संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६१
📿 कळो नये तोचि चुकावित
2661.
कळो नये तोचि चुकाविता बरे । मग पाठमोरे काय काज ॥१॥
धरिलेती आता द्या जी माझा डाव । सांपडता भाव ऐसा आहे ॥धृपद॥
होतासी अंतरे झाकिलिया डोळी । तोचि मी हा न्याहाळी धरुनी दृष्टी ॥२॥
तुका म्हणे तुज रडीचीच खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गुरु - अभंग २६६१ ते २६६५›
📿 अभंग क्र. २६६१
📿 गुरु - अभंग २६६१ ते
2661.
गुरु - अभंग २६६१ ते २६६५
आहाच वाहाच झकविलें लोका 2661
आहाच वाहाच झकविलें लोका । ऐसिया ठका देव कैचा ॥१॥
शिकवूनी जन वंचला आपण । नरकी पतन होत असे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६२
📿 विश्वास तो देव । म्ह
2662.
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥
माझी वदवितो वाणी । जेणे धरिली धरणी ॥धृपद॥
जोडिली अक्षरे । नव्हेती बुद्धीच्या विचारे ॥२॥
नाही केली आटी । काही मानदंभासाठी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६३
📿 सुराणीची झालो लाडिकी
2663.
सुराणीची झालो लाडिकी एकली । वडील धाकुली आम्ही देवा ॥१॥
म्हणऊनि काही न घडे अव्हेर । गोमटे उत्तर भातुके ही ॥धृपद॥
काही एक नाही वंचिले वेगळे । मुळिचया मुळे स्थिरावले ॥२॥
लेवविलो अंगी आपली भूषणे । अळंकार लेणे सकळ ही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६४
📿 एक वेळ केले रिते कले
2664.
एक वेळ केले रिते कलेवर । आता दिली थार पांडुरंगा ॥१॥
पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचे ते काई सर्वभावे ॥धृपद॥
माझिया मरणे झाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाश ॥२॥
झाला ऐसा एका घाये येथे नाही । तुका म्हणे काही बोलो नये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गुरु - अभंग २६६१ ते २६६५›
📿 अभंग क्र. २६६४
📿 जळतिया घरा । कोण वस्
2664.
जळतिया घरा । कोण वस्ती करी थारा ॥१॥
तैसे अभागी पामर । गुरुपण मिरविती वरवर ॥२॥
नाही मंत्रशुद्धीचें ज्ञान । भलतियाचें फुंकिती कान ॥३॥
मनुष्य असोनी गुरु पाही । एका जनार्दनी ते नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६५
📿 पावतो ताडन । जरी हे
2665.
पावतो ताडन । जरी हे मोकलिते जन ॥१॥
मग मी आठवितो दुःखे । देवा सावकाश मुखे ॥धृपद॥
होती अप्रतिष्ठा । होतो वरपडा कष्टा ॥२॥
तुका म्हणे मान । होता उत्तम खंडन ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 गुरु - अभंग २६६१ ते २६६५›
📿 अभंग क्र. २६६५
📿 शिष्यापासून सेवा घेण
2665.
शिष्यापासून सेवा घेणे । हे तो लक्षण अधमाचें ॥१॥
ऐसे असतीं गुरु बहु । नव्हेंचि साहुं भार त्यांचा ॥२॥
एकपणे समानता । गुरुशिष्य उरतां उपदेश ॥३॥
एका जनार्दनी शरण । गुरु माझा जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६६
📿 धरावे ते भय । जाती अ
2666.
धरावे ते भय । जाती अंतरोनि पाय ॥१॥
झाल्या तुटी देववास । काय वांचोनि करावे ॥धृपद॥
कोणासी पारिखे । लेखू आपणासारिखे ॥२॥
तुका म्हणे असो । अथवा हे आता नसो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६६७
📿 आनंदाचा थारा । सुखे
2667.
आनंदाचा थारा । सुखे मोहरला झरा ॥१॥
ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥धृपद॥
अंकिता ऐसिया । होईल पावविले ठाया ॥२॥
तुका म्हणे ऐसे । दिले आभंड प्रकाशे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६७१
📿 व्हावया भिकारी हेचि
2671.
व्हावया भिकारी हेचि आम्हा कारण । अंतरोनि जन व्हावे दुरी ॥१॥
संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥
तुका म्हणे दुःखे उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकी देवा ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संत - अभंग २६७१ ते २६७२›
📿 अभंग क्र. २६७१
📿 संत - अभंग २६७१ ते २
2671.
संत - अभंग २६७१ ते २६७२
कलीमाजें संत जाले । टिळा टोपी लाविती भले ॥१॥
नाही वर्माचे साधन । न कळे हृदयी आत्मज्ञान ॥२॥
सदा सर्वदा गुरगुरी । द्वेष सर्वदा ते करी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संत - अभंग २६७१ ते २६७२›
📿 अभंग क्र. २६७१
📿 संत - अभंग २६७१ ते २
2671.
संत - अभंग २६७१ ते २६७२
कलीमाजे संत जाले । टिळा टोपी लाविती भले ॥१॥
नाही वर्माचे साधन । न कळे हृदयी आत्मज्ञान ॥२॥
सदा सर्वदा गुरगुरी । द्वेष सर्वदा ते करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६७२
📿 कोरडिया ऐशा काय सारू
2672.
कोरडिया ऐशा काय सारू गोष्टी । करु उठाउठी हित आधी ॥१॥
खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठे ॥धृपद॥
लौकिकाचा आड येईल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥
तुका म्हणे डांक लागे अळंकारे । मग नव्हे खरे पुटेविण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संत - अभंग २६७१ ते २६७२›
📿 अभंग क्र. २६७२
📿 होती पोटासाठीं संत ।
2672.
होती पोटासाठीं संत । नाही हेत विठ्ठली ॥१॥
तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥
घालुनी माळा मुद्रा गळा । दाविती जिव्हाळा वरवरी ॥३॥
एका जनार्दनी ते पामर । भोगिती अघोर यातना ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संत - अभंग २६७१ ते २६७२›
📿 अभंग क्र. २६७२
📿 होती पोटासाठीं संत ।
2672.
होती पोटासाठीं संत । नाही हेत विठ्ठली ॥१॥
तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥
घालुनी माळा मुद्रा गळा । दाविती जिव्हाळा वरवरी ॥३॥
एका जनार्दनी ते पामर । भोगिती अघोर यातना ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६७५
📿 बोलणे ते आम्ही बोलो
2675.
बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी । पडिले प्रसंगी काळाऐसे ॥१॥
जयामध्ये देव आदि मध्ये अंती । खोल पाया भिंती न खचेची ॥धृपद॥
करणे ते आम्ही करू एका वेळे । पुढिलिया बळे वाढी खुंटे ॥२॥
तुका म्हणे असो आज्ञेची धारके । म्हणऊनि एके बोले सारू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६७७
📿 पाठीलागे काळ येतसे य
2677.
पाठीलागे काळ येतसे या लागे । मी माझे वाउगे मध्ये ऐसे ॥१॥
आता अगी लागो ऐसिया वेव्हारा । तू माझा सोइरा पांडुरंगा ॥धृपद॥
वागविला माथा नसताचि भार । नव्हे ते साचार देखिले तो ॥२॥
तुका म्हणे केले जवळील दुरी । मृगजळ वरी आड आले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६७८
📿 द्रव्याचिया आशें । क
2678.
द्रव्याचिया आशें । कथा करणे सायासे ॥१॥
उभयंता नरका जोडी । मेळविलीं ती बापुडीं ॥२॥
निराश करुनी मन । करा कथा ते कीर्तन ॥३॥
देवा आवड भक्तीची । एका जनार्दनी साची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६७९
📿 माझे तो स्वभाव मज अन
2679.
माझे तो स्वभाव मज अनावर । तुज ही देता भार काही नव्हे ॥१॥
ऐसे कळो आले मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाही ॥धृपद॥
संपादितो तो अवघा बाह्य रंग । तुझा नाही संग अभ्यंतरी ॥२॥
तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट । असते निघोंट एकी जाती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६७९
📿 द्रव्य घेऊनियां कथा
2679.
द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥
तयांचियां दोषा नाही परिहार । वेदाचा विचार कुंठितची ॥२॥
शास्त्रांची तो मती न चाले सर्वथा । पुराणे हो तत्त्वता मौनावलीं ॥३॥
एका जनार्दनी दोषा नाही पार । रवरव निर्धारे भोगिताती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८०
📿 न व्हावा तो बरा मुळी
2680.
न व्हावा तो बरा मुळीच संबंध । विश्वासिका वध बोलिलासे ॥१॥
आता माझे हित काय ते विचारा । सत्यत्वे दातारा पांडुरंगा ॥धृ॥
नाही भाव परी म्हणवितो दास । नको देऊ यास उणे येऊ ॥२॥
तुका म्हणे का हो उद्धरिता दीन । मानीतसा सीण मायबापा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८१
📿 काय तुमचिया सेवे न व
2681.
काय तुमचिया सेवे न वेंचते गांठोळी । माझी टाळाटाळी करीतसा ॥१॥
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसे तरी सांगा निवडूनि ॥धृपद॥
कोण तुम्हा सुख असे या कौतुके । भोगिता अनेक दुःखे आह्मी ॥२॥
तुका म्हणे काय झालासी निर्गुण । आम्हा येथे कोण सोडवील ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६८१
📿 द्रव्य घेऊनिया उपदेश
2681.
द्रव्य घेऊनिया उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मी ॥१॥
द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मी ॥२॥
द्रव्य देऊनिया दान परतोनि घेती । सूकार ते होती जन्मोजन्मी ॥३॥
द्रव्य घेऊनिया रंगी जे नाचती । वैष्णव ते न होती जन्मोजन्मी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८२
📿 निष्ठुर यासाठी करितो
2682.
निष्ठुर यासाठी करितो भाषण । आहेसी सर्वज्ञ जाणता तू ॥१॥
ऐसे कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊ आता शरण त्यासी ॥धृपद॥
बैसलासी केणे करुनिया धीर । नाही येथे उरी दुसऱ्याची ॥२॥
तुका म्हणे आले अवघेच पायापे । आता मायबापे नुपेक्षावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६८२
📿 करिताती कथा । द्रव्य
2682.
करिताती कथा । द्रव्य मागती सर्वथा ॥१॥
नाही पुण्य दोघा गांठी । हीन भाग्य ती करंटीं ॥२॥
नैराश्य कथा भजन । तेणे तुष्ट नारायण ॥३॥
एका जनार्दनी वाणी । व्यास बोललें पुराणीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८४
📿 तुम्हा आम्हा सरी । य
2684.
तुम्हा आम्हा सरी । येथे कइच्याचा परी ॥१॥
स्वामिसेवा अळंकार । नाही आवडिये थार ॥धृपद॥
खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥
तुका म्हणे कोडे । आम्ही नाचो तुज पुढे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६८४
📿 प्रत्यक्ष ती कथा जगा
2684.
प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा ॥१॥
आपुली ती माता आपण भोगितां । प्रायश्चित सर्वथा काय द्यावे ॥२॥
पतिव्रतेनें जैसा पतीच वधिला । प्रायश्चित्त तिला कोणी द्यावे ॥३॥
माते बाळकासी विषपान दिले । प्रायश्चित या बोले कोणी द्यावे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८५
📿 कैचे भांडवल खरा हाती
2685.
कैचे भांडवल खरा हाती भाव । कळवळ्याने भाव दावीतसे ॥१॥
आता माझा अंत नको सर्वजाणा । पाहो नारायणा निवडूनि ॥धृपद॥
संतांचे उच्छिष्ट मागितले पंगती । करावे संगती लागे ऐसे ॥२॥
तुका म्हणे आलो दावूनि विश्वास । संचित ते नास पावे ऐसे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८६
📿 थोडे तुम्ही मागे होत
2686.
थोडे तुम्ही मागे होते उद्धरिले । मज ऐसे गेले वाया जीव ॥१॥
आता याचा काही न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तू ॥धृपद॥
तुज आळविता पापाची वसति । राहे अंगी किती बळ त्याचे ॥२॥
तुका म्हणे जैसे तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८७
📿 आम्ही म्हणो कोणी नाह
2687.
आम्ही म्हणो कोणी नाही तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥
हागे माझ्या भोगे केलासी परता । विश्वंभरी सत्ता नाही ऐसी ॥धृपद॥
आम्ही तुज असो देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितो ॥२॥
तुका म्हणे मज धरियेले काळे । पंचभूती खळे करूनिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८८
📿 आहे ते सकळ प्रारब्धा
2688.
आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती । यावे काकुलती यासी आता ॥१॥
ऐसा माझ्या मने सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाही ॥धृपद॥
अवघियांची जेव्हा सारावी करकर । भावबळे थार धरू येसी ॥२॥
तुका म्हणे तुज ठेवावे पुजून । आणीक तो गुण नाही येथे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६८८
📿 आडक्या कारणे जीव जात
2688.
आडक्या कारणे जीव जात । म्हणती आम्ही उदार भक्त ॥१॥
ऐसिया दांभिकांसी । दुरी होय हरी त्यांसी ॥२॥
गाजराची तुळा साची । वाट पाहाती विमानाची ॥३॥
एका जनार्दनी खोटा भाव । तयासी न भेटे देव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६८९
📿 सेवट तो होती तुझियान
2689.
सेवट तो होती तुझियाने गोड । म्हणऊनि चाड धरीतसो ॥१॥
देऊ भोगाभोग कलिवरचा भार । साहो तुज भार त्याचमधी ॥धृपद॥
तुझ्या बळे काही खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥
तुका म्हणे आम्ही चेंपलो या भारे । तुमचे ते खरे देवपण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६८९
📿 विषयप्राप्तीलागीं जा
2689.
विषयप्राप्तीलागीं जाण । धरी बकापरी ध्यान ॥१॥
विषयीक गायन करी । जैसा खर भुकें स्वरी ॥२॥
नाही संतचरणी मन । सदा विषयावरी ध्यान ॥३॥
विषय लोटी परता होई । एका जनार्दन पायी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९०
📿 ऐसाचि तो गोवा । न पा
2690.
ऐसाचि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥१॥
बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥धृपद॥
आम्हासी न कळे । तुम्ही झाकु नये डोळे ॥२॥
तुका म्हणे संगे । असो एक एका अंगे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६९०
📿 नाही ध्यान ते अंतरी
2690.
नाही ध्यान ते अंतरी । सदा विषयी दुराचारी ॥१॥
स्वप्नीं नेणे नामस्मरण । करी विषय सेवन ॥२॥
अतीत अभ्यागत । जया नावडे चित्तांत ॥३॥
एका शरण जनार्दनी । ऐसा पामर तो जनीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६९१
📿 वरीवरी दाविती आचार ।
2691.
वरीवरी दाविती आचार । अंतरी तो अनाचार ॥१॥
मुखी नाही कधी नाम । सदा काम विषयाचा ॥२॥
नेणे कधी संतसेवा । न करी देवा पूजन ॥३॥
शरण एका जनार्दनी । ऐसा जन्मला तो जनी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६९२
📿 वासना विषयी सदा वसे
2692.
वासना विषयी सदा वसे । तेथे देवा कोण पुसे ॥१॥
सदा तळमळी मन । करी ध्यान विषयांचें ॥२॥
रात्रंदिवस करी चिंता । नाठवी सर्वथा रामनाम ॥३॥
एका जनार्दनी नाही भाव । तंव कैंचा भेटे देव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९३
📿 नव्हेसी तू लांसी । म
2693.
नव्हेसी तू लांसी । माया आणिका त्या ऐसी ॥१॥
जे हे वाया जाती बोल । होती निर्फळचि फोल ॥धृपद॥
नव्हेसी दुबळी । काही नाही ते जवळी ॥२॥
तुका म्हणे खोटी । काही नव्हेसी करंटी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९४
📿 आम्हा बोल लावा । तुम
2694.
आम्हा बोल लावा । तुम्हा अनुचित हे देवा ॥१॥
ऐसे सांगा का व्यालेती । काय नाही तुम्हा हाती ॥धृपद॥
आता धरा दुरी । वाया दवडाया थोरी ॥२॥
तुका म्हणे ठायी । ऐसे विचारावे पायी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९५
📿 मरोनिया गेली माया ।
2695.
मरोनिया गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥
पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥धृपद॥
निढळासी निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥
तुका म्हणे देवाऐसी । आहो सरसी आपण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९७
📿 नव्हते ते कळो आले ।
2697.
नव्हते ते कळो आले । तरी बोले अबोला ॥१॥
तुज मज घातली तुटी । एका भेटीपासूनि ॥धृपद॥
आता याची न धरी चाड । काही कोड कवतुके ॥२॥
तुका म्हणे यावे जावे । एका भावे खंडले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६९७
📿 वेष घेउनी नुसता का ।
2697.
वेष घेउनी नुसता का । उगेच जगावरी रुसतां का ।
भोग देखोनि घुसता का । आम्ही भले म्हणोनि पुसतां का ॥१॥
थिता बाईल का सांडिली । आशा परवंधूं का धुंडिली ।
शुभ्र सांडोनि भगवी का गुंडिली । ऐसी भंडी कांहो मांडिली ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९८
📿 आता दोघामध्ये काय ।
2698.
आता दोघामध्ये काय । उरले होय वाणीजेसे ॥१॥
निष्ठुर हे केले मन । समाधान न करूनि ॥धृपद॥
झुरावे ते तेथींच्या परी । घरिच्याघरी अवघिया ॥२॥
तुका म्हणे देवपण । गुंडाळून असो दे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २६९८
📿 अभाविकांचे कर्म । तय
2698.
अभाविकांचे कर्म । तया न कळे कांही वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥
हरुषे मुखे नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनी वाहे ॥२॥
बोले जैसा का भाट । वर्म कांही न कळे नीट । नामस्मरण स्पष्ट । न घडे तया ॥३॥
ऐशियाची संगती । न घडावी निश्चिती । एका जनार्दनीक अप्रीति । तयाची देवा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २६९९
📿 मागितल्यास आस करा ।
2699.
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाही ॥१॥
म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ ते ॥धृपद॥
माझ्या मोहे तुज पान्हा । लोटे स्तना वोरसे ॥२॥
तुका म्हणे आळवणे । माझ्या देणे उत्तरा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७००
📿 आता बरे घरिच्याघरी ।
2700.
आता बरे घरिच्याघरी । आपली उरी आपणापे ॥१॥
वाइट बरे न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥धृपद॥
बोलो जाता वाढे बोल । वाया फोल खटखट ॥२॥
काकुलती यावे देवा । तो तो सेवा इिच्छतो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७००
📿 भलतीयासी म्हणती । अह
2700.
भलतीयासी म्हणती । अहो महाराज निश्चिती ॥१॥
ऐसे अंधळे हे जन । गेले भुलोन संसारे ॥२॥
महराज जनार्दन । नेणती तयाचे चरण ॥३॥
दीना महाराज म्हणती । एका जनार्दनी सांगूं किती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७०१
📿 आधी सोज्वळ करावा मार
2701.
आधी सोज्वळ करावा मारग । चालता ते मग गोवी नाही ॥१॥
ऐसा चालोनिया आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥धृपद॥
पळणे तो पळो सांडुनि का बळे । उपाधीच्या मुळे लाग पावे ॥२॥
तुका म्हणे येथे शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्री ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७०१
📿 सर्व महाराजाचा रावो
2701.
सर्व महाराजाचा रावो । विटेवरी पंढरीरावो ॥१॥
तया न जाती हे शरण । दीना घालिती लोटांगण ॥२॥
तारा म्हणतीं आम्हांसी । ऐसे अभागी ते दोषी ॥३॥
एका जनार्दनी नाही भाव । तया अवघेंचि वाव ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७०२
📿 स्वप्नामाजी नेणे देव
2702.
स्वप्नामाजी नेणे देवा । करी सेवा भूतांची ॥१॥
नाना साधन ते चेष्टा । तेणे कष्टा भरीं भरला ॥२॥
जे जे करी ते उपाधी । मंत्र जपे तो अविधी ॥३॥
सकळ मंत्रा मंत्रराज । एका जनार्दनी नेणे निज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७०३
📿 आम्हा कथा आवश्यक । य
2703.
आम्हा कथा आवश्यक । येर संपादू लौकिक ॥१॥
जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥धृपद॥
व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोवळा ॥२॥
कवतुके वावरे । तुका म्हणे त्या आधारे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७०४
📿 पाळितो वचन । परि बहु
2704.
पाळितो वचन । परि बहु भीते मन ॥१॥
करितो पायाशी सलगी । नये बैसो अंगसंगी ॥धृपद॥
जोडोनिया कर । उभे असावे समोर ॥२॥
तुका म्हणे संत । तुम्ही मी बहु पतित ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७०५
📿 जैसा तैसा आता । मज प
2705.
जैसा तैसा आता । मज प्रमाण अनंता ॥१॥
पाया पडणे न सोडी । पोटी तेच वर तोंडी ॥धृपद॥
एका भावे चाड । आदी तेचि अंती गोड ॥२॥
तुका म्हणे आम्हा । टळणेंचि नाही नेमा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७०८
📿 जाहला बहु दीन । मग म
2708.
जाहला बहु दीन । मग म्हणे नारायण ॥१॥
तया हीन पामरासी । ब्रह्महत्या घडल्या राशी ॥२॥
जे न करावे ते केले । मग राम म्हणोनि डोले ॥३॥
काय तयाचे ते गाणें । जैसे मोलाचें रडणे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७१०
📿 हे तो एक संतांठायी ।
2710.
हे तो एक संतांठायी । लाभ पायी उत्तम ॥१॥
म्हणविता त्याचे दास । पुढे आस उरेना ॥धृपद॥
कृपादान केले संती । कल्पाती ही सरेना ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । हाचि हेवा उत्तम ॥३॥