🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४१
📿 देवा तुम्ही उदार असा
141.
देवा तुम्ही उदार असा त्रिभुवनी । तोडर चरणी ब्रीदावळी ॥१॥
ती आजि माझी पुरवावी आस । नका करू उदास जीवित्वासी ॥२॥
न करी न करी आन साधनासी । गाईन सर्व भावेसी नाम तुमचे ॥३॥
चोखा म्हणे देवा ही माझी वासना । पुरवा नारायणा कोड माझे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वनक्रीडा - अभंग १३९ ते १४७›
📿 अभंग क्र. १४१
📿 आनंद सोहळा वृंदावनी
141.
आनंद सोहळा वृंदावनी पाहो । नंदजीचा कृष्ण तेणे केला नवलावो ॥१॥
धाकुले संवंगडे गौलणींचा थाट । वेणु पावां वाजविती नाचती दाट ॥२॥
एका जनार्दनी वेधले मन । पाहता पाहता चित्त जाले उन्मन ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४१
📿 जेथुनीया परापश्यंती
141.
जेथुनीया परापश्यंती वोवरा । मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥१॥
ते रूप सुंदर नाम ते श्रीधर । जेणे चराचर रचियेले ॥२॥
वेदाचे जन्मस्थान वेदरूपे आपण । तो हा नारायण नंदाघरी ॥३॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ । गोपिकांचे हित करि माझा ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४२
📿 देवा का हे साकडे घात
142.
देवा का हे साकडे घातिले । निवारा हे कोडे माझे तुम्ही ॥१॥
समर्थे आपुल्या नामासी पाहावे । मनी उमजावे आपुलिया ॥२॥
यातिहीन आम्हा कोण अधिकार । अवघे दूरदूर करिताती ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह । पडिला संदेह काय करू ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १४२
📿 फागुन के दिन चार होल
142.
फागुन के दिन चार होली खेल मना रे॥
बिन करताल पखावज बाजै अणहदकी झणकार रे ।
बिन सुर राग छतीसू गावै रोम रोम रणकार रे॥
सील संतोखकी केसर घोली प्रेम प्रीत पिचकार रे ।
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४२
📿 उफराटी माळ उफराटे ध्
142.
उफराटी माळ उफराटे ध्यान । मनाचे उन्मन मूर्ति माझी ॥१॥
ते रूप आवडे भोगिता साबडे । यशोदेसि कोंडे बुझावितु ॥२॥
नहोनि परिमाण हरपले ध्यान । आपणचि रामकृष्ण जाला ॥३॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी । मन ते वैकुंठी ठेवियेले ॥४॥
143.
हे तो एक संतांठायी । लाभ पायी उत्तम ॥१॥
म्हणविता त्यांचे दास । पुढे आस उरेना ॥२॥
कृपादान केले संती । कल्पांतींही सरेना ॥३॥
तुका म्हणे संतसेवा । हेचि देवा उत्तम ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४३
📿 धरोनिया आशा टाकिलासे
143.
धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥
कवणासी सांकडे सांगू पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हा ॥२॥
बाळकाचे परी लडिवाळपणे । तुमचे पासणे मी तो देवा ॥३॥
चोखा म्हणे मज तुम्ही मोकलिता । काय आमुची कथा आता चाले ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ३›
📿 अभंग क्र. १४३
📿 कालोकी रेन बिहारी ।
143.
कालोकी रेन बिहारी । महाराज कोण बिलमायो॥धृ०॥
काल गया ज्या जाहो बिहारी । अही तोही कौन बुलायो॥१॥
कोनकी दासी काजल सार्यो । कोन तने रंग रमायो॥२॥
कंसकी दासी काजल सार्यो । उन मोहि रंग रमायो॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 असुरासुर वध›
📿 अभंग क्र. १४३
📿 असुरासुर वध.
143.
असुरासुर वध.
अहर्निशी कंस बसे चिंताक्रांत । विचार पुसत प्रधा-नासी ॥१॥
प्रतिज्ञा करूनि शत्रुवधा जाती । ते मागे न येती पर-तोनी ॥२॥
आता पुरुषार्थी कोण पाठवावा । तो मज सांगावा निव-डोनि ॥३॥
144.
जन्मा आलो त्याचे । आजि फळ झाले साचे ॥१॥
तुम्ही सांभाळिले संती । भय निरसली खंती ॥२॥
कृतकृत्य झालो । इचछा केली ते पावलो ॥३॥
तुका म्हणे काळ । आता करु न शके बळ ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४४
📿 धरोनी विश्वास राहिले
144.
धरोनी विश्वास राहिलेसे द्वारी । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥
कळेल तैसे करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥
मी तंव धरणे घेवोनी बैसलो । आता काय बोलो येयापरी ॥३॥
चोखा म्हणे माझा हाचि नमे आता । तुम्ही कृपावंत सिध्दि न्यावा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 वनक्रीडा - अभंग १३९ ते १४७›
📿 अभंग क्र. १४४
📿 जो परिपुर्ण परब्रह्म
144.
जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥
पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥
एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४४
📿 विस्तार विश्वाचा विव
144.
विस्तार विश्वाचा विवेके पै साचा । बोलताचि वाचा हारपती ॥१॥
ते रूप श्रीधर कृष्णाचा आकार । सर्व निराकार एकरूपे ॥२॥
नसतेनि जीव असतेनि शिव । तदाकार माव मावळली ॥३॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप । विश्वी विश्वदीप आपेंआप ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नाममाला > अभंग ११० ते १५५›
📿 अभंग क्र. १४५
📿 हरि आला रे हरि आला र
145.
हरि आला रे हरि आला रे । संतसंगे ब्रह्मांनंदु जाल रे ॥
हरि येथे रे हरि तेथे रे । हरिवांचूनि न दिसे रिते रे ॥
हरि पाही रे हरि ध्यांई रे । हरिवांचूनि दुजे नाही ॥
हरि वाचे रे हरि नाचे रे ॥ हरि पाहात आनंदु साचे रे ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 असुरासुर वध›
📿 अभंग क्र. १४५
📿 गायी गोप तेव्हा लपवो
145.
गायी गोप तेव्हा लपवोनी क्षणेक । जानकी नायक झाला देव ॥१॥
आकर्ण नयन हाती धनुष्यबाण । करितसे ध्यान मारुतीचे ॥२॥
स्वामीचा तो धांवा ऐकोनिया कानी । हडबडिला मनी कपींद्र तो ॥३॥
निवोनी त्वरित वनामाजी आला । चरणसी लागला प्रेमभावे ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४५
📿 तारक प्रसिद्ध तीर्थ
145.
तारक प्रसिद्ध तीर्थ ते अगाध । नामाचा उद्बोध नंदाघरी ॥१॥
प्रकाश पूर्णता आदिमध्ये सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणे ॥२॥
निवृत्ति साधन कृष्णरूपे सुख । विश्वी विश्वरूप हरि माझा ॥३॥
अर्थ:
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १४६
📿 देहभाव सर्व जाय । ते
146.
देहभाव सर्व जाय । तेव्हा विदेही सुख होय ॥1॥
तया निद्रे जे पहुडले । भवजागृति नाही आले ॥2॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥3॥
त्या एकी एक होता । दासी जनी कैंचि आता ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ३›
📿 अभंग क्र. १४६
📿 जल भरन कैशी जाऊंरे ।
146.
जल भरन कैशी जाऊंरे । जशोदा जल भरन॥धृ०॥
वाटेने घाटे पाणी मागे मारग मै कैशी पाऊं॥ज० १॥
आलीकोर गंगा पलीकोर जमुना । बिचमे सरस्वतीमे नहावूं॥ज० २॥
ब्रिंदावनमे रास रच्चा है । नृत्य करत मन भावूं॥ज० ३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 असुरासुर वध›
📿 अभंग क्र. १४६
📿 त्रेतायुगी ख्याती कर
146.
त्रेतायुगी ख्याती करोनिया थोर । वधिले असूर रावणादी ॥१॥
कोण्या हेतुस्तव पुन्हा आगमन । सांगा कृपा करून दासालागी ॥२॥
ऐकोनिया वचन बोले सर्वेश्वर । द्बापारी अवतार आठवा हा ॥३॥
तुझे हे भेटीस्त व रूप हेम धरिले । दावा ते वहिले कपी ह्मणे ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४६
📿 गगन घांस घोंटी सर्व
146.
गगन घांस घोंटी सर्व ब्रम्हांडे पोटी । निमुनिया शेवटी निरलंबी ॥१॥
ते ब्रह्म सांवाळे माजि लाडेंकोडे । यशोदेमायेपुढे खेळतसे ॥२॥
ब्रम्हांडाच्या कोटी तरंगता उठी । आप आपासाठी होत जात ॥३॥
निवृत्तिचे ध्यान यशोदेचे धन । वासुदेवखुण आम्हामाजी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४७
📿 नको मज मान अथवा अपमा
147.
नको मज मान अथवा अपमान । दोहींचे कारण मज नाही ॥१॥
सुख अथवा दु:ख संचिताचा ठेवा । संकल्पाचा ठेवा जैसा तैसा ॥२॥
जन्म मरण है तो बांधिले पदरी । वाया हाव भरी येणे संगे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा नेमियेला नेम । तेंचि है वर्म भोगू आता ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ३›
📿 अभंग क्र. १४७
📿 कान्हो काहेकू मारो म
147.
कान्हो काहेकू मारो मोकू कांकरी । कांकरी कांकरी कांकरीरे॥धृ०॥
गायो भेसो तेरे अवि होई है । आगे रही घर बाकरीरे॥ कानो॥१॥
पाट पितांबर काना अबही पेहरत है । आगे न रही कारी घाबरीरे॥ का०॥२॥
मेडी मेहेलात तेरे अबी होई है । आगे न रही वर छापरीरे॥ का०॥३॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १४७
📿 बन जाऊ चरणकी दासी रे
147.
बन जाऊ चरणकी दासी रे, दासी मै भई उदासी॥धृ०॥
और देव कोई न जाणू । हरिबिन भई उदासी॥१॥
नही न्हावू गंगा नही न्हावू जमुना । नही न्हावू प्रयाग कासी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । चरनकमलकी प्यासी॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 असुरासुर वध›
📿 अभंग क्र. १४७
📿 द्वापारींची ठेव संपू
147.
द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागी ॥१॥
रामरूप धरून मज बोळवावे । ते रूप राहावे ह्लदया-माजी ॥२॥
मनोरथ ऐकोनी श्रवणी । झाला चापपाणी तात्कालीक ॥३॥
पाहोनिया ध्यान करूनि नमन । निघाला तेथून वायुसुत ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४७
📿 आगम निगमा बोलता वैखर
147.
आगम निगमा बोलता वैखरी । तो यशोदेच्या करी धरूनी चाले ॥१॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानी । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥२॥
कमळासनी ब्रह्मा ध्यानस्थ बैसला । पाहता पाहता मुळा न संपडे ॥३॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥४॥
148.
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा । चित्तशुद्धि सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठल गाइजे एकान्ती । अलभ्य ते येती लाभ धरा ॥२॥
आणिका अंतरी न द्यावी वसती । कारावी हे शांती वासनेची ॥३॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचू नये ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 भक्त वत्सलता›
📿 अभंग क्र. १४८
📿 पदक माळा सकलाद । तेथ
148.
पदक माळा सकलाद । तेथे टाकिली गोविंदे ॥1॥
देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥2॥
भक्त येती महाद्वारी । चोर पडले देव्हारी ॥3॥
नवल झाले पंढरपुरी । देव राबे दासी घरी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४८
📿 न लगे भुक्ति मुक्ति
148.
न लगे भुक्ति मुक्ति वैकुंठींचा वास । सुखे पंढरीस राहीन देवा ॥१॥
आणिक सांकडे घडोत नानापरी । परी मी पंढरी सोडोनी न वजे कोठे ॥२॥
खावयासी जरी न मिळेचि अन्न । उदक सवान धणिवरी ॥३॥
कोणी निंदो कोणी म्हणोत का वेडा । जेणे नव्हे पीडा भजनासी ॥४॥
149.
उपाधि वेगळे तुम्ही निर्विकार । कांहींच संसार तुम्हा नाही ॥१॥
ऐसे मज करुनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥२॥
नि :संग तुम्हासी राहणे एकट । नाही कटकट साहो येत ॥३॥
तुका म्हणे नाही मिळो येत शिळा । रंगासी सकळा स्फ़टिकाची ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १४९
📿 न सुचे मज कांही शेवट
149.
न सुचे मज कांही शेवट हा आला । आजिवरि झाला वारावार ॥१॥
आता अवसान कोणाचे चिंतन । नव्हे मज जाण मायामोहे ॥२॥
केले ते अवघे झाले फलकट । वाउगा बोभाट करोनी काई ॥३॥
वाया गा पसारा माझे आणि तुझे । गुंतलो वाउगे मृगजळा ॥४॥