🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२६५
📿 कोणी कांही तरी म्हणो
1265.
कोणी कांही तरी म्हणो । आम्ही न जाणो तया बोला ॥१॥
गाऊ सुखे नामावळी । सुख कल्लोळीं सर्वदा ॥२॥
नाचु संतमेळीं सदा । कीर्तनी गोविंदा रंजवुं ॥३॥
एका जनार्दनी हाचि धंदा । वाया शब्दा न लागू ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२६६
📿 धन्य धन्य श्रीहरीचे
1266.
धन्य धन्य श्रीहरीचे गुण । नाम पावन ऐकता ॥१॥
जे जे अवतारचरित्र । वर्णीता पवित्र वाणी होय ॥२॥
कीर्ति वर्णिता उद्धार जीवां । कलीयुगीं सर्वा उपदेश ॥३॥
एका जनार्दनी सोपे वर्म । गुण कर्म वर्णिता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२६८
📿 मोक्ष मुक्तीचे लिगाड
1268.
मोक्ष मुक्तीचे लिगाड । वागवी अवघड कासया ॥१॥
एक नाम जपा कंठी । राबती कोटी मुक्ति देखा ॥२॥
मोक्ष तेथे जोडोनि हात । उभाचि तिष्ठत सर्वदा ॥३॥
एका जनार्दनी देखा । मुक्ति फुका राबती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२६९
📿 मज माझा उपदेश । आणिक
1269.
मज माझा उपदेश । आणिका नये याची रीस ॥१॥
तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥धृपद॥
तुमचा मी शरणागत । काही करा माझे हित ॥२॥
तुका पाय धरी । मी हे माझे दुर करी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२६९
📿 वडील वडील आमुची बोलत
1269.
वडील वडील आमुची बोलतील गोष्टी | परी तुज ऐसा सुष्टी देव नाही ॥१॥
दर्षना आलिया पाडिसी आव्हाटा | मन मारूनी चोहाटा भुलविसी तू ॥२॥
ऐसा कैसा कोणे केलासिरे देव | आमुच्या जाणिया खेंच आणियेला ॥३॥
माझे बाळ तुझ्या दर्शनासी आले | ते त्वा भुलविले केशिराजा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२७०
📿 जाणे त्याचे वर्म नेण
1270.
जाणे त्याचे वर्म नेणे त्याचे कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥
मैथुनाचे सुख सांगितल्या खूण । अनुभवाविण कळो नये ॥२॥
तुका म्हणे जळो शाब्दिक हे ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२७०
📿 अगा ये विठोबा पाहे म
1270.
अगा ये विठोबा पाहे मजकडे | का गा केले वेडे बाळ माझे ॥१॥
तुझे काय खादले त्वा काय दिधले | भले दाखविले देवपण ॥२॥
आम्ही म्हणू तू रे कृपाळू अससी | आता तू कळलासि पंढरिराया ॥३॥
का देवपण आपुले भोगू पै जाणावे | भक्ता सुख द्यावे हेळामात्र ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२७१
📿 अभिमानी पांडुरंग । ग
1271.
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥
अनुसरा लवलाही । नका विचार करू काही ॥धृपद॥
कोठे राहतील पापे । जालिया हो अनुतापे ॥२॥
तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. १२७२
📿 नित्य नैमित्तिक कर्म
1272.
नित्य नैमित्तिक कर्म । जया न घडे हा धर्म । येणे उच्चारावें नाम । सत्य निर्धार जाणावा ॥१॥
नामे कर्माचा सुटे उपाधी । नामे तुटे आधी व्याधी । नामे शोक संदेह बुद्धी । नासतसे हरिनामें ॥२॥
नाना रोग तुटती नामे । घडती सर्व ब्रह्माकर्में । एका जनार्दनी नामे । धर्म सकळ साधती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२७३
📿 तुझिया नाम्याने बळी
1273.
तुझिया नाम्याने बळी देउनि चित्त | जन्मोनिया आप्त केले मज ॥१॥
इष्ट मित्र बंधु जननी जनक | सर्व मीच एक करूनि ठेला ॥२॥
ऐसी याची करणी अजोनि नेणसी | बाळ माझे म्हणसी चाळविले ॥३॥
प्रेमांचे लाघव लाउनि माझ्या पायी | बांधले हृदयी धरोनिया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२७४
📿 अवघे जेणे पाप नासे ।
1274.
अवघे जेणे पाप नासे । ते हे असे पंढरीसी ॥१॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥धृपद॥
अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशी वोळली हे ॥२॥
तुका म्हणे जवळी आले । उभे ठाले समचरणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१›
📿 अभंग क्र. १२७५
📿 नामपाठ सार सर्वामाजी
1275.
नामपाठ सार सर्वामाजीं श्रेष्ठ । जो गाये तो वरिष्ठ कलियुगीं ॥१॥
चुकेल यातना नाना गर्भवास । भय आणि त्रास नव्हे मनी ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ भावे । आदरे गात आहे सदोदित ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२७६
📿 जन हे सुखाचे दिल्या
1276.
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे । अंत हे काळीचे नाही कोणी ॥१॥
जाल्या हीन शक्ती नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरे ॥धृपद॥
बाइल म्हणे खर मरता तरी बरे । नासिले हे घर थुंकोनिया ॥२॥
तुका म्हणे माझी नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वाचूनिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२७७
📿 त्या तुवा केसा आणि ए
1277.
त्या तुवा केसा आणि एके माये ॥ येणे पंढरी राये बुडबिळे ॥ १ ॥
असता चराचरा न बुडता सृष्टी ॥ का घेतली पाठी दुबळीची ॥ २॥
एक वाळ माझे त्याची धरिळी आस ॥ तेथे कावानिरास केले देवा ॥ ३॥
एवढा हा दान कशाने विसरेन ॥ देई कृपादान पांडुरंगा ॥ ४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१›
📿 अभंग क्र. १२७७
📿 नामपाठ सार वेदांचे त
1277.
नामपाठ सार वेदांचे ते मूळ । शास्त्रांचे ते फळ नामपाठ ॥१॥
योगयाग विधि न लगे खटपट । नामपाठे स्पष्ट सर्व कार्य ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ घोकी । गुढीं तिही लोकी उभारिली ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२७८
📿 बहुत दिवस भरले पै गो
1278.
बहुत दिवस भरले पै गोपाळा | अगा ये विठ्ठला कवण न ये ॥१॥
नामा माझा वेगी देई माझ्या हाती | जाऊ दे परती अनाथनाथा ॥२॥
खाऊ जेऊ तुज असोस पै देऊ | कीर्ति तुझी गाऊ जगामाजी ॥३॥
तुज काय जाणे ब्रह्मांडनायका | नव्हेसी मजसारिखा एकदेशी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१›
📿 अभंग क्र. १२७८
📿 नामपाठ ब्रह्मा उघड ब
1278.
नामपाठ ब्रह्मा उघड बोले वाचा । वेदांतीं तो साच निर्णय असे ॥१॥
नामपाठ भावस भक्ति ते कारण । आणिक साधन नाही दुजे ॥२॥
जनार्दनाचा एक गाये तो आवडी । तोडियेली बेडी संसाराची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१›
📿 अभंग क्र. १२७९
📿 नामपाठ किती सर्वात व
1279.
नामपाठ किती सर्वात वरिष्ठ । नको साधन कष्ट आणिक कांही ॥१॥
नामपाठमाला हृदयी ध्याई भावे । उगेंचि जपावे मौन्यरुप ॥२॥
जनार्दनाचा एक नाम गाय फुका । साधन तिही लोका वरिष्ठ ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२८०
📿 बोलाचे गौरव । नव्हे
1280.
बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥१॥
माझी हरीकथा माउली । नव्हे आणिकासी पागिली ॥धृपद॥
व्याली वाढविले । निजपदी निजवले ॥२॥
दाटली वो रसे । त्रिभुवन ब्रम्हरसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१›
📿 अभंग क्र. १२८०
📿 नामपाठ कालीमाजीं सोप
1280.
नामपाठ कालीमाजीं सोपे वर्म । साधन तो श्रम न करी वाया ॥१॥
नामपाठ गाये नामपाठ गाये । वाया तू न जाय खटपटा ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाये । जनार्दना पाहे काया वाचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२८१
📿 माझे घर तुवा पुर्वीच
1281.
माझे घर तुवा पुर्वीच बुडविले | जे दर्शनासी आले बाळ माझे ॥१॥
नेणो काय वर्म तुझे सांपडले हाती | रिघालासी चित्ती जेणे द्वारे ॥२॥
लौकिक परिहार देसील कासया | मी तुज ऐसिया बरवे जाणे | |३ ॥कटी ठेउनि कर उभा गरुडपारी | हे तव अंतरी हारपला ॥४॥
नाही चळणवळण न लावी पात्या पाते | लागले निरूते लक्ष तुझे ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १२७३ ते १२८१›
📿 अभंग क्र. १२८१
📿 नामपाठ श्रेष्ठ नामपा
1281.
नामपाठ श्रेष्ठ नामपाठ श्रेष्ठ । पावें तो वैकुंठकलीमाजीं ॥१॥
नामपाठे गेले नामपाठे गेले । जडजीव उद्धरिले नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एका आणिक नेणे वर्म । सोपे होय कर्म नामपाठे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२८२
📿 तुझे नाम गाऊ आता । त
1282.
तुझे नाम गाऊ आता । तुझ्या रंगी नाचो था था ॥१॥
तुझ्या नामाचा विश्वास । आम्हा कैचा गर्भवास ॥धृपद॥
तुझे नामी विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥२॥
नाम घ्या रे कोणी फुका । भावे सांगतसे तुका ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३›
📿 अभंग क्र. १२८२
📿 नामपाठफल - अभंग १२८२
1282.
नामपाठफल - अभंग १२८२ ते १३२३
नामपाठ सदा एकांती जो करी । भुक्तिमुक्ती चारी घरी त्याच्या ॥१॥
न लगे साधन व्युप्तत्ति पसारा । नामपाठ बरा संतसंगे ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे निका । तारिले जडलोकां नामपाठे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२८३
📿 लावोनि भवभये तुवा के
1283.
लावोनि भवभये तुवा केले साचे | देह नव्हे याचे ऐसे केले ॥१॥
सुखभोग सर्व दिला टाकोनिया | नेणे तुझ्या पायांपरते कांही ॥२॥
ऐसे काय केले नामया चाळविले | समूळ बुडविले अपणांमांजी ॥३॥
आम्हा दुरबळांचा करोनिया घात | केला वाताहात घराचार ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२८४
📿 राही रखुमाई सत्यभामा
1284.
राही रखुमाई सत्यभामा माता | सिकवा वो कांता बहुता परी ॥१॥
संत सनकादिक साक्ष हे सकळ | येणे माझे बाळ चाळविले ॥२॥
हा काय आमुचा धनी की गोसावी | नाही ते शिकवी लेकुरासी ॥३॥
जाला देव तरी पडो याच्या पाया | मैदावे केलिया भले नव्हे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२८५
📿 जगी मान्य केले हा तु
1285.
जगी मान्य केले हा तुझा देकार । की काही विचार आहे पुढे ॥१॥
करितो कवित्व जोडितो अक्षरे । येणे काय पुरे जाले माझे ॥धृपद॥
तोवरी हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखे ॥२॥
तुका म्हणे तुज पुंडलिकाची आण । जरी काही वचन करिसी मज ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२८६
📿 झड मारोनिया बैसलो पं
1286.
झड मारोनिया बैसलो पंगती । उठविता फजिती दातयाची ॥१॥
काय ते उचित तुम्हा का न कळे । का हो झांका डोळे पांडुरंगा ॥धृपद॥
घेईन इच्छेचे मागोनि सकळ । नाही नव्हे काळ बोलायाचा ॥२॥
तुका म्हणे जालो गगनाधिकारी । नाही लोक परी लाज देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२८८
📿 नाम न वदे ज्याची वाच
1288.
नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापाचा ॥१॥
हेचि ओळख तयाची । खूण जाणा अभक्तची ॥धृपद॥
ठावा नाही पांडुरंग । जाणा जातीचा तो मांग ॥२॥
ज्याची विठ्ठल नाही ठावा । त्याचा संग न करावा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२८८
📿 नामा म्हणे माते परिय
1288.
नामा म्हणे माते परियेसी वचन | गुज मी सांगन अंतरीचे ॥१॥
धरोनि माझी वृत्ति पाहे माझे सुख | मी सांगतो ते ऐक जननिये ॥२॥
कायावाचामने ममत्व माझ्या ठायी | ते तू ठेवी पाई विठोबाचे ॥३॥
मग हा कृपासिंधु न विसंबेल तुज | अनाथांची लाज हाचि राखे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२८९
📿 पतित मीराशी शरण आलो
1289.
पतित मीराशी शरण आलो तुज । राखे माझी लाज पांडुरंगा ॥१॥
तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥धृपद॥
द्रौपदी बहिणी वैरी गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥
प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार । माझा का विसर पांडुरंगा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 गोणाई व नामदेव यांचा संवाद›
📿 अभंग क्र. १२८९
📿 लाभाचितया लोभे मज म्
1289.
लाभाचितया लोभे मज म्हणसी आपुले | परी तेणसी तापले चित्त माझे ॥१॥
जन्म मरण दुःखे शिणलो यातायाती | ऐसी माझी खंती न विचारिसी ॥२॥
म्हणोनि विठोबाचा जालो शरणागत | तेणे माझे हित ऐसे केले ॥३॥
पुत्र कलत्र सकळ भजती हितालांगी | दु:खाचे विभागी नव्हती कोणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १२९०
📿 कस्तूरीचे रूप अति ही
1290.
कस्तूरीचे रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥
आणीक ही तैसी चंदनाची झाडे । परिमळे वाढे मोल तया ॥धृपद॥
काय रूपे असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणे ॥२॥
फिरंगी आटिता नये बारा रुके । गुणे मोले विके सहस्रवरी ॥३॥