संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७९३
📿 विचार नाही नर खर तो
793.
विचार नाही नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणे त्यासी तोचि वरी । गुखाडीची चाड सरे तोचि बाहेरी ॥धृपद॥
सौभाग्यसंपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठ । छी करूनि सांडी पाया लागली ते विष्ठ ॥२॥
नाही याति कुळ फासे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७९३
📿 म्हणा श्रीराम जयराम|
793.
म्हणा श्रीराम जयराम| भवसिंधु तारक नाम॥१॥
नाम पतितपावन| नाम जीवांचे साधन॥२॥
नाम शिवाचे ध्यान| नाम नारदा गायन॥३॥
नामा म्हणे हरिचे नाम| नाम तारक परब्रह॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७९४
📿 देव होसी जरी आणिकाते
794.
देव होसी जरी आणिकाते करिसी । संदेह येविशी करणे न लगे ॥१॥
दुष्ट होती तरी अणिकाते करिसी । संदेह येविशी करणे न लगे ॥२॥
तुका म्हणे जे दर्पणी बिंबले । ते तया बाणले निश्चयेसी ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७९४
📿 सोपा हा सुगम उपावो प
794.
सोपा हा सुगम उपावो परीस|धरी तू विश्वास नाममहिमें॥१॥
नाम हेंचि गंगा नाम हेंचि भीमा|अंतरी श्रीरामा जपिजेसू॥२॥
अमृत सुरस रामनाम एक|वाचेचे वाचक मन करी॥३॥
नामा म्हणे सुरस सेवी सुधारस|ध्यार केशवास दिननिशीं॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ७९५
📿 सर्वगत निर्धारिता आत
795.
सर्वगत निर्धारिता आत्मा एक चराचरी तेथे तव नाही दुजेयाची परी ।
चारी खाणी चारी वाणी चौऱ्यांसी लक्ष जीव योनी मी अपत्य तुमचे अवधारी ।
तुझिये भेटीलागी रोडेलो दातारा हे तनु होतसे संकीर्ण भारी ।
जवळीच असता भेटी का नेदिसी थोर शिणविलो वोरबारी रया ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७९५
📿 कलिधर्म मागे सांगितल
795.
कलिधर्म मागे सांगितले संती । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
तेचि कळो आता येतसे प्रचिती । अधर्मा टेकती धर्म नव्हे ॥धृपद॥
तप व्रत करिता लागती सायास । पाळिता पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी का नव्हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७९५
📿 मुखें गावें नाम । ते
795.
मुखें गावें नाम । तेणे पुरें सर्व काम ॥१॥
सर्व साधनांचे सार । तेणे पावे पैलपार ॥२॥
नामे बहुत तारिले । महा दोषी उद्धरिले ॥३॥
रामनाम बहु श्रेष्ठ । घेता न लगती कष्ट ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ७९६
📿 आदि पुरुषा जय विश्वं
796.
आदि पुरुषा जय विश्वंभरिता नानापरी तुझा खेळू ।
जया ब्रह्मगोळु कल्पकोडी गडी मोडिता नलगे वेळु ।
वेदपुराणे मत्सरे भांडती बहुते करीत होती कोल्हाळु ।
होय नव्हे ऐसी भ्रांतीसी गुंतली तयासी तू आकळू गा ॥१॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७९६
📿 सदा सर्वकाळ नाम मुखी
796.
सदा सर्वकाळ नाम मुखी गाये । आणीक ते नये दुजा हेत ॥१॥
धन्य त्याची माय पावन ते कुळ । धन्य तो निर्मळ वंश त्याचा ॥२॥
जन्मजन्मांतरींचें सुकृत पदरी । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥३॥
एका जनार्दनी सदा जपे नाम । तो देह उत्तम इहलोकी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ७९७
📿 जळाचा जळबिंदु जळींच
797.
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे| तैसे हे विघरे पांचा ठायी ॥१॥
जिव शिव हे उच्चार नाम हे मधुर| जिव्हेसी उच्चार रामनाम ॥२॥
रामनाम त रक शिव षडाक्षरी|तैसी वाचा करी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम| मंत्र हा परम रामनाम॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ७९८
📿 देवा तुज नेणतांना का
798.
देवा तुज नेणतांना काही न सांभाळिता नानायाती धरूनी धाविन्नलो ।
धांवता धांवता पुढे सुनाट देखिले त्याची पाऊली मागुती मुरूडलो जी सुंदरा ॥१॥
आलो भक्तिशाळे अतौता तेथे कांहींएक गौरव गमले ।
जेणे वेषे आहे तेणे तुजजोगे नव्हे मग ऐसे काही एक गुंथावे केले जी सुंदरा ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७९८
📿 धन्य ते भाग्याचे । व
798.
धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामी नाचे ॥१॥
सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥
सदा नामी ज्याचे मन । जन नोहे जनार्दन ॥३॥
नामे रंगे ज्याची वाणी । एका जनार्दनी तोचि जनी ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ७९९
📿 तो आपुलिया चाडा कोटि
799.
तो आपुलिया चाडा कोटिगर्भवासा येता श्लाधिजे ।
तुझिया गोमटेपणा पकडलो दातारा हे बोलणे बोलता लाजिजे जी सुंदरा ॥१॥
तुमते देखिलिया हे मन मागुते मोहरेना ।
वज्र द्रवेपरी मन न द्रवे हाचि विस्मो पुढत पुढती जी सुंदरा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ७९९
📿 काय कीर्ती करू लोक द
799.
काय कीर्ती करू लोक दंभ मान । दाखवी चरण तुझे मज ॥१॥
मज आता ऐसे नको करू देवा । तुझा दास जावा वाया विण ॥धृपद॥
होईल थोरपणे जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायी ॥२॥
अंतरीचा भाव काय कळे लोका । एक मानी एका देखोवेखी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ७९९
📿 राम राम ध्वनी जयाचे
799.
राम राम ध्वनी जयाचे मुखासी । धन्य पुण्यराशी पावन झाला ॥१॥
सदोदित नाम जपे श्रीरामाचे । अनंता जन्माचें दोष जाती ॥२॥
राम राम वदे सादा सर्वकाळं । काळाचा तो काळ रामनामे ॥३॥
राम वदे ध्यानीं राम वदे मनी । एका जनार्दनी राम वदे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८००
📿 मानावया जग व्हावी द्
800.
मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाही हे माझिया जीवा चाड ॥१॥
तुझ्या पायासाठी केली आराणूक । आता काही एक नको दुजे ॥धृपद॥
करूनिया कृपा करी अंगीकार । न लवी उशीर आता देवा ॥२॥
नव्हे साच काही कळो आले मना । म्हणोनि वासना आवरीली ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ८०१
📿 म्हणोनी तुझे रूप देख
801.
म्हणोनी तुझे रूप देखिलिया दिठी ।
जय सच्चिदानंद पदेसी मिठी ।
ओंकारेंसी त्रिपुटी न साहे तो तू सगुण जगजेठी ।
या दृष्टीचेनी सुखे माये हृदयी भासले रूप ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०१
📿 आता माझा सर्वभावे हा
801.
आता माझा सर्वभावे हा निर्धार । न करी विचार आणिकासी ॥१॥
सर्वभावे नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥धृपद॥
लोटांगण तुझ्या घालीन अंगणी । पाहीन भरोनि डोळे मुख ॥२॥
निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणी । येऊ नेदी मनी शंका काही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८०१
📿 प़ाडुरंगे प्राप्त हो
801.
प़ाडुरंगे प्राप्त होईल सकळ|चरणकमळ ध्यारे मनीं॥१॥
मनी मानसिक न करावा कधीं|नाम घ्यारे आधी केशवाचें॥२॥
केशवाचे नाम पावन पवित्र|महाभाष्यसूत्र हेंचि स़ागे॥३॥
नामा म्हणे तुम्ही करावे कीर्तन|पंढरीचे ध्यान चुको नका॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०२
📿 जनी जनार्दन ऐकतो हे
802.
जनी जनार्दन ऐकतो हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा ॥१॥
जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखे ॥धृपद॥
पापपुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे । ही कोणा कारणे कवणे केली ॥२॥
आम्हा मरण नाश तू तव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानू ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड›📂 , देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०›
📿 अभंग क्र. ८०३
📿 डोळ्याची निशी कोणे क
803.
डोळ्याची निशी कोणे काढिली ।
की रविबिंबा हारी कोणे आणिली ॥
की काळिमा पाठी प्रकाश तरी चंद्र हा नव्हे चकोरा पारणे ।
फिटले विकासित कमोदिनी चंद्र हा न दिसे सेखी नवलावो हे तुझी बोली रया ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०३
📿 यथार्थवाद सांडूनि उप
803.
यथार्थवाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरिता सांगे कुठोऱ्याचे नांव । दोघाचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणी निवाड । माझी हे बडबड नव्हे काही ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८०३
📿 माया पुरातनु तू़ंचि
803.
माया पुरातनु तू़ंचि वो जननी|नाम संजीवनी विठ्ठल वो॥१॥
त़ेचि हे वोळले पूर्ण प्रेम आम्हां|लोलंगित ब्रह्मा पंढरीये॥२॥
धांव पाव वेगी येई संभाळी तू|नाम हा संकेतु पांडुरंगे॥३॥
क्षुधा तृषा आशा तुजलागी चिंतिती|जीवन हे मागुती नाम तुझें॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०४
📿 धीर तो कारण । साह्य
804.
धीर तो कारण । साह्य होतो नारायण । नेदी होऊ सीण । वाहो चिंता दासांसी ॥१॥
सुखे करावे कीर्तन । हर्षे गावे हरीचे गुण । वारी सुदर्शन । आपणचि कळिकाळा ॥धृपद॥
जीव वेची माता । बाळा जडभारी होता । तो तो नव्हे दाता । प्राकृता या सारिखा ॥२॥
हे तो माझ्या अनुभवे । अनुभवा आले जीवे । तुका म्हणे सत्य व्हावे । आहाच नये कारण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०५
📿 पुढे आता कैचा जन्म ।
805.
पुढे आता कैचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥१॥
सर्वथाही फिरो नये । ऐसी सोय लागलिया ॥धृपद॥
पांडुरंगा ऐसी नांव । तारू भाव असता ॥२॥
तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८०५
📿 रामनाम मुखी गाय । यम
805.
रामनाम मुखी गाय । यम त्यांचेंवंदी पाय ॥१॥
ऐसा नामाचा महिमा । सरी न पावेचि ब्रह्मा ॥२॥
उत्तमाउत्तम नाम । सर्व सुखासी विश्राम ॥३॥
एका जनार्दनी नाम । भवसिंधु तारक धाम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८०६
📿 या रे नाचु प्रेमानंद
806.
या रे नाचु प्रेमानंदे । रामनामचेनि छंदें ॥१॥
म्हणा जयरामा श्रीराम । भवसिंधु तारक नाम ॥२॥
ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥
आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०७
📿 वीर विठ्ठलाचे गाढे ।
807.
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पाया पडे ॥१॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषाचे डोंगर ॥धृपद॥
क्षमा दया शांति । बाण अभंग हे हाती ॥२॥
तुका म्हणे बळी । तेचि एक भू मंडळी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८०७
📿 पाहता यॆ परिपाटी आणि
807.
पाहता यॆ परिपाटी आणिक नाही सृष्टी | नामॆंविण दृष्टी न दिसॆ माझ्या ॥१॥
नमचि समर्थ नामचि मथित | शंकरासी हॆत रामनामी ॥२॥
भरती सर्व काम वाचॆ रामनाम | न लगती तॆ नॆम कर्मजाळ ॥३॥
नामा म्हणॆ उच्चार न करी तू विचार | तुटॆल यॆरझार नाना यॊनी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८०८
📿 साधन साधिता होताती आ
808.
साधन साधिता होताती आपदा|म्हणोनि गोविंदा स्मरे का रे॥१॥
कृष्णकथा सार सांगे का सधर|तुटेल येरझार जन्ममरणा॥२॥
निष्फळ निखळ भावी तू सफळ|भजन केवळ सर्वांभूती॥३॥
नामा म्हणे भक्ति होईल विरक्ति|तुटेल यातायाती जन्ममरण॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८०८
📿 नाही सायासाचें काम ।
808.
नाही सायासाचें काम । वाचे वदा रामनाम ॥१॥
बहु कर्मा सोडवण । वाचेसि न घडे मौन ॥२॥
राम चिंता ध्यानीं मनी । कळिकाळ वाहे पाणी ॥३॥
एका जनार्दनी राम । वाचे उच्चारा निष्काम ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८०९
📿 न करी तळमळ राहे रे न
809.
न करी तळमळ राहे रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥१॥
अविनाश सुख देईल निर्वाणी । चुकतील खाणी चौऱ्यांशीच्या ॥धृपद॥
आणिकिया जीवा होईल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥२॥
आहिक्य परत्री होसील सरता । वाचे उच्चारीता रामराम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८१०
📿 का रे दास होसी संसार
810.
का रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥१॥
मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरी । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥धृपद॥
आणीक ही भोग आणिका इंद्रियांचे । नाही ऐसे साचे जवळी काही ॥२॥
रूप दृष्टि धाय पाहाता पाहाता । न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८१०
📿 भवसिंधुचा पार तरावया
810.
भवसिंधुचा पार तरावयालागी । साधन कलियुगी आणिक नाही ॥१॥
अहनिंशी नाम जपा श्रीरामाचे । सकळ धर्माचे मुगुटमणी ॥२॥
न चले वर्णाश्रम धर्म आचरण । न घडे व्रत दान तप कोणा ॥३॥
नव्हे तीर्थाटन पुराण श्रवण । नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८१०
📿 कलीमाजी सोपे घेता रा
810.
कलीमाजी सोपे घेता रामनाम । नाही कांही श्रम जपतप ॥१॥
न लगे साधन पंचाग्री धुम्रपान । नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥
योगयाग यज्ञ न लगे वेरझारा । नाममंत्र पुरा जप आधी ॥३॥
एका जनार्दनी निश्चयो नामाचा । तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८११
📿 बैसोनि निश्चळ करी त्
811.
बैसोनि निश्चळ करी त्याचे ध्यान । देईल तो अन्न वस्त्रदाता ॥१॥
काय आम्हा करणे अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥धृपद॥
दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागता लळा राखो जाणे ॥२॥
न लगे सांगणे मागणे तयासी । जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८११
📿 तुटे मायाजाळ विघडे भ
811.
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा ॥१॥
येर कर्मधर्म करिता या कली । माजी कोण बळी तरला सांगा ॥२॥
न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥३॥
नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८११
📿 कलियुगीं नाम सोपे ते
811.
कलियुगीं नाम सोपे ते सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची ॥१॥
वाल्मिक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राममंत्र ॥२॥
पुराणकर्ता तो व्यास मुगुटमणी । म्हणे रामकृष्ण वदनी सोपा मंत्र ॥३॥
बहुतांच्या मते एका जनार्दनी । रामनाम वाणी गाय सदा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ८१२
📿 सोनियांचा कळस । माजी
812.
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥
काय करावे प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥धृपद॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥२॥
तुका म्हणे हित । ते मज सांगावे त्वरित ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 नाम महिमा›
📿 अभंग क्र. ८१२
📿 पंढरीचा राजा उभा भक्
812.
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारुनि भुजा वाट पाहे ॥१॥
घ्यारे नाम सुखे प्रेमे अलौकिक । साधने आणिक करु नका ॥२॥
मनाचेनि मने ह्रदयी मज धरा । वाचेने उच्चारा नाम माझे ॥३॥
बोलोनिया ऐसा उभा भीमातीरी । नामा निरंतरी चरनापाशी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०›
📿 अभंग क्र. ८१२
📿 नाम मुखी सदा वाचे ।
812.
नाम मुखी सदा वाचे । कांपती कळीकाळ साचे ॥१॥
दो अक्षरीं रामनाम । जपतां पावसी मोक्षधाम ॥२॥
नामावांचूनि परिपाठी । साधन नाही नाही नेहटीं ॥३॥
नाममंत्र श्रेष्ठ सार । जड जिवांसी उद्धार ॥४॥