🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७७३
📿 मी म्हणता अहंता होईल
773.
मी म्हणता अहंता होईल पूर्णता|भजन सर्वथा न घडे येणें॥१॥
आपुले आपण विचारावे धन|हरि हाचि पूर्ण भजे कारे॥२॥
हेंचि भजन थोर करी निरंतर|नाम हे सधर मने गिळी॥३॥
नामा म्हणे अपार नाम पारावार|श्रीराम सुंदर जप करी॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७७३
📿 नामेंचि पावले पैलपार
773.
नामेंचि पावले पैलपार । शुकादि साचार नामे जगी ॥१॥
ते नाम सोपे वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥
नामे पावले मोक्षपद गती । नाम हे विश्रांती सर्व जीवां ॥३॥
एका जनार्दनी नाम हे तारका । वेदाचा विवेक रामनाम ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७७४
📿 विषय खटपट आचार सांगस
774.
विषय खटपट आचार सांगसी|विठ्ठल न भजसी अरे मूढा|१|पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी|अंती हा निर्धारी तारील सत्य|२|न लगे सायास करणे उपवास|रामाचा विश्वास ऐसा धरी॥३॥
नामा म्हणे प्रेम धरी तू सप्रेम|विठ्ठल हाचि नेम दिननिशी॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७७५
📿 एकांत एकला सर्व आहे
775.
एकांत एकला सर्व आहे हरी|ऐसेंचि अहर्निशी ध्यायिजे तू|१|सर्वांभूती विठ्ठल आहे आहे साचे|हे तंव वेदींचे वचन जाण॥२॥
मार्ग हाचि सोपा गेले मुनिजन|जनी जनार्दन हाचि भावो॥३॥
नाही म्हणून म्हणे नाम मंत्र उच्चारण| सर्वही कारण होईल तुझें॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७७६
📿 भ्रमना पाउले वेचताती
776.
भ्रमना पाउले वेचतातीती वाव । प्रवेशाचा ठाव एका द्वारे ॥१॥
सार ती पाउले विठोबाची जीवी । कोणी न विसंभावी क्षणभरि ॥धृपद॥
सुलभ हे केले सकळा जीवन । फुंकावेचि कान न लगेसे ॥२॥
तुका म्हणे येथे सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७७७
📿 काही जाणो नये पांडुर
777.
काही जाणो नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहाने ॥१॥
भलतिया नावे आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥धृपद॥
अहंकार जातो गौरविता वाणी । सर्वगात्रा धणी हरीकथा ॥२॥
तुका म्हणे उपजे विल्हाळ आवडी । करावा तो घडीघडी लाहो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७७७
📿 रामनामी भाव न धरिती
777.
रामनामी भाव न धरिती कोणी । नाना मंत्र तंत्र घेती जनी ।
सकुडी कुंटणी वैकुंठासी नेली । अवचटे राम वदनी ॥१॥
रामनाम न मानिती जनी । सैर समाधि हरिकीर्तनी ॥धृ.॥
वारितां नाम प्रल्हाद स्मरे । त्याचे चुकविले नाना घात ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७७९
📿 एकतत्व हरी निर्धार त
779.
एकतत्व हरी निर्धार तू धरी|प्रपंच बोहरी एका नामें॥१॥
अच्युत गोविंद परमानंद छंद|नित्य तो आल्हाद हरिनामीं॥२॥
ऐसा तू विनटे हरी नामपाठें|जासील वैकुंठे नश्वरता॥३॥
नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचें|हेंचि धरी साचे येर वृथा॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७८०
📿 शरीर संपत्ती मायेचे
780.
शरीर संपत्ती मायेचे टवाळ|वायांची पाल्हाळ मिरवितोसी|१|
नाम हेंचि तारी विठ्ठल निर्धारी|म्हणे हरी हरी एकी हेळा॥२॥
स्मरता गोपाळनाम वंदील काळयम|न लगती नेम मंत्रबाधा॥३॥
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम|राम हेंचि नाम स्मरे का रे॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८०
📿 नाशिवंत सर्व एक नाम
780.
नाशिवंत सर्व एक नाम साचे । म्हणोनि वदा वाचे श्रीराम ॥१॥
शरीर नासे संपत्ति नासे । नाम न नासे श्रीरामाचे ॥२॥
आकार नसे निराकार नासे । नाम नासे श्रीरामाचे ॥३॥
स्थुळ नासे सुक्ष्म नासे । नाम न नासे श्रीरामांचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७८१
📿 ज्या ज्या आम्हापाशी
781.
ज्या ज्या आम्हापाशी होतील ज्या शक्ती । तेणे हा श्रीपती अळंकारू ॥१॥
अवघा पायापाशी दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥धृपद॥
ज्याचे देणे त्यासी घातला संकल्प । बंधनाचे पाप चुकविले ॥२॥
तुका म्हणे येथे उरला विठ्ठल । खाये बोल बोल गाये नाचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८१
📿 पापपुण्य दोन्ही समान
781.
पापपुण्य दोन्ही समानची गांठी । नाम जपा होटीं श्रीरामांचे ॥१॥
तुटेल बंधन खुटेल पतन । नाम ते पावन श्रीरामाचे ॥२॥
भोग रोग नासे कल्पना दूर देशे । श्रीराम मुखी वसे प्राणीयांसी ॥३॥
एका जनार्दनी नामींच विश्वास । ठेवितां निश्चयास दोष भंगे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८२
📿 रकारासी कान्हा मकारप
782.
रकारासी कान्हा मकारपुढती । स्मरतां होय मुक्ति सर्व जना ॥१॥
नारी अथवा नर हो का दुराचारी । वाचे म्हणतीं हरी सर्व मुक्त ॥२॥
सायास तो नाही अनायासें काम । वाचे रामनाम सदां गावें ॥३॥
एका जनार्दनी धरा हेतू मनी । श्रीराम वदनी उच्चारावा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७८३
📿 आइत्याची राशी । आली
783.
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशी ॥१॥
आता सोडोनि भोजन । भिके जावे वेडेपण ॥धृपद॥
उसंतिली वाट । मागे परतावे फुकट ॥२॥
तुका म्हणे वाणी । वेचो बैसोन ठाकणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७८३
📿 सार पै नाम विठ्ठलाचे
783.
सार पै नाम विठ्ठलाचे आहे|दिननिशी सोय मना लावी॥१॥
गुंपेजेल मन जोडती पाउले|तुटती घेतले मायाजाळ॥२॥
नामचि कारण जप पै सफळ|उद्धार निर्मळ सकळ जीवां॥३॥
नामा म्हणे तो हा विठ्ठल पंढरिये|नाम अमृतमय चराचरीं॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८३
📿 कायाक वाचीक मानसीक ।
783.
कायाक वाचीक मानसीक । सदां वसे राम एक ॥१॥
तो नर अथवा नारी । हो का पतीत दुराचारी ॥२॥
सदा वसे राम ध्यानीं । आणिक कांही नाही मनी ॥३॥
एका जनार्दनी जनी । राम पाहे मनी ध्यानीं ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७८४
📿 विठ्ठलनामी आळस न करी
784.
विठ्ठलनामी आळस न करी गव्हरा|वायांचि वेरझारा शिणतोसी|१॥
हरी उच्चारण करी हा विचार |नामचि साचार उद्धरण॥२॥
मी म्हणता अहंता वाढे हे सर्वथा|परी भजनापरता नाही मार्ग॥३॥
मायाजाळ विषय तोडी तोडी सांठा|विठ्ठलनाम पाठा वोळगे जना|४|
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८४
📿 नाम गोड श्रीरामांचे
784.
नाम गोड श्रीरामांचे । अमृत फिकें जाहले साचे ॥१॥
हो का उत्तम चांडळ । अधम खळांहुनी खळ ॥२॥
रामनाम वदता वाचे । पवित्रपणें तोचि साचे ॥३॥
एका जनार्दनी नाम । मुक्ति सायुज्य निष्काम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८५
📿 संसार तो गज । राम पं
785.
संसार तो गज । राम पंचानन सहज ॥१॥
शब्द ऐकता तातडी । रज जैसा सोडी ॥२॥
धाके पळे महाभूत । राम म्हणे नित्यानित्य ॥३॥
न लगे जप माळ । राम वदे सर्व काळ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७८७
📿 भोजन पा शांतीचे । उं
787.
भोजन पा शांतीचे । उंच निच उसाळी ॥१॥
जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥धृपद॥
कल्पना ते देवाविण । करी भिन्न इतरी ॥२॥
तुका म्हणे पावे भूती । ते निश्चिंती मापली ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७८७
📿 ज्याचे मुखी नाम तोचि
787.
ज्याचे मुखी नाम तोचि एक धन्य|त्याचे शुद्ध पुण्य इये जनीं॥१॥
नामसंकीर्तन नित्य नाम वाचे|दहन पापाचे एका नामें॥२॥
ऐसा जो अखंड जपे रामनाम|नाही तयासम दुजे कोणी॥३॥
नामा म्हणे नाम विठ्ठलाचे जपा|हाचि मार्ग सोपा परब्रह्मीं॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८७
📿 रामनामे तृप्त जे नर
787.
रामनामे तृप्त जे नर जाहले । पुनरावृत्ती न आले संसारासी ॥१॥
जाणार जाणार सर्व हे जाणार । रामनाम साचार जप करी ॥२॥
अभ्राची छाया मृगजळाचें जळ । तैसा हा देह केवळ मिथ्या असे ॥३॥
मिथ्याचें सत्य मनिती गव्हार । रामनामी विसर पडोनि ठेला ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७८८
📿 सकळ साधनांचे सार| रा
788.
सकळ साधनांचे सार| रामकृष्ण हा उच्चार॥१॥
म्हणा गोविंद नरहरी|सकळ जीवा तोचि तारी॥२॥
नाम घेता हरी माधव|तरताती सकळ जीव॥३॥
नामा म्हणे केशव वाचे|धन्य जीवित वैष्णवांचें॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७८८
📿 आयुष्य जाते मागुतें
788.
आयुष्य जाते मागुतें येते । रामनामे सरतें होय मुख ॥१॥
देह जाते मागुतें होते । रामनामे सरतें होय मुख ॥२॥
आकार जाते मागुतें होते । रामनामी सरतें होय मुख ॥३॥
एका एकपण नाही जाते । एका जनार्दनी सरतें होय मुख ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७८९
📿 गति अधोगति मनाची हे
789.
गति अधोगति मनाची हे युक्ति । मन लावी एकाती साधुसंगे ॥१॥
जतन करा जतन करा । धावते सैरा ओढाळ ते ॥धृपद॥
मान अपमान मनाचे लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥२॥
तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौऱ्यांशीचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७८९
📿 रामकृष्ण माळ घाली का
789.
रामकृष्ण माळ घाली का अढळ|तुटेल भवजाळ मायामोह॥१॥
होशील तू साधु न पवसी बाध|पूर्ण ब्रह्मानंद पावेल तुज॥२॥
जपता रामनाम पुरती सर्व काम|आदि अंती नेम साधेल तुज॥३|
नामा म्हणे कृतार्थ पूर्ण मनोरथ|न लगती ते अर्थ मायाफांसे॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७९०
📿 नको नको आळस करु । वा
790.
नको नको आळस करु । वाचे श्रीराम उच्चारु ।
तेणे सुफळ संसारु । होय जनीं जाणिजे ॥१॥
का रे न करिसी उच्चार । किती सांगु तुज विचार ।
न धरसी निर्धार । मनामाजीं पामरा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७९१
📿 द्वारकेचे केणे आले य
791.
द्वारकेचे केणे आले याचि ठाया । पुढे भक्तराया चोजवीत ॥१॥
गोविले विसारे माप केले खरे । न पाहे माघारे अद्यापवरी ॥धृपद॥
वैष्णव मापारी नाही जाली सळे । पुढे ही न कळे पार त्याचा ॥२॥
लाभ जाला त्यांनी धरिला तो विचार । आहिक्य परत्र साठविले ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ७९२
📿 सर्व जीव तू जालासी आ
792.
सर्व जीव तू जालासी आपण तरी निरय आपदा भोगिता हे कवण ।
परमात्मया तुमचे अविनाश स्वरूप तरी येवढे का कष्टसाधन ।
तू अंतरी परब्रह्म सावळे म्हणोनी जगत्रय व्यापिलेंया ध्याने ।
म्हणोनी तुमचा पुत्र जालो स्वामिया जगाधीन का केले माझे जिणे रया ॥१॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७९२
📿 तपाचे पै तप राम हे अ
792.
तपाचे पै तप राम हे अमूप|करी का रे जप रामनामीं॥१॥
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण|तुटेल बंधन यमपाश॥२॥
साधेल साधन होती कोटी यज्ञ|नाम जनार्दन जप करी॥३॥
नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी|म्हणे नरहरि एकभावें॥४॥