संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९३३
📿 का जी धरिले नाम । तु
933.
का जी धरिले नाम । तुम्ही असोनि निष्काम ॥१॥
कोणा सांगतसा ज्ञान । ठकाठकीचे लक्षण ॥धृपद॥
आवडीने नाचे । आहे तरी पुढे साचे ॥२॥
तुका म्हणे प्रेम । नाही भंगायाचे काम ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९३६
📿 शिष्यांची जो नेघे से
936.
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखे ॥१॥
त्याचा फळे उपदेश । आणिका दोष उफराटे ॥धृपद॥
त्याचे खरे ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावी ॥२॥
तुका म्हणे सत्य सांगे । येवोत रागे येतील ते ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पदप्राप्ति - अभंग ९३६›
📿 अभंग क्र. ९३६
📿 पदप्राप्ति - अभंग ९३
936.
पदप्राप्ति - अभंग ९३६
अहिरावणे राम धरुनिया नेला थोर मांडिले निर्वाण ।
घायातळी राम उभा करुनियां म्हणतसे करी रे स्मरण ॥१॥
जगाच्या संकटीं रामाते स्मरती राम स्मरावें कवण॥धृ०॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९३७
📿 तंव ते जगन्माता म्हण
937.
तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता | कर्ता करविता कोण याचा ॥१॥
हा तुमचा दास आहे अंतरंग | काय या उद्वेग करणे असे ॥२॥
सर्व भार याचा लागे चालवणे | ऋणवई केंले येणे जन्मोजन्मी ॥३॥
तुम्हापरते यासी जिवलग सोयरे | कोण आहेत दुसरे लोभापर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९३८
📿 आणीक कोणाचा न करी मी
938.
आणीक कोणाचा न करी मी संग । जेणे होय भंग माझ्या चित्ता ॥१॥
विठ्ठलावाचूनि आणीक जे वाणी । नाइके मी कानी आपुलिया ॥धृपद॥
समाधानासाठी बोलावी हे मात । परि माझे चित्त नाही कोठे ॥२॥
जिवाहूनि मज तेचि आवडती । आवडे ज्या चित्ती पांडुरंग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९३९
📿 आशा हे समूळ खाणोनि क
939.
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हाचि गोसावी व्हावे तेणे ॥१॥
नाही तरी सुखे असावे संसारी । फजिती दुसरी करू नये ॥धृपद॥
आशा मारूनिया जयवंत व्हावे । तेव्हाचि निघावे सर्वातूनि ॥२॥
तुका म्हणे जरी योगाची तांतडी । आशेची बीबुडी करी आधी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९४०
📿 निष्ठावंत भाव भक्तां
940.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास । पाहो नये वास आणिकाची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाही ऐकिला ऐसा कोणी ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९४१
📿 नामाचे चिंतन प्रगट प
941.
नामाचे चिंतन प्रगट पसारा । असाल ते करा जेथे तेथे ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्चयेसी । प्रतिज्ञा हे दासी केली आह्मी ॥धृपद॥
गुण दोष नाही पाहात कीर्तनी । प्रेमे चक्रपाणी वश्य होय ॥२॥
तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४›
📿 अभंग क्र. ९४१
📿 गोड साखरसे गोड साखरस
941.
गोड साखरसे गोड साखरसे । रामनाम रसे चवी आली ॥१॥
देठीचे फळ देठी पिके । रान तोडितां चवी चाखे ॥२॥
न फोडी न तोडी सगळेंचि सेवी । ब्रह्मादिका तो वाकुल्या दावी ॥३॥
एका जनार्दनी घेतली गोडी । जीव गेला तरी मी न सोडी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९४२
📿 सकळिका नमस्कार करुनी
942.
सकळिका नमस्कार करुनी यादवरावो | सांगे जीवींचा भावो तयांप्रती ॥१॥
तुमचे कृपादृष्टि करावे भोजन | येणे होईल संपूर्ण व्रतसिद्धी ॥२॥
हेचि आवडी आहे बहु माझ्या जीवी | ते आजी गोसावी पूर्ण कीजे ॥३॥
क्षण एक बसावे स्वस्थ अंत:करणे | संकल्पिले नारायणे तुळसीदळ ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४›
📿 अभंग क्र. ९४२
📿 रघुवीरस्मरणें चित्त
942.
रघुवीरस्मरणें चित्त माझे रंगले वो बाई ।
आसनींशयनी भोजनी भोजनी त्याविण न रुचे काई ॥१॥
जीवींचे जीवन माझे त्रैलोक्याचें सुख । त्यासी पाहता सर्व हरली तहानभुक ।
ब्रह्मानंदे नाचूं लागे निरसुनी गेले दुःख ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९४४
📿 गासी तरि एक विठ्ठलचि
944.
गासी तरि एक विठ्ठलचि गाई । नाही तरि ठायी राहे उगा ॥१॥
अद्वैती तो नाही बोलाचे कारण । जाणीवेचा सीण करिसी वाया ॥२॥
तुका म्हणे किती करावी फजिती । लाज नाही चित्ती निलाजिरा ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९४५
📿 जयाचिये वाचे नये हा
945.
जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥१॥
शत्रु तो म्या केला न म्हणे आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावे ॥२॥
जयासी नावडे विठोबाचे नाम । तो जाणा अधम तुका म्हणे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९४६
📿 भोळा कर्पुरगौर भोळे
946.
भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचे मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥
भोळे याचे गळा शोभे रुडमाळा । अर्धांगी ते बाळा पर्वताची ॥२॥
भोळें ज्याचे मन भोळे ज्यांचें ध्यान । भोळे ज्याचे वदन शोभतसे ॥३॥
एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा । भरो माझे डोळा सदोदित ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९४७
📿 जीव तोचि देव भोजन ते
947.
जीव तोचि देव भोजन ते भक्ती । मरण तेचि मुक्ति पाखांड्याची ॥१॥
पिंडाच्या पोषके नागविले जन । लटिके पुराण केले वेद ॥धृपद॥
मना आला तैसा करिती विचार । म्हणती संसार नाही पुन्हा ॥२॥
तुका म्हणे पाठी उठती यमदंड । पापपुण्य लंड न विचारीती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९४७
📿 पंचविसांचे दृष्टी ।
947.
पंचविसांचे दृष्टी । शिवा नाही तेथे भेटी ॥१॥
छत्तिसां वेगळा । भरला असे तो निराळा ॥२॥
चाळिसाचे ध्यानीं मनी । कदा नये शुळपाणी ॥३॥
ऐसे विचारे भागले । तया नाही रुप कळलें ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९४८
📿 मग केशव म्हणे माझे प
948.
मग केशव म्हणे माझे परिसा वचन | गुज मी सांगेन अंतरीचे ॥१॥
व्रत तप दान सकळ कर्मक्रिया | एक भूतदया असे जेथे ॥२॥
तोचि सत्य मानी भक्त आणि ज्ञानी | न विसंबे निर्वाणी जीवे त्यासी ॥३॥
ज्ञानाचे सौभाग्य भक्ति आणि वैराग्य | तयाचे आरोग्य प्रेमरस ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९४८
📿 पांच पांचाचा मिळोनि
948.
पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥
कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥
विरुपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥
एका जनार्दनी प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृद्धु ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९४९
📿 आशा तृष्णा माया अपमा
949.
आशा तृष्णा माया अपमानाचे बीज । नासिलिया पूज्य होईजेते ॥१॥
अधीरासी नाही चालो जाता मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचे ॥२॥
तुका म्हणे नाही आणिकासी बोल । वाया जाय मोल बुद्धीपाशी ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९४९
📿 महा मुक्ति क्षेत्र त
949.
महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचे तारक | उपमेसि आणीक नाही दुजे ॥१॥
ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार | नामे निरंतर गर्जंतसे ॥२॥
येवढ तीर्थ जवळी असता पै समर्थ | कोण भाग्यहत दैन्य भाकी ॥३॥
जीवन्मुक्त ज्ञानी येथे पुंडलिक मुनि | बैसलासे ध्यानी परलक्षी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९४९
📿 श्रवण नयन घ्राण रसन
949.
श्रवण नयन घ्राण रसन । यमाजीं कोण ज्ञान प्रमाण॥महादेव ॥१॥
इंद्रियां अतीत आपण । देखिजें हे ज्ञान कारण॥महादेव ॥२॥
जन वन जीवन निरंजन । यामाजीं कवण करु भजन॥महादेव ॥३॥
एका जनार्दनी जन । तो भजका तो मुख्य भजन॥महादेव ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९५०
📿 सकाम निष्काम वाचे जप
950.
सकाम निष्काम वाचे जपे नाम | ती माझा परम प्राणसखा ॥१॥
जीवाहूनि आवडता न करी जीवापरता | पूजी परम देवता भावे त्यासी ॥२॥
हे माझी प्रसिद्धि जगी ब्रीदावळी | हरिदासाचे कुळी वोळंगे सदा ॥३॥
जन्मोनि ज्याचे कुळी एक हरिदास | धन्य त्याचा वंश पुण्यशीळ ॥॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५०
📿 निर्गुण निराकार अवयव
950.
निर्गुण निराकार अवयवरहित । जो शब्दरुपातीत शिव जाण ॥१॥
चहू वांचांवेगळा पांचांसी निराळा । तो असे व्यापाला सर्वांघटी ॥२॥
ध्यानी मनी नये समाधी साधनी । तो भक्तांचे ध्यानीं तिष्ठतसे ॥३॥
एका जनार्दनी नामरुपा वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव जाणा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५१
📿 मोक्षाचे आम्हासी नाह
951.
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशी पुरविता ॥धृपद॥
ज्याचे त्यासी देणे कोण ते उचित । मानूनिया हित घेतो सुखे ॥२॥
तुका म्हणे सुखे देई संवसार । आवडीसी थार करी माझे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९५१
📿 तंव म्हणती द्विज परि
951.
तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी | प्रतिपादिले वेदी जेजे धर्म॥१॥
ते ते आचरावे विहित क्रियाकर्म | जे जे वर्णाश्रमे आले जया ॥२॥
तेचि एक धन्य जगी देहधारी | असता संसारी जीवन्मुक्त ॥३॥
आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म | शौच नित्यनेम सत्यवाणी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५१
📿 परपश्यंती मध्यमा वेग
951.
परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥
आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहू वांचा शिव जाणा ॥२॥
एका जनार्दनी जीवांचें जीवन । सर्वा घटी पूर्ण शिव जाणा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००›
📿 अभंग क्र. ९५२
📿 चिंतनासी न लगे वेळ ।
952.
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावे ॥१॥
सदा वाचे नारायण । ते वदन मंगळ ॥धृपद॥
पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥२॥
ऐसे उपदेशी तुका । अवघ्या लोका सकळा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 तीर्थावळी›
📿 अभंग क्र. ९५२
📿 तुम्ही सदाचार महंत ब
952.
तुम्ही सदाचार महंत ब्रह्मवादी | तुमची वाग्नदी ब्रह्मरूप ॥१॥
सत्य वचन जळ पवित्र ते निर्मळ | कृतार्थ तेणे केवळ जालोंसे मी ॥२॥
हा तुमचा विववास दृढ आहे मज | तुम्ही माझे पूज्य परम देव ॥३॥
स्नानाचा प्रकार आहे पंचविध | सांगेन विद्गद भाव त्याचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८›
📿 अभंग क्र. ९५२
📿 एक दोन तीन पांचा वेग
952.
एक दोन तीन पांचा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥१॥
सात पांच बारा चौदा वेगळा । आहे तो निराळा शिव एक ॥२॥
भेदा अभेदा सोळांसी वेगळा । एका जनार्दनी निराळा शिव एक ॥३॥