला आपापल्याकडे ओढावे, तसे स्त्रीपुत्रादीरूप कोल्हे परमार्थाविषयी बेसावध असणार्या जीवाला आपापल्याकडे ओढत असतात. पुष्कळ वेली, गवत, झुडपे यांमुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोचलेल्या माणसाला डास, मधमाशा यांनी हैराण करावे, त्याप्रमाणे कामना, निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहाणार्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात. काहीवेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी, तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते. काहीवेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे, तसा संसारारण्यातील हा जीव सोन्याच्या (द्रव्याच्या) आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळविण्यासाठी खूप खटपट करतो. अरण्यात पोचलेला माणूस राहाण्यासाठी जागा, पाणी, द्रव्य इत्यादी मिळविण्यासाठी इकडेतिकडे भटकतो, त्याचप्रमाणे संसाररुप अरण्यात आलेला जीव राहाण्यासाठी घर, अन्नपाणी, द्रव्य इत्यादी मिळविण्यासाठी खूप धावाधाव करतो (आणि ते मिळाल्यावर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते गेले असता खूप दुःखी होतो.) वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यांतही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाहीत, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणार्या स्त्रीच्या प्रेमविलासादिकांनी ज्याची दृष्टि धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणार्या दिशारूप देवतांना जाणत नाही (आणि मनसोक्त कुकर्मे करीत राहतो.) न दिसणार्या घुंगुर्टयांच्या आवाजाने कानशूळ उठलेला अरण्यवासी घुबडांच्या घूत्काराने भयभीत होतो. भुकेने व्याकूळ झाला की, बिब्यासारख्या निषिद्ध झाडांच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. त्याचप्रमाणे संसारारण्यातील जीव पाठीमागे निंदा करणार्यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो, तसाच समोर अपशब्द बोलणार्यांच्या वाग्बाणांनी घायाळ होतो. भुकेने व्याकूळ झाला की, धर्मभ्रष्ट लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत, हे माहीत असूनही त्यांच्या मागे लागतो. पाणी नसणार्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात व पाणीही मिळत नाही, त्याप्रमाणे हा जीव इहपरलोकी दुःखदायक असणार्या नास्तिकमताचा स्वीकार करून दुःखी होतो. नातलगांकडून अन्नवस्त्रादिकांची आशा करतो. अरण्यवासी कधी वणव्यात सापडून होरपळतो, तर कधी पिशाच्चांना पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो, तसाच संसारारण्यातील प्राणी वणव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होरपळतो, तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखा कष्टी होतो. अधिक बलवान असलेल्या कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निपचित होऊन पडतो. आणि कधी गंधर्वनगरीप्रमाणे असणार्या मनासारख्या नातलगांत जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो. काटया-कुटयांनी पायाची चाळणी झालेला अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो, तेव्हा उदास होतो; त्याप्रमाणे संकटांनी वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो, तेव्हा निराश होतो. कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगांवरच चिडू लागतो. कधी झोपरूपी अजगराचा घास बनून वनात फेकून दिलेल्या मुडद्याप्रमाणे पडून राहतो. यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते. कधी विषारी जंतू चावावे, तसे दुष्ट याला पिडू लागतात, तेव्हा त्यांच्या विषारी वाग्बाणांनी विवेकशून्य होऊन एखाद्या अंधार्या विहिरीत पडावे, त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधकारात शुद्ध-बुद्ध हरपून पडून राहतो. कधी परस्त्री-परधनरूप मधाच्या शोधात तो फिरतो, तेव्हा त्याचे मालकरूप मधमाशा याच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो. अनेक संकटांचा सामना करून यदाकदाचित तो मध त्याला मिळाला, तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्यांच्याकडून इतरच तो हिसकावून घेतात. कधी थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यांपासून आपले संरक्षण करण्यास तो असमर्थ होतो. कधी आपापसात थोडी देवघेव करतो, तेव्हा पैशाच्या लोभाने दुसर्यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो. कधी कधी त्या संसारवनात याचे धन नष्ट होते, तेव्हा याच्याजवळ अंथरूण-पांघरूण, आसन, घर आणि वाहनसुद्धा उरत नाही, तेव्हा तो दुसर्यांकडे याचना करतो. आणि मागूनही दुसर्याकडून इच्छित वस्तु मिळाली नाही की, दुसर्याच्या वस्तूंवर डोळा ठेवल्यामुळे तो त्यांच्याकडून अपमानित होतो. (१-१२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २४ वा
राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन -
श्रीशुक म्हणतात -
परीक्षिता, काही लोकांचे म्हणणे आहे की, सूर्यापासून दहा हजार योजने दूर खालच्या बाजूस राहू, नक्षत्रांप्रमाणे फिरत आहे. भगवंतांच्या कृपेनेच याने देवत्व आणि ग्रहत्व प्राप्त केले आहे. हा सिंहिकापुत्र स्वतः असुराधम असल्याकारणाने कोणत्याही प्रकारे या पदाला योग्य नव्हता. याच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आपण पुढे करू. सूर्याचा हा जो अत्यंत तप्त गोल आहे, त्याचा विस्तार दहा हजार योजने सांगितला जातो. याचप्रमाणे चंद्रमंडळाचा विस्तार बारा हजार योजने आहे आणि राहूचा तेरा हजार योजने आहे. राहू अमृतपानाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये देवाच्या वेषात येऊन बसला त्यावेळी सूर्य आणि चंद्राने याचे गुपित फोडले होते. ते वैर लक्षात ठेवून हा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी त्यांच्यावर आक्रमण करतो. हे पाहून भगवंतांनी सूर्य आणि चंद्र यांच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ आपले प्रिय आयुध सुदर्शन चक्र ठेवले आहे. ते नेहमी फिरत असते. म्हणून राहू त्याच्या असह्य तेजाने उद्विग्न आणि आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ त्यांच्या समोर राहून पुन्हा मागे फिरतो. या त्याच्या थांबण्यालाच लोक ग्रहण म्हणतात. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २५ वा
श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
पाताळ लोकाच्या खाली तीस हजार योजने अंतरावर अनंत नावाची भगवंतांची तामसी नित्य कला आहे. ही अहंकाररूप असल्याने द्रष्टा आणि दृश्याला एकत्रित करते. म्हणून पांचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला ‘संकर्षण’ म्हणतात. या भगवान अनंतांना एक हजार फणा आहेत. त्यांपैकी एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते. प्रलयकाली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते, तेव्हा क्रोधाने फिरणार्या यांच्या मनोहर भ्रुकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रगट होतात. त्यांच्या समूहाची संख्या अकरा आहे. त्या सर्वांना प्रत्येकी तीन डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूळ असतात. भगवान संकर्षणांच्या दोन्ही चरणकमळांची स्वच्छ, तांबूस वर्णाची नखे रत्नांप्रमाणे दैदीप्यमान आहेत. जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात, तेव्हा त्या नखमण्यांमध्ये त्यांच्या कुंडलकांतिमंडित कमनीय गाल असणार्या मनोहर मुखकमलाची मनमोहक शोभा दिसते, तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते. अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळगून त्यांच्या अंगावर, चांदीच्या खांबांप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कडयांनी शोभणार्या लांबच लांब, शुभ्रवर्ण, सुंदर बाहूंवर अष्टगंध, चंदन आणि कुंकुमाचा लेप करतात. त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्यांच्या हृदयात कामसंचार होतो. तेव्हा त्या त्यांच्या विव्हल झालेल्या करुणामय, तांबूस नयनकमलांनी सुशोभित, तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या, मुखारविंदाकडे मधुर, मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागतात. ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत. (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय ७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ७ वा
भरताचे चरित्र -
श्रीशुक म्हणतात -
महाराज भरत मोठे भगवद्भक्त होते. भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला. जशी तामस अहंकारापासून शब्दादी पाच भूततन्मात्रे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू नावाचे पाच पुत्र झाले. ते तंतोतंत त्यांच्यासारखेच होते. ज्या देशाचे नाव अगोदर ‘अजनाभवर्ष’ होते, त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून ‘भारतवर्ष’ म्हणतात. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २३ वा
शिशुमारचक्राचे वर्णन -
श्री शुकदेव म्हणतात -
सप्तर्षींच्या वरच्या बाजूला तेरा लाख योजने अंतरावर ध्रुवलोक आहे. याला भगवान विष्णूंचे परमपद असे म्हणतात. तेथे उत्तानपादाचा पुत्र परम भगवद्भक्त ध्रुव आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सर्वजण एकाच वेळी अत्यंत आदराने याला प्रदक्षिणा घालतात. आतासुद्धा कल्पापर्यंत राहाणारे लोक याच्याच आधारावर आहेत. याचा या लोकातील प्रभाव आम्ही पूर्वी (चौथ्या स्कंधात) वर्णन केलेला आहे. सदा जागृत राहाणार्या अव्यक्तगती भगवान कालाकडून जे ग्रह-नक्षत्रादी ज्योतिर्गण नेहमी फिरविले जातात, त्यांना आधारस्तंभ म्हणून भगवंतांनी ध्रुवलोकाचीच नियुक्ती केली आहे. म्हणून हा एकाच ठिकाणी राहून नेहमी प्रकाशित असतो. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय २६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय २६ वा
नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन
परीक्षिताने विचारले -
महर्षे, लोकांना या ज्या उच्च-नीच गती प्राप्त होतात, त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा ? (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १४ वा
संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण -
श्री शुकाचार्य म्हणतात -
देहाभिमानी जीवांच्याकडून सत्त्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ, अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होत राहातात. त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग-वियोगादिरूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो, त्याच्या अनुभवाची मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा दारे होत. त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापार्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहाणार्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्य़ाप्रमाणे दुर्गम असणार्या वाटेने जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणार्या संसार-वनात जाऊन पोहोचतो. येथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामांत सफलता प्राप्त होत नाही. तरीसुद्धा तो आपले श्रम मिटविणार्या श्रीहरी व श्रीगुरुदेवांच्या चरणारविंदमकरंद-मधूचे रसिक असलेल्या भक्त-भ्रमरांच्या मार्गाने जात नाही. मनासहित सहा इंद्रियेच या संसारवनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवितो, त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपात होईल तर (तोच) परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो. परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहात नाही, त्याच्या त्या धर्मोपयोगी धनाला ही मनासहित सहा इंद्रिये पाहाणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प-विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्याद्वारा गृहस्थोचित विषयभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की, जसे बेइमान प्रमुखाचे अनुकरण करणार्या बेसावध व्यापार्यांच्या समूहाचे धन चोर, लुटारू लुटून नेतात. एवढेच काय, त्या संसारवनात राहाणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा ज्यांना पत्नी-पुत्र इत्यादी म्हटले जाते, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या-कोल्ह्यांप्रमाणे असतात, त्या अर्थलोलुप कुटुंबप्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकारे हिसकावून घेतात की जसे कोल्हा, धनगर राखण करीत असलेल्या मेंढया पळवून नेतो. जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादीने भरून जाते, त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने येथेसुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही. कारण हे घर कामनांचा पेटारा आहे. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय ३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय ३ रा
नाभिराजाचे चरित्र -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
नाभिराजाने भार्या मेरुदेवीसह पुत्रकामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषाचे पूजन केले. भगवान जरी द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज, दक्षिणा आणि विधी, या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले, तरी ते भक्तवत्सल असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक व विशुद्ध भावाने त्यांची आराधना केली, तेव्हा त्यांचे चित्त आपल्या भक्ताचा इच्छित हेतू साध्य करण्यासाठी उत्सुक झाले. त्यांचे स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असले, तरी त्यांनी प्रवर्ग्यकर्माचे अनुष्ठान सुरू होताच नाभीच्या मन आणि नेत्रांना आनंद देणार्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदयाकर्षक रूपात स्वतःला प्रगट केले. त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला होता. वक्षःस्थळावर सुमनोहर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होते. हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म तसेच गळ्यात वनमाला आणि कौस्तुभ मणी शोभून दिसत होता. संपूर्ण शरीराच्या अंगप्रत्यंगांची कांती वाढविणार्या किरणांनी आच्छादलेल्या मणिमय मुकुट, कुंडले, कंकणे, कमरपटटा, हार, बाजूबंद, नूपुर इत्यादी अलंकारांनी ते शोभून दिसत होते. परम तेजस्वी चतुर्भुजमूर्ती अशा पुरुषोत्तमांना प्रगट झालेले पाहून ऋत्विज, सदस्य आणि यजमान इत्यादी सर्व लोक, जसे निर्धन धनराशी प्राप्त झाल्यावर अत्यंत आनंदित होतात, तसे आनंदित झाले. नंतर सर्वांनी मस्तक नमवून अत्यंत आदराने प्रभूंची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ५ वा, अध्याय २६›📂 भागवत स्कंध ५, अध्याय १५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ५ वा - अध्याय १५ वा
भरताच्या वंशाचे वर्णन -
श्रीशुकाचार्य म्हणतात -
भरताचा पुत्र सुमती होता हे पूर्वी सांगितलेच आहे. त्याने ऋषभदेवाच्या मार्गाचे अनुकरण केले; म्हणून कलियुगात पुष्कळसे नास्तिक-मतवादी अनार्य आपल्या मताने वेदमताविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानतील. त्याची पत्नी वृद्धसेना. तिच्यापासून देवताजित नावाचा पुत्र झाला. देवताजिताला असुरीपासून देवद्युम्न, देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमेष्ठी आणि त्याला सुवर्चलेपासून प्रतीह नावाचा पुत्र झाला. त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश करून, स्वतः शुद्धचित्त होऊन, परमपुरुष श्रीनारायणांचा साक्षात्कार करून घेतला होता. प्रतीहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता या नावाचे तीन पुत्र झाले. ते यज्ञादी कर्मांमध्ये अत्यंत निष्णात होते. यांच्यापैकी प्रतिहर्त्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावांचे दोन पुत्र झाले. भूमाला ऋषिकुल्येपासून उद्गीथ, उद्गीथाला देवकुल्येपासून प्रस्ताव आणि प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू नावाचा मुलगा झला. विभूला रतीपासून पृथुषेण, पृथुषेणाला आकूतीपासून नक्त आणि नक्ताला द्रुतीपासून उदारकीर्ती राजर्षिप्रवर गय नावाचा मुलगा झाला. याला, जगाच्या रक्षणासाठी सत्त्वगुणाचा स्वीकार करणार्या साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानले जात होते. संयमादी अनेक गुणांमुळे याची महापुरुषांत गणना केली जाते. त्याने प्रजेचे पालन-पोषण, मनोरंजन, लालन आणि शासन इत्यादी करून, तसेच निरनिराळ्या यज्ञांचे अनुष्ठान करून निष्कामभावाने केवळ भगवत्प्राप्तीसाठी आपल्या धर्माचे आचरण केले. त्यामुळे त्याची सर्व कर्मे सर्वश्रेष्ठ परमपुरुष परमात्मा श्रीहरींना समर्पित होऊन ती परमार्थरूप होऊन गेली होती. यामुळे तसेच ब्रह्मवेत्त्या महापुरुषांच्या चरणसेवेने त्याला भक्तियोगाची प्राप्ती झाली. नंतर सदैव भगवच्चिंतन करून त्याने आपले चित्त शुद्ध केले. आणि देहादी अनात्म वस्तूंविषयी ‘मी-माझेपणा’ नाहीसा करून तो आपल्या आत्म्याला ब्रह्मरूपाने अनुभवू लागला. एवढे असूनही तो निरभिमानपणे पृथ्वीचे पालन करीत राहिला.(१-७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत महात्म्य (शेवटचे) अध्याय ४›📂 भागवत महात्म्य शेवटचे, अध्याय १›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण माहात्म्य -
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य (श्रीस्कान्दे) - अध्याय १ ला
🔸अ.१ - परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट, शांडिल्यमुनींच्या मुखातून भगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि वज्रभूमीच्या महत्त्वाचे वर्णन
महर्षी व्यास म्हणतात - ज्यांचे स्वरूप सच्चिदानंदघन आहे, जे अनंत सुखाचा वर्षाव करतात, ज्यांच्या शक्तीनेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतात, त्या भगवान श्रीकृष्णांची आम्ही भक्तिरसाच्या प्राप्तीसाठी नित्य स्तुती करतो. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत महात्म्य (शेवटचे) अध्याय ४›📂 भागवत महात्म्य शेवटचे, अध्याय ३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण माहात्म्य - अध्याय ३ रा
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य (श्रीस्कान्दे) - अध्याय ३ ला
🔸अ.३ - श्रीमद्भागवताची परंपरा आणि त्याचे माहात्म्य, भागवतश्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती
सूत म्हणतात
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ७ वा
बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार -
राजाने विचारले
- भगवन, देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग का केला ? आपल्या गुरूंचा देवांनी कोणता अपराध केला होता, ते मला सांगावे. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १६ वा
चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन -
श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता, त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा, शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले. (१)
नारद म्हणाले - हे जीवात्म्या, तुझे कल्याण असो. बघ. तुझे माता-पिता, सगे-सोयरे, तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल झाले आहेत. तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आप्तेष्टांबरोबर घालव आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे. (२-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १४ वा
वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र -
परीक्षित म्हणाला - ब्रह्मन, वृत्रासुराचा स्वभाव रजोगुणी, तमोगुणी होता. तो पापीच होता. असे असता भगवान नारायणांच्या चरणी त्याची बुद्धी निश्चल कशी झाली ? शुद्ध सत्त्वमय देव आणि पवित्रहृदय ऋषी यांचीसुद्धा भगवंतांच्या चरणी भक्ती क्वचितच उत्पन्न झालेली दिसते. भगवन, या जगात पृथ्वीवरील धूलिकणांइतके असंख्य प्राणी आहेत. त्यांपैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात. हे ब्रह्मन, त्यातूनही मुक्ती इच्छिणारे विरळाच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणार्यांत एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते. हे महामुने, अशा कोटयवधी सिद्ध किंवा मुक्त पुरुषांमध्ये सुद्धा जो भगवंतांचाच अनन्यभक्त आहे, असा शांतचित्त महापुरुष सापडणे तर अत्यंत दुर्मिळ आहे. (१-५)
तर मग सर्वांना सतावणारा असल्याने जो मोठा पापी होता, त्या वृत्रासुराची भयंकर युद्धाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णांमध्ये इतकी दृढ भक्ती कशी उत्पन्न झाली ? हे प्रभो, याविषयी आम्हांला अतिशय संदेह असून त्याचे उत्तर ऐकण्याविषयी मोठेच कुतूहल आहे. त्या वृत्रासुराने तर रणभूमीवर इंद्रालासुद्धा संतुष्ट केले होते. (६-७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ११›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ११ वा
वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती -
श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, असुरसेना भयभीत होऊन पळू लागली होती. त्याचे सैनिक इतके व्याकूळ झाले होते की, त्यांनी आपल्या स्वामींच्या धर्मानुकुल म्हणण्य़ाकडे सुद्धा लक्ष दिले नाही. वृत्रासुराने पाहिले की, काळाची अनुकूलता असल्यामुळे देव असुरांच्या सेनेला चोपीत आहेत आणि ती सेनापती नसल्यासारखी छिन्न-विच्छिन्न होऊ लागली आहे. राजन, हे पाहून वृत्रासुराला हे सहन न होऊन क्रोधामुळे त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. मोठया बळाने देवसेनेला रोखून धरून त्यांचा तिरस्कार करीत तो म्हणाला. क्षुद्र देवांनो, रणभूमीवरून पळणार्या असुरांवर पाठीमागून प्रहार करण्यात काय पुरुषार्थ ? हे तर आपल्या आईचा मळ आहेत. परंतु स्वतःला शूर समजणार्या तुमच्यासारख्यांनी भित्र्या लोकांना मारणे ही काही भूषणावह गोष्ट नाही. आणि यामुळे तुम्हांला स्वर्गही मिळणार नाही. जर तुमच्यामध्ये युद्ध करण्याची शक्ती आणि उत्साह असेल, तसेच जिवंत राहून विषयसुख भोगण्याची इच्छा नसेल, तर क्षणभर माझ्यासमोर उभे राहा. (१-५)
वृत्रासुर अतिशय बलाढय होता. तो आपल्या आकारानेच शत्रू असणार्या देवांना भयभीत करू लागला. त्याने क्रोधाने एवढा प्रचंड सिंहनाद केला की, तो ऐकूनच लोक बेशुद्ध झाले. वृत्रासुराच्या भयानक गर्जनेने सर्व देव मूर्च्छित होऊन जमिनीवर पडले. जणू काही त्यांच्यावर वीजच कोसळली. जसा मदोन्मत्त हत्ती देवनळांचे जंगल तुडवितो, त्याचप्रमाणे रणशूर वृत्रासुर हातात त्रिशूळ घेऊन भीतीने डोळे बंद करून पडलेल्या देवसेनेला लाथांनी तुडवू लागला. त्या धमाक्याने पृथ्वी डळमळू लागली. त्याचे हे कृत्य देवराज इंद्राला सहन झाले नाही. तो जेव्हा त्याच्यावर धावून आला, तेव्हा त्याने आपल्या शत्रूवर एक मोठी गदा फेकली. ती असह्य गदा येता येताच त्याने सहजपणे आपल्या डाव्या हाताने पकडली. राजन, क्रोधाने लालबुंद होऊन अत्यंत पराक्रमी वृत्रासुराने त्याच गदेने इंद्राचे वाहन असलेल्या हत्तीच्या डोक्यावर जोराने गर्जना करीत प्रहार केला. त्याच्या या पराक्रमाची सर्वजण अतिशय प्रशंसा करू लागले. वृत्रासुराच्या गदेच्या आघाताने ऐरावत हत्ती वज्राघात झालेल्या पर्वताप्रमाणे कोसळला. डोके फुटल्याने रक्त ओकत तो इंद्रासह अठठावीस हात मागे सरला. आपले वाहन ऐरावत मूर्च्छित होऊन पडल्याने इंद्र विषण्ण झाला. हे पाहून महात्म्या वृत्रासुराने त्याच्यावर गदा टाकली नाही. तोपर्यंत इंद्राने आपल्या अमृतस्रावी हाताच्या स्पर्शाने घायाळ झालेल्या ऐरावताची व्यथा नाहीशी केली आणि तो पुन्हा युद्धभूमीवर उभा राहिला. परीक्षिता, भाऊ विश्वरूपाचा वध करणारा शत्रू इंद्र युद्धासाठी हातात वज्र घेऊन पुन्हा समोर आला आहे, हे वृत्रासुराने पाहिले, तेव्हा त्याला इंद्राच्या त्या पापकर्माची आठवण झाली आणि शोक आणि मोह यांनी युक्त होऊन उपहासाने तो त्याला म्हणू लागला. (६-१३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ४›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ४ था
दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव -
राजाने विचारले
- भगवन, आपण थोडक्यात स्वायंभुव मन्वन्तरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली, हे सांगितले. परम कारण भगवानांनी आपल्या ज्या शक्तीने, ज्या प्रकारे त्याच्यानंतरची सृष्टिरचना केली, ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १२ वा
वृत्रासुराचा वध -
श्रीशुकदेव म्हणतात - राजन, वृत्रासुर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता. कारण त्याला विजयाहून मृत्यू श्रेष्ठ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासुर भगवान विष्णूंवर जसा धावला होता, तसा हासुद्धा त्रिशूळ घेऊन इंद्रावर तुटून पडला. प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळांसारख्या तीक्ष्ण टोकांचा त्रिशूल फिरवून वीर वृत्रासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला आणि अतिशय क्रोधाने गर्जना करून तो म्हणाला, "नीच इंद्रा, आता तू वाचणार नाहीस." तो भयंकर त्रिशूळ ग्रह आणि उल्कांप्रमाणे गोल फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे, असे पाहूनही इंद्राने विचलित न होता त्रिशूळाबरोबरच वासुकी नागासारख्या असलेल्या वृत्रासुराचा विशाल बाहू, शंभर गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकला. एक हात तुटल्याचे पाहून वृत्रासुराला अत्यंत राग आला. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडले. (१-४)
वृत्रासुराचा हा अत्यंत अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण इत्यादी सर्वजण त्याची प्रशंसा करू लागले. परंतु इंद्रावर आलेले संकट पाहून तेच लोक वारंवार "हाय ! हाय !" करून मोठयाने आक्रोश करू लागले. ते वज्र इंद्राच्या हातातून सुटून वृत्रासुराजवळच जाऊन पडले होते. म्हणून लज्जित होऊन इंद्राने ते पुन्हा उचलून घेतले नाही. तेव्हा वृत्रासुर म्हणाला, "इंद्रा, तू वज्र घेऊन तुझ्या शत्रूला मारून टाक. ही खेद करण्याची वेळ नाही." सर्वज्ञ, सनातन, आदिपुरुष, भगवानच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्यास समर्थ आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त इतर देहाभिमानी आणि युद्ध करू इच्छिणार्या अविचारी लोकांना नेहमीच विजय मिळतो असे नाही. हे सर्व लोक आणि लोकपाल जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे ज्याच्या अधीन होऊन ही कृत्ये करतात, तो काळच सर्वांच्या जय-पराजयाचे कारण आहे. तो काळच मनुष्याचे मनोबल, इंद्रियबल, शरीरबल, प्राण, जीवन आणि मृत्यूच्या रूपात असतो. ते न कळल्यामुळे मनुष्य जड शरीरालाच सर्वाचे कारण समजतो. इंद्रा, जशी लाकडाची बाहुली आणि यंत्राचे हरिण नाचविणार्याच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन असतात, असे समज. भगवंतांच्या कृपेशिवाय पुरुष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरणचतुष्टय हे कोणीही या विश्वाची उत्पत्ती इत्यादी करण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. भगवंतच सर्वांचे नियंत्रण करतात. हे ज्यांना माहित नाही, तेच या परतंत्र जीवाला स्वतंत्र कर्ता-भोक्ता मानतात. वास्तविक स्वतः भगवंतच प्राण्यांच्याकडून प्राण्यांची निर्मिती आणि संहार करतात. जसे इच्छा नसतानासुद्धा काल प्रतिकूल असताना मनुष्याला अपकीर्ती इत्यादी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे काल अनुकूल असताना इच्छा नसतानासुद्धा त्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर्य इत्यादी भोग मिळतात. म्हणून यश-अपयश, जय-पराजय, सुख-दुःख, जीवन-मरण यांपैकी कशाचीही इच्छा-अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत समभावाने राहावे. सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचे आहेत. आत्म्याचे नाहीत. म्हणून जो मनुष्य आत्मा हा केवळ त्याचा साक्षी आहे, हे जाणतो, त्याला त्या गुणांचे बंधन नसते. हे इंद्रा, तू माझा हात आणि शस्त्र तोडून मला दुर्बळ केले आहेस. तरीसुद्धा मी तुझे प्राण घेण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेच. हे युद्ध हा एक जुगारच अहे. यामध्ये प्राणांची बाजी लागते. बाणांचे फासे टाकले जातात आणि वाहने हा पट आहे. यामध्ये कोणाचा विजय होईल आणि कोण हरेल हे कळत नाही. (५-१७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १९ वा
पुंसवन-व्रताचा विधी -
राजाने विचारले - भगवन ! आपण ज्या पुंसवनव्रताचे वर्णन केले आणि म्हणालात की, त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तर आता मी त्याचा विधी जाणू इच्छितो. (१)
श्रीशुक म्हणाले - हे पुंसवनव्रत सर्व कामना पूर्ण करणारे आहे. पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा. प्रथम मरुद्गणांच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी. नंतर सकाळी दात घासून स्नान करावे. दोन शुभ्र वस्त्रे धारण करावीत आणि अलंकारही घालावेत. प्रातःकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. प्रभो, आपण पूर्णकाम आहात. म्हणून निरपेक्ष आहात. आपण सर्व विभूतींचे स्वामी आणि सकल सिद्धीस्वरूप आहात. मी आपणांस वारंवार नमस्कार करते. हे आराध्यदेवते, आपण कृपा, विभूती, तेज, महिमा आणि वीर्य इत्यादी समस्त गुणांनी नित्ययुक्त आहात. म्हणून आपणास भगवान म्हणतात. आपण सर्वशक्तिमान आहात. माते लक्ष्मीदेवी, आपण भगवंतांची अर्धांगिनी आणि महामायास्वरूपिणी आहात. भगवंतांचे सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात. हे महाभाग्यवती जगन्माते, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. मी आपणास नमस्कार करते. (२-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ५ वा
श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप -
श्रीशुकाचार्य म्हणतात
- भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्याने, दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता. त्याने पंचजनाची कन्या असिक्नीपासून हर्यश्व नावाचे दहा हजार पुत्र उत्पन्न केले. राजा, दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते. वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले. पश्चिम दिशेकडे सिंधुनदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे. मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तेथे निवास करतात. नारायणसरोवरामध्ये स्नान करताच हर्यश्वांचे अंतःकरण शुद्ध झाले. त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली. तरीसुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत राहिले. देवर्षी नारदांनी ते प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, हे पाहून त्यांना म्हटले, अरे हर्यश्वांनो, तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात. जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही, तर प्रजा कशी उत्पन्न कराल ? हे तुमचे करणे विचित्र नव्हे का ! असा एक देश आहे की, जेथे एकच पुरुष आहे. एक असे विवर आहे, जेथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही. एक अशी स्त्री आहे, जी बहुरूपिणी आहे. एक असा पुरुष आहे, जो व्यभिचार करणार्या स्त्रीचा पती आहे. एक अशी नदी आहे, जी मागे-पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहाते. एक असे आश्चर्यकारक घर आहे, जे पंचवीस पदार्थांनी बनलेले आहे. एक असा हंस आहे, ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे. एक असे चक्र आहे, जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले असून ते आपोआप फिरते. हर्यश्वांनो, जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही, आणि वरील वस्तू पाहिल्या नाहीत, तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल ? (१-९)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ३ रा
यम आणि यमदूतांचा संवाद -
राजाने विचारले - ऋषिवर्य, सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंतांच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांचा अपमान केला. जेव्हा त्यांच्या दूतांनी अजामिळाचा वृत्तांत सांगितला, तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले ? कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही. मुनिवर्य, याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही. असे माझे निश्चित मत आहे. (१-२)
श्रीशुकाचार्य म्हणाले - परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी यमदूतांच्या कामात अडथळा आणला, तेव्हा त्या लोकांनी संयमनी पुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले. (३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ८ वा
नारायण कवचाचा उपदेश -
परीक्षिताने विचारले - भगवन, ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला, ते नारायणकवच मला सांगावे. तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणार्या शत्रूंवर कसा विजय मिळवला, हेही सांगावे. (१-२)
श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षिता, जेव्हा देवांनी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली, तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायणकवचाचा उपदेश केला, तो तू एकाग्रचित्ताने ऐक. (३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १३ वा
इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण -
श्रीशुकाचार्य म्हणतात - दानशूर परीक्षिता, वृत्रासुराच्या मृत्यूमुळे इंद्राशिवाय तिन्ही लोक आणि लोकपाल त्याचक्षणी निर्भय होऊन अत्यंत प्रसन्न झाले. नंतर देव, ऋषी, पितर, भूत, दैत्य आणि देवांचे अनुयायी, आपापल्या लोकी निघून गेले. त्यानंतर ब्रह्मदेव, शंकर आणि इंद्र इत्यादीसुद्धा निघून गेले. (१-२)
राजाने विचारले - मुनिवर्य, इंद्राच्या विषण्णतेचे कारण मी ऐकू इच्छितो. वृत्रासुराचा वध झाल्याने सर्व देव सुखी झाले. मग इंद्राला दुःख होण्याचे कारण काय ? (३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १८ वा
अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरुद्गणांच्या उत्पत्तीचे वर्णन -
श्रीशुकदेव म्हणतात - सवित्याची पत्नी पृश्नी हिच्यापासून सावित्री, व्याहृती, त्रयी, अग्निहोत्र, पशू, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी आठ संताने झाली. हे राजा, भगाची पत्नी सिद्धी. हिला महिमा, विभू आणि प्रभू हे तीन पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली. ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती. धात्याला कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती या नावाच्या चार पत्न्या होत्या. त्यांच्यापासून अनुक्रमे सायं, दर्श, प्रातः आणि पूर्णमास हे चार पुत्र झाले. (१-३)
धात्याच्या लहान भावाचे नाव विधाता होते, त्याची पत्नी क्रिया. तिच्यापासून पुरीष्य नावाच्या पांच अग्नींची उत्पत्ती झाली. वरुणाच्या पत्नीचे नाव चर्षणी होते. भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्म ग्रहण केला. याअगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते. महायोगी वाल्मीकीसुद्धा वरुणाचे पुत्र होते. वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचे वाल्मीकी असे नाव पडले. उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचेही वीर्यस्खलन झाले होते. ते त्या दोघांनी घडयात ठेवले. त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ यांचा जन्म झाला. मित्राची पत्नी रेवती होती. तिला उत्सर्ग, अरिष्ट आणि पिप्पल असे तीन पुत्र झाले. हे परीक्षिता, पुलोमनंदिनी शचीला इंद्रापासून जयंत, ऋषभ आणि मीढ्वान असे तीन पुत्र झाले. भगवान विष्णूच मायेने वामनरूपात अवतीर्ण झाले होते. त्यांची पत्नी कीर्ती. तिच्यापासून बृहच्छ्लोक नावाचा मुलगा झाला. सौभगादी तिला अनेक संताने झाली. कश्यपनंदन भगवान वामनांनी अदितीच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण, लीला आणि पराक्रम केले, याचे वर्णन मी पुढे करीन. (४-९)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ६ वा
श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप -
श्रीशुकदेव म्हणतात
- त्यानंतर ब्रह्मदेवांनी समजूत घातल्यानंतर दक्षाने असिक्नीपासून साठ कन्या उत्पन्न केल्या. त्या सर्वजणी पित्यावर प्रेम करीत होत्या. दक्षाने त्यांपैकी दहा कन्यांचा धर्माशी, तेरांचा कश्यपाशी, सत्ताविसांचा चंद्राशी, दोघींचा भुतांशी, दोघींचा अंगिराशी, दोघींचा कृशाश्वाशी आणि उरलेल्या चौघींचा तार्क्ष्य नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. परीक्षिता, तू या दक्षकन्या आणि त्यांच्या संतानांची नावे माझ्याकडून ऐक. यांचीच वंशपरंपरा तिन्ही लोकात पसरली आहे. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १० वा
दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून वज्र-निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण -
श्रीशुकदेव म्हणतात - विश्वाचे रक्षण करणारे भगवान श्रीहरी इंद्राला असे सांगून देवांच्यासमोरच अंतर्धान पावले. हे राजा, देवांनी अथर्ववेदी दधीची महर्षींकडे जाऊन याचना केली. ती ऐकून दधीची ऋषींना फार आनंद झाला. ते हसत म्हणाले, देवांनो, मरतेवेळी प्राण्यांना शरीराची चेतना नाहीशी करणार्या असह्य यातना होतात, हे तुम्हांला माहित नाही का ? जे जीव जगात जिवंत राहू इच्छितात, त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय आणि हवेसे वाटणारे आहे. अशा स्थितीत स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितले, तरी ते कोण देईल बरे ! (१-४)
देव म्हणाले - ब्रह्मन, ज्यांच्या कर्मांची महात्मेही प्रशंसा करतात, अशा आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणार्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे ? मागणारे लोक स्वार्थी असतात. देणार्याच्या संकटाचा ते विचार करीत नाहीत. जर विचार केला असता तर त्यांनी ते मागितलेच नसते. तसेच समर्थ दाताही कधी नाही म्हणत नाही. (५-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १७ वा
चित्रकेतूला पार्वतीदेवींचा शाप -
श्रीशुक म्हणतात - ज्या दिशेला भगवान संकर्षण अंतर्धान पावले होते, त्या दिशेला विद्याधर चित्रकेतूने नमस्कार केला आणि तो आकाशमार्गाने स्वच्छंदपणे विहार करू लागला. (१)
महायोगी चित्रकेतू कोटयवधी वर्षेपर्यंत सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणार्या सुमेरू पर्वताच्या दर्यांतून विहार करीत राहिला. या काळात त्याच्या शरीरातील बळ आणि इंद्रियांची शक्ती अबाधित राहिली. मोठमोठे मुनी, सिद्ध, चारण त्याची स्तुती करीत असत. त्याच्या प्रेरणेने विद्याधरांच्या स्त्रिया त्याच्याजवळ सर्वशक्तिमान भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन करीत असत. (२-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय २›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय २ रा
विष्णुदूतांकडून भागवत-धर्म-निरूपण आणि अजामिळाचे परमधामगमन -
श्रीशुकाचार्य म्हणाले
- राजा, धर्माचे मर्म जाणणार्या भगवंतांच्या दूतांनी यमदूतांचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय ९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय ९ वा
विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषीकडे जाणे -
श्रीशुकाचार्य म्हणाले - परीक्षिता, आम्ही असे ऐकले आहे की, विश्वरूपाला तीन मस्तके होती. तो एका तोंडाने सोमरस, दुसर्याने मद्य आणि तिसर्याने अन्न ग्रहण करीत असे. त्वष्टा इत्यादी बारा आदित्य त्याचे वडील होते. म्हणून तो यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत असे. त्याचबरोबर तो अप्रत्यक्षपणे असुरांनासुद्धा आहुती देत असे. कारण त्याची आई असुरकुलातील असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत असे. देवराज इंद्राने पाहिले की, तो अशा रीतीने देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून कपट करीत आहे. त्यामुळे इंद्र भयभीत झाला आणि रागारागाने त्याने वेगाने त्याची तिन्ही मस्तके तोडली. विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक, सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कवडा झाले. इंद्र ब्रह्महत्येचे ते पाप जरी दूर करू शकत होता, तरी त्याने त्याचा ओंजळीने स्वीकार केला आणि एक वर्षापर्यंत त्यातून सुटण्याचा काहीही उपाय केला नाही. त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप चार भागांत वाटून पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रियांना दिले. तो चौथा भाग स्वीकारताना पृथ्वीने त्याच्या बदल्यात हा वर मागून घेतला की, जेथे कुठे खडडा असेल, तो योग्य वेळी आपोआप भरला जावा. तीच ब्रह्महत्या कुठे कुठे ओसाड जमिनीच्या रूपाने दृष्टीस पडते. दुसरा चतुर्थांश वृक्षांनी घेतला. त्याबदली त्यांनी हा वर मिळवला की, एखादा भाग तोडला गेल्यानंतर तो पुन्हा भरून यावा. अजूनही त्यांच्यात चिकाच्या रूपाने ब्रह्महत्या दृष्टीस पडते. नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वर मिळवून स्त्रियांनी ब्रह्महत्येचा तिसरा भाग स्वीकारला. त्यांची ब्रह्महत्या प्रत्येक महिन्यात रजःस्रावाच्या रूपाने दृष्टीस पडते. उपयोग करीत राहिल्यानंतरही झरे इत्यादींच्या रूपाने वाढच व्हावी, हा वर मिळवून पाण्याने ब्रह्महत्येचा चौथा भाग स्वीकारला. फेस, बुडबुडे इत्यादी रूपांनी तीच ब्रह्महत्या पाण्यावर दृष्टीस पडते. म्हणून माणूस ते बाजूला सारून पाणी उपयोगात आणतो. (१-१०)
विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा "हे इंद्रशत्रो, तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक." या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला. यज्ञ पूर्ण होताच अन्वाहार्य-पचन नावाच्या अग्नीतून एक मोठा भयानक पुरुष प्रगट झाला. तो सर्व लोकांचा नाश करण्यासाठी प्रलयकालीन विक्राळ काळच प्रगट झाला आहे, असा वाटत होता. दररोज त्याचे शरीर सर्व बाजूंनी बाणाएवढे वाढत असे. तो जळलेल्या पहाडाप्रमाणे काळाकुटट होता. संध्याकाळच्या ढगांप्रमाणे त्याची कांती होती. त्याच्या डोक्यावरील केस आणि दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाच्या, तसेच डोळे माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे प्रखर होते. तीन पात्यांचा चमकणारा त्रिशूल घेऊन जेव्हा तो नाचत, ओरडत आणि उडया मारीत असे, तेव्हा पृथ्वीचा थरकाप होऊन जाई आणि असे वाटत असे की त्या त्रिशूळावर त्याने अंतरिक्षाला झेलले आहे. तो वारंवार जांभई देत असे. त्यामुळे जेव्हा त्याचे गुहेसारखे खोल, विक्राळ दाढा असलेले प्रचंड तोंड उघडले जाई, तेव्हा असे वाटत असे की, तो सर्व आकाश पिऊन टाकील, जिभेने सर्व नक्षत्रे चाटून घेईल आणि तिन्ही लोक गिळून टाकील. त्याचे भयानक रूप पाहून सर्व लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. (११-१७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध ६ वा, अध्याय १९›📂 भागवत स्कंध ६, अध्याय १५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ६ वा - अध्याय १५ वा
चित्रकेतूला अंगिरा आणि नारदांचा उपदेश -
श्रीशुकाचार्य म्हणाले - राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता.त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनांनी समजावू लागले. ते म्हणाले, राजेंद्रा, ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस, तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता ? तसेच तू त्याचा कोण होतास ? आणि पुढच्या जन्मीसुद्धा तुझा त्याच्याशी काय संबंध असेल ? जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात. त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात. जसे काही बीजांपासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे भगवंतांच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. राजा, आम्ही, तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत, ते सर्वजण आपल्या जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत. यावरून असे सिद्ध होते की, सध्यासुद्धा त्यांचा व आपला काही संबंध नाही. सर्व प्राण्यांचे अधिपती, जन्म-मृत्यूरहित भगवान निरपेक्ष असूनही जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात, तशी आपण उत्पन्न केलेल्या व आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्याकडून अन्य प्राण्यांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. राजा, जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते, त्याचप्रमाणे माता-पित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो. घटादी कार्यांमध्ये माती जशी नित्य, तसा देहांत राहणारा आत्मा नित्य असतो. जसे एकाच मातीरूप वस्तूमध्ये घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती, हा भेद काल्पनिक आहे, त्याचप्रमाणे आत्मवस्तूमध्ये देही आणि देह याप्रकारचा भेदसुद्धा अनादी अविद्येने कल्पिलेला आहे. (१-८)
श्रीशुकदेव म्हणतात - राजा, जेव्हा महर्षींनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत घातली, तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख हाताने पुसून तो त्यांना म्हणाला. (९)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १० वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १० वा
श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन -
शौनकांनी विचारले
- आपले परंपरागत राज्य बळकावण्याची इच्छा असलेल्या आततायींचा नाश करून धर्मशिरोमणी महाराज युधिष्ठिरांनी आपल्या बंधूंसह कशाप्रकारे राज्य केले आणि कोणकोणती कामे केली. कारण बंधुवधाच्या दुःखाने राज्यभोगाविषयी ते विरक्त होते. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १३ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १३ वा
विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे -
सूत म्हणाले -
विदुर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रेय यांचेकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला. जे जाणण्याची त्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली होती. विदुराने मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णांचे ठिकाणी अनन्य भक्ति असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही. शौनक महोदय, आपला चुलता विदुर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर, त्याचे चारही भाऊ, धृतराष्ट्र, युयुत्सू, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी तसेच पांडव-परिवारातील अन्य सर्व स्त्री-पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया, असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्याच्या स्वागतासाठी सामोरे गेले. योग्य रीतीने आलिंगन, नमस्कार इत्यादि द्वारा सर्वजण त्याला भेटले आणि विरहदुःखामुळे व्याकूळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. युधिष्ठिराने त्याला आसनावर बसवून त्याचा यथोचित सत्कार केला. भोजन व विश्रांती झाल्यानंतर विदुर समाधानाने आसनावर बसला, तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक, सर्वांच्या देखत त्याला म्हणाला, (१-७)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १४ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १४ वा
अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे -
सूत म्हणाले -
स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता. पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही, त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले. त्यांनी पाहिले की, काळाची गति भयंकर होऊ लागली आहे. ज्यावेळी जो ऋतू असावयास पाहिजे तो असत नाही आणि त्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत. लोक क्रोधी, लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत. आपला जीवन - निर्वाह चालविण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहेत. सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत. एवढेच काय मैत्रीमध्येही कपट आहे. पिता, माता, सगे-सोयरे, बंधू, पति-पत्नी यांच्यात तंटे होऊ लागले आहेत. कलियुग असल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ, दंभ, अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्टसूचक अपशकुन होऊ लागले आहेत. हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाले, (१-५)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १ , अध्याय २ रा›
📿 अभंग क्र. १
📿 स्कंध १ ला - अध्याय
स्कंध १ ला - अध्याय २ रा श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय २ रा
भगवत्कथा आणि भगवद्भक्तीचे माहात्म्य -
श्रीव्यास म्हणतात
- शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय ११ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ११ वा
श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत -
सूत म्हणाले -
श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा आनर्त देशात जाऊन पोहोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरह-वेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला. भगवंतांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवितेवेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की, जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्चस्वरात मधुर गान गात आहे. संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी आली. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत. असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही नीरांजन ओवाळतात, त्याप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णांचे स्वागत केले. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सर्वांचे सुहृद आणि संरक्षक अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षगद्गद वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागले की, जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने बोलतात. हे नाथ, आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव प्रणाम करतो. ज्या चरणांना ब्रह्मा, शंकर, इंद्रसुद्धा वंदन करतात, ते चरण या संसारात परम कल्याण इच्छिणार्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत, त्यांना शरण गेल्याने परम समर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. हे विश्वबंधो, आपणच आमचे माता-पिता, सुहृद आणि स्वामी आहात. आपणच सद्गुरू आणि परम आराध्यदैवत आहात. आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपण आमचे कल्याण करा. अहाहा ! आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो. कारण सर्व सौंदर्याचे सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत. तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हांला पाहायला मिळत आहे. हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे. कमलनयन श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता, तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एकेक क्षण आम्हांला कोट्यवधी वर्षांइतका मोठा वाटतो. सूर्याशिवाय डोळ्यांची जशी, तशी आमची आपल्याखेरीज अवस्था होते. प्रजेच्या मुखांतून अशी स्तुतिवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. (१-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १७ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १७ वा
महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन -
सूत म्हणाले -
हे शौनका, तेथे गेल्यावर राजा परीक्षिताला असे दिसले की, एक राजाचा वेष धारण करणारा शूद्र हातात काठी घेऊन एका गाय आणि बैलाच्या जोडीला अशा रीतीने मारीत होता की, त्यांना कोणी वाली नाही. कमलातील तंतूप्रमाणे शुभ्र रंगाचा बैल एका पायावर उभा राहून थरथर कापत होता आणि त्या शूद्राच्या मारण्यामुळे दुःखी आणि भयभीत होऊन मूत्र त्याग करीत होता. धार्मिक कृत्यांसाठी दूध, तूप असे आहूतीचे पदार्थ देणारी गायसुद्धा शूद्राच्या वारंवार लत्ताप्रहारांनी अत्यंत दुःखी झाली होती. एक तर ती अशक्त होती, शिवाय तिचे वासरूही तिच्याजवळ नव्हते. तिला भूक लागली होती, त्यामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. स्वर्णजडित रथात बसलेल्या राजा परीक्षिताने आपले धनुष्य सज्ज केले आणि घनगंभीर आवाजात त्याने शूद्राला विचारले. अरे, स्वतः बलवान असूनही माझ्या राज्यातील दुर्बल प्राण्यांना बलपूर्वक मारहाण करणारा तू कोण आहेस ? एखाद्या नटाप्रमाणे राजाचा वेष तू धारण केला आहेस, पण तुझे कृत्य तर शूद्रासारखे दिसत आहे. अर्जुनासह श्रीकृष्णांच्या परमधामाला जाण्याने, निर्जन स्थानात निरपराध्यांवर अशा प्रकारे प्रहार करणारा तू अपराधी आहेस. म्हणून वध करण्यास योग्य आहेस. (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १९ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १९ वा
परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकदेवांचे आगमन -
सूत म्हणाले -
राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या निंद्य कर्माबद्दल अतिशय पश्चात्ताप झाला. तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला, मी निरपराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणाबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला, हे किती वाईट झाले. त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येवो. कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायश्चित्त मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही. ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य, सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे. त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण, देवता आणि गाय यांच्याबाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही. परीक्षित असा विचार करीत होता, एवढ्यात त्याला असे समजले की, ऋषिकुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे. त्यामुळे संसारात आसक्त असण्यार्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला. या जगातील आणि परलोकांतील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता. आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगातीरावर बसला. तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे. म्हणून गंगामाता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते. मग मरणासन्न असला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही ? (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय ६ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ६ वा
नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग -
सूत म्हणाले
- देवर्षी नारदांची जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवतीपुत्र भगवान श्रीव्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १६ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १६ वा
परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद -
सूत म्हणाले -
शौनका ! पांडवांच्या महाप्रयाणानंतर भगवंताचा परम भक्त राजा परीक्षित श्रेष्ठ ब्राह्मणांच्या उपदेशानुसार पृथ्वीचे पालन करू लागला. त्याच्या जन्माच्या वेळी ज्योतिष्यांनी त्याच्याविषयी जे काही सांगितले होते, ते सर्व श्रेष्ठ गुण त्याच्यामध्ये होते. त्याने उत्तराची कन्या इरावतीशी विवाह केला. तिच्यापासून त्याला जनमेजय आदि चार पुत्र झाले. त्याने कृपाचार्यांना आचार्य नेमून गंगातटाकी तीन अश्वमेध यज्ञ केले, त्यावेळी ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा दिली. त्या यज्ञात देवतांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपापला भाग ग्रहण केला. एकदा दिग्विजय करीत असताना त्याने शूद्र असून कली, राजाचा वेष घेऊन गाय आणि बैल यांना लाथांनी मारीत आहे, असे पाहिले. तेव्हा राजाने मोठ्या शौर्याने त्या कलियुगाला पकडून शासन केले. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय ८ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ८ वा
परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक -
सूत म्हणाले -
यानंतर पांडव श्रीकृष्णांच्यासह स्त्रियांना पुढे करून, मेलेल्या स्वजनांना तिलांजली देण्यासाठी गंगा तीरावर गेले. तेथे त्या सर्वांनी मृत बंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला. त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले. कुरुराज महाराज युधिष्ठिर, त्यांचे बंधू, धृतराष्ट, पुत्रशोकाने व्याकूळ झालेली गांधारी, कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण मृत स्वजनांच्यासाठी शोक करीत होते. भगवान श्रीकृष्णांनी धौम्य मुनींसह त्यांचे सांवन करून त्यांची समजूत घातली की, संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत. मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १२ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १२ वा
परीक्षिताचा जन्म -
शौनक म्हणाले -
अश्वत्थाम्याने सोडलेल्या अत्यंत तेजस्वी ब्रह्मास्त्राने उत्तरेचा गर्भ नष्ट झाला होता, परंतु भगवंतांनी तो पुन्हा जिवंत केला. ज्याला शुकदेवांनी ज्ञानोपदेश केला होता, त्या महाज्ञानी व महात्मा परीक्षिताचा जन्म, कर्म, मृत्यू आणि त्यानंतर त्याला जी गति प्राप्त झाली, ते सर्व आपणांस ओग्य वाटत असेल तर, आम्हांस सांगावे. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १ , अध्याय १ ला›
📿 अभंग क्र. १
📿 स्कंध १ ला - अध्याय
स्कंध १ ला - अध्याय १ ला श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १ ला
शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न -
या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थांतील त्याच्या अस्तित्वावरून (अन्वय) तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते, तर या सर्वांहून तो वेगळा (व्यतिरेक) असल्यामुळे तोच निमित्तकारण आहे, याचा निश्चय होतो. (कारण) तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद, सृष्टिनिर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्त्वगुणरूप तेज, रजोगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली, असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उपादान कारण असल्याने ती भूते सत्य वाटतात. (तरीही तो अद्वैतदृष्ट्या मायाजनित भ्रम होय.) जसे सूर्यप्रकाशावर मृगजळ, पाण्यावर काच (रूप मोती) किंवा काचरूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठानसत्तेमुळे सत्य वाटते, तसेच परमात्मसत्तेमुळे विश्व सत्य वाटते. (या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्त्व-रज-तम हे तीन गुण किंवा पंचभूते, इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल.) असे असूनही स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनांतील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो, त्या एकमेवाद्वितीय परम सत्य परमात्म्याचे (माया निरासाठी) आम्ही ध्यान करतो. (१)
महामुनिव्यास-निर्मित या श्रीमद्भागवतमहापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणार्या सत्पुरुषांनी जाणण्यायोग्य मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे, ते आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात, तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे ?(२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १ , अध्याय ४ था›
📿 अभंग क्र. १
📿 स्कंध १ ला - अध्याय
स्कंध १ ला - अध्याय ४ था श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ४ था
महर्षी व्यासांचा असंतोष -
व्यास म्हणाले
- त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनींमध्ये ऋग्वेदी, विद्या-वयोवृद्ध कुलपती शौनकांनी याप्रमाणे सांगणार्या सूतांची प्रशंसा केली आणि म्हटले. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय ९ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ९ वा
युधिष्ठिर आदींचे भीष्मांजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग -
सूत म्हणाले -
अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. नंतर सर्व धर्मांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जेथे भीष्मपितामह शरशय्येवर पडले होते, त्या कुरुक्षेत्रावर गेला. शौनकादी ऋषींनो, त्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे जुंपले होते, अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व पांडव बंधू युधिष्ठिरामागोमाग गेले. व्यास, धौम्य आदी मुनीही त्यांच्या बरोबर होते. शौनका, भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले. तेव्हा त्या सर्व बंधूंच्यासह युधिष्ठिर, यक्षसमुदायात कुबेर शोभून दिसावा, तसा शोभून दिसत होता. आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर तेथे गेल्यानंतर पांडवांना दिसले की, स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्मपितामह पृथ्वीवर पडले होते. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. शौनका, भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्मपितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी तेथे आले होते. पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदश्व, भारद्वाज तसेच आपल्या शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, गृत्समद, असित, कक्षीवान, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्धहृदय असणारे महात्मे, तसेच शिष्यांसहित कश्यप, अंगिरापुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तेथे आले. देश कालनिर्णय जाणणार्या धर्मज्ञ भीष्मपितामहांनी त्या थोर ऋषींना एकत्र आलेले पाहून त्यांचा मनाने व दृष्टीने यथायोग्य सन्मान केला. ते भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव जाणत होते. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान् श्रीकृष्णांची त्यांनी पूजा केली. (१-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १ , अध्याय ५ वा›
📿 अभंग क्र. १
📿 स्कंध १ ला - अध्याय
स्कंध १ ला - अध्याय ५ वा श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ५ वा
भगवंतांच्या यश-कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र -
सूत म्हणाले
- त्यानंतर आरामात बसलेल्या, हातात वीणा घेतलेल्या, परम यशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळच बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय ७ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ७ वा
अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी -
शौनकांनी विचारले
- सूतमहोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले ? (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १५ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १५ वा
कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण -
सूत म्हणाले,
भगवान श्रीकृष्णांचा प्रिय मित्र अर्जुन आधीच श्रीकृष्णांच्या विरहाने कष्टी झाला होता. त्यात राजा युधिष्ठिरांनी त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली. शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेले होते. तो भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानात इतका गढून गेला होता की, आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही. आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्याकारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकूळ झाला होता. रथ हाकणे, फिरावयास जाणे इत्यादि वेळी भगवंतांच्या बरोबर जी मित्रता, अभिन्नहृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते, त्यांची त्याला वारंवार आठवण येत होती. मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला; हाताने डोळे पुसले आणि सद्गदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरांस अर्जुन म्हणाला - (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १, अध्याय १८ वा›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय १८ वा
राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप -
सूत म्हणाले -
अद्भुत कर्मे करणार्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने, राजा परीक्षित मातेच्या गर्भात अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळूनही मरण पावला नाही. ब्राह्मणाच्या शापाने त्यला दंश करण्यासाठी तक्षक आला, त्यावेळी प्राण जाण्याच्या मोठ्या भयानेही तो भयभीत झाला नाही. कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते. त्याने सर्वाची आसक्ती सोडली, गंगातटावर जाऊन श्रीशुकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंतांचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला. जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या लीला कथन करीत राहतात, त्या कथामृताचे मेहमी पान करतात आणि त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना अंतकालीही मोह होत नाही. जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्युपुत्र महाराज परीक्षित सम्राट होते, तोपर्यंत सर्वत्र राहूनही कलीचा काही प्रभाव पडला नाही. ज्या दिवशी, ज्या क्षणी, भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला, त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते. भ्रमरासारखे सार ग्रहण करणार्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही. कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते; परंतु पापकर्माचे फळ संकल्पाने नव्हे, तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते. लांडग्याप्रमाणे मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणार्या आणि निश्चयी पुरुषांना भिणार्या कलीला काय किंमत आहे ? धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो. ऋषींनो, आपण विचारलेले भगवंतांच्या कथांनी युक्त असे राजा परीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपणास सांगितले. वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्ये करणार्या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणार्या जितक्या कथा आहेत, त्या सर्वांचे कल्याण इच्छिणार्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे. (१-१०)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १ ला, अध्याय १९›📂 भागवत स्कंध १ , अध्याय ३ रा›
📿 अभंग क्र. १
📿 स्कंध १ ला - अध्याय
स्कंध १ ला - अध्याय ३ रा श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १ ला - अध्याय ३ रा
भगवंतांच्या अवतारांचे वर्णन -
सूत म्हणतात
- सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्तत्त्व आदींपासून दहा इंद्रिये, पंचमहाभूते आणि एक मन अशा सोळा कलांनी युक्त पुरुषरूप ग्रहण केले. पाण्यात पहुडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभिसरोवरातून प्रगट झालेल्या कमळापासून भगवंताम्च्या त्या विराट रूपाच्या अंग-प्रत्यंगांतच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे. ते विराट रूप भगवंतांचे विशुद्ध असे सत्त्वमय श्रेष्ठ रूप आहे. योगी दिव्य दृष्टीने भगवंतांच्या त्या रूपाचे दर्शन करतात. भगवंतांच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे. त्यालाच हजारो डोकी, कान, डोळे नाके, तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले इत्यादि अलंकारांनी शोभून दिसते. भगवंतांचे हे पुरुषरूप ज्याला नारायण म्हणतात, अनेक अवतारांचे उगमस्थान आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात. या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशु-पक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. (१-५)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत महात्म्य पाहिले, ६ अध्याय›📂 भागवत महात्म्य, अध्याय ३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद्भागवत महात्म्
श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय ३ रा
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य - अध्याय ३ रा
भक्तीच्या कष्टांची निवृत्ती -
नारद म्हणाले - भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीशुकदेवांनी सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथांद्वारा मी उज्ज्वल ज्ञानयज्ञ करीन. हा यज्ञ कोठे केला पाहिजे, ते ठिकाण आपण मला सांगा. आपण वेद जाणणारे आहात, तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा. श्रीमद्भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा ॥ १-३ ॥
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत महात्म्य पाहिले, ६ अध्याय›📂 भागवत महात्म्य, अध्याय २›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद्भागवत महात्म्
श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय २ रा
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य - अध्याय २ रा
भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न -
नारद म्हणाले - बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस ? तू इतकी चिंतातुर का झाली आहेस ? भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन कर. तुझे दुःख नाहीसे होईल. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरींचे ज्यांनी पालन केले, ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्यांना नेहमी प्राणांहूनही अधिक प्रिय अशी तू भक्ति आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्याही घरात जातात. सत्य, त्रेता आणि द्वापर या तीन युगांत ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती; परंतु कलियुगात केवळ भक्ति मोक्षप्राप्ती करून देणारी आहे, असे निश्चित जाणून परमानंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरींनी सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णांना प्रिय अशी सुंदरी आहेस. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की, "मी काय करू ?" तेव्हा श्रीकृष्णांनी "माझ्या भक्तांचे पोषण कर," अशी तुला आज्ञा केली होती. (१-६)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत महात्म्य पाहिले, ६ अध्याय›📂 भागवत महात्म्य, अध्याय ५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद्भागवत महात्म्
श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय ५ वा
श्रीमद् भागवत महापुराण
माहात्म्य - अध्याय ५ वा
धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार -
सूत म्हणाले - शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंधुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले, "बोल. धन कुठे ठेवले आहेस ते ! नाहीतर तुला लाथांनी तुडवीन." मुलाच्या या धमकीला भिऊन आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली व ती मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही. कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत महात्म्य पाहिले, ६ अध्याय›📂 भागवत महात्म्य, अध्याय १›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद्भागवत महात्म्
श्रीमद्भागवत महात्म्य अध्याय १ ला
श्रीमद्भागवत महात्म्य अनुक्रमणिका
अध्याय १ - देवर्षी नारदांची भक्तीशी भेट
अध्याय २ - भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न
अध्याय ३ - भक्तीच्या कष्टांची निवृत्ती
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय १०›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १० वा
मार्कंडेयला शंकरांचे वरदान -
सूत म्हणतात
- अशा तर्हेने मार्कंडेय मुनीने नारायणनिर्मित योगमाया-वैभवाचा अनुभव घेतला. आणि तो त्यांनाच शरण गेला. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ८›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ८ वा
मार्कंडेयाची तपश्चर्या आणि वरप्राप्ती -
शौनका म्हणाला - हे साधो सूता ! तुला उदंड आयुष्य मिळो ! तू वक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. जे लोक संसाराच्या घनदाट अंधकारात भटकत असतात, त्यांना तू परमात्म्याचा साक्षात्कार करवितोस. आता आम्हांला यासंबंधी सांग. लोक सांगतात की, मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय ऋषी चिरायू आहे. ज्यावेळी प्रलयाने सर्व जग गिळून टाकले होते, त्यावेळी सुद्धा तो वाचला. तो तर याच कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्मलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी आहे आणि आतापर्यंत प्राण्यांचा कोणताही प्रलय झालेला नाही. अशा स्थितीमध्ये हे खरे असू शकेल, की ज्यावेळी मार्कंडेय मुनीने त्यामधून फिरत असताना वटवृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये पहुडलेल्या अत्यंत अद्भुत अशा पुरूषाला पाहिले ! हे सूता ! आमच्या मनामध्ये हा मोठाच संशय उत्पन्न झाला आहे. आणि हे समजून घेण्याची आम्हांला अतिशय उत्कंठा आहे. तू महान योगी आहेस. शिवाय पुराणे जाणणारा म्हणून प्रसिद्ध आहेस. तरी आमच्या या संशयाचे निराकरण करावे. (१-५)
सूत म्हणाले - शौनका ! तू विचारलेल्या प्रश्र्नामुळे लोकांच्या मनातील शंका नाहीशी होईल. शिवाय या कथेमध्ये भगवान नारायणांचा महिमा कथन केलेला आहे. जो या कथेचे गायन करतो, त्याचे कलियुगामुळे उत्पन्न होणारे दोष नष्ट होतात. मृकंड ऋषीने आपला पुत्र मार्कंडेय याच्यावर द्विजाला आवश्यक सर्व संस्कार त्या त्या वेळी केले. नंतर विधिपूर्वक वेदांचे अध्ययन करून मार्कंडेय तपश्चर्या आणि स्वाध्याय करीत होता. त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केले होते. तो शांत भावाने राहात होता. मस्तकावर जटा होत्या. झाडांच्या सालीच तो वस्त्र म्हणून नेसत असे. हातात तो कमंडलू आणि दंड धारण करी. त्याच्या अंगावर जानवे आणि मेखला शोभून दिसत असे. काळे मृगचर्म, रुद्राक्षांची माळ आणि कुश, एवढेच साहित्य त्याच्याजवळ होते. आपल्या व्रताच्या समृद्धीसाठी त्याने हे सर्व ग्रहण केले होते. सायंकाळी आणि प्रातःकाळी तो अग्निहोत्र, सूर्योपस्थान, गुरुवंदन, ब्राम्हणसत्कार आणि स्वतःला परमात्म्याचे स्वरूप मानणे इत्यादी प्रकारांनी भगवंतांची आराधना करी. संध्याकाळी-सकाळी भिक्षा मागून ती गुरूदेवांच्या चरणांशी ठेवून तो मौन राही. गुरूजींची आज्ञा झाली, तरच एक वेळ भोजन करी, नाहीतर उपवास करी. मार्कंडेयाने अशा प्रकारे तपश्चर्या आणि स्वाध्याय यांमध्ये तत्पर राहून कोट्यावधी वर्षेपर्यंत भगवंतांची अराधना केली आणि जिंकण्यास कठीण अशा मृत्यूवर विजय प्राप्त केला. त्यामुळे ब्रह्मदेव, भृगू, शंकर, दक्ष, ब्रह्मदेवाचे अनेक अन्य पुत्र तसेच मनुष्य, देवता, पितर व इतर सर्व प्राणी अत्यंत आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे नैष्ठिक ब्रह्मचर्य-व्रत धारण केलेला योगी मार्कंडेय याने तपश्चर्या, स्वाध्याय आणि संयम यांच्या द्वारा अविद्या इत्यादी सर्व क्लेश नाहीसे करून शुद्ध अंतःकरणाने तो इंद्रियातीत परमात्म्याचे ध्यान करू लागला. योगी मार्कंडेय-मुनी महायोगाच्या द्वारे आपले चित्त भगवंतांच्या स्वरूपाशी एकरूप करीत राहिला. असे करता करता सहा मन्वन्तरे उलटून गेली. (६-१४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ७›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ७ वा
अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे -
सूत म्हणतात
- सुमंतुमुनी अथर्ववेदाचे ज्ञानी होते. आपली संहिता त्यांनी आपला शिष्य कबंध याला शिकविली. कबंधाने त्या संहितेचे दोन भाग करून पथ्य आणि वेददर्श यांना ती शिकविली. वेददर्शाचे शौक्लायनी, ब्रह्मबली, मोदोश आणि पिप्पलायनी या नावाचे शिष्य होते. आता पथ्याच्या शिष्यांची नावे ऐका. शौनका ! कुमुद, शुनक आणि अथर्ववेत्त जाजली असे पथ्याचे तीन शिष्य होते. अंगिरा गोत्राचा शुनक याचे बभ्रू आणि सैंधवायन असे दोन शिष्य होते. त्यांनी दोन संहितांचे अध्ययन केले. अथर्ववेदाच्या आचार्यांमध्ये यांच्याखेरीज सैंधवायन इत्यादींचे शिष्य सावर्ण्य इत्यादी, तसेच नक्षत्रकल्प, शांती, कश्यप, आंगिरस इत्यादी पुष्कळ विद्वान होऊन गेले. आता मी तुम्हांला पौराणिकांच्यासंबंधी ऐकवितो. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ९›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ९ वा
मार्कण्डेयाला मायेचे दर्शन -
सूत म्हणतात
- बुद्धिमान मार्कंडेयाने जेव्हा अशी स्तुती केली, तेव्हा प्रसन्न होऊन नरासह असलेले भगवान नारायण मार्कंडेयाला म्हणाले. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ५›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ५ वा
श्रीशुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश -
श्रीशुक म्हणतात
- या श्रीमद्भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव ज्यांच्या रजोगुणातून आणि शंकर तमोगुणातून प्रगट झाले आहेत त्या विश्वात्मा भगवान श्रीहरींचेच वारंवार वर्णन आलेले आहे. हे राजन ! आता तू ’मी मरेन’ हा अज्ञान्यासारखा विचार सोडून दे. शरीरासारखा तू पूर्वी कधीही जन्मलेला नाहीस. आणि तुझा जन्म न झाल्यामुळे शरीरासारखा आज तू नष्टही होणार नाहीस. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे तू पुत्र-पौत्रादिकांच्या रूपानेही पुन्हा उत्पन्न होणार नाहीस. कारण, लाकडापासून अग्नी जसा वेगळा असतो, त्याचप्रमाणे तूसुद्धा शरीर इत्यादींहून वेगळा आहेस. (१-३)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ६›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ६ वा
परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद -
सूत म्हणतात
- चराचरात स्वत:ला पाहाणार्या आणि समदर्शी व्यासनंदन श्रीशुक मुनींनी सांगितलेले ऐकून परीक्षिताने मस्तक लववून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना म्हणाला. (१)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय १३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १३ वा
विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद्भागवताचा महिमा -
सूत म्हणतात
- ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र, आणि मरुद्गण दिव्य स्तोत्रांनी ज्यांची स्तुती करतात, सामगायन करणारे ऋषी अंग, पद, क्रम तसेच उपनिषदांसह वेदांच्याद्वारे ज्यांचे गायन करतात, योगी ध्यानाच्या वेळी निश्वल झालेल्या मनाने ज्यांचे दर्शन घेतात आणि देव-दैत्यसुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो. ज्यावेळी भगवंतांनी कच्छपरूप धारण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता, त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकांनी खाजविल्यामुळे ज्यांना झोप आली, त्यावेळचे त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करतो. त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यात खळबळ माजली, त्या संस्कारांच्या खुणा आजही शिल्लक आहेत. त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनार्यावर लाटांच्या रूपाने ये-जा चालू झाली, ती अजूनही थांबत नाही. (१-२)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय १२›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय १२ वा
श्रीमद्भागवताची संक्षिप्त विषय-सूची -
सूत म्हणतात
- भगवद्भक्तिरूप महान धर्माला नमस्कार असो. विश्वविधात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार असो. आता मी ब्राम्हणांना नमस्कार करून श्रीमद्भगवतोक्त सनातन धर्म सांगतो. हे ऋषींनो ! आपण मला जो प्रश्र्न विचारला होता, त्यानुसार मी भगवान विष्णूंचे हे अद्भुत चरित्र सांगितले. हे सर्व पापे नाहीसे करणार्या श्रीहरींचेच संकीर्तन झालेले आहे. तेच श्रीहरी सर्वांच्या ह्रदयात विराजमान, सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवनसर्वस्व आहेत. या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचे वर्णन आलेले आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ति, स्थिती आणि प्रलय यांची प्रचीती येते. या पुराणात त्याच परमतत्त्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधने, यांविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. (१-४)
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ३›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ३ रा
राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय - नामसंकीर्तन -
श्रीशुक म्हणतात
- राजे लोक आपल्याला जिंकण्यासाठी उतावीळ झालेले पाहून पृथ्वी त्यांना हसते आणि म्हणते, " केवढे आश्चर्य आहे पहा ! जे स्वत: मृत्यूच्या हातातील बाहुले आहेत, ते मला जिंकून घेऊ इच्छितात. जे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असलेल्या शरीरावर फाजील विश्वास ठेवतात, त्या सुजाण राजांचीही ही इच्छा फोल ठरते. ते असाही विचार करतात की, आपण प्रथम मनासह आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळवू. त्यानंतर आपल्या मंत्री, अमात्य, नागरिक, बांधव आणि सर्व सेनेलासुद्धा वश करून घेऊ. अशा रीतीने शत्रूला जिंकून क्रमाने समुद्रवलयांकित पृथ्वी जिंकू. अशा प्रकारे मनात मनोरे रचणारे ते जवळ आलेल्या मृत्यूला पाहात नाहीत. समुद्रवलयांकित मला जिंकल्यावर ते नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राची सफर करतात. अंत:करणजयाच्या तुलनेत हे किती क्षुद्र फळ आहे ! कारण मनोजयाचे फळ मुक्ती हे आहे.
🙏 श्रीमद भागवत मराठी सार श्लोकार्थ›📚 श्रीमद् भागवत मराठी कथासार›📖 भागवत स्कंध १२ वा, अध्याय १३›📂 भागवत स्कंध १२, अध्याय ११›
📿 अभंग क्र. १
📿 श्रीमद् भागवत महापुर
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १२ वा - अध्याय ११ वा
भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन -
शौनक म्हणाला - सूत महोदय ! आपण भागवताचे तत्त्व जाणणारे आणि अनेक विषय जाणणारे आहात. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांसंबंधी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. भगवान आपले कल्याण करोत. आम्ही क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छितो; कारण कौशल्याने आणि योग्य तर्हेने त्याचे आचरण केल्याने मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेतो. म्हणून आपण आम्हांला हे सांगा की, पांचरात्र इत्यादी तंत्रांचा विधी जाणणारे लोक फक्त श्रीलक्ष्मीपती भगवंतांची आराधना करतेवेळी कोणकोणत्या तत्त्वांनी त्यांचे चरण इत्यादी अंगे, गरुडादी उपांगे, सुदर्शन इत्यादी आयुधे आणि कौस्तुभ इत्यादी अलंकारांची कल्पना करतात ? (१-३)
सूत म्हणाले - मी श्रीगुरूदेवांच्या चरणांना नमस्कार करून, ब्रह्मदेव इत्यादी आचार्यांनी , वेदांनी तसेच पांचरात्र इत्यादी तंत्रग्रंथांनी श्रीविष्णूंच्या ज्या विभूतींचे वर्णन केले आहे, ते सांगतो. भगवंतांच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये हे त्रैलोक्य दिसते, ते प्रकृती, सूत्रात्मा, महतत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या नऊ तत्त्वांनी निर्माण झालेले आहे. हे भगवंतांचेच पुरूषरूप आहे. पृथ्वी याचे चरण, स्वर्ग मस्तक, अंतरिक्ष नाभी, सूर्य नेत्र, वायू नासिका आणि दिशा कान आहेत. (४-६)
🙏 शुद्ध पंचरत्न हरीपाठ›📚 पाच संतांचे हरिपाठ›📖 5 संतांचे हरिपाठ›📂 संत एकनाथ हरिपाठ›
📿 अभंग क्र. १
📿 श्री एकनाथ महाराज हर
1.
श्री एकनाथ महाराज हरिपाठ
हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरी मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥२॥
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगें हरिरूप ॥३॥
🙏 शुद्ध पंचरत्न हरीपाठ›📚 पाच संतांचे हरिपाठ›📖 5 संतांचे हरिपाठ›📂 हरिपाठ नियम व प्रस्तावना›
📿 अभंग क्र. १
📿 प्रस्तावना
1.
प्रस्तावना
आज च्या या घडीला मानव, संत विचारापासून दूर जात असल्याने त्याला सामाजिक भाना बरोबर आध्यात्मिकभान हि नाही, त्यामुळे सुख, समाधान, दया, करुणा, सेवा, ममता, कर्तव्य, जबाबदारी, इत्यादींच त्याला काही देण घेण नाही अस दिसून येत. कारण त्यान भौतिक साधनांचा अंगीकार करून तो त्यात गुरफटून गेला आहे. (उदा. MOBILE, TAB, COMPUTER, LAPTOP, FABLET, FACEBOOK, WHATSUP, ETC.)
ती साधन त्याला शाश्वत वाटतात त्या मुळे तो परमार्थ साधना कडे वळत नाही आणि आजच्या गतिमान युगात त्याला सवड हि नाही.
म्हणून आज मानव ज्या भौतिक साधनाच्या आहारी गेला त्यातून त्याला बाहेर हि काढण्यासाठी त्याच साधनाचा उपयोग करता येईल का? असे संशोधन वारकरी डिजिटल लॅब (Warkari Digital Lab) व्दारे करण्यात येऊन त्याचे फलित म्हणजे हा शुद्ध हरिपाठ.
🙏 शुद्ध पंचरत्न हरीपाठ›📚 पाच संतांचे हरिपाठ›📖 5 संतांचे हरिपाठ›📂 संत नामदेव हरिपाठ›
📿 अभंग क्र. १
📿 श्री नामदेव महाराज ह
1.
श्री नामदेव महाराज हरिपाठ
नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावे श्रीरामा एका भावे ॥१॥
न लगती स्तोत्रें नाना मंत्रे यंत्रे । वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम ॥२॥
अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत ॥३॥
🙏 शुद्ध पंचरत्न हरीपाठ›📚 पाच संतांचे हरिपाठ›📖 5 संतांचे हरिपाठ›📂 , संत सोपानदेव हरिपाठ›
📿 अभंग क्र. १
📿 संत सोपान देवा हरिपा
1.
संत सोपान देवा हरिपाठ एकूण अभंग ६
संत सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून –
” वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे “
हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .
🙏 पालखी सोहळा दिंडी नंबर›📚 संतांचे पालखी सोहळे›📖 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा›📂 ज्ञानेश्वर. म. पालखी सोहळा (माहिती)›
📿 अभंग क्र. १
📿 वारी - काय आहे जाणून
1.
वारी - काय आहे जाणून घ्या
१)
वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली...
काही निष्ठावंत वारकरी तर दिवसभर तोंडात पाणीसुद्धा घालत नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच... निष्काम सेवेचा धडा मिळतो यावारीतच!