संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९७३
📿 कृपेचे उत्तरे देवाचा
973.
कृपेचे उत्तरे देवाचा प्रसाद । आनंदी आनंद वाढवावा ॥१॥
बहुतांच्या भाग्ये लागले जाहाज । येथे आता काज लवलाहो ॥धृपद॥
अलभ्य ते आले दारावरी फुका । येथे आता चुका न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे जिव्हा श्रवणाच्या द्वारे । माप भरा बरे सिगेवरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७३
📿 सदाशिव अक्षरे चार ।
973.
सदाशिव अक्षरे चार । जो जपे निरंतर ॥१॥
तया न बाधी संसार । वाचे वदता हरहर ॥२॥
ऐसे शिवाचे महिमान । उच्चारिता नोहे पतन ॥३॥
एका जनार्दनी शिव । वाचे वदता निरसे भेव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९७५
📿 वचना फिरती अधम जन ।
975.
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥
केला असता अंगीकार । न मनी भार समर्थ ॥धृपद॥
संसाराचा नाही पाग । देवे सांग सकळ ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाणू । मध्ये नाणू संकल्प ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७५
📿 सकळांमध्यें श्रेष्ठ
975.
सकळांमध्यें श्रेष्ठ । शिवनाम जे वरिष्ठ ॥१॥
आवडीनें नाम जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥२॥
ऐसा भक्तांचा अंकित । स्मरतांचि मोक्ष देत ॥३॥
एका जनार्दनी उदार । देणे त्रिभुवनी साचार ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७६
📿 पाहोनिया भक्तनाथा ।
976.
पाहोनिया भक्तनाथा । स्वये दे आपुली कांता ॥१॥
देता न पाहे मागेंपुढें । उदार त्रिभुवन थोकडें ॥२॥
देणे जयाचे अचाट । म्हणोनि नाम नीलकंठ ॥३॥
एका जनार्दनी भोळा । पाळों जाणे भक्तलळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७७
📿 उत्तम अथवा चांडाळ ।
977.
उत्तम अथवा चांडाळ । न पाहेचि खळाखळ ॥१॥
शरण आलिया तत्त्वता । तया नुपेक्षी सर्वथा ॥२॥
न म्हणे शुचि अथवा चांडाळ । स्मरणेंचि मुक्तिफळ ॥३॥
ऐसा पतीत पावन । शरण एका जनार्दन ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७८
📿 अनाथाचा नाथ पतीतपावन
978.
अनाथाचा नाथ पतीतपावन । हे नामभिदान तया साजे ॥१॥
भाळी अर्धचंद्र जटाजुट गंगा । दरुशने पापें जाती ॥२॥
एका जनार्दनी नाम जपा होटीं । पातकें नाशाकोटी हेळामात्रें ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९७९
📿 आपुल्या महिमाने । धा
979.
आपुल्या महिमाने । धातु परिसे केले सोने ॥१॥
तैसे न मनी माझे आता । गुणदोष पंढरिनाथा ॥धृपद॥
गावामागील वोहोळ । गंगा न मनी अमंगळ ॥२॥
तुका म्हणे माती । केली कस्तुरीने सरती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९७९
📿 त्रिभुवनी उदार । भोळ
979.
त्रिभुवनी उदार । भोळा राजा श्रीशंकर ॥१॥
जे चिंती जया वासना । पुरवणे त्याची क्षणा ॥२॥
यातीं कुळ न पाहे कांही । वास कैलासीं त्या देई ॥३॥
एका जनार्दनी सोपे । शिवनाम पवित्र जपे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा›
📿 अभंग क्र. ९८०
📿 सनकादिकी मंत्रघोष |
980.
सनकादिकी मंत्रघोष | केले विधिपूर्वक पांच दिवस |मग पांडुरंग यथावकाश | भक्ता वास महिवरी ॥१॥
धन्यभूमि आळंकापुरी | ज्ञान समाधि खेचरी |पूर्ण परिपूर्ण श्रीहरी | स्वये आपण उभा असे ॥२॥
ध्रु.॥संत भागवत देव्हडे | अमर उभे चहुंकडे |नारद तुंबर पुढे | वीणा वाजविती ॥३॥
एकी केला जयजयकार | ज्ञानदेवी धरूनिया कर |विठ्ठल चरणा समोर | निकट बैसते जाले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८०
📿 सत्यसत्य ब्रीदावळी ।
980.
सत्यसत्य ब्रीदावळी । नाम उत्तम हे कलीं ॥१॥
जपतां चार अक्षरे । मुक्ति जगासी निर्धारे ॥२॥
नामे सर्वांवरी सत्ता । ऐसे वदे पै गीता ॥३॥
ते नाम जपा पावन । शरण एका जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९८१
📿 ब्रम्हचारी धर्म घोका
981.
ब्रम्हचारी धर्म घोकावे अक्षर । आश्रमी विचार षटकर्मे ॥१॥
वानप्रस्थ तरी संयोगी वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥धृपद॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथे याती धर्म कुळ नाही ॥२॥
बोले वर्म जो चाले या विरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा›
📿 अभंग क्र. ९८१
📿 स्नानविधी केलिया भक्
981.
स्नानविधी केलिया भक्ती | नाममंत्राचिया आव्रुति |मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति | विठोबाची ॥१॥
धन्य धन्य तो देव ज्ञान | राजा निव्रुत्ति निधान |विठोजी आपण | भक्ता साह्ये ॥२॥
मग सकळहि भक्तमेळी | सहित वनमाळी |बैसले तये पाळी | इंद्रायणीचे ॥३॥
एकी केले स्तुतिस्तोत्रे | एक जपताती नाममंत्रे |एक गाताती वेदस्तोत्रे | विठोबासी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८१
📿 नाम उत्तम पावन । शिव
981.
नाम उत्तम पावन । शिव शिव वरिष्ठ जाण ॥१॥
ऐसा पुराणीं महिमा । न कळे वेदशास्त्रा सीमा ॥२॥
जयासाठी वेवादती । तो शिव स्वयं ज्योती ॥३॥
रुपा अरुपावेगळा । एका जनार्दनी पाहे डोळा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८३
📿 देखोनिया हरलिंग । जो
983.
देखोनिया हरलिंग । जो न करी तया साष्टांग ॥१॥
मुख्य तोचि वैरी । स्वमुखें म्हणतसे हरी ॥२॥
व्रत न करी शिवरात्र । कासयानें होती पवित्र ॥३॥
ऐशियासी यमपुरी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९८४
📿 याचि नावे दोष । राहे
984.
याचि नावे दोष । राहे अंतरी किल्मिष ॥१॥
मना अंगी पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥धृपद॥
बिजाऐसी फळे । उत्तम का अमंगळे ॥२॥
तुका म्हणे चित्त । शुद्ध करावे हे हित ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा›
📿 अभंग क्र. ९८४
📿 देव म्हणे नामया | ऐक
984.
देव म्हणे नामया | ऐके येथे चित्त देउनिया | एक एक तीर्थ सांगावया | हे तो पुराणी असे॥१॥
ध्रु.॥नकळे देवाची थोरी | कैसे पुढारिले मुरारी | गौप्यगुज श्रीहरी | सांगतसे नामया | पुराण म्हणसी कोण कथा | तरी ऐके गा तू सकळार्था | शैवशास्र हा ग्रंथ सर्वथा | सिद्धमार्ग असे ॥३॥
जे जे जुनाट क्षेत्रतीर्थ | जे जे ब्रह्मनामे परमार्थ |तो तो सांगितला हेत |चतुरानने ॥४॥
ऐसे देवमुखीचे वचन | ऐकता संतोषले पूर्ण |मग देताति आलिंगन | येकमेकांसी ॥५॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 ज्ञानकांड रुपके›📂 , कूट अभंग ९७१ ते ९९०›
📿 अभंग क्र. ९८५
📿 माते आधि कन्या जन्म
985.
माते आधि कन्या जन्म पावली तिच्या वऱ्हाडा आईति केली ।
पाहो गेलो तये चरण ना नेत्र संपूर्ण लक्षणे वोळखिली ।
नवरा गर्भवासी पहिले नामरसी घटित आहे दोघांसी ।
याचा अर्थ तुम्ही करा श्रोते हो लग्नेंविण आणिली घरासी रेरे ॥१॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९८५
📿 कुशळ वक्ता नव्हे जाण
985.
कुशळ वक्ता नव्हे जाणीव तो श्रोता । राहे भाव चित्ता धरोनिया ॥१॥
धन्य तो जगी धन्य तो जगी । ब्रम्ह तया अंगी वसतसे ॥धृपद॥
न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळी रामराम ॥२॥
जप तप ध्यान नेणे योग युक्ती । कृपाळु जो भूती दयावंत ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८५
📿 सकळ देवांचा जनिता ।
985.
सकळ देवांचा जनिता । त्रिगुण सत्ता चाळविता ॥१॥
शरण जाता ज्याच्या पाया । सर्व हारपली माया ॥२॥
भेदाभेद निवारिले । सर्व स्वरुप कोंदले ॥३॥
एका जनार्दनी शिवे । जीवपणा मुकलों जीवे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८६
📿 शिवनाम उच्चारी । आळस
986.
शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेता ॥१॥
शिव शिव नाम । जपे का रे उत्तम । तेणे नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥
दो अक्षरीं काम । वाचे घेई तू नाम । आणीक ते वर्म । सोपे नाही ॥३॥
एका जनार्दनी । शिव जप ध्यानीं मनी । वेद शास्त्र पुराणी । बोलियेलें ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८७
📿 शिव शिव अक्षरे दोन ।
987.
शिव शिव अक्षरे दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥
धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥
सदोदित वाचे । जपे शिव शिव साचे ॥३॥
एका जनार्दनी शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९८८
📿 ॐ नमोजी शिवा । नमो त
988.
ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥ सोपा मंत्र रामनाम । तेणे झाले सर्व काम । साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥ बैसनियां दृढासनीं । नाम जपे निशिदीनीं । तयासी अवनी । सोपी दिसे ॥३॥ बरवे साधन उत्तम । अवघा निवारिला श्रम । गाता तुमचे नाम । वंद्य तिहे लोकी ॥४॥ जड जीव उद्धरिले । कलिमाजीं सोपे केले । रामराम जप वहिले । थोर साधन हे ॥५॥ अवतार धरुनी साचा । उद्धार केला जड जीवांचा । एका जनार्दनी नामाचा । वाढविला महिमा ॥६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९८९
📿 काय माझे नेती वाईट म
989.
काय माझे नेती वाईट म्हणोन । करू समाधान काशासाठी ॥१॥
काय मज लोक नेतील परलोका । जाता कोणा एक निवारील ॥धृपद॥
न म्हणे कोणासी उत्तम वाईट । सुखे माझी कूट खावो मागे ॥२॥
सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझे जगासवे काज ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा›
📿 अभंग क्र. ९८९
📿 देवो म्हणती रुक्मिणी
989.
देवो म्हणती रुक्मिणी | हा येचि युगी देखिला नयनी | हेंचि ज्ञानसंजीवनी | जाण त्रैलोक्यासी ॥१॥
धन्य धन्य धरातळी | जो याते दृष्टी न्याहाळी | तो वात येईल टाळी | वैकुंठ भुवनासी ॥२॥
जो करील याची यात्रा | तो तारील सकळ गोत्रा | सकळही कुळ पवित्रा |याचेंनि दरुषणे होती ॥३॥
आळंकापुरी हे शिवपीठ | पूर्वी येथे होते नीळकंठ | ब्रह्मादिकी तप वरिष्ठ |येथेंचि पै केले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७›
📿 अभंग क्र. ९८९
📿 हरिहर ऐक्य - अभंग ९८
989.
हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥ एका नित्य वास स्मशानी । एका क्षीरनिधी शयनी ॥२॥ एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥ एका रुंडमाळा कंठी शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥ एका जनार्दनी सारखे । पाहता आन न दिसे पारखें ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९९०
📿 काळाचिया सत्ता ते ना
990.
काळाचिया सत्ता ते नाही घटिका । पंढरीनायका आठविता ॥१॥
सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आज्ञा नाही ॥धृपद॥
याकारणे माझ्या विठोबाची कीर्ती । आहे हे त्रिजगती थोर वाट ॥२॥
तुका म्हणे जन्मा आलियाचे फळ । स्मरावा गोपाळ तेचि खरे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा›
📿 अभंग क्र. ९९०
📿 तंव पुस्ती होय माता
990.
तंव पुस्ती होय माता | तुम्ही झणे खेद करा चित्ता |तरी ज्ञानासारिखा का आता |समाधीसी बैसविता ॥१॥
हे सांगावे सविस्तर | याचे कोण कोण अवतार | बंधु त्रिवर्ग हे साचार |आणि ते भगिनी ॥२॥
देव म्हणती ब्रह्मा होय | सोपान देव नेणसी काय |निव्रुत्ति शिव ज्योतिर्मय |ज्ञानदेव ब्रह्म निघोंट ॥३॥
ऐसे ब्रह्मा विष्णु हर | मुक्ताई ते मूळमाता साचार | तारावया चराचर | कलिमाजी अवतरले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७›
📿 अभंग क्र. ९९०
📿 एक बाळ ब्रह्माचारी ।
990.
एक बाळ ब्रह्माचारी । एक उदास निर्विकारी ॥१॥ एका शोभेंपाशुपत । एका सुदर्शन झळकत ॥२॥ एका करी पद्मगदा । एकपरशु वाहे सदा ॥३॥ ऐसे परस्परे ते दोघे । शोभताती ब्रह्मानंदे ॥४॥ एका जनार्दनी ध्याऊं । तया चरणी लीन होऊं ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७›
📿 अभंग क्र. ९९१
📿 एका जटा मस्तकी शोभती
991.
एका जटा मस्तकी शोभती । एका कीरीट कुंडले तळपती ॥१॥ एका अर्धांगी कमळा । एका विराजे हिमबाळा ॥२॥ एका गजचर्म आसन । एक हृदयींश्रीवत्सलांछन ॥३॥ एका जटा जुट गंगा । एका शोभे लक्ष्मी पै गा ॥४॥ एका जनार्दनी दोघे । तया पदी नमन माझे ॥५॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७›
📿 अभंग क्र. ९९२
📿 एका शोभे कौपीन । एका
992.
एका शोभे कौपीन । एका पीतांबर परिधान ॥१॥ एका कंठी वैजयंती । एका रुद्राक्ष शोभती ॥२॥ एका उदास वृत्ति सदा । एका भक्तापांशीं तिष्ठे सदा ॥३॥ एका एका ध्यान करिती । एक एकातें चिंतिती ॥४॥
एका जनार्दनी हरिहर । तया चरणी मज थार ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९९३
📿 जैसी तैसी तरी । शरणा
993.
जैसी तैसी तरी । शरणागते तुझी हरी ॥१॥
आता न पाहिजे केले । ब्रीद लटिके आपुले ॥धृपद॥
शुद्ध नाही चित्त । परी म्हणवितो भक्त ॥२॥
मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझे तुका ॥३॥