संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २४
📿 सुख अणुमात्र नाही सं
24.
सुख अणुमात्र नाही संसारी । सदा हावभारी रात्रंदिवस ॥१॥
न घडे न घडे नामाचे चिंतन । संतांचे पूजन न घडेचि ॥२॥
न बैसे मन एके ठायी निश्चळ । सदा तळमळ अहोरात्र ॥३॥
निर्मळा म्हणे चोखिया सुजाणा । पंढरीचा राणा जीवी घरी ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २४
📿 करिती दु:ख न धरा चित
24.
करिती दु:ख न धरा चित्ती । सुख मानी ॥
आपलाली कर्मे आपण भोगिती । केल्यावीण देती झाडा जणी ॥
तेथे आनंदाचे । प्रगट विकार केवि उठे हृदयी प्रगट रामरुप ॥
येथे माझा स्वामी कृपाळू पाही । पाप दृष्टी काही न राहे तेथे ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय २४ वा›
📿 अभंग क्र. २४
📿 🕉
24.
🕉
अध्याय २४ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय चोविसावा - फलश्रुति 👉 बालहत्येचा दोष दूर होऊन वांझ स्त्रियांना पुत्रप्राप्ती होऊन तो पुत्र सुखात नांदेल.
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २४
📿 कहा करू जाती कहा करू
२४.
कहा करू जाती कहा करू पाती । राजाराम सेऊ दीन राती ॥१॥
मन मेरो गंगा मन मेरो कासी । राम रमे काटू जमकी फांसी ॥२॥
सीवणा सीवणा सीउ सिऊ । राम बिना हू कैसे जीऊ ॥३॥
अनंत नामका सिऊ बागा । जा सीवत जमका डर भागा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 अवतार विचार भगवान आणि शेष यांचा संवाद›
📿 अभंग क्र. २४
📿 अवतारविचार भगवान आणि
24.
अवतारविचार भगवान आणि शेष यांचा संवाद.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊ आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्हाणे सुरवर सांगू आले ॥२॥
शेष ह्मणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी न घेचि ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २५
📿 तोडी हे बिरडे मोह मम
25.
तोडी हे बिरडे मोह ममता आधी । विषय बाधा व्याधी गुंफो नको ॥१॥
असे घराश्रामी भजे सर्वांभूती । मी माझे पुढती म्हणो नको ॥२॥
तु तव लटिका आलासी कोठून । मी माझे म्हणोनी म्हणतोसी ॥३॥
नामा म्हणे मूळ राम परब्रम्ह । जगाचा विश्राम त्यासी भजे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २५
📿 आम्हा घरी धन शब्दांच
25.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करु ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटु धन जनलोका ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करु ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २५
📿 न बोलता तुम्हा कळो न
25.
न बोलता तुम्हा कळो न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥
आता तुम्हा पुढे जोडीतसे हात । नका कोणी अंत पाहो माझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी । करील ते हरी पाहो आता ॥३॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७›
📿 अभंग क्र. २५
📿 निज ब्रह्मा ब्रह्म त
25.
निज ब्रह्मा ब्रह्म तो । ब्रह्नादिका वंद्य तो गे बाई ॥
अचिंतचिंतन तो । सारासार गुह्य तो गे बाई ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु तो । जनी वनी कृपाळ तो गे बाई ॥
अर्थ :
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. २५
📿 जो न कळे वेदा शास्त्
25.
जो न कळे वेदा शास्त्रा अगोचर । तो हा कटी कर उभा विटे ॥१॥
गोड गोजिरे ध्यान मिरविले । ते आम्हा देखिले पंढरीये ॥२॥
संत समुदाय पताकांचे भार । करती जयजयकार महाद्वारी ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाची विश्रांती । तो हा रमापति पंढरीये ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २५
📿 जयाचिये वाचे विठोबाच
25.
जयाचिये वाचे विठोबाचे नाम । तयाचा तो जन्म सफळचि ॥१॥
तयासी काचणी नाही बा जाचणी । यम पायवणी वंदी त्याची 1 ॥२॥
हेचि निजसार नामाचा उच्चार । मंत्र हा निर्धार सुलभचि ॥३॥
सोयरा म्हणे पावन हे नाम । जपता सुखघाम वैकुंठीचे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. २५
📿 राम मिलण के काज सखी,
25.
राम मिलण के काज सखी, मेरे आरति उर मे जागी री ।
तड़पत-तड़पत कल न परत है, बिरहबाण उर लागी री ।
निसदिन पंथ निहारूँ पिवको, पलक न पल भर लागी री ।
पीव-पीव मै रटूँ रात-दिन, दूजी सुध-बुध भागी री ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २५
📿 काय मी करितो कशाने त
25.
काय मी करितो कशाने तरतो । नाम तुझे घेतो एक भावे ॥
नाम तुझे वाणी बोबडिया बोला । न ये मज चाली करु काय ॥
न ये मज गाणे न ये मज नाचणे । भावे आलो शरण तुझे पायी ॥
बोधला म्हणे देवा तु मज बोधिले । आवडीने ठेविले नाम माझे ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय २५ वा›
📿 अभंग क्र. २५
📿 🕉
25.
🕉
अध्याय २५ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय पंचविसावा - फलश्रुति 👉 दुसर्याचे शाप बाधणार नाहीत. मानवाशिवाय अन्य जन्म मिळणार नाही. तसेच आरोग्य लाभून पतिव्रता स्त्रीची प्राप्ती होईल व गुणी पुत्राचा लाभ होईल.
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 शेष आणि लक्ष्मी यांस भगवंताची आज्ञा›
📿 अभंग क्र. २५
📿 शेष आणि लक्ष्मी यांस
25.
शेष आणि लक्ष्मी यांस भगवंताची आज्ञा.
पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मज-सवे ॥१॥
आता तू वडील होईंगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे ॥२॥
देवकीउदरी राहावे जावोनी । मायेसी मागूनि पाठवितो ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २६
📿 शरीर संपति मायेचे टव
26.
शरीर संपति मायेचे टवाळ । वायाचि पाल्हाळ मिरवितोसि ॥१॥
नाम हेचि तारी विठ्ठल निर्धार । म्हणे हरि हरि एकी हेळा ॥२॥
स्मरता गोपाळनाम वंदिल काळयम । न लगति नेम मंत्रबाधा ॥३॥
नाम म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेचि नाम स्मरे का रे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. २६
📿 लक्षवरी बिल्वदळे माथ
26.
लक्षवरी बिल्वदळे माथा वाहे । आनंद न समाये महादेवा ॥१॥
बहुता काळाचे तेथे एक लिंग । होते भूमिभाग होऊ-निया ॥२॥
भोळा महादेव तेणे संतोषला । ह्मणे करी मला कोण पूजा ॥३॥
नामा ह्मणे पाहे निमित्याची वाट । पुराणी बोभाट असे त्याचा ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २६
📿 जे तुम्हा कळे ते करा
26.
जे तुम्हा कळे ते करा गोमटे । बरे का वोखटे गोड दिसे ॥१॥
मी तो झाले बोलोनी उतराई । तुमचिये पायी समर्पिले ॥२॥
होता जो वृत्तांत माझिये जीवींचा । बोलियेला वाचा तुम्हांपुढे ॥३॥
सोयरा म्हणे माझे सकळ गणगोत । तुंचि माझे हित करी देवा॥ ॥४॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २६
📿 साधनाच्या कांही न पड
26.
साधनाच्या कांही न पडे कचाटी । जावोनी कपाटी काय पाहू ॥१॥
सुंदर श्रीमुख विटे जे शोभले । कर मिरविले कटावरी ॥२॥
तो हा श्रीहरी उभा भिवरेतीरी । भक्ता अभयकरी पालवितो ॥३॥
कर्ममेळा म्हणे सर्व सुखाचे आगर । तो हा विटेवर उभा असे ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २६
📿 कुरंगिणी आपुली बालके
26.
कुरंगिणी आपुली बालके सांभाळी । तैसा वनमाळी आत्मालागी ॥
बहुत माझे लळे पुरविले सकळ । माउली कृपाळ अनाथांची ॥
उपकार सांगता नलगे आत पाहाता । सकल माझी चिंता दूर केली ॥
काये गा मी सांगो सांगता गा नये । सकाळ बाप माये पांडुरंग ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय २६ वा›
📿 अभंग क्र. २६
📿 🕉
26.
🕉
अध्याय २६ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय सव्विसावा - फलश्रुति 👉 कुलात कुणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहिसा होईल. मुले शत्रुत्वाने वागणार नाहीत.
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चौर्यकर्म - अभंग २३ ते २७›
📿 अभंग क्र. २६
📿 पाळतोनि जाती घरासी त
26.
पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥ गोपाळ संवगडे मेळावोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥ निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरित खेळताती ॥३॥ न कळे लाघव करी ऐशीं चोरी । एका जनार्दनी हरीं गोकुळांत ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २७
📿 रामकृष्ण माळ घाली का
27.
रामकृष्ण माळ घाली का अढळ । तुटेल भवजाळ मायामोह ॥१॥
होशील तु साधु न पवसी बाध । पूर्ण ब्रहानंद पावेल तुज ॥२॥
जपता रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नेम साधेल तुज ॥३॥
नामा म्हणे कृतार्थ पूर्ण मनोरथ । न लगति ते अर्थ माया फसे ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. २७
📿 ज्या कारणे वेद श्रुत
27.
ज्या कारणे वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचे ठेवणे क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविकाकारणे उभवोनी हात । उदारपणे देत भुक्ति-मुक्ति ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । सत्री क्षूद्र चांडाळ सरते पायी ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २७
📿 भांबावोनी प्राणी संस
27.
भांबावोनी प्राणी संसारी गुंतले । माझे म्हणोनि श्रमले भव नदी ॥१॥
नामाची सांगडी न बांधिती कोणी । चौऱ्यांशीची खाणी भोगिताती ॥२॥
आपुला आपण झाला असे वैरी । हिडे दारोदारी भीक मागा ॥३॥
बंका म्हणे नाम सांडोनी विठ्ठल । वाचे बोलती बोल वाउगाची ॥४॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २७
📿 सुख दुःख दोन्ही आमुच
27.
सुख दुःख दोन्ही आमुचे पदरी । पूर्वीच निर्धारी बांधियेली ॥१॥
आता का वाईट म्हणो ’कशासाठी । आपुली ती राहाटी भोग आम्ही ॥२॥
तुम्ही तो व्यापक सर्वांसी निराळे । आमुची कर्मफळे भोगू आम्ही ॥३॥
कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण । आमुची निजखूण कळली आम्हा ॥४॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २७
📿 कृष्ण सकळ जीवांचा जी
27.
कृष्ण सकळ जीवांचा जीव । जाणते जाणती तयाचा भाव । इतरा लोका संदेहो न कळे । महिमान तयाचा ॥१॥
आपण तो बाळ ब्रह्मचारी सकळ । जन्मले तयाचे उदरी ब्रह्ममाया न कळत । याची थोरवी येर लोक काये जाणती ॥२॥
हा तो सर्वाचा साक्षभूत । कोणा न कळे याचा आत । आता सांगेन तयाचा वृतांत ।
सावधान श्रोते हो ॥३॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय २७ वा›
📿 अभंग क्र. २७
📿 🕉
27.
🕉
अध्याय २७ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय सत्ताविसावा - फलश्रुति 👉 स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान पुन्हा प्राप्त होईल. हरवलेली वस्तू सापडेल.
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २७
📿 काना चिता का गाइला ।
२७.
काना चिता का गाइला । का घसी घसी चंदन लाविला ॥१॥
अपापर नाही चिन्हीला । तो चित्त चितारे डहकीला ॥२॥
कीरतन आगे नाचे लाई । स्यभदेव चिन्हे नही कोई ॥३॥
स्यभ देवकी सेवा जाणे । तो देव द्दष्टि व्है सकल पछाने ॥४॥