संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५›
📿 अभंग क्र. १०४२
📿 दत्तात्रेय नाम । नित
1042.
दत्तात्रेय नाम । नित्य जपे जो निष्कामा ॥१॥
तया नाही द्वैतभाव । दृष्टी दिसे गुरुराव ॥२॥
दत्ताविण नसे स्थान । दत्तरुप जन वन ॥३॥
ध्यानीं मनी दत्तराज । दत्तविण नाही काज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०४३
📿 पाहे मजकडे भरोनिया द
1043.
पाहे मजकडे भरोनिया दृष्टी । बहुत हिंपुटी जालो माते ॥१॥
करावेसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हे वचन श्रुंगाारिक ॥धृपद॥
सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचे ते नव्हे ॥२॥
तुका म्हणे माझी कळवळ्याची कीव । भागलासे जीव कर्तव्याने ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०४४
📿 तुज म्हणतील कृपेचा स
1044.
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि का केला धीर पांडुरंगा ॥१॥
आझुनि का नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥धृपद॥
आळवितो जैसे पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनी तानभूक ॥२॥
प्रेमरसपान्हा पाजी माझे आई । धावे वो विठाई वोरसोनि ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०४४
📿 धन्य इंद्रायणी पिंपळ
1044.
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार | धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा | आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग | मिळाले ते सांग आळंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत | जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५›
📿 अभंग क्र. १०४४
📿 खुंटलासे शब्द बोलता
1044.
खुंटलासे शब्द बोलता आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥
ते हे दत्तनाम आवडी आदरे । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥
कलिमाजीं सोपे दत्तनाम घेता । संसाराची वार्ता उरी नुरे ॥३॥
एका जनार्दनी लागलासे छंद । दत्तनामे आनंद सर्वकाळ ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०४५
📿 भक्ती तो कठिण शुळावर
1045.
भक्ती तो कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥धृपद॥
कामावले तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०४७
📿 उगविल्या गुंती । ऐशा
1047.
उगविल्या गुंती । ऐशा मागे नेणो किती ॥१॥
ख्यात केली अजामेळे । होते निघाले दिवाळे ॥धृपद॥
मोकलिला प्रायिश्चती । कोणी न धरिती हाती ॥२॥
तुका म्हणे मुक्त वाट । वैकुंठीची घडघडाट ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०४७
📿 पुसताती संत सांगा दे
1047.
पुसताती संत सांगा देवा माते | पूर्वी येथे होते कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि | येथेंच समाधि ज्ञानदेवा ॥२॥
अष्टोत्तरशे वेळा साधिली समाधी | ऐसे हे अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा संगितले उत्तम | ज्ञान अंजन सुगम देखो डोळा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०४८
📿 स्वानंदे देवभक्ता भे
1048.
स्वानंदे देवभक्ता भेटी | वोरसोनि कंठी आलिंगावे ॥१॥
देव म्हणे भले आठवले तुज | ते हे संधी मज कळली असे ॥२॥
पदपदांतरे केला मार्ग सोपा | त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥
देव म्हणे तुझी पुरविन आळी | सुखी सही मंडळी वैष्णवांची ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०४९
📿 पवित्र तो देह वाणी प
1049.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥धृपद॥
देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागे मागे ॥२॥
काय त्या उरले वेगळे आणीक । वैकुंठनायक जया कंठी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०४९
📿 उदित जाले मन आता काय
1049.
उदित जाले मन आता काय अनुमान | करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥
देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर | निघाला बाहेर योगिराज ॥२॥
मागे पुढे संत चालिले मिरवित | कौतुक पहात इहलोकी ॥३॥
नारा विठा गोंदा माहादा विरक्त | परसा भागवत उभे तेथे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०५०
📿 सारासार विचार करिती
1050.
सारासार विचार करिती अवघे जन | हे ज्ञान अंजन दाविले डोळा ॥१॥
पाहिले गे माय अंतरीचे सुख | वैकुंठ नायक उभा असे ॥२॥
ज्ञानदेवायोगे सकळांशी दर्शन | परब्रह्म निधान डुल्लतसे ॥३॥
वोसंडले देव पाहोनिया प्रेम | डुल्लती सप्रेम अनुभवे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०५१
📿 येणे बोधे आम्ही असो
1051.
येणे बोधे आम्ही असो सर्वकाळ । करू हेनिर्मळ हरीकथा ॥१॥
आम्ही भूमीवरी एक दैवाचे । निधान हे वाचे सापडले ॥धृपद॥
तरतील कुळे दोन्ही उभयता । गाता आइकता सुखरूप ॥२॥
न चळे हा मंत्र न म्हणे यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०५२
📿 खेद दु:ख करी मनाचा क
1052.
खेद दु:ख करी मनाचा कळवळा | प्रेमाश्रु डोळा दाटताती ॥१॥
नारा विठा गोंडा पाठविला महादा | साहित्या गोविंदा सांगितले ॥२॥
काय काय आणू सांगा हे प्रमाण | नेमियेला नेम पांडुरंगे ॥3॥
तुळसी आणि बेल दर्भ आणि फुले | उदक हे चांगले भागिरथींचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५›
📿 अभंग क्र. १०५४
📿 दत्तात्रय नाम ज्याचे
1054.
दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखी । तया समसुखीं नाही दुजा ॥१॥
भावे दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥
दत्ताचें पै रुप ज्याचे वसे नेत्री । आहिक्य परत्री तोचि सुखी ॥३॥
गुरु दत्ताराया देई आलिंगन । तयासी वंदन करिती सर्व ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०५५
📿 सकळीकांचे समाधान । न
1055.
सकळीकांचे समाधान । नव्हे देखिल्यावाचून ॥१॥
रूप दाखवी रे आता । सहस्त्रभुजांच्या मंडिता ॥धृपद॥
शंखचक्रपद्मगदा । गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०५५
📿 वन वृक्ष वल्ली ईश्वर
1055.
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान | ऋषि मुनिजन राहाती जेथे ॥१॥
होऊनिया पक्षी कपोद कोकिळा | वेष्टियेले स्थळा ब्रह्मबोधे ॥२॥
मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे | जाले पहा धडफुडे ब्रह्मरूप ॥३॥
पंचमहापातकी गेले आळंकापुरी | न चले त्याजवरी काळ यम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०›
📿 अभंग क्र. १०५६
📿 दत्तमानसपूजा - अभंग
1056.
दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०
केले आवाहन । जेथे नाही विसर्जन ॥१॥
भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥
गाता येत नाही । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०५७
📿 कोण जाणे माझे जीवींच
1057.
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा | प्रेमाश्रु डोळा लोटताती ॥१॥
अवघियांचे मन दूषित तटस्थ | लहान थोर संत वोसंडती ॥२॥
तारीयेले जड बा माझ्या कीर्तनी | आठवती मनी गुण तुझे ॥३॥
नामा म्हणे येथे बोलवेना मज | जातसे निजगुज आवडीचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०›
📿 अभंग क्र. १०५७
📿 सहज सुखासनी अनुसुयान
1057.
सहज सुखासनी अनुसुयानंदन । पाहता हे ध्यान वृत्ती निवे ॥१॥
बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावे ॥२॥
कारण प्रकाऋती न घेचि तो माथा । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥
एका जनार्दनी हृदयी आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०५९
📿 साधावया भक्तीकाज । न
1059.
साधावया भक्तीकाज । नाही लाज हा धरीत ॥१॥
ऐसियासी शरण जावे । शक्ती जीवे न वंची ॥धृपद॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीले ॥२॥
तुका म्हणे साक्ष हाती । तो म्या चित्ती धरियेला ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०५९
📿 अनुभव हा सागर गुह्य
1059.
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म | उघडे अध्यात्म बोलियेले ॥१॥
प्रगट हे गुह्य उकलिले गाबाळ | केले करतळमळ ज्ञानयाने ॥२॥
कोणाची कल्पना नुरेचि बा येथे | उघडा गुहयार्थ सिद्ध केला ॥३॥
करणे न करणे सांगितला पंथ | तिही लोकी कीर्त वाढविली ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०›
📿 अभंग क्र. १०५९
📿 चोहें देहांची क्रिया
1059.
चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय ॥१॥
जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥
इंद्रिय क्रियाजात । कांही उचित अनुचित ॥३॥
आत्मा माझा देव दत्त । एका जनार्दनी स्वस्थ ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०›
📿 अभंग क्र. १०६१
📿 साती भागीरथी सत्रावी
1061.
साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥
अर्पियले स्नान झाले समाधान । मनाचे उन्मन होऊनियां ॥२॥
चित्त हे शीतळ गेली तळमळ । पाहिले निढळ अमूर्तासी ॥३॥
एका जनार्दनी केला जयजयकार । अत्रीवरद थोर तिन्ही लोकी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०६२
📿 नानापरी मन आवरितो भा
1062.
नानापरी मन आवरितो भारी | कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥
दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी | उघडिली दृष्टी ज्ञानदेवे ॥२॥
गीतेवरी टीका ग्रंथ केला सार | केवळ ईश्वर ज्ञानाचा हा ॥३॥
नामा म्हणे आता देहासी विटला | स्वरूपी पालटला ज्ञानदेव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०६३
📿 विठ्ठल हा चित्ती । ग
1063.
विठ्ठल हा चित्ती । गोड लागे गाता गीती ॥१॥
आम्हा विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥धृपद॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥२॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०६३
📿 गंध आणि अक्षता पंचाम
1063.
गंध आणि अक्षता पंचामृत उदक | धूप आणि दीप आणियेले ॥१॥
संत सज्जनांचा मिळाला समुदावो | मध्ये ज्ञानदेवो चालतसे ॥२॥
क्षेत्र प्रदक्षणा करावया उद्देशी | मुहूर्त देवापाशी विचारिला ॥३॥
दशमीचे दिवशी रिघावे बाहेर | हरिदिनी जागर निशिदिनी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०६४
📿 विठ्ठल विठ्ठल मंत्र
1064.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनी । कोड कानी ऐकती ॥धृपद॥
विठ्ठल हे दैवत भोळे । चाड काळे न धरावी ॥२॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्ती तो धन्य ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. १०६५
📿 म्हणे विठ्ठल ब्रम्ह
1065.
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥धृपद॥
नाही विठ्ठल जया ठावा । तो ही डोळा न पाहावा ॥२॥
तुका म्हणे नाही । त्याची भीड मज काही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 श्री ज्ञानेश्वर समाधी›
📿 अभंग क्र. १०६५
📿 विनविति संत आणिक सज्
1065.
विनविति संत आणिक सज्जन | नव्हे समाधान कांही केल्या ॥१॥
नानाचि प्रकार करितसे घोर | कांही केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥
काय पाहावे याला विरक्त पुरुषाला | स्वरूपी मिळाला ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे यांचे उचंबळले प्रेम | म्हणोनि परब्रह्म मागे पुढे ॥४॥