🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६८
📿 परम सुखाचा सुकाळ ।
1468.
परम सुखाचा सुकाळ ।
चित्ती वसे सर्वही काळ ॥१॥
ऐसे केले कृपादान ।
तुम्ही मनाते मोहुन ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४६९
📿 आधींच मी लटिका वरी ल
1469.
आधींच मी लटिका वरी लटिकी तुझी माया | ऐसे हे कासया पाहसी देवा ॥१॥
जाणता नेणता नाम तुझे देवा | गाईन केशवा आवडीने ॥२॥
विषयी आसक्त भ्रांत माझे मन कैसे तुझे भजन घडेल मज ॥३॥
नामा म्हणे आता जाणसी ते करी | पतितपावन हरि नाम तुझे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४६९
📿 पूर्ण केला पूर्ण केल
1469.
पूर्ण केला पूर्ण केला ।
पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले ।
घरा आले कृपाळू ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७०
📿 जीवन उपाय । वैदेवाणी
1470.
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥
ते मी नाठवी घडिघडी । म्हणोनिया चरफडी ॥धृपद॥
तुटे भवरोग । जेथे सर्व सुख भोग ॥२॥
तुका म्हणे विटे । धरियेले जे गोमटे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४७०
📿 लटिका तरी गाईन तुझें
1470.
लटिका तरी गाईन तुझेंचि नाम | लटिके तरी प्रेम आणीन तुझे ॥१॥
सहजचि लटिके असे माझे ठायी | तुझिया पालट नाही साचपण ॥२॥
लटिके तरी हरी करी तुझे ध्यान | लटिके माझे मन तुजचि चिती ॥३॥
लटिके तरी बैसे संतांचे संगती | दृढ धरीन चित्ती नाम तुझे ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७०
📿 पूर्वार्जित होते पुण
1470.
पूर्वार्जित होते पुण्य ।
तेणे हे चरण आतुडलो ॥१॥
आता सुखा नाही उणे ।
इहलोकी भोगणे परत्रींचे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७१
📿 ऐका हे वचन माझे संतज
1471.
ऐका हे वचन माझे संतजन । विनवितो जोडुन कर तुम्हा ॥१॥
तर्क करूनिया आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥धृपद॥
आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझे त्याचे गुंतलेंसे पायी । म्हणऊनि काही नावडे त्या ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७१
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७२
📿 ऐसा कोणी नाही हे जया
1472.
ऐसा कोणी नाही हे जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेते रोगी कवणिया सुखे । हरावया दुःखे व्याधि पीडा ॥धृपद॥
काय पळे सुखे चोर लागे पाठी । न घालावी काठी आड तया ॥२॥
जयाचे कारण तोचि जाणे करू । नये कोणा वारू आणिकासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४७२
📿 नित्य हरिकथा वैष्णव
1472.
नित्य हरिकथा वैष्णव सांगात । तोचि परमार्थ शुद्ध त्याचा ॥१॥
नाही कधी द्वैत सदा ते अद्वैत । अभेदरहित सर्वकाळक ॥२॥
परमार्थसाधनीं झिजवितसें अंग । वाउगा उद्योग न करी कांही ॥३॥
एका जनार्दनी ऐसा ज्याचा हेत । त्याचे मनोरथ पूर्ण होती ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७२
📿 बोलिले शब्द निश्चयाच
1472.
बोलिले शब्द निश्चयाचे ।
प्रतीति साचे आले ते ॥१॥
माझा मजचि परिचय झाला ।
संती दाविला हितार्थ ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७३
📿 भाग्याची उजरी ।
1473.
भाग्याची उजरी ।
दिसे यावरी वोडवली ॥१॥
म्हणोनिया कृपावंत ।
झाले संत मायबाप ॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७४
📿 भाग्य माझे उभे ठेले
1474.
भाग्य माझे उभे ठेले ।
संती दाविले निधान ॥१॥
आता उणे कोठे काही ।
न पडे ठायी भरलेंसे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७५
📿 जरा कर्णमूळी सांगो आ
1475.
जरा कर्णमूळी सांगो आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥
आता माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥धृपद॥
शेवटील घडी बुडता न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥
तुका म्हणे चिंती कुळीची देवता । वारावा भोवता शब्द मिथ्या ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७५
📿 भोळा देव ।
1475.
भोळा देव ।
दाखविला आम्हा केला सन्मुख ॥१॥
पंढरिये विटेवरी ।
उभा व्दारी पुंडलिका ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७६
📿 मागील ते आटी येणे घड
1476.
मागील ते आटी येणे घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रे ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥धृपद॥
आवश्यक तेथे आगळा आदर । चाली थोडे फार संपादते ॥२॥
तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हाता आल्या ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४७६
📿 गाजी परमानंदु मानसी
1476.
गाजी परमानंदु मानसी । संत भेटतां सुखराशी । कीर्तने तारिले सर्वांसी । विठ्ठल नामस्मरणें ॥१॥
धन्य धन्य विठ्ठल मंत्र । सोपा तीन अक्षरीं पवित्र । काळिकाळ उघडोनि नेत्र । पाहू न शके जयासी ॥२॥
एका जनार्दनी उघडोनि नेत्र । पाहुं न कीर्तने प्राप्त सर्व स्थिती । जयजय रामकृष्ण म्हणती । ते तरती कालीमाजीं ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७६
📿 मज तो सांभाळिले संती
1476.
मज तो सांभाळिले संती ।
धरिले हाती दीन म्हणुनी ॥१॥
सांगता नये विश्वास लोका ।
बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७७
📿 साधावा तो देव सर्वस्
1477.
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥
मग कासयाने पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥धृपद॥
जिणे दिल्हे त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावे ॥२॥
तुका म्हणे निज भोगईल निजता । नाही होईल सत्ता दुजियाची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४७७
📿 नित्य नवा कीर्तनी कै
1477.
नित्य नवा कीर्तनी कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वये जाला श्रीरंग ॥१॥
आल्हादे वैष्णव करती नामाचा घोष । हरिनाम गर्जता गगनी न माये हरुष ॥२॥
पदोपदी कीर्तनी निवताहे जन मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन ॥३॥
एका जनार्दनी गाता हरीचें नाम । निमाली इंद्रियें विषय विसरली काम ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७७
📿 मायबाप उत्तीर्ण होणे
1477.
मायबाप उत्तीर्ण होणे ।
न घडे देणे अपत्या ॥१॥
जरी लक्ष जोडी दिली ।
॥२॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७८
📿 मी तो संतांचे पोसणे
1478.
मी तो संतांचे पोसणे ।
देती समयी तेचि खाणे ॥१॥
अवघी चुकली जाचणी ।
उण्यापुयाची सोसणी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४७९
📿 संतांसी क्षोभवी कोण्
1479.
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारे । त्याचे नव्हे बरे उभयलोकी ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥धृपद॥
संतांपाशी ज्याचा नुरेचि विश्वास । त्याचे जाले दोष बळीवंत ॥२॥
तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगे । किंवा धावे लागे विषमे मारू ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४७९
📿 मी ज्या बोलिलो निगुत
1479.
मी ज्या बोलिलो निगुती ।
संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥
येरवी हे काय जाणे ।
प्रसादाचे करणे त्यांचिया ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८०
📿 उद्धवा तू धर संतसमाग
1480.
उद्धवा तू धर संतसमागम । तेणे भवश्रम हरे उद्धवा ॥१॥
सांगासे गुज मना धरीरे उद्धवा । आणिक श्रम वाया न करी रे ते ॥२॥
तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया वाचा ॥३॥
मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तू सर्वभावे सदगद नाम घेई ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४८०
📿 लेवविले अळंकार केले
1480.
लेवविले अळंकार केले थोर वाढवुनी ॥१॥
आपुली दृष्टी निवविता ।
मी तो नेणता लळेवाड ॥२॥
गोड घास मुखी भरा ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८१
📿 घालुनि आसन साधिला पव
1481.
घालुनि आसन साधिला पवन | घेतले जीवन अंतरिक्षी ॥१॥
परहस्ते तृप्ति नव्हे जी दातारा | कृपा करुणा करा केशिराजा ॥२॥
जीवाचे जीवन तू सर्वाचे कारण | धांव मजलागुन केशिराजा ॥३॥
अनाथाचा नाथ है ब्रीद साचार | झणे माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४८१
📿 होते तैसे पांई केले
1481.
होते तैसे पांई केले निवेदन ।
अंतरलो दीन बहुत होतो ॥१॥
संबोखून केले समाधान चित्ता ।
वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८२
📿 ज्याचिया रे मने देखि
1482.
ज्याचिया रे मने देखियेले तुज | त्याची लोकलाज मावळली ॥१॥
नाही तया क्रिया नाही तया कर्म | नाही वर्णाश्रम सुखदुःख ॥२॥
नाही देह स्फूर्ति जाती कुळ भेद | अखंड आनंद ऐक्यतेचा ॥३॥
नामा म्हणे त्याचे चरणरज व्हावे | हेंचि भाग्य द्यावे केशिराजा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८२
📿 मज तयांची आवड । पुरव
1482.
मज तयांची आवड । पुरवणे लागे त्याचे कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥
घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥
माझे जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण । नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥३॥
मज आणिले नामरुपा । त्याची मजवर कृपा । दाविला हो सोपा । मार्ग मज उद्धवा ॥४॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग २›📂 संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार›
📿 अभंग क्र. १४८२
📿 कृपा केली संतजनी ।
1482.
कृपा केली संतजनी ।
अर्थ दाविले उघडुनि ॥१॥
तेचि प्रगट केले आता ।
नाही बोलिलो मी स्वता: ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४८४
📿 कळो आले ऐसे आता । ना
1484.
कळो आले ऐसे आता । नाही सत्ता तुम्हासी ॥१॥
तरी वीर्य नाही नामा । जातो प्रेमा खंडत ॥धृपद॥
आड ऐसे येते पाप । वाढे ताप आगळा ॥२॥
तुका म्हणे गुण झाला । हा विठ्ठल हीनशक्ती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४८५
📿 लागो दिले अंगा । ऐसे
1485.
लागो दिले अंगा । ऐसे का गा सन्निध ॥१॥
कोण्या पापे उदय केला । तो देखिला प्रळय ॥धृपद॥
न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥
तुका म्हणे भले । मज तो न वजे साहिले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८५
📿 वाल्मिकादि भीष्म द्र
1485.
वाल्मिकादि भीष्म द्रोण कृपाचार्य | द्रुपदतनया दिली भेटी ॥१॥
उद्धव नारद अंबरिष शुक | बळी हरुवादिक आले भेटी ॥२॥
देवी देवऋषी गोपाळांसहित | भाष्यकारे नीत शुद्ध केली ॥३॥
नामा म्हणे आता पाहू नको देश | पतितास यश तुझे नामी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८५
📿 ज्या सुखाकारणें देव
1485.
ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥
धन्य धन्य संतांचे सदन । जेथे लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥
सर्व सुखांची सुखराशी । संतचरणी भुक्तिमुक्ति दासी ॥३॥
एका जनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४८६
📿 धावा शीघ्रवत । किंवा
1486.
धावा शीघ्रवत । किंवा घ्यावे दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मी होतो हीनवर ॥धृपद॥
न धरावा धीर । धावा नका चालो स्थिर ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८६
📿 भक्तांची आवडी मोठी त
1486.
भक्तांची आवडी मोठी त्या देवासी | सद्भक्तिप्रेमासी लांचावला ॥१॥
काय सांगू आता तयांचे कौतुक | जेथे ब्रह्मादिक स्तब्ध ठेले ॥२॥
गज आणि गणिका भिल्लिणी कुंटिणी | नेल्या त्या विमानी बैसोनिया ॥३॥
अजामीळ खळ कोळी तो वाल्मिक | तारिले अनेक एकसरा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८६
📿 वैष्णवाघरी देव सुखाव
1486.
वैष्णवाघरी देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥
देव म्हणे माझे पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥
जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥३॥
कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनी पडली मिठी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४८७
📿 सेवकासी आज्ञा निरोपा
1487.
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥
मनाचिये मुळी रहावे बैसोन । आकर्षावे गुण पायापाशी ॥धृपद॥
भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसे वाटे ॥४॥
तुका म्हणे माझे करावे कारण । आपुले जतन ब्रीद करा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८७
📿 जैसा वृक्ष नेणे मान
1487.
जैसा वृक्ष नेणे मान अपमान | तैसे ते सज्जन वर्तताती ॥१॥
येऊनिया पूजा प्राणि जे करिती | त्याचे सुख चित्ती तया नाही ॥२॥
अथवा कोणी प्राणि येऊनि तोडिती | तया न म्हणती छेदू नका ॥३॥
निंदा स्तुति सम मानिती जे संत | पूर्ण धैर्यवन्त सिंधु ऐसे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८७
📿 संतापोटीं देव वसे ।
1487.
संतापोटीं देव वसे । देवा पोटी संत असे ॥१॥
ऐसा परस्परे मेळा । देव संतांचा अंकिला ॥२॥
संतांठायीं देव तिष्ठे । देव तेथे संत वसे ॥३॥
एका जनार्दनी संत । देव तयांचा अंकित ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८८
📿 मंत्रयंत्र दीक्षा सा
1488.
मंत्रयंत्र दीक्षा सांगतील लक्ष | परि राम प्रत्यक्ष न करी कोण्ही ॥१॥
प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय | आणिकांची काय चाड मज ॥२॥
सर्व कामी राम भेटविती माते | जीवेंभावे त्यांते ओवाळीन ॥३॥
नामा म्हणे आम्हा थोर लाभ जाला | सोईरा भेटला अंतरींचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८८
📿 संत ते देव देव ते सं
1488.
संत ते देव देव ते संत । ऐसा हेत दोघांचा ॥१॥
देव ते संत संत ते देव । हाचि भाव दोघांचा ॥२॥
संतांविण देवा कोण । संत ते जाण देवासी ॥३॥
फळपुष्प एका पाठी । एका जनार्दनी राहाटी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार›
📿 अभंग क्र. १४८९
📿 कैसा पांडुरंगा करावा
1489.
कैसा पांडुरंगा करावा विचार | सांग वा निर्धार साक्षरूपा ॥१॥
काय आले देवा कैचे थोरपण | आकारासि कोणी आणियले ॥२॥
आणियले आता आपणासारिखे | गोपिकांसी रूपे दावी नाना ॥३॥
काय जीवेंभावे सकळा संमतः | सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४८९
📿 संताअंकीं देव वसे ।
1489.
संताअंकीं देव वसे । देवाअंकीं संत बैसे ॥१॥
ऐशा परस्परें मिळणी । समुद्र तरंग तैसे दोन्ही ॥२॥
हेम अलंकारवत । तैसे देव भक्त भासत ॥३॥
पुष्पी तो परिमळ असे । एका जनार्दनी देव दिसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४९०
📿 गेला तरी जावो सुखे न
1490.
गेला तरी जावो सुखे नरकासी । कळंकी याविशी शिवो नये ॥१॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरे तो हित दुरी बरे ॥धृपद॥
उगीच का आली नासवावी फळे । विटाळ विटाळे कालवूनि ॥२॥
तुका म्हणे लोणी घालोनि शेणात । उपेगाची मात काय असे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४९०
📿 संत आधी देव मग । हाच
1490.
संत आधी देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥
देव निगुर्ण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥२॥
नाम रुप अचिंत्य जाण । संती सगुण वर्णिलें ॥३॥
मुळी अलक्ष लक्षा नये । संतीं सोय दाविली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४९१
📿 वर्णावे ते किती । के
1491.
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥
विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥धृपद॥
भाव शुद्ध तरी । सांगितले काम करी ॥२॥
तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४९१
📿 संताचा महिमा देवचि ज
1491.
संताचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतांची पुसणे ॥१॥
ऐसी आवडी एकमेका । परस्परें नोहे सुटिका ॥२॥
बहुत रंग उदक एक । यापरी देव संत दोन्ही देख ॥३॥
संताविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १४९२
📿 देवाचे सोईरे संत रे
1492.
देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरते जीवे नाठवी कोणा ॥१॥
पडता संकट आठवितसे संता । त्याहुनी वारिता नाही दुजा ॥२॥
म्हणोनि घरटी फिरे तया गांवी । सुदर्शनादि मिरवी आयुधे हाती ॥३॥
लाडिकें डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनी त्याचे वंदी पाय ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १४९४
📿 हेंदऱ्याचे भरिता कान
1494.
हेंदऱ्याचे भरिता कान । हलवी मान भोंक रिते ॥१॥
नाही मी येथे सांगो स्पष्ट । भावे नष्ट घेत नाही ॥धृपद॥
अवगुणी बाटले चित्त । तया हित आतळे ना ॥२॥
तुका म्हणे फजितखोरा । म्हणता बरा उगा रहा ॥३॥