वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 232. भीष्मप्रतिज्ञा

करिता ते युद्ध नव दि

🙏 4. संत नामदेव · ABH-083904 · अभंग क्र. २२४२

2242.
करिता ते युद्ध नव दिवस झाले । संकट पडले पांडवांसी ॥१॥
एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥
संग्रामी पांडव करिता विचार । चिंतातूर फार देखोनिया ॥३॥
तेव्हा कृष्ण म्हणे चला अवघे जन । भीष्मा लागोन विचारासी ॥४॥
कृष्ण परमात्मा धर्मराजासहित । भीष्म शिबिरांत जाते झाले ॥५॥
करूनि वंदन पितामहालागी । बोलती ते वेगी कैसी परी ॥६॥
नेम दिवस दाहा त्या माजी ते नव । झाले ते स्वभावे कांही नव्हे ॥७॥
जयाचिया कांक्षा धरूनि ते मनी । आलो समरांगणी हेचि ठावे ॥८॥
तुजसी झुंजता नये यश आम्हा । तुझी ते महिमा अगाध हो ॥९॥
भार्गव राम बळी युद्धी जिंकवेना । तया तोषवेना युद्ध बळे ॥१०॥
ऐसी यासी कैसे मारावे ते रणी । न करिता हो येक्षणी जय कैसा ॥११॥
याचि हो विचारे आलो तुझ्या घरी । सांगे जय नरा प्राप्ति घडे ॥१२॥
ऐकोनिया बोला मनी आनंदला । भीष्म महा भला काय बोले ॥१३॥
जोंवरी जीवंत तोंवरी जयवंत । आहे हे निश्चित कळो आले ॥१४॥
परंतु पुसता विचार मजला । तरी ऐका बोला सांगिजतो ॥१५॥
तुमची हो दळी शिखंडी नामक । राजा नपूंसक पुरुष आहे ॥१६॥
तया करा पुढे मागून अर्जुन । बाणांचे संधान करावे की ॥१७॥
माझी ते प्रतिज्ञा षंढावरी शस्त्र । न धरी ते अस्त्र प्राण गेल्या ॥१८॥
ऐसी युक्ति करा रणी मग मारा । यश येईल घरा आपेआप ॥१९॥
ऐकोनी विचार आले निजस्थाना । नामदेवी जाणा विचार केला ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग