संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १५९९
📿 ऐका गा हे अवघे जन ।
1599.
ऐका गा हे अवघे जन । शुद्ध मन ते हित ॥१॥
अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावा ॥धृपद॥
नाही कोणी सवे येता । संचिता या वेगळा ॥२॥
बरवा अवकाश आहे । करा साहे इंद्रिये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १५९९
📿 मज कोनी न देखावें ।
1599.
मज कोनी न देखावें । मज कोणी नोळखावें ॥१॥
मान देखोनिया दृष्टी । पळे देह उपेक्षा पोटी ॥२॥
मी एक लौकिकी आहे । ऐसे कवणा ठावें नोहे ॥३॥
सांडावया अहं ममता । मान न पाहे सर्वथा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६००
📿 पाहुनि न दिसे लौकिक
1600.
पाहुनि न दिसे लौकिक वेव्हारी | ऐसा तू अंतरी लावी मज ॥१॥
परि तुझ्या चरणी माझे अनुसंधान | तरी प्रेम पावन देई देवा ॥२॥
मनाचिये वृत्ती अखंड तू राहोनी | झेंपावती झणी कामक्रोध ॥३॥
नामा म्हणे ऐसे पावसी तू माते | तरी मी जीवे तूते न विसंबे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६००
📿 ऐशीं शांती ज्यासी आह
1600.
ऐशीं शांती ज्यासी आहे । त्याचे घरी देव राहे ॥१॥
हा अनुभव मनी । पहा प्रत्यक्ष पुराणीं ॥२॥
धर्माघरीं वसे । अर्जुनाचे रथी बैसे ॥३॥
अंकित दासाचा होय । एका जनार्दनी देव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०१
📿 गेले पळाले दिवस रोज
1601.
गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझे माझे ॥१॥
सळे धरोनि बैसला काळ । फाको नेदी घटिका पळ॥धृपद॥
का रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥
हित कळोनि असता हाती । तोंडी पाडोनि घेसी माती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६०१
📿 तुझे पायी माझ्या मने
1601.
तुझे पायी माझ्या मने दिली बुडी | इंद्रिये बापुडी वेडावली ॥१॥
आता विषयसुख जाणावे कवणे | जाणोनि भोगणे कवणे स्वामी ॥२॥
देह सहज स्थिति राहिले निष्काम | हृदयी सदा प्रेम ओसंडत ॥३॥
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला | क्षण जीवावेगळा न करी मजे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०२
📿 आता माझ्या मायबापा ।
1602.
आता माझ्या मायबापा । तू या पापा प्रायिश्चत्त ॥१॥
फजित हे केले खळ । तो विटाळ निवारी ॥धृपद॥
प्रेम आता पाजी रस । करी वास अंतरी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६०२
📿 आता होणार ते होवो पं
1602.
आता होणार ते होवो पंढरीनाथा | न सोडी सर्वथा चरण तुझे ॥१॥
हृदयी तुझे ध्यान वाचे जपे नाम | हाचि नित्यनेम सर्व माझा ॥२॥
आम्ही तुझी देवा धरियेली कांस | न करी उदास पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला | क्षण जीवावेगळा न करी मज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६०२
📿 भाग्यवंत श्रीहरीचे द
1602.
भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरिता कास तारिती ॥१॥
धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥
वर्णिता त्यांचे उत्तम गुण । होय जन्मांचेंखंडन ॥३॥
शरण एका जनार्दनी । धन्य धन्य तुमची वाणी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०३
📿 का रे न पवसी धावण्या
1603.
का रे न पवसी धावण्या । अंगराख्या नारायणा ॥१॥
अंगी असोनिया बळ । होसी खटयाळ नाट्ट्याळ ॥धृपद॥
आम्ही नरकासी जाता । काय येईल तुझ्या हाता ॥२॥
तुका म्हणे कान्हा । क्रियानष्टा नारायणा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६०४
📿 हेंचि एक खरें । सदा
1604.
हेंचि एक खरें । सदा वाचे नाम स्मरे ॥१॥
धन्य त्याची जननी । प्रसवली त्या लागोनी ॥२॥
हरुषे नाचे कीर्तनांत । प्रेम न खंडे शुद्ध चित्त ॥३॥
एका जनार्दनी शरण । वंदीन तयाचे चरण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०५
📿 पवित्र ते अन्न । हरी
1605.
पवित्र ते अन्न । हरीचिंतनी भोजन ॥१॥
येर वेठया पोट भरी । चाम मसकाचे परी ॥धृपद॥
जेऊनि तो धाला । हरीचिंतनी केला काला ॥२॥
तुका म्हणे चवी आले । जे का मिश्रित विठ्ठले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०६
📿 चरणाचा महिमा । हा तो
1606.
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥
अंध पारखी माणिके । बोलविशी स्पष्ट मुके ॥धृपद॥
काय नाही सत्ता । हाती तुझ्या पंढरीनाथा ॥२॥
तुका म्हणे मूढा । मज चेष्टविले जडा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६०६
📿 माझे सर्व भाग्य केशव
1606.
माझे सर्व भाग्य केशवाचे पाय | आणिक उपाय नेणो आम्ही ॥१॥
पक्षी अवचित अंगणांत आला | घेऊनिया गेला सारा तेणे ॥२॥
हाटकरी आम्ही हाटासी पे गेलो | फिरोनिया आलो गांवामाजी ॥३॥
नामा म्हणे नमू सर्व जीवजंत | दिसे ते अनंत दृष्टीपुढे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०७
📿 बळीवंत कर्म । करी आप
1607.
बळीवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥
पुढे घालुनिया सत्ता । न्यावे पतना पतिता ॥धृपद॥
आचरणे खोटी । केली सलताती पोटी ॥२॥
तुका म्हणे देवा । नाही भजन केली सेवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६०७
📿 न्याय मीमांसा सांख्य
1607.
न्याय मीमांसा सांख्य पातंजली । व्याकरण वेदांत बोली सर्व एक ॥१॥
ते माझे सोई रे जिवलग जीवाचे । जे अधिकारी साचे संतजन ॥२॥
एका जनार्दनी मन तया ठायी । होऊनिया पायी उतराई ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६०८
📿 जननिया बाळका रे घातल
1608.
जननिया बाळका रे घातले पाळणा । पंचतत्त्वी जोडियेल्या वारितया चहू कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हाती भाव दावी खेळणा ॥१॥ निजी रे निजी आता । म्हणोनि परिये दे माता । खेळता कष्टलासी बाळा तू रे नेणता । निजी रे निजी आता ॥धृपद॥ खेळता बाहेरि रे मुला लोकांच्या सवे । बागुल काळतोंडा नाही नेतो ते ठावे । खेळता दुश्चित्ता रे देखोनि ते न्यावे । म्हणोनि सांगे तुज शीघ्र वचन पाळावे ॥२॥ संचित मागे तुज शुद्ध होते सांगाती । तेणे तुज वांचविले वेरझारिया हाती । आणीक नेली मागे काय जाणो ती किती । आलासि येथवरी थोर पुण्ये बहुती ॥३॥ खेळता शुक देवा तो रे लागला पाठी । लपाला वरुषे बारा तिये मातेचे पोटी । रिघता बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणे रिघे कपाटी ॥४॥ खेळता चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे काप अंगी सुख नाठवे दुःख । आप पर ते ही नाही देहभाव सकळिक ॥५॥ शिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिले हाती । टाकिले तयावरी खुणे गोविला अंती । पावला मायबाप हिरोन घेतला हाती ॥६॥ बांधले अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाके कळले मायबापासी । घातली धाव नेटे वेगी पावला त्यासी । हिरोनि नेली दोघे आपणया ती पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहे निश्चळ । खेळता दुश्चिता रे नको जाऊ बरळ । टोकताहे तुजलागी दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवू रे नेत्री घाली पडळ ॥८॥ ऐसी ती कृपावंते बाळा मोहिले चित्त । सुस्वरे कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणे ते चित्त राहे होऊनिया निवांत । पावती तुका म्हणे नाही विश्वास तो घात ॥९॥
अर्थ :
खेळता शुक देवा तो रे लागला पाठी । लपाला वरुषे बारा तिये मातेचे पोटी । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । तेचि परी जाली स्वामी भेणे रिघे कपाटी ॥४॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिलासे अग्नीमाजी पाव जळत एक । भरलासे कांप अंगी सुख नाठवें दुःख । आप पर ते ही नाही देहभाव सकळिक ॥५॥ शिबीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हाती । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हाती ॥६॥ बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाके कळले मायबापासी । घातली धांव नेटे वेगी पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणया ती पासी ॥७॥ धरूनी आठवू रे बाळा राहे निश्चळ । खेळतां दुश्चिता रे नको जाऊ बरळ। टोंकताहे तुजलागी दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवू रे नेत्री घालीं पडळ ॥८॥ ऐसी ती कृपावंते बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणे त.....
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६१०
📿 अशक्य तो तुम्हा नाही
1610.
अशक्य तो तुम्हा नाही नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागे काय जाणो स्वामीचे पवाडे । आता का रोकडे दावू नये ॥धृपद॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितो दास काय थोडे ॥२॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे समर्थाचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६१०
📿 किती देवा तुला यावे
1610.
किती देवा तुला यावे काकुलती | काय या संचिती लिहिले असे ॥१॥
केली कांहो सांडी माझी हृषिकेशी | आम्ही कोणापाशी तोंड वासू ॥२॥
ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनी | तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥
समूळ घेतला पृथ्वीचा भार | माझाचि जोजार काय तुला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६११
📿 दाता तो एक जाणा । ना
1611.
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥
आणीक नासिवंते काय । न सरे आय ज्यांच्याने ॥धृपद॥
यावे तया काकुलती । जे दाविती सुपंथ ॥२॥
तुका म्हणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६१२
📿 हाती विणा मुखी हरी |
1612.
हाती विणा मुखी हरी | गाये राउळाभीतरी ॥१॥
अन्न उदक सोडिले | ध्यान देवाचे लागले ॥२॥
स्त्री पुत्र बाप माय | यांचा आठव न होय ॥३॥
देहभाव विसरला | छंद हरीच लागला ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६१३
📿 पाहता तुझे चरण हरली
1613.
पाहता तुझे चरण हरली भवव्यथा | पुढती एक चिंता वाटतसे ॥१॥
झणी मुक्तिपद देसी पांडुरंगा | मग या संतसंगा कोठे पाहू ॥२॥
मग हे पंढरी आनंद सोहळा | कवणाचे डोळा पाहू देवा ॥३॥
मग हे हरिकथा अमृत संजीवनी | कवणाचे श्रवणी ऐको देवा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६१३
📿 पुर्वपुण्य असता गांठ
1613.
पुर्वपुण्य असता गांठी । संतभेटी होय ॥१॥
धन्य धन्य संतसंग । फिटे तग जन्माचा ॥२॥
चार सहा वंदिती पाय पै । आणिकां ठाव कोठे नाही ॥३॥
एका जनार्दनी संत । कृपावंत सुखासिंधु ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६१४
📿 देवा माझे मन आणि तुझ
1614.
देवा माझे मन आणि तुझे चरण | एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥
होणार ते हो गा सुखे पंढरीनाथा | कासया शिणता वायांविण ॥२॥
माझिया अदृष्टी ऐसेंचि मे आहे | सेवावे तुझे पाय जन्मोजन्मी ॥३॥
असता निरंतर येणे अनुसंधाने | प्रारब्ध भोगणे गोड वाटे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६१५
📿 नाही म्या वंचिला मंत
1615.
नाही म्या वंचिला मंत्र कोणापाशी । राहिलो जीवासी धरूनि तो ॥१॥
विटेवरी भावे ठेवियेले मन । पाउले समान चिंतीतसे ॥धृपद॥
पावविला पार धरिला विश्वास । घालूनिया कास बळकट ॥२॥
तुका म्हणे मागे पावले उद्धार । तिही हा आधार ठेविलासे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 पादसेवन चरण सेवा›
📿 अभंग क्र. १६१५
📿 तुझिया चरणाची न संडी
1615.
तुझिया चरणाची न संडी मी आस | मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥
हेंचि मज द्यावे जन्मजन्मांतरी | वाचे नरहरी नाम तुझे ॥२॥
कृपेचे पोसणे मी गा येक दिन | माझा अभिमान न संडावा ॥३॥
नामा म्हणे मज चाड नाही येरे | इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६१६
📿 चंचळी चंचळ निश्चळी न
1616.
चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
सोपे वर्म परि मन नाही हाती । हा हा भूत चित्ती भ्रम गाढा ॥धृपद॥
रविबिंब नाही तुटत उदका । छायेची ते नका सरी धरू ॥२॥
तुका म्हणे भय धरी रज्जूसाठी । नाही साच पोटी कळले तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६१६
📿 संतभेटीचा आनंदु । सु
1616.
संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गाता नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥
कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरी । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥
भुक्ति आणि मुक्ति । सदा तिष्ठे अहोराती । कैवल्यपद येती । सामोरी तयासी ॥३॥
नाम गाती जे आनंद । हृदयी नहीं दुजा भेद । एका जनार्दनी छंद । तयांच मज ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 दास्य शरणागत स्थिती›
📿 अभंग क्र. १६१७
📿 जाणसी ते करी कृपाळुव
1617.
जाणसी ते करी कृपाळुवा हरि | लाज सर्वापरी आहे तुज ॥१॥
आरूष साबडे मी कांही नेणे वेडे | जन्मोनि सांकडे केले तुज ॥२॥
बहुकीति ऐकिली बहुतांचे मुखी | बहुत केले सुखी शरणागत ॥३॥
नाही तुझी सेवा केली मनोभावे | लोभ दंभ गर्व भ्रांति सदा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६१९
📿 किती वेळा जन्मा यावे
1619.
किती वेळा जन्मा यावे । नित्य व्हावे फजीत ॥१॥
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥धृपद॥
प्रारब्ध हे पाठी गाढे । न सरे पुढे चालत ॥२॥
तुका म्हणे रोकडी हे । होती पाहे फजीती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६१९
📿 ऐसे म्हणशील कोण । ज्
1619.
ऐसे म्हणशील कोण । ज्याचे गाता नामभिधान । देवाधि देव आपण । स्वमुखें सांगे उद्धवा ॥१॥
नारद पराशर पुंडलीक । व्यास शुक वाल्मिकादिक । ध्रुव उपमन्यु भीष्मादिक । वंद्य जाण उद्धवा ॥२॥
वासिष्ठ वामदेव विश्वामित्र । आत्रि दत्तात्रेय पवित्र । ऐसे पुण्यश्लोक सर्वत्र । ते तुज वंद्य उद्धवा ॥३॥
रघु दिलीप हरिश्चंद्र । शीभ्रीराज बली थोर । जयाचा अंकित मी निर्धार । हे तू जाणे उद्धवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२०
📿 होतो सापडलो वेठी । ज
1620.
होतो सापडलो वेठी । जाता भेटी संसारा ॥१॥
तो या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥धृपद॥
होता भार माथा माझे । बहु ओझे अमुप ॥२॥
तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२१
📿 जा रे तुम्ही पंढरपुर
1621.
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥
गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखे ॥धृपद॥
उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥
तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२२
📿 या रे हरीदासानो जिंक
1622.
या रे हरीदासानो जिंको कळिकाळा । आमुचिया बळा पुढे किती बापुडे ॥१॥
रंग सुरंग घमंडी नाना छंदे । हास्यविनोदे नामाचि आवडी ॥धृपद॥
येणे तेणे प्रकारे बहुता सुख जोडे । पूजन ते घडे नारायणा अंतरी ॥२॥
वांकुडीया माना बोल बोलावे आरुष । येईल तो त्यास छंद पढीये गोविंदा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२३
📿 देव जाणता देव जाणता
1623.
देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥
देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥धृपद॥
देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६२३
📿 वारंवार जन्म घेऊ । प
1623.
वारंवार जन्म घेऊ । परी पाहू पंढरपूर ॥१॥
दुजे मागणें देवा । करु सेवा वैष्णवांची ॥२॥
न मागो भुक्ति आणि मुक्ति ती फजिती कोण सोसी ॥३॥
एका जनार्दनी मागे । कीर्तनरंगी रंगला वेगे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२४
📿 माझ्या मुखे मज बोलवि
1624.
माझ्या मुखे मज बोलवितो हरी । सकळांच्या अंतरी नारायण ॥१॥
न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तव विचार जाणो आम्ही ॥२॥
तुका म्हणे दोष नाही या विचारे । हिताची उत्तरे शिकविता ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६२५
📿 कोणता उपाय । जोडे जे
1625.
कोणता उपाय । जोडे जेणे संतपाय ॥१॥
हाचि आठव दिवस रात्रीं । घडो संतांची संगती ॥२॥
न करु जप तप ध्यान । संतापायी ठेवुं मन ॥३॥
न जाऊ तीर्थप्रदक्षिणा । आठवुं संतांचे चरणा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२६
📿 तुज जाणे तान्हे नाही
1626.
तुज जाणे तान्हे नाही पांडुरंगा । का जी मज सांगा उपेक्षिले ॥१॥
तुज ठावे होते पातकी मी खरा । आधीच का थार दिधली पायी ॥धृपद॥
अंक तो पाडिला हरीचा मी दास । भेद पंगतीस करू नये ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिंतिले ते खरे । आता उणे पुरे तुम्हा लागी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६२६
📿 आधी घेई निरपेक्षता ।
1626.
आधी घेई निरपेक्षता । त्याचे चरण वंदीन माथा ॥१॥
निरपेक्ष जेथे घडें । यमकाळ पायी जोडे ॥२॥
निरपेक्षाची आवडी । ब्रह्माज्ञान घाली उडी ॥३॥
निरपेक्षेवांचुन । नाही नाही रे साधन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२७
📿 आम्हा घरी धन शब्दाची
1627.
आम्हा घरी धन शब्दाचींच रत्ने । शब्दाचींच शस्त्रे यत्न करू ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जनलोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करू ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 दास्य शरणागत स्थिती›
📿 अभंग क्र. १६२७
📿 लाज साडोनिया जालो शर
1627.
लाज साडोनिया जालो शरणागत | ऐसियाचा अंत पाहसी झणी ॥१॥
गुण दोष माझे मनी गा न धरी | पतितपावन जरी म्हणविसी ॥२॥
पडावे परदेसी हे लाज कोणासी | जरी तू न पावसी पांडुरंगा ॥३॥
नामा म्हणे केशवा चतुरा शिरोमणी | विचारो अंतःकरणी मायबापा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२८
📿 ब्रम्हज्ञान दारी येत
1628.
ब्रम्हज्ञान दारी येते काकुलती । अव्हेरिले संती विष्णुदासी ॥१॥
रिघो पाहे माजी बळेचि त्याचे घर । दवडिती दूर म्हणोनिया ॥२॥
तुका म्हणे येथे न चाले सायास । पडिले उदास त्यांच्या गळा ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१›
📿 अभंग क्र. १६२८
📿 न होता शुद्ध अंतःकरण
1628.
न होता शुद्ध अंतःकरण । संतसेवा न घडे जाण ॥१॥
शुद्ध संकल्पावांचुन । संतसेवा न घडेचि जाण ॥२॥
कामक्रोध दुराचार । यांचा करु नये अंगिकार ॥३॥
आशा मनींशांचें जाळें । छेदुनी टाकी विवेकबळें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६२९
📿 कासया लागला यासी चौघ
1629.
कासया लागला यासी चौघाचार । मुक्तीचा वेव्हार निवडिला ॥१॥
ग्वाही भक्तांची घालूनिया वरी । महजर करी आहे माझ्या ॥धृपद॥
तुम्हा वेगळ्या आपुल्या ठायी । होते करुनि ते ही माझे माझे ॥२॥
भांडण सेवटी जाले एकवट । आता कटकट करू नये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६३०
📿 जाती पंढरीस । म्हणे
1630.
जाती पंढरीस । म्हणे जाईन तयास ॥१॥
तया आहे संवसार । ऐसे बोले तो माहार ॥धृपद॥
असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥
चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ३›📂 दास्य शरणागत स्थिती›
📿 अभंग क्र. १६३१
📿 आम्ही शरणागती केलासी
1631.
आम्ही शरणागती केलासी सरता | येन्हवी अनंता कोण जाणे ॥१॥
वेदशास्त्र पुराणी उबगोनि सांडिलासी | तो तू आम्ही धरिलासे हृदयकमळी ॥२॥
चतुरा शिरोमणी अहो केशिराजा | अंगीकार तुझा केला आम्ही ॥३॥
सहस्र नामे जरी जालासि संपन्न | तरी हेंहि भूषण आमुचेंचि ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १५०१ ते २०००›
📿 अभंग क्र. १६३२
📿 ज्याचे गर्जता पवाडे
1632.
ज्याचे गर्जता पवाडे । कळिकाळ पाया पडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौ अठरा जणा ॥धृपद॥
चिंतिता जयासी । भुक्तीमुक्ती कामारी दासी ॥२॥
वैकुंठासी जावे । तुका म्हणे ज्याच्या नावे ॥३॥