वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 233. रावण मंदोदरी संवाद

मंदोदरी करी विनंती ।

🙏 4. संत नामदेव · ABH-083861 · अभंग क्र. २२४६

2246.
मंदोदरी करी विनंती । परिसा स्वामी लंकापती ॥१॥
सोडा रामाची अंतुरी । जंव तो राम आहे दुरी ॥२॥
उदकी तारिले पाषाण । हा तो प्रताप नव्हे सान ॥३॥
झाला बिभीषण शाहाणा । देखोनी तुमच्या दुश्चिंतपणा ॥४॥
जाउनी रामासी भेटला । मृत्युपासूनि सुटला ॥५॥
नामयास्वामी रघुनंदन । वेगी करावा प्रसन्न ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग