वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

सांडूनि कीर्तन न करी

🙏 3. संत तुकाराम · ABH-078179 · अभंग क्र. २२४७

2247.
सांडूनि कीर्तन न करी आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ॥१॥
आवडीचे आर्त पुरवी पंढरिराया । शरण तुझ्या पाया या चि लागी ॥धृपद॥
टाळी वाहूनिया विठ्ठल म्हणेन । तेणे निवारीन भवश्रम ॥२॥
तुका म्हणे देवा नुपेक्षावे आम्हा । न्यावे निजधामा आपुलिया ॥३॥

अर्थ :
किर्तन सोडून मी कोणतेही काम करणार नाही आणि देवा तुझ्या रंगात मी निर्लज्ज होऊन नाचेल. हे पंढरीराया माझी आर्त भावना तु आता पूर्ण कर यासाठीच मी तुला शरण येऊन तुझ्या पायाला येऊन लागलो आहे. मी टाळी वाजवून केवळ विठ्ठलाचे नामस्मरण करील त्यामुळे माझे सर्व भवश्रम नाहीसे होतील. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तु आमची उपेक्षा करू नकोस आम्हाला तुझ्या निज स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन जावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग