संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७६१
📿 डगमगी मन निराशेच्या
2761.
डगमगी मन निराशेच्या गुणे । हे तो नारायणे शांतवीजे ॥१॥
धीर तू गंभीर जीवन जगाचे । जळो विभागाचे आहाचते ॥धृपद॥
भेईल जीव हे देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वाया ॥२॥
तुका म्हणे आवश्यक हे वचन । पाळावेचि दान समयो आहे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६१
📿 विषया जो लंपट । तया
2761.
विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा ॥१॥
अमृत फळे पूर्ण आली । का गा जैसी परी जालीं । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणावी ॥२॥
धनलुब्धका नावडे धर्म । मद्यपिया नावडे कर्म । जारासी संतसमागम । नाठवेचि सर्वथा ॥३॥
स्त्रीलुब्ध परद्वारी । काय तया गीता निर्धारी । एका जनार्दनी हरी । नको संग तयाचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६२
📿 एक नरदेह नेणोनि वाया
2762.
एक नरदेह नेणोनि वाया गेले । एक न ठके म्हणोनि उपेक्षिले । एक ते गिळले ज्ञान गर्वे ॥१॥
एक ते साधनी ठकिले । एक ते करू करु म्हणतांचि गेले । करणे राहिलेंसे तैसे ॥२॥
यापरि अभिमान जगी । ठकवितसे अंगसंगीं । नडी लागवेगीं जाणत्यासी ॥३॥
जे जे करी साधन । तेथे होय अभिमान । नागवी लावणें तेथे । सावधांवा करी कोण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७६३
📿 आपण तो असा । समर्थ ज
2763.
आपण तो असा । समर्थ जी हृषीकेशा ॥१॥
करा करा बुझावणी । काय विलंब वचनी ॥धृपद॥
हेंगे ऐसे म्हणा । उठूनि लागेन चरणा ॥२॥
घेऊनिया सुखे । नाचेल तुका कवतुके ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६३
📿 विषयाचे अभिलाषे सबळ
2763.
विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथे मुक्ति केवी वसे ॥१॥
विषयतृष्णा सांडी मग तू साधन मांडी । वैराग्याची गोडी गुरुसी पुसे ॥२॥
स्त्रीपुरुष भावना भेदु भासे मना । तेथे ब्रह्माज्ञाना गमन कैंचें ॥३॥
कणुभरित जो डोळा शरीरासी दे दुःख । अणुमात्र विषय तो संसारदायक ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६४
📿 प्रत्यक्ष देव असोनी
2764.
प्रत्यक्ष देव असोनी नाही म्हणती । न कळे मुर्खा देशकपोर्ट धुंडिती ॥१॥
देहींच देही देव तो आहे । भ्रांतीचेनी लोभे नाहींसा होय ॥२॥
एका जनार्दनी सबळ ती भ्रांती । देही देव असोनी वाया हुडकिती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७६५
📿 तुम्ही तो सदैव । अधी
2765.
तुम्ही तो सदैव । अधीरपणे माझी हाव ॥१॥
जळो आशेचे ते जिणे । टोंकतसावे दीनपणे ॥धृपद॥
येथूनि सोडवा । आता अनुभवे देवा ॥२॥
तुका म्हणे झाले । एक मग हे निमाले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७६६
📿 कैसे भले देवा अनुभवा
2766.
कैसे भले देवा अनुभवा का नये । उशीर तो काय तुम्हापाशी ॥१॥
आहे ते मागतो दिसते जवळी । केल्यामध्ये कळि कोण साध्य ॥धृपद॥
नाही सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करी ॥२॥
तुका म्हणे हात आवरीला गुंती । माझे तव चित्ती नाही दुजे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६६
📿 हृदयस्थ असोनी का रे
2766.
हृदयस्थ असोनी का रे फिरसी वाया । दीप आणि छाया जयापरी ॥१॥
आत्मतीर्थी सुस्नात झालिया मन । आणिक साधन दुजे नाही ॥२॥
साधन ते मन करी आपुले आधीन । यापरते कारण आन नाही ॥३॥
एका जनार्दनी मनासी आवरी । मग तुं संसारी धन्य होसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६८
📿 जाणोनिया वेडा होसी क
2768.
जाणोनिया वेडा होसी का रे गव्हारा । भजें तू पामरा श्रीविठ्ठला ॥१॥
नका रे साधन व्युप्तत्तीचा भार । चुकवी वेरझारा विठ्ठलानामें ॥२॥
एका जनार्दनी विठ्ठलावांचुनी । सोडविता कोणी नाही दुजा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७६९
📿 करूनि कडविड । जमा घड
2769.
करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥१॥
होते तेचि झाले । नाम ठायीचे पडीले ॥धृपद॥
उतरले डाई । उत्तम सुलाख ते ताई ॥२॥
हिंडविता देशोदेश । तुका म्हणे नाही नाश ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७६९
📿 अष्टांग साधने करितात
2769.
अष्टांग साधने करिताती योगी । परी मन अव्यंगीं होत नाही ॥१॥
जिंकितांचि मन साधने साधती । न जिंकितां फजिती मागे पुढे ॥२॥
एका जनार्दनी काया वाचा मन । धरुनि बंधन त्यासी करी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७७२
📿 आम्ही भाविके हे काय
2772.
आम्ही भाविके हे काय जाणो खोडी । आइकोनि प्रौढी विनविले ॥१॥
नाही ऐसे येथे झालेती असता । वाढविली चिंता अधिक सोस ॥धृपद॥
न कळेचि आधी करिता विचार । न धरिता धीर आहाचता ॥२॥
तुका म्हणे आता वचने वचन । वाढले तिक्षण बुद्धी झाली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७७२
📿 अकळ तो खेळ नाकळे वेद
2772.
अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउले कुंथती भारवाही ॥१॥
ऐसा तो अकळ न कळेची कळा । लावियेला चाळा सर्व जीवा ॥२॥
परस्परें एकएका पै मैत्री । ऐशी चाले धात्री पंचभुते ॥३॥
जगपटतंतु आपणचि होय । ऐसा हा निश्चय सत्ता ज्याची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७७४
📿 पाहिजे ते आता प्रमाण
2774.
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥धृपद॥
ठेवीयली खूण करोनी संकेत । तया पाशी चित्त लागलेसे ॥२॥
जाणसी गे मते लेकरांचा लाड । नये पडो आड निष्ठुरता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७७५
📿 पडिला प्रसंग का मी ऐ
2775.
पडिला प्रसंग का मी ऐसा नेणे । संकल्प ते मने जिरवले ॥१॥
चेष्टाविले तरी सांगावे कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥धृपद॥
लावूनिया दृष्टि घेतली सामोरी । बैसले जिव्हारी डसोन ते ॥२॥
तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावे गोपाळा शीघ्र दान ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७७६
📿 मागील विसर होईंल सकळ
2776.
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥
दोहीचे ऐक्य घाली गडसंदी । स्थिरावली बुद्धी पायापाशी ॥धृपद॥
अहाच या केलो देहपरिचारे । तुमचे ते खरे वाटो नये ॥२॥
तुका म्हणे व्हावे लवकरी उदार । मी आहे सादर प्रतिग्रहा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७७८
📿 क्षोभ आणि कृपा मातेच
2778.
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥
क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडीता आवडीची ॥धृपद॥
शिकवू जाणे ते गोमाटियासाठी । लोभे नाही तुटी निश्चियेंसी ॥२॥
अवघेचि मिथ्या समया आरते । देता तो उचिते काय जाणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८०
📿 मी त्यासी अनन्य ती क
2780.
मी त्यासी अनन्य ती कोणा असती । ऐसे तव चित्ती विचारावे ॥१॥
आहे तो विचार आपणयापाशी । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबी ॥धृपद॥
शुभ शकून तो शुभ लाभे फळे । पुढील ते कळे अनुभवे ॥२॥
तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७८०
📿 लांब लांब तुम्ही सां
2780.
लांब लांब तुम्ही सांगाल गोष्टी । तत्त्वेंसी भेटी करी उठाउठी ॥१॥
मीपण जोंवरी गेले नाही । तोंवरी तुम्ही केले काई ॥२॥
मीपण देही प्रपंच दृष्टी । कोरड्या काय सांगाल गोष्टी ॥३॥
एका जनार्दनी बांधावें सत्य । बोलामाजीं तेणेंक दाखविले तत्त्व ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८१
📿 बहु कृपावंते माझी मा
2781.
बहु कृपावंते माझी मायबापे । मी माझ्या संकल्पे अंतरलो ॥१॥
संचिताने नाही चुको दिली वाट । लाविले अदट मजसवे ॥धृपद॥
आता मी रुसतो न कळता वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥
तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमुचीया आसे उद्वेग त्या ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७८१
📿 वरीवरी दावी भक्ति ।
2781.
वरीवरी दावी भक्ति । अंतरी असे कामासक्ति ॥१॥
माझे घर माझे कलत्र । माझे गोत्र माझा पुत्र ॥२॥
ऐसा प्रपंची गुंतला । तयावरी काळघाला ॥३॥
एका जनार्दनी शरण । काळ वंदितसे चरण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७८२
📿 अंतरी शुद्ध नाही भाव
2782.
अंतरी शुद्ध नाही भाव । वरी मिरवी वैराग्य ॥१॥
जळो जळो त्याचे ज्ञान । काय नटाचे भाषण ॥२॥
टिळा टोपी दावी सोंग । बकध्याना मिरवी रंग ॥३॥
शरण एका जनादनीं । त्याचा मंत्र न घ्यावा कानी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८३
📿 आता सांडू तरी हाती न
2783.
आता सांडू तरी हाती ना पदरी । सखी सहोदरी मोकलीलो ॥१॥
जनाचारामध्ये उडाला पातेरा । झालो निलाजिरा म्हणऊनि ॥धृपद॥
कोणाचिया दारा जावेनासे झाले । म्याच विटंबिले आपणासी ॥२॥
कोण झाला माझे बुद्धीसी संचार । नाही कोठे थार ऐसे झाले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८४
📿 जेथे जातो तेथे पडतो
2784.
जेथे जातो तेथे पडतो मतोळा । न देखिजे डोळा लाभ काही ॥१॥
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि का हा श्रम पावतो मी ॥धृपद॥
नव्हेचि तुम्हास माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
भोग तव झाला खरा भोगावा तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७८४
📿 किती काकुलती यावे ।
2784.
किती काकुलती यावे । किती वेळां फजीत व्हावे ॥१॥
न भीचि तो यमदंडा । जैसा मेंढा मातलासे ॥२॥
भलतिया वरी धांवें । श्वान जैसे ते स्वभावे ॥३॥
एका जनार्दनी जाण । वाहतो देवाची तो आण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८५
📿 का जी आम्हा होते दोष
2785.
का जी आम्हा होते दोषाचे दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥
पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥धृपद॥
का जी आम्हावरी आणिकाची सत्ता । तुम्हासी असता जवळिके ॥२॥
तुका म्हणे पायी केले निवेदन । उचित ते दान करी सत्ता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७८५
📿 किती बोलू किती सांगू
2785.
किती बोलू किती सांगू । नायकती त्यांचा न सरे पांगु ॥१॥
जाता न राहाती आडवाटे । मोडती काटे कर्मधर्म ॥२॥
वाउगे पंथे असती जनीं । तसे मांडणी गुंतू नका ॥३॥
एका जनार्दनी लडिवाळ । पूर्ण कृपाळू संतांचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८६
📿 निंदावे हे जग । ऐसा
2786.
निंदावे हे जग । ऐसा भागा आला भाग ॥१॥
होते तैसे आले फळ । गेले निवडूनि सकळ ॥धृपद॥
दुसऱ्याच्या मता । मिळेनासे झाले चित्ता ॥२॥
तुका झाला सांडा । विटंबिती पोरे रांडा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७८७
📿 माझे माथा तुझा हात ।
2787.
माझे माथा तुझा हात । तुझे पायी माझे चित्त ॥१॥
ऐसी पडियेली गाठी । शरीरसंबंधाची मिठी ॥धृपद॥
येरयेरांपाशी । सांपडोन गेलो ऐसी ॥२॥
तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७८७
📿 पवित्र अंतर शुद्ध कर
2787.
पवित्र अंतर शुद्ध कर मन । तेणे घडें जाण सर्व कर्म ॥१॥
वेदयुक्त मंत्र जपतां घडें पाप । मी मी म्हणोनी संकल्प उठतसे ॥२॥
यज्ञादिक कर्मे घडता सांग । मी मी संसर्ग घडता वाया ॥३॥
दानधर्मविधी धरिता शुद्ध मार्ग । मी मी म्हणता याग वाया जाय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७९१
📿 जेथे कष्टे न लभे ज्ञ
2791.
जेथे कष्टे न लभे ज्ञान । आधी पाहिजे समाधान । योगयाग तपाचे नाही कारण । शांति क्षमा दया जाण मुख्य धरी ॥१॥
आणिक नको रे साधन । वाया शीण ब्रह्माज्ञान । आम्ही मुखी गाऊ रामकृष्ण । हेंचि समाधान आमुचे ॥२॥
आलिया जन्माचें सार्थक । जन्मजरा निवारुं दुःख । कायावाचामनें संतसेवा देख । दुजा हेतु नाही मनी ॥३॥
जन तोचि जनार्दन । साक्षी तया लोटांगण । एका जनार्दना शरण । कायावाचामनेंसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७९३
📿 सत्य आठविता देव । जा
2793.
सत्य आठविता देव । जातो भेंव पळोनि ॥१॥
न लगे काही करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥धृपद॥
भावे भाव राहे पायी । देव तै संनिध ॥२॥
तुका म्हणे कृष्णनामे । शीतळ प्रेमे सर्वांसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७९५
📿 उपाधि या नांव भूतांच
2795.
उपाधि या नांव भूतांचा तो द्वेष । तो तू या निःशेष सांडीं बापा ॥१॥
सर्वांठायीं देव जगी तो भरला । व्यापूनियां ठेला जळीं स्थळीं ॥२॥
काम अकाम सकाम निष्काम । हे सोपे उपाय साधकांसी ॥३॥
आसन ध्यान धारण ते ध्येय । हे सोपे उपाय साधकांसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २७९८
📿 सत्य असत्य दोनीं देह
2798.
सत्य असत्य दोनीं देहींच भासत । तेणेंचि नासत सर्व काम ॥१॥
एकासी वंदावें एकासी निंदावें । ऐसिया भावा काय सत्य ते मानावे ॥२॥
देह जातो गोष्टी असत्य न बोलू । सर्वज्ञ विठ्ठ्लू म्हणो आम्ही ॥३॥
सत्य असत्याची वार्ता नको देवा । एका जनार्दनी जीवा हेंचि प्रेम ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २७९९
📿 विनवीजे ऐसे काही । उ
2799.
विनवीजे ऐसे काही । उरले नाही यावरी ॥१॥
आता असो पंढरीनाथा । पायी माथा तुमचिये ॥धृपद॥
मागे सारियेली युक्ती । काही होती जवळी ते ॥२॥
निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८००
📿 आता येथे झाली जीवा स
2800.
आता येथे झाली जीवा संवसाटी । होते तैसे पोटी फळ आले ॥१॥
आता धरिले ते नो सोडी चरण । सापडले धन निजठेवा ॥धृपद॥
आता हा अळस असो परता दुरी । नेदावी ते उरी उरो काही ॥२॥
आता याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहो रूप ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २८००
📿 एक एक मंत्र करिती अन
2800.
एक एक मंत्र करिती अनुष्ठान । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥१॥
एक एक तीर्था करिती प्रदक्षिणा । परि विठोबाचे चरण दुर्लभ ते ॥२॥
एक एक ग्रामी करिती भ्रमण । परि विठोबाचे प्राप्ती दुर्लभ ते ॥३॥
एका जनार्दनी सत्संगावांचुनीं । परि विठोबाची मिळणी दुर्लभ ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०२
📿 पराधीन माझे करूनिया
2802.
पराधीन माझे करूनिया जीणे । सांडी काय गुणे केली देवा ॥१॥
उदार हे कीर्ति असे जगामाजी । का ते ऐसे आजि पालटिले ॥धृपद॥
आळवितो परी न पुरेचि रीग । उचित तो त्याग नाही तुम्हा ॥२॥
तुका म्हणे का बा मुळींच व्यालासी । ऐसे का नेणसी पांडुरंगा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २८०२
📿 स्नान दानाचें एक फळ
2802.
स्नान दानाचें एक फळ । त्याहुनी नामाचे सुफळ । कोटी गुणें विशाळ । पुण्य हाता चढतसे ॥१॥
धन्य धन्य नाम श्रेष्ठ । गाय अखंड नीळकंठ । आणिक श्रेष्ठ श्रेष्ठ । नाम मुखी जपताती ॥२॥
नाम त्रिभुवनी साजिरे । नाम पावन गोजिरे । एक जनार्दनी निर्धारे । सांगे ब्राह्मा उभारूनी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०३
📿 नेणपणे नाही केला हा
2803.
नेणपणे नाही केला हा बोभाट । आता आली वाट कळो खरी ॥१॥
आता बहु शीघ्र यावे लवकरी । वाट पाहे हरी भेटी देई ॥धृपद॥
समर्थाच्या बाळा करुणेचे भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥२॥
तुका म्हणे बहु बोलिले बडिवार । पडिले अंतर लौकिकी ते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०४
📿 जे जे केले ते ते साह
2804.
जे जे केले ते ते साहे । कैसे पाहे भाविक ॥१॥
ओवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥धृपद॥
काय होय नव्हे करू । नेणे धरू सत्ता ते ॥२॥
तुका म्हणे कटी कर । उभे धीर धरूनि ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २८०४
📿 ज्याचे नाम स्मरतां क
2804.
ज्याचे नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥
करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥
एका जनार्दनी तयाचे बंधन । कोण करील खंडन जन्म कर्मा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०५
📿 नाही मज कृपा केली पा
2805.
नाही मज कृपा केली पांडुरंगे । संताचिया संगे पोट भरी ॥१॥
चतुराचे सभे पंडित कुशल । मी काय दुर्बळ विष्णुदास ॥२॥
तुका म्हणे नेणे करू समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २८०५
📿 न लगे न लगे जीवाचा त
2805.
न लगे न लगे जीवाचा तो नाश । नाम गांता उल्हास माना चित्ती ॥१॥
पंचाग्नि साधन नको धूम्रपान । योगयाग तपन नको कांही ॥२॥
सुखें वाजवा टाळी मुखी नामघोष । पातकांचा नाश कल्पकोडी ॥३॥
एकाजनार्दनी नाम एक समर्थ । तेणे स्वार्थ पुरे सर्व जीवां ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०६
📿 तुम्ही माझा देवा करा
2806.
तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाही विचार मजपाशी ॥१॥
आता दोही पक्षी लागले लांछन । देवभक्तपण लाजविले ॥धृपद॥
एकांती एकले न राहे निश्चळि । न बैसे चपळ मन ठायी ॥२॥
पायी महत्वाची पडिली शृखळा । बांधविला गळा स्नेह हाती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०७
📿 बोलिलिया गुणी नाही प
2807.
बोलिलिया गुणी नाही पाविजेत । देवा नाही होत हित तेथे ॥१॥
कवतुक तुझे न कळे यापरि । घेसील ते शिरी काय नव्हे ॥धृपद॥
नाही मिळे येत संताचिया मता । पुराणी पाहता अघटित ॥२॥
तुका म्हणे पायी निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८०८
📿 हा तो नव्हता दीन । ट
2808.
हा तो नव्हता दीन । टाळायाचा ऐसा क्षण ॥१॥
का जी नेणो राखा हात । कैसे देखावे रडत ॥धृपद॥
दावूनिया आस । दूर पळविता काशास ॥२॥
तुका म्हणे धाव । येता न पुरेचि हाव ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८›
📿 अभंग क्र. २८०८
📿 साधावया स्वरुपसिद्धी
2808.
साधावया स्वरुपसिद्धी । सिद्ध साधका समाधी । बैसोनि ध्यानस्थ बुद्धी । परी तो हरी न सांपडे ॥१॥
धन्य धन्य वैष्णवसंग । खेळे तेथे पांडुरंग । कीर्तनी नाचतसे स्वयंभ । सदा काळ सर्वदा ॥२॥
घेता नाम धांवे विठ्ठल । नको तप नको मोल । न लगती कष्ट बहुसाल । तो कृपाळु दीनांचा ॥३॥
एका जनार्दनी शरण । भक्तीस तुष्टें नारायन । त्यांचे करिता चिंतन । आपोआप येतसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २८१०
📿 आर्तभूता द्यावे दान
2810.
आर्तभूता द्यावे दान । खरे पुण्य त्या नावे ॥१॥
होणार ते सुखे घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥धृपद॥
सत्य संकल्पचे साठी । उजळा पोटी रविबिंब ॥२॥
तुका म्हणे मनी वाव । शुद्ध भाव राखावा ॥३॥