🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७›
📿 अभंग क्र. ११
📿 देवो आहे जैसा तैसा न
11.
देवो आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥
तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमेंसी आणुन वासनारुपे ॥
देव सर्वगत निराळा अद्वैत । तया मुर्तीमंत ध्याई जेतु ॥
तिही देवासी आकारु जेथुनि विस्तारु । तो ध्वनी ओंकारु त्या आरुता ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ११
📿 आवडीचे प्रेम नामया ल
11.
आवडीचे प्रेम नामया लागले । ते आम्हा फावले जन्मोजन्मी ॥१॥
म्हणोनी पंढरी विटेवरी हरी । भिवरेचे तीरी कर कटी ॥२॥
महा पातकियासी दर्शने उद्धार । ऐसा दिला वर पुंडलिका ॥३॥
अठ्ठावीस युगे न बैसे खाली । समचि पाउली उभा असे ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ११
📿 चहूंकडे देवा दाटला व
11.
चहूंकडे देवा दाटला वणवा । का न ये कनवा तुजलागी ॥१॥
सांपडले संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
बहु मज उबग आला असे देवा । धांवे तू केशवा लवलाही ॥३॥
तुजविण मज कोण गणगोत । तूंचि माझा हितकर्ता देवा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. ११
📿 आज मारे साधुजननो संग
11.
आज मारे साधुजननो संगरे राणा । मारा भाग्ये मळ्यो॥धृ०॥
साधुजननो संग जो करीये पियाजी चडे चोगणो रंग रे॥१॥
सीकुटीजननो संग न करीये पियाजी पाडे भजनमा भंगरे॥२॥
अडसट तीर्थ संतोने चरणे पियाजी कोटी काशी ने कोटी गंगरे॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ११
📿 अवगुणाचे हाती । आहे
11.
अवगुणाचे हाती । आहे अवघीच फजीती ॥१॥
नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ॥धृपद॥
विष तांब्या वाटी । भरली लावू नये होटी ॥२॥
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ११
📿 आमच्या संसाराचे घेतल
11.
आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे । तुजवाचुनी दुजे नाही कोण्ही ॥
ऐसा करुणानिधी आणिक नाही कोण्ही । तु जनक जननी मायेबाप ॥
कृपेचा कोवळा दीन दयानिधी । मज येऊनिया आधी सांभाळावे ॥
रात्री दिवस आस लागली मनास । भेटी सावकाश द्यावी मज ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 पारायण सात दिवसांचेच का?›
📿 अभंग क्र. ११
📿 पारायण सात दिवसांचेच
11.
11. पारायण सात दिवसांचेच का?
पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की, 'श्रीगुरुचरित्र' किंवा 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथांचे पारायण सात दिवसांतच का करावे? आम्ही रोज थोड्या ओव्या वाचल्या तर चालणार नाही का?
या प्रश्नाचे उत्तर असे की, रोज थोड्या ओव्या वाचण्यात गैर काहीच नाही. 'अकरणात मंद करण श्रेयाः' ही म्हण प्रसिद्धच आहे. परंतु सात दिवसांच्या पारायणाचे महत्व काही वेगळेच आहे. ते एक दिवसाच्या किंवा तीन दिवसांच्या पारायणाला येणे शक्य नाही.
या संदर्भात तासगावचे (कै. ) रा. वि. कुलकर्णी ऊर्फ 'आनंदघनराम' यांनी दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. *
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय ११ वा›
📿 अभंग क्र. ११
📿 🕉अध्याय ११ नवनाथ भक्
11.
🕉अध्याय ११ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
अध्याय अकरावा - फलश्रुति 👉 अग्निपिडा दूर होईल व गृहपीडा (दोष) दूर होऊन संतती व संपत्ती प्राप्त होईल.
श्रीगणेशाय नमः
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. ११
📿 धिग् तो वक्ता धिग्
११.
धिग् तो वक्ता धिग् तो सुरता । प्राणनाथको नाम नहि लेता ॥१॥
नाद वेद सब गनीक पुराण । रामनामको मरम न जान ॥२॥
पंडित होई सो बेद बखाणो । मुरख नामदेव रामही जाणो ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 बाळक्रीडा स्तुती›
📿 अभंग क्र. ११
📿 काय माझा आता पाहातोस
11.
काय माझा आता पाहातोसी अंत । येई बा धांवत देवराया ॥१॥
माझ्या जीवा होय तुजविण आकांत । येई बा धांवत देवराया ॥२॥
असे जरी काम भेटूनिया जात । येई बा धांवत देवराया ॥३॥
येरे देवा आता नामा तुज बाहात । येई बा धांवत देवराया ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. ११
📿 प्रारब्ध संचित विठ्ठ
11.
प्रारब्ध संचित विठ्ठल दैवत । कुळी उगवत भाग्य योगे ॥१॥
जे रुप पंढरी उभे असे साने । त्रिभुवन ध्याने वेधियेले ॥२॥
उगवती ज्योती प्रभा पै फाकती । नाही दिन राती पंढरीये ॥३॥
प्रभात हारपे सायंकाळ लोपे । दिननिशी लोपे विठ्ठल प्रभा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 सर्व आरती संग्रह›📂 देवीच्या आरत्या›
📿 अभंग क्र. ११
📿 मी तूं विरहित हें तू
11.
मी तूं विरहित हें तूं तें तूं तुकाई ।
मींपण सरतां सरलों तू पण तें कोई ॥
भी तूं विसरे तिसरे साक्षीपण सोयी ।
ते सुख अनुभवसिद्धां प्रगटें तव पायीं ॥ १ ॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 बाळक्रीडा - अभंग ५ ते १२›
📿 अभंग क्र. ११
📿 तीरा आणिला श्रीकृष्ण
11.
तीरा आणिला श्रीकृष्ण । हरिखे यमुना झाली पुर्ण । चढ़े स्वानंदजीवन । चरण वंदनार्थ ॥१॥ वसुदेव म्हणे कटकटा । यमुना रोधिली वाटा । कृष्ण असता निकटा । मोहं मार्ग न दिसे ॥२॥ कृष्ण असता हाती । मोहे पडली भ्रांति । मोहाचिये जाती । देव नाठवे बा ॥३॥ मैळ मुकी वेताळ । मारको मेसको वेताळ । आजी कृष्ण राखा सकळ । तुम्ही कुळदेवतांनी ॥४॥ अगा वनींच्या वाघोबा । पावटेकीच्या नागोबा । तुम्ही माझिया कान्होंबा । जीवे जतन करा ॥५॥ हातींचा कृष्ण विसरुन । देव देवता होतो दीन । मोहममतेचे महिमान । देवा ऐसे आहें ॥६॥ मोहे कृष्णांची आवडी । तेथे न पडे शोक सांकडीं । एका जनार्दनी पावले परथडी । यमुनेच्या ॥७॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १२
📿 आम्ही नामाचे धारण ।
12.
आम्ही नामाचे धारण । नेणो प्रकार आणिक ।
सर्वभावे एक । विठ्ठलाचि प्रमाण ॥१॥
नलगे जाणावे नेणावे । गावे आनंदे नाचावे ।
प्रेम सुख घ्यावे । वैष्णावांचे सगंती ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. १२
📿 हासो रुसो आता वाढवू
12.
हासो रुसो आता वाढवू आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखे करू विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकी ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १२
📿 अवघी साधन हातवटी । म
12.
अवघी साधन हातवटी । मोले मिळत नाही हाटी ॥१॥
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥२॥
कोणी कोणास शिकवावे । सार साधुनिया घ्यावे ॥३॥
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. १२
📿 (घोंगडीची रूपके)
12.
(घोंगडीची रूपके)
घोंगडे नेले सांगो मी कोणा । दुबळे माझे नाणीत मना ॥१॥
पुढे ते मज न मिळेती आता । जवळी सत्ता दाम नाही ॥धृपद॥
सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥२॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १२
📿 कशासाठी पोणियेले । ह
12.
कशासाठी पोणियेले । हे तू सांग बा विठ्ठले ॥१॥
मज कोण आहे गणगोत । न दिसे बरी तुझी नीत ॥२॥
मोकलित दातारा । काय येते तुझे पदरा ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा । वोखटपण येईल तुला ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. १२
📿 आज मेरेओ भाग जागो सा
12.
आज मेरेओ भाग जागो साधु आये पावना॥धृ०॥
अंग अंग फूल गये तनकी तपत गये ।
सद्गुरु लागे रामा शब्द सोहामणा॥ आ०॥१॥
नित्य प्रत्यय नेणा निरखु आज अति मनमे हरखू ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. १२
📿 हरिच्या जागरणा । जात
12.
हरिच्या जागरणा । जाता का रे नये मना ॥१॥
कोठे पाहासील तुटी । आयुष्य वेच फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तो मोकलिती अंती ॥२॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १२
📿 आमचा विठोबा विश्वाचा
12.
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी । कारे तुम्ही जीवी आठवाना ॥
लटकियाचा तुम्ही मानाल भरवसा । जातिल दाही दिशा सोडुनिया ॥
माता आणि पिता बंधु या बहिणी । अंतकाळी कोणी नव्हती बापा ॥
लटकिया मायेसी धरला जीवेसी । जातील परदेशी टाकोनिया ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 दिव्य अनुभव कधी व का ?›
📿 अभंग क्र. १२
📿 दिव्य अनुभव कधी व का
12.
12. दिव्य अनुभव कधी व का ?
'श्रीगुरुचरित्र' किंवा 'श्रीनवनाथ भक्तिसार' अशासारख्या ग्रंथांची भक्तिभावाने पारायणे करणार्या साधकांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आल्याचे दाखले आहेत. यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्य हेतूने केलेले असेल तर त्या संदर्भात काही सूचना मिळणे, याचप्रमाणे वृत्ती पूर्ण आनंदमय होणे, सुवास येणे, स्वर्गीय नाद ऐकू येणे इथपासून 'आदेश' किंवा 'अलख्'यासारखे शब्द ऐकू येणे इ, अनेकानेक अनुभवांचा उल्लेख करावा लागेल. प्रस्तुत लेखकाला यापैकी बरेच अनुभव आलेले आहेत. तथापि, असे आध्यात्मिक अनुभव दुसर्याला सांगू नयेत असा दण्डक असल्याने त्याबद्दल जास्त काही लिहिता येत नाही. (फक्त असे अनुभव निश्चितपणे येतात व अनुभव येतात ही कपोलकल्पित कथा नव्हे, हे ठामपणे सांगण्यासाठीच अनुभव आल्याचे सांगितले आहे. )
अनुभव का येतात?
असो. आता हे अनुभव कुणाला येतील व ते का येतात त्याबद्दल माहिती पाहू.
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. १२
📿 जन नामदेव पायो नाऊ ह
१२.
जन नामदेव पायो नाऊ हरी ।
जम आइका करी हे बौरी इब मोरी छुटी परी ॥१॥
भाव भगतकी नाना बिधि किन्ही फळका कोन करी ।
केवळ ब्रम्हा निकटी लीव लागी मुक्ति कहव परी ॥२॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १२
📿 सर्व काम धन सर्व सिध
12.
सर्व काम धन सर्व सिध्दि पूर्ण । पतित पावन हरि एक ॥१॥
ते रुप पंढरी पुंडलिका वोळले । आणूनि ठेविले भीमातीरी ॥२॥
न लगती त्या सिध्दि करणे उपाधी । नित्य चित्त शुध्दि विठ्ठलनामे ॥३॥
कळिकाळासी त्रास चित्ती हृषिकेश । उगवला दिवस सोनियाचा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. १३
📿 गाफळ मत रहेना बेटा ।
13.
गाफळ मत रहेना बेटा । सिरपर जब मारे सोटा ॥धृ॥
लख चौऱ्यांशी गिरके म्याने अवचित नरतनु पाया दो दिन गये सटरपटरमे फिर चौऱ्यांशी आया ॥गाफ. ॥१॥
चार प्रहरका लेना देना चार निंदमे कांटा । आठौ प्रहर येह घुसड गये तो आया मुदलमे तोटा ॥गाफ. ॥२॥
कवडी कवडी माया जोडी लाख करोडा मोटा । जद आवेगी जमकी चिठ्ठी साथ न आवे लंगोटा ॥गाफ. ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १३
📿 माझे माहेर पंढरी । आ
13.
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरी ॥१॥
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक बंधु आहे । त्याची ख्याती सांगू काये ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा । करितसे पापभंगा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १३
📿 उदाराचा राणा म्हणविस
13.
उदाराचा राणा म्हणविसी आपणा । सांग त्वा कवणा काय दिले ॥१॥
उचिता उचिता देसी पंढरीनाथा । न बोलो सर्वथा वर्मे तुझी ॥२॥
वर्मे तुझी काही बोलेन मी आता । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥
न घेता न देसी आपुलेंहि कोणा । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. १३
📿 शिव ऐसा शब्द कल्याणद
13.
शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हे नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागो गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिले दीनानाथे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 श्रीकृष्ण जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १३
📿 नंदाच्या घराला । मज
13.
नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथे । ठेवी मज आणि येथे ॥२॥
म्हणसी असे रक्षपाळ । ते म्या मोहिले सकळ ॥३॥
आच्छादित रूप । नामा म्हणे माझा बाप ॥४॥