🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३२३
📿 सोलीव जे सुख अतिसुखा
323.
सोलीव जे सुख अतिसुखाहुनि । उभे ते अंगणी वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनिया ॥धृपद॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठी ॥२॥
नामओघ मुखी अमृताचे सार । मस्तक पवित्र सहित रजे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३२३
📿 ज्ञानियांचे ज्ञेय ध्
323.
ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय | पुंडलिकाचे प्रिय सुख वस्तु ॥१॥
ते हे समचरण उभे विटेवरी | पहा भीमातीरी विठ्ठल रुप ॥२॥
जे तपस्वियांचे तप जे जपकांचे जाप्य | योगियांचे गौप्य परमधाम ॥३॥
जे तेजकांचे तेज जे गुरूमंत्राचे गुज | जे पूजकांचे पूज्य कुळदैवत ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३२३
📿 जाश्वनीळ सदा ध्याये
323.
जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनी । बैसोनी स्मशानी निवांतपणे ॥१॥
ते हे उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हे ॥२॥
न बुडे कल्पांती आहे ते संचलें । म्हणोनि म्हणती भए भूवैकुंठ ॥३॥
एका जनार्दनी कल्पाचें निर्धारी । निर्विकल्प पंढरी उरतसे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 थालीपाक›
📿 अभंग क्र. ३२४
📿 हांसे आले द्रौपदीसी
324.
हांसे आले द्रौपदीसी । बापा वचन परियेसी ॥1॥
सर्व अरिष्ट भंजना । तुजलागी बाहो कोणा ॥2॥
एक भाव तुझे पायी । यावेगळे काही नाही ॥3॥
थाळी माजी पाहता अन्न । होय क्षुधेचे हरण ॥4॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३२४
📿 तीर्थे केली कोटीवरी
324.
तीर्थे केली कोटीवरी । नाही देखिली पंढरी ॥१॥
जळो त्याचे ज्यालेपण । न देखे चि समचरण ॥धृपद॥
योग याग अनंत केले । नाही समचरण देखिले ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलपायी । अनंत तीर्थे घडिली पाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३२४
📿 वेदा अगोचर परब्रह्म
324.
वेदा अगोचर परब्रह्म कारण | योगिया हृदयीचे परमतत्व निर्वाण |
आकळू न कळेचि शेखी धरियेले मौन |ते रूप पंढरिये विटे समचरण ॥१॥
कानडा विठ्ठल तो उभा भिवरेतीरी |भेटिचे आर्त वो जीवा लागले भारी ॥ध्रु.॥
भूवैकुंठ पंढरी हे देवे रचियेली पै गा |शिवे ती वंदियेली विठो समचरणांची गंगा |
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३२५
📿 पाहता पाहाणे लया गेल
325.
पाहता पाहाणे लया गेले । ते पाहाणे नामया आले ॥१॥
अवघे डोळा जे ग्रासिले । तेंचि नामया फावले ॥२॥
जया नाही रूप नांव । गांव ना ठाव नामयाते ॥३॥
चोखा म्हणे नामदेवा । बरवे चोज दाविले जीवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३२५
📿 कोणते कारण राहिले या
325.
कोणते कारण राहिले यामुळे । जे म्या तुज बळे कष्टवावे ॥१॥
नाही जात जीव होत नाही हानी । सहज ते मनी आठवले ॥धृपद॥
नाही काही चिंता मरतो उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥२॥
हे तो तुज कळो येतसे अंतरी । लापणीक वरी साच भाव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३२५
📿 धन्य पृथ्वी दक्षिन भ
325.
धन्य पृथ्वी दक्षिन भाग । जेथे उभा पांडुरंग । मधे शोभे पुंडलीकक लिंग । सन्मुख चांग भीमरथी ॥१॥
काय वानु तो महिमा । दृष्टी पाहतांचि भीमा । पैलथडी परमात्मा । शिवास जो अगम्य ॥२॥
दोन्ही कर धरुनि जघनी । वाट पाहे चक्रपाणी । एका शरण जनार्दनी । भक्तांसाठीं घाबरा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३२६
📿 सारांचे सार गुह्मांच
326.
सारांचे सार गुह्मांचें निजगुह्मा । ते हे उभे आहे पंढरेये ॥१॥
चहुं वांचापरतें वेदा जे आरुतें । ते उभे आहे सरतें पंढरीये ॥२॥
शास्त्रांचे निज सार निगमां न कळे पार । तोचि हा परात्पर पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी भरुनि उरला । तोचि हा देखिला पंढरीये ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३२७
📿 बहु दुर्लभ होते ते स
327.
बहु दुर्लभ होते ते सुलभचि झाले । तेथे मन गुंतले सर्वभावे ॥१॥
ते रूप अरूप रूपाची वेगळे । हृदयी बिंबले सर्व काळ ॥२॥
नामगोष्टी अवघी भरली हे सृष्टी । द्वेत भाव पोटी नाहींसा झाला ॥३॥
चोखा म्हणे ज्याचा उपदेश भला । सहज निरसला भेदाभेद ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ७›
📿 अभंग क्र. ३२७
📿 राम मिलण के काज सखी
327.
राम मिलण के काज सखी मेरे आरति उर मे जागी री ।
तड़पत-तड़पत कल न परत है बिरहबाण उर लागी री ।
निसदिन पंथ निहारू पिवको पलक न पल भर लागी री ।
पीव-पीव मै रटू रात-दिन दूजी सुध-बुध भागी री ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३२७
📿 तुजवरी ज्याचे मन । द
327.
तुजवरी ज्याचे मन । दर्शन दे त्याचे ॥१॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥धृपद॥
अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळा रोखिले ॥२॥
तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड दावी देवा ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३२८
📿 ब्रह्मादिका माव न कळ
328.
ब्रह्मादिका माव न कळे हे लाघव 1 तेथे हे जीव नेणती कांही ॥१॥
ऐसे जे चरित्र केलेंसे देवे । ते सुखे गावे अहर्निशी ॥२॥
भलतिया भरी पडु नये साच । नामाचा भरंवसा जीवे धरा ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही माय हो माउली । कृपेची साउली नामदेवा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 थालीपाक›
📿 अभंग क्र. ३२९
📿 म्हणे पाचारा भूदेवा
329.
म्हणे पाचारा भूदेवा । धर्म म्हणे जावे भीमा ॥1॥
गंगातिरासी येऊन । नमियेल ऋषिजन ॥2॥
त्वरा करा ऋषिजन । पात्री विस्तारले अन्न ॥3॥
म्हणती बापा ऐसे नव्हे । पोट आहे किंवा काय ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३२९
📿 बोल जो बोलता तोचि मा
329.
बोल जो बोलता तोचि मावळला । आता काय बोला बोलावे ते ॥१॥
बोलाचे बोलणे खुंटले बोल वरी । बोलाचीच परी नाठवे ते ॥२॥
कोणासी तो बोल कोणे तो बोलावा । उरला नाही ठावा बोलल्यासी ॥३॥
चोखा म्हणे नामया ते बोणले खुंटले । बोली बोल आटले सर्व दिसे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३२९
📿 निर्गुण सगुण नाही ज्
329.
निर्गुण सगुण नाही ज्या आकार |होऊनि साकार तोचि ठेला ॥१॥
जळी जळंगार दिसे जैशा परी |तैसा निराकारी साकार हा ॥२॥
सुवर्ण की धन धन की सुवर्ण |निर्गुण सगुण ययापरी ॥३॥
असा पूर्णपणे सहजी सहज |सखा केशिराज प्रगटला ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३३०
📿 भक्तिभाव मज तुम्ही द
330.
भक्तिभाव मज तुम्ही दाखविला । आनंद सोहळा सुखाचाचि ॥१॥
ते प्रेम मज नये सांगता । कोंदाटलो चित्ता सुखानंदे ॥२॥
रूपटृष्टी घाय पाहता न समाये । बोलतांचि न ये काय करू ॥३॥
चोखा म्हणे धन्य नामया तू गुरूफेडिला आधारू जीवित्वाचा ॥४।।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३३०
📿 नव्हे शब्द एक देशी ।
330.
नव्हे शब्द एक देशी । सांडी गिवशी कोणाला ॥१॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥धृपद॥
मोकलिले जावे बाणे । भाता जेणे वाहिला ॥२॥
आता येथे कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३३०
📿 आपणची कर्ता आपणची मि
330.
आपणची कर्ता आपणची मित्र |आपण सर्वत्र हरी जाला ॥१॥
साधन साधिता हरि दिसे पूर्ण |प्रपंच हे भान न देखे डोळा ॥२॥
किमर्थ हे टवाळ मायामोह जाळ |वायाच पाल्हाळ कोरडे करी ॥३॥
नामा म्हणे सखोल विठ्ठल पूर्ण बोल |उच्चारिता मोल नलगे कांही ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३३१
📿 माझे सुख मज दाखविले
331.
माझे सुख मज दाखविले । पावन केले तिही लोकी ॥१॥
नवलाव झाला नवलाव झाला । हृदयींच दाविला देव मज ॥२॥
निवारोनी भवताप । दाविले रूप प्रत्यक्ष ॥३॥
चोखा म्हणे नामदेवा । चुकविला हेवा जन्म मरण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३३१
📿 गायनाचे रंगी I शक्ती
331.
गायनाचे रंगी I शक्ती अद्भुत हे अंगी ॥१॥
हे तो देणे तुमचे I देवा घ्यावी अखंडित सेवा ॥धृपद॥
अंगी प्रेमाचे भरते I नाही उतार चढते ॥२॥
तुका म्हणे वाणी I नाम अमृताची खाणी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्री विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ३३१
📿 एक तत्व एकाकार सर्व
331.
एक तत्व एकाकार सर्व देशी |एक तो नेमेंसी सकल जनी ॥१॥
ऐसे ब्रह्म पहा आहे सर्व एक | नलगे विवेक करणे कांही ॥२॥
मिथ्या हे डांबर माया मथितार्थ |हरि हाचि स्वार्थ वेगी करी ॥३॥
नामा म्हणे समर्थ बोलिला तो वेद |नाही भेदाभेद ब्रह्मपणी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३३१
📿 पुंडलिकापुढें सर्वेश
331.
पुंडलिकापुढें सर्वेश्वर । उभा कटी ठेउनी कर ॥१॥
ऐसा पुंडलिकापुढें हरी । तो पुजावा षोडशोपचारी ॥२॥
संभोवता वेढा संतांचा । आनंद होतो हरिदासांचा ॥३॥
एका जनार्दनी देव । उभा विटेवरी स्वयमेव ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ३३२
📿 जावोनी राउळा जोडूनिय
332.
जावोनी राउळा जोडूनिया हात । बोले ज्ञानेश्वर विठोबासी ॥1॥
करावी ही तीर्थे आवड अंतरी । घ्यावे बरोबरी नामदेवा ॥2॥
ऐकताचि ऐसे म्हणे पांडुरंग । न धाडिता राग येईल तुज ॥3॥
तयाविण मज घडी जरी जाय । युगा ऐसी होय ज्ञानेश्वरा ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३३२
📿 मोकाटाचे परी हिंडे द
332.
मोकाटाचे परी हिंडे दारोदारी । शुध्दि ते न धरी काय करू ॥१॥
न कळे न कळे विंदान ययाचे । भांबावलो साचे बोलवेना ॥२॥
शब्दाचा शब्द खुंटला प्रकार । कैसा हा विचार न सुचे कांही ॥३॥
चोखा म्हणे अहो नामया श्रीगुरू । कैसा हा प्रकारू सांगा मज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३३२
📿 पंढरीचें सुख पुंडलीक
332.
पंढरीचें सुख पुंडलीक जाणे । येर सोय नेणे तेथील पै ॥१॥
उत्तम हे स्थळ तीर्थ चंद्रभागा । स्नाने पावन जगा करितसे ॥२॥
मध्यभागी शोभे पुंडलीक मुनीं । पैल ते जघनी कटी कर ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठल बाळरुप दरुशने ताप हरे जगा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ३३३
📿 जाय बरोबरी नामया तू
333.
जाय बरोबरी नामया तू जाय । न चले उपाय काही येथे ॥1॥
करु काय मज पडिले सांकडे । उल्लंघेना भीड मज याची ॥2॥
नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा । एक विज्ञापना परिसावी ॥3॥
कटावरी कर नाही ज्या देवाचे । न घे मी तयाचे दरुशन ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 नामदेव स्तुती›
📿 अभंग क्र. ३३३
📿 मोकाट हे मन करिता बा
333.
मोकाट हे मन करिता बावरे । हिंडता वावरे न सांपडेचि ॥१॥
तयाचिये पायी दृढ घाली बेडी । न करी वोढावोढी कोणी मग ॥२॥
निवांतचि राहे ऐसा हा उपाय । नेणे आन सोय दुजी कांही ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही जे शिकविले । तेचि फळा आले नामदेवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ३३३
📿 कोण सांगायास । गेले
333.
कोण सांगायास । गेले होते देशोदेश ॥१॥
जाले वार्या हाती माप । समर्थ तो माझा बाप ॥धृपद॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥२॥
तुका म्हणे या निश्चये । माझे निरसले भय ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९›
📿 अभंग क्र. ३३३
📿 पूर्वापार श्रीविठ्ठल
333.
पूर्वापार श्रीविठ्ठलमूर्ति । ऐसे वेद पै गर्जती ॥१॥
भक्त पुंडलीका निकट । वसतें केले वाळुवंट ॥२॥
गाई गोपाळांचा मेळ । आनंदे क्रीडे तो गोपाळ ॥३॥
ऐसा स्थिरावला हरी का जनार्दनी निर्धारी ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ३३४
📿 तुम्ही सकळिक संत आहा
334.
तुम्ही सकळिक संत आहात सज्ञान । हे माझे अज्ञान फार आहे ॥1॥
याजबरोबर चालावी हो वाट । मोडतील काटे सांभाळावे ॥2॥
हळूहळू जावे करु नका घाई । चालायाची नाही सवय त्यासी ॥3॥
लागताचि भूक न धरी हा निर्धार । घ्यावा समाचार क्षणक्षणा ॥4॥