संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०१२
📿 भगवे तरी श्वान सहज व
3012.
भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथे अनुभवाचा काय पंथ ॥१॥
वाढवुनी जटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज स्थिति ॥धृपद॥
कोरोनिया भूमी करिती मधी वास । तरी उंदिरास काय वाणी ॥२॥
तुका म्हणे ऐसे कासया करावे । देहासी दंडावे वाउगेंचि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०१४
📿 बरवी हे वेळ सांपडली
3014.
बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धी संचितासी ॥१॥
येणे पंथे माझी चालिली पाउले । दरुषण झाले संता पायी ॥धृपद॥
त्रासिले दरिद्रे दोषा झाला खंड । त्याचि काळे पिंड पुनीत झाला ॥२॥
तुका म्हणे झाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०१४
📿 देह भोगितसे मुख्य गो
3014.
देह भोगितसे मुख्य गोडी । स्त्री भोगतो आवडी ॥१॥
स्त्री हाती देख । वाढे प्रपंचाचें दुःख ॥२॥
जे जे आणि ते ते थोडे । धनधान्य आवडे कुडे ॥३॥
ऐसा भुलला संसारा । लक्ष चौर्यांयशीं वेरझारा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०१६
📿 जयासी नावडे वैष्णवाच
3016.
जयासी नावडे वैष्णवाचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरी ॥१॥
अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाही जया ॥धृपद॥
मंजुळवदनी बचनागाची कांडी । शेवटी विघडी जीवप्राणा ॥२॥
तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०१७
📿 व्हावे निसंतान । हें
3017.
व्हावे निसंतान । हेंचि एक बरे जाण ॥१॥
येर श्वान ते सूकर । जन्मा येवोनिया खर ॥२॥
मातापित्यांचा कंटाळा । न पहावे त्या चांडाळा ॥३॥
देखतांचि सचेल स्नान । करावे ते पाहुनी जाण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०२०
📿 पाषाण प्रतिमा सोन्या
3020.
पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हे तो हाती एका समर्थाचे ॥१॥
अनामिका हाती समर्थाचा सिक्का । न मानिता लोका येईल कळो ॥२॥
तुका म्हणे येथे दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०२१
📿 मातेसी न मिळे खावयास
3021.
मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न ॥१॥
म्हणे बाईल माझी संसारी बहु । मातेने मज बुडवलें बहु ॥२॥
मातेने माझा संसार बुडविला । माझ्या बाइलेने वाढविला ॥३॥
माता माझी अभागी करंटी । बाईल प्रत्यक्ष सभागी मोठी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०२२
📿 बाइलेचा जाहला दास ।
3022.
बाइलेचा जाहला दास । न करी आस मातेची ॥१॥
नव महिने वोझे वागवून । तिचा उतरी तो शीण ॥२॥
बाइलेच्या बोला । धरी मातेसी अबोला ॥३॥
एका जनादनीं पुत्र । जन्मला तो अपवित्र ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०२३
📿 आजिवरी होतो संसाराचे
3023.
आजिवरी होतो संसाराचे हाती । आता ऐसे चित्ती उपजले ॥१॥
तुला शरणागत व्हावे नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥धृपद॥
विसरलो काम याजसाठी धंदा । सकळ गोविंदा माझे तुझे ॥२॥
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवी झाली तैसी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०२४
📿 धन्यधन्य ज्यास पंढरी
3024.
धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥१॥
बहु खाणीमध्ये होत कोणी एक । त्रिगुण कीटक पक्षिराज ॥धृपद॥
उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघेचि सकळ चतुर्भुज ॥२॥
अवघा विठ्ठल तेथे दुजे नाही । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०२४
📿 बाईल सांगतांचि गोठी
3024.
बाईल सांगतांचि गोठी । म्हणे मातेसी करंटी ॥१॥
जन्मापासुनी आमुचे मागे । अवदसा लागली सांगे ॥२॥
इचे उत्तम नाहींत गुण । ऐसा बोले अभागी जाण ॥३॥
नरदेही ते गाढव । एक जनार्दनी नाही भाव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०२६
📿 विठ्ठलावांचोनि ब्रम्
3026.
विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जे बोलती । वचन ते संती मानू नये ॥१॥
विठ्ठलावाचूनि ज्या ज्या उपासना । अवघाचि जाणा श्रमचि तो ॥धृपद॥
विठ्ठलावाचूनि सांगतील गोष्टी । वाया ते हिंपुटी होती जाणा ॥२॥
विठ्ठलांवाचूनि जे काही जाणती । तितुल्या वित्पत्ती वाउगीया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०२७
📿 सर्व काळ डोळा बैसो न
3027.
सर्व काळ डोळा बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥
धाड पडो माझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥धृपद॥
जळो अंतरीचे सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचे ॥२॥
सकळा चरणी गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०२८
📿 मधुरा उत्तरासवे नाही
3028.
मधुरा उत्तरासवे नाही चाड । अंतरंगी वाड प्रेम असो ॥१॥
प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो ज्ञान मूर्ख बरा ॥धृपद॥
जननिंदा होय तो बरा व्यापार । थोरवीचा भार कामा नये ॥२॥
तुका म्हणे भाव निष्ठावंत चित्ती । दया क्षमा शांत सर्वा भूती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०२८
📿 निर्धन पुरुषाची देखा
3028.
निर्धन पुरुषाची देखा । स्त्री बोले अतिशय ऐका ॥१॥
दिवसा पोराची ताडातोडी । रात्रीं तुमची वोढावोढी ॥२॥
नाही घरी खावया अन्न । संततीने भरले सदन ॥३॥
एका जनार्दनी देवा । ऐसा स्त्रीचा हेलावा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०३०
📿 स्त्री पुत्र दारा धन
3030.
स्त्री पुत्र दारा धन । देखोनिया नाचे श्वान ॥१॥
जाता बळे कीर्तनी । बका ऐसा बैसे ध्वनी ॥२॥
लक्ष ठेउनी बाहेरी । वरवर डोले दुराचारी ॥३॥
एका जनार्दनी म्हणे । श्वानापरि त्याचे जिणें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०३२
📿 न कळे ब्रम्हज्ञान आच
3032.
न कळे ब्रम्हज्ञान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥१॥
विश्वामित्रीपोटी तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचे ॥धृपद॥
द्रव्यइच्छेसाठी करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥२॥
पोट पोसावया तोंडे बडबडी । नाही धडफुडी एक गोष्टी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०३२
📿 प्रपंचाचा कठिण लाग ।
3032.
प्रपंचाचा कठिण लाग । नाशासी मूळ स्त्रीसंग ॥१॥
भोगाचे जे जे सुख । ते ते प्रत्यक्ष घेतो विख ॥२॥
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥३॥
पुढील निमाले देखती । पाहुनी पुढे उडी घालिती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०३३
📿 कन्येचा करी जो नर वि
3033.
कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची ॥१॥
तयाचिया मुखा श्वानाची ते विष्ठा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनीं ॥२॥
पंचमहापातकी विश्वासघातकी । यापरता दोष का तया अंगी ॥३॥
एका जनार्दनी त्याचे नाम घेता । सचैल सर्वथा स्नान कीजे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०३४
📿 गौ आणि कन्या कथेचा व
3034.
गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी ॥१॥
तयाचे ते मुख न पाहती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥
एका जनार्दनी दोषा न परिहार । भोगिती अघोर कल्पकोटीं ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०३५
📿 भक्तकरुणा बहुत तुझिय
3035.
भक्तकरुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळो आले ॥१॥
पक्षीयासी तुझे नाम जे ठेविले । तये उद्धरिले गणिकेसी ॥धृपद॥
कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेता आली करुणा तुज ॥२॥
हृदय कोमळ तुझे नारायणा । ऐसे बहुता जना तारियेले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०३६
📿 आजामेळा अंत मरणासी आ
3036.
आजामेळा अंत मरणासी आला । तोवरी स्मरला नाही तुज ॥१॥
प्राण जातेवेळे म्हणे नारायण । त्यासाठी विमान पाठविले ॥धृपद॥
बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥२॥
तुका म्हणे भक्तकाज तू कैवारी । तुज साही चारी वर्णिताती ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०३६
📿 कन्या पुत्रादिक धन ।
3036.
कन्या पुत्रादिक धन । हे तो जाण भ्रमवत् ॥१॥
मागील अनुभव घेउनी कसवटी । पडलीसे तुटी रामनामी ॥२॥
नाथिले याचा काय तो धिवसा । कवण तो आकाशा कुंपण घाली ॥३॥
अभ्रींची छाया मृगजळ पाणी । काय ते रांजणी भरता येते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०३८
📿 गुंतलासी मायापाशी ।
3038.
गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥
वाचे सदा नाम गाय । तेणे चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखी वदता ॥२॥
बंधनाची तुटेल बेडी । होईल कैवल्याची सहज जोडी । एका जनार्दनी आवडी । रामनामी धरिता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१›
📿 अभंग क्र. ३०४१
📿 मातापितयांसी जो करी
3041.
मातापितयांसी जो करी नमन । धन्य त्याचे पुण्य इह जगी ॥१॥
मातापितयांचें करी जो पूजन । धन्य तयाचे पुण्य इहलोकी ॥२॥
मातापितयांची करीत जो सेवा । एका जनार्दनी देवा वरिष्ठ तो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०४३
📿 तू आम्हा सोयरा सज्जन
3043.
तू आम्हा सोयरा सज्जन सांगाति । तुज मज प्रीति चालो सदा ॥१॥
तू माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरीचा ॥धृपद॥
गण गोत मित्र तू माझे जीवन । अनन्य शरण तुझ्या पायी ॥२॥
तुका म्हणे सर्वगुणे तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 धन - अभंग ३०४२ ते ३०५१›
📿 अभंग क्र. ३०४४
📿 घरी धनधान्य पुरून ।
3044.
घरी धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न ॥१॥
द्रव्य असोनी नाही म्हणे । केविलवाणे म्हणे मी दीन ॥२॥
असोनि द्रव्याचिया राशी । भिक्षा मागे अहर्निशी ॥३॥
ऐसा संचय करुन । सवेंची पावल मरण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०४५
📿 माझे मुख नामी रंगो स
3045.
माझे मुख नामी रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥
अबद्ध चांगले गाऊ भलतैसे । बाळ वडे जैसे मायबापा ॥२॥
तुका म्हणे मज न लवी वाकडे । मी तुझे बोबडे बाळ तान्हे ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०४६
📿 यालागी आवडी म्हणा रा
3046.
यालागी आवडी म्हणा रामकृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥
सोपे हे साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥धृपद॥
न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥
न लगे तप तीर्थ करणे महादान । केल्या एक मन जोडे हरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 धन - अभंग ३०४२ ते ३०५१›
📿 अभंग क्र. ३०४८
📿 पाया शोधोनियां बांधि
3048.
पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसे या दुस्तर नरदेहीं ॥१॥
म्हणती पुत्र माझे नातु हे कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥
संपत्ति देखोनि गिवसिती तयासी । माझे माझे म्हणती रांडापोरे ॥३॥
चाले बरवा धंदा । बहिणी म्हणती दादा । आलिया दरिद्रबाधा पळुनी जाती ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 धन - अभंग ३०४२ ते ३०५१›
📿 अभंग क्र. ३०४९
📿 डोळा फोडोनियां काजळ
3049.
डोळा फोडोनियां काजळ ल्याला । नाम कापून शिमगा खेळला ॥१॥
वेंचिती धन लक्ष कोटी । आयुष्य क्षणचि नोहे भेटी ॥२॥
मिथ्या बागुलाचा भेवो । बाळें सत्य मानिती पहाहो ॥३॥
ऐसे मिथ्या नको मनी । एका जनार्दनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०५०
📿 देव तिही बळे धरिला स
3050.
देव तिही बळे धरिला सायासे । करूनिया नास उपाधीचा ॥१॥
पुर्वपक्षी धातु धिक्कारिले जन । स्वये जनार्दन तेचि झाले ॥२॥
तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवे गोडी येईल कळो ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०५२
📿 जायाचे शरीर जाईंल क्
3052.
जायाचे शरीर जाईंल क्षणांत । का हा गोपिनाथ पावेचि ना ॥१॥
तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥धृपद॥
अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला । पायापे विठ्ठला ठेवी मज ॥२॥
तुका म्हणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करिल माझे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०५३
📿 त्रासला हा जीव संसार
3053.
त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाही कोणी ॥१॥
ऐसे माझे मनी वाटे नारायणा । घालावी चरणावरी मिठी ॥धृपद॥
कइ ते सुंदर देखोनि रूपडे । आवडीच्या कोडे आळंगीन ॥२॥
नाही पूर्व पुण्य मज पामरासी । म्हणोनि पायासी अंतरलो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०५४
📿 मोलाचे आयुष्य वेचुनि
3054.
मोलाचे आयुष्य वेचुनिया जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥१॥
अनंतजन्मींचा शेवट पाहता । नर देह हाता आला तुझ्या ॥धृपद॥
कराल ते जोडी येईल कार्यासी । ध्यावे विठ्ठलासी सुखालागी ॥२॥
सांचलिया धन होईल ठेवणे । तैसा नारायण जोडी करा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०५५
📿 वेश्येचिया घरी जातो
3055.
वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥
काय ऐशा पामरा सांगावे गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥
एका जनार्दनी नको त्याचा संग । अंतरें पाडुरंग तयाचेनी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०५८
📿 बंधनाचा फांसा बैसलास
3058.
बंधनाचा फांसा बैसलासे गळी मीनापरि गिळी सर्वकाळ ॥१॥
आमीष विषया भुलला पामर । भोगिती अघोर चौर्यायंशी ॥२॥
गुंततांचि गळी जाईल की प्राण । हे तो अधम जना न कळे कांही ॥३॥
एका जनार्दनी न कळेंचि मूढा । सांगावे दगडा किती किती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०५९
📿 दसरा दिवाळी तोचि आम्
3059.
दसरा दिवाळी तोचि आम्हा सन । सखे संतजन भेटतील ॥१॥
आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥धृपद॥
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामे ॥२॥
तुका म्हणे काय होऊ उतराई । जीव ठेवू पायी संतांचिये ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०५९
📿 इंद्रिये नाना छळती प
3059.
इंद्रिये नाना छळती पामरे । समाधान शरीरें नोहे कधी ॥१॥
त्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परि त्या सर्वेश्वरा न भजती ॥२॥
विषयाचे कामे करिती विवंचना । परी नारायणा न स्मरती ॥३॥
एका जनार्दनी कृपा नव्हती पूर्ण । इंद्रियां समाधान केवी होय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०६०
📿 काम क्रोध मद मत्सर श
3060.
काम क्रोध मद मत्सर शरीरी । रात्रंदिवस निर्धारी छळिताती ॥१॥
आशा तृष्णा भ्रांति भुली हे वासना । सदोदित मना छळिताती ॥२॥
एका जनार्दनी यांचा टाकी संग । मग पांडुरंग हाती लागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६१
📿 जेणे माझे हित होईल त
3061.
जेणे माझे हित होईल तो उपाव । करिसील भाव जाणोनिया ॥१॥
मज नाही सुख दुःख तया खंती । भावना हे चित्ती नाना छंदे ॥धृपद॥
तोडी हे संबंध तोडी आशापाश । मज हो सायास न करिता ॥२॥
तुका म्हणे मी तो राहिलो निश्चिंत । कवळोनि एकांत सुख तुझे ॥३॥