ज्याते ध्यानी ध्याती
2245.
ज्याते ध्यानी ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागी ॥१॥
तया रामासी विन्मुख होणे । जळो जिणे लाजिरवाणे ॥२॥
व्रते तपे ज्या साधिती । तो मज नित्य ध्यातो चित्ती ॥३॥
जो अगम्य वेद पुराणा । तो मज येतो समरंगणा ॥४॥
नामया स्वामीच्या दर्शने । मग कैंचि भवबंधने ॥५॥
