🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४३
📿 शिळा जया देव । तैसा
1143.
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥
होय जतन ते गोड । अंतरा येती नाड ॥धृपद॥
देव जोडे भावे । इच्छेचे ते प्रेम घ्यावे ॥२॥
तुका म्हणे मोड दावी । तैशी फळे आली व्हावी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४›
📿 अभंग क्र. ११४४
📿 मुद्रा ती पाचवी लाऊन
1144.
मुद्रा ती पाचवी लाऊनिया लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥
कानी जे पेरिलें डोळा ते उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥
कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥
नित्य प्रेमभावे हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४५
📿 कासया जी ऐसा माझे मा
1145.
कासया जी ऐसा माझे माथा ठेवा । भार तुम्ही देवा संतजन ॥१॥
विचित्र विंदानी नानाकळा खेळे । नाचवी पुतळे नारायण ॥धृपद॥
काय वानरांची अंगीची ते शक्ती । उदका तरती वरी शिळा ॥२॥
तुका म्हणे करी निमित्तचि आड । चेष्टवूनि जड दावी पुढे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 वटेश्वर नमन›
📿 अभंग क्र. ११४५
📿 सव्य हाते नगर घेती ऋ
1145.
सव्य हाते नगर घेती ऋषीश्वर | केला नमस्कार समाधीसी ॥१॥
परतले देव आणि सुरगण | चालली विमाने वेष्णवांची |॥२॥
निवृत्ति मुक्ताबाई चांगदेव संगे | रूक्मिणी पांड्रंग समुदायेंसी ॥३॥
नामा म्हणे देव गंधर्व ऋषीमुनी | जाती उत्तरायणी निवृत्तिराज ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४६
📿 पाया पडावे हे माझे भ
1146.
पाया पडावे हे माझे भांडवल । सरती हे बोल कोठे पायी ॥१॥
तरि हे सलगी कवतुक केले । लडिवाळ धाकुले असे बाळ ॥धृपद॥
काय उणे तुम्हा संताचिये घरी । विदित या परी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे माझे उचित हे सेवा । नये करू ठेवाठेवी काही ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११४७
📿 श्री चांगदेव महाराजा
1147.
श्री चांगदेव महाराजांची समाधी
निवृत्तिदेवा योग्य गगेचे ते स्नान | करू अवघेजण आवडीने ॥१॥
तीर्थयात्रा होईल देवसमागमे | केवढा महिमा रामे सांगितला ॥२॥
मार्गी चालताती भक्त आणि हरी | आले भुलेश्वरी अवघेजण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४८
📿 नमावे पाय हे माझे उच
1148.
नमावे पाय हे माझे उचित । आशीर्वादे हित तुमचिया ॥१॥
कृपेचा वोरस न समाये पोटी । म्हणोनि उफराटी वचने ही ॥धृपद॥
तुमची उष्टावळी ते माझे भोजन । झाडावे अंगण केरपुंजे ॥२॥
परि ऐसे पुण्य नाही माझे गाठी । जेणे पडे मिठी पायासवे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११४८
📿 कौतुकाने तेथे आले सा
1148.
कौतुकाने तेथे आले सावकाश | उभे हरिदास कीर्तनासी ॥१॥
दहा दिवस तेथे राहिपेले स्वस्थ | अवघ्यांचा मनोरथ पूर्ण जाला ॥२॥
क्षेत्रींचा महिमा पुसिती देवासी | जना आगळी काशी सांगियेली ॥३॥
येथोनिया वाट जाते वाराणसी | मुनि आणि ऋषी आनंदले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११४९
📿 काय नाही माता गौरवीत
1149.
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ते ॥१॥
काय नाही त्याची करीत ते सेवा । काय नाही जीवा गोमटे ते ॥धृपद॥
अमंगळपणे काटाळा न धरी । उचलोनि करी कंठी लावी ॥२॥
लेववी आपुले अंगे अळंकार । संतोषाये फार देखोनिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११५०
📿 माझिया मीपणावरी पडो
1150.
माझिया मीपणावरी पडो पाषाण । जळो हे भूषण नाम माझे ।
पापा नाही पार दुःखाचे डोंगर । जालो ये भूमीसी ओझे ॥१॥
काय विटंबना सांगो किती । पाषाण फुटती ऐसे दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती डोळा माझे मुख ॥धृपद॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६›
📿 अभंग क्र. ११५०
📿 चिंतनें धांवे भक्तां
1150.
चिंतनें धांवे भक्तांपाठीं । धरी कांबळीं हाती काठी । चिंतनें उठाउठी । बांधवितो आपणिया ॥१॥
ऐसा भुकेला चिंतनाचा । न पाहे यातीहीन उंचाचा । काय अधिकार शबरीचा । फळे काय प्रिय ती ॥२॥
एका जनार्दनी चिंतन । तेणे जोडे नारायण । आणिक न लगे साधन । कलीमाजी सर्वथा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११५१
📿 फिराविली दोनी । कन्य
1151.
फिराविली दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥
जाला आनंदे आनंद । अवतरले गोविंद ॥धृपद॥
तुटली बंधने । वसुदेवदेवकीची दर्शने ॥२॥
गोकुळासी आले । ब्रम्ह अव्यक्त चांगले ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११५१
📿 दशमीचे दिवशी ठेविले
1151.
दशमीचे दिवशी ठेविले प्रस्थान | साधियेला येणे देव गुरु ॥१॥
दिधला मंडप सिद्धेश्वरासमोर | उठावले भार वैष्णवांचे ॥२॥
सर्व स्वस्थ तेथे बैसले मिळून | नारद कीर्तन पुढे होत ॥३॥
धन्य पुण्यस्तंभ धन्य गंगातीर | धन्य दिसती भार पताकांचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६›
📿 अभंग क्र. ११५२
📿 चिंतनासी न लगे वेळ ।
1152.
चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥
हाचि पुरे मंत्र सोपा । तेणे चुके जन्म खेपा । आणिक ते पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥
चौर्यांशीची न ये फेरी । एवढी चिंतनाची ही थोरी । सांडोनी वेरझारी । का रे शिणतां बापुडी ॥३॥
एका जनार्दनी चिंतन । वाचे वदा परिपूर्ण । तेणे घडे कोटीयज्ञ । नाम चिंतन जपतां ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११५३
📿 मुख डोळा पाहे । तैशी
1153.
मुख डोळा पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥
केल्याविण नव्हे हाती । धरोनि आरती परती ॥धृपद॥
न धरिती मनी । काही संकोच दाटणी ॥२॥
तुका म्हणे देवे । ओस केल्या देहभावे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११५३
📿 चवदाशे वर्षे शरीर के
1153.
चवदाशे वर्षे शरीर केले जतन | नाही अज्ञानपण गेले माझे ॥१॥
अहंकारे माझे बुडविले घर | जालो सेवा थोर स्वामीसंगे ॥२॥
तापत्रयी तापलो महाअगी जळालो | अविवेकी जालो मंदमती ॥३॥
काय माझा देह वायांविण व्यर्थ | आलो शरणागत पांडुरंगा ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११५४
📿 नाना दु:ख माया आठवती
1154.
नाना दु:ख माया आठवती मना | आता नारायणा कृपा करी ॥१॥
माझ्या पातकांचा लागू नेदी अंत | ऐसे माझे चित्त साक्ष असे ॥२॥
ज्ञानाग्नि माझी करा तृणवत | होऊनि कृपावंत श्रीहरी ॥३॥
योगिराज यासी नाही पापदोष | केला उपदेश मुक्ताईने ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६›
📿 अभंग क्र. ११५५
📿 चिंतनें उद्धरला पापी
1155.
चिंतनें उद्धरला पापी । महा दोषी केला निःपापी । तया म्हणती ऋषी तपी । पुराणी ते सर्व ॥१॥
नारदे सांडोनिया मंत्र । केला जगी तो पवित्र । चिंतना एवढें पात्र । आन नाही सर्वथा ॥२॥
चिंतनें शुकादिक मुक्त । राजा जाहला परिक्षित । ऐसे अपार आहेत । चिंतनें मुक्त जाहले ते ॥३॥
चिंतनाची येवढी थोरी । गणिका नारी परद्वारी । वाचे उच्चारिता हरि । मोक्षधामीं बैसविली ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११५६
📿 कृपावंत जाली जेव्हा
1156.
कृपावंत जाली जेव्हा मुक्ताबाई | स्वरूप दिशा दाही दाखविले ॥१॥
पाठी पोटी स्वरूप केले सद्गुरूने | तंव अभिमान गेला माझा ॥२॥
यांच्या उपकाराची काय वर्णू थोरी | ज्यांच्यासंगे हरि जोडियेला ॥३॥
पुरे पुरे आता आठविसी फार | होईल उशीर समाधीसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६›
📿 अभंग क्र. ११५७
📿 जाईन पंढरी । हेंचि च
1157.
जाईन पंढरी । हेंचि चिंतन धरी । मग तो श्रीहरी । नुपेक्षी भक्तांतें ॥१॥
धरुनी पहा विश्वास । नका आणिक सायास । पहातसे वास चिंतनाची सर्वथा ॥२॥
न धरी माझे आणि तुझे । भार घाली पारे वोझे । एका जनार्दनी दुजे । मग नाही तयाते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११५८
📿 होईल जाला अंगे देव ज
1158.
होईल जाला अंगे देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥
येरांनी सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥धृपद॥
धाला आणिकाची नेणे तहान भूक । सुखे पाहे सुख आपुलिया ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११५९
📿 का न वजावे बैसोनि कथ
1159.
का न वजावे बैसोनि कथे । ऐसे ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथे । उभा असे तिष्ठत ॥१॥
म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणे ॥धृपद॥
कथे काही अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्ता चित्त । समरसी खंडणा ॥२॥
का वैष्णव पूजावे । ऐका घेईल जो भावे । चरणरजा शिवे । वोढविला मस्तक ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११६०
📿 अनुभवे आले अंगा । ते
1160.
अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ॥१॥
नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिची ॥धृपद॥
उतरूनि दिसे कशी । शुद्धरसी सरे ते ॥२॥
तुका म्हणे दुसरे नाही । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११६२
📿 अंतरींची ज्योती प्रक
1162.
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥
तेथींचा आनंद ब्रम्हांडी न समाये । उपमेशी काये देऊ सुखा ॥धृपद॥
भावाचे मथिले निर्गुण संचले । ते हे उभे केले विटेवरी ॥२॥
तुका म्हणे आम्हा ब्रम्हांड पंढरी । प्रेमाची जे थोरी साठवण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११६२
📿 नाममहिमा - अभंग ११६२
1162.
नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२
ऐका नामाचे महिमान । नाम पावन ते जाण ॥१॥
हास्य विनोंदें घेता नाम । तरती जन ते अधम ॥२॥
एका जनार्दनी धरी विश्वास । नामे नासती दोष कळिकाळाचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज समाधी›
📿 अभंग क्र. ११६३
📿 मुक्ताईने चांगा घेत
1163.
मुक्ताईने चांगा घेतलासे पोटा | उठा आता भेटा लहान थोर ॥१॥
भेटले ऋषीवर वैष्णव सकळी | बैसले ते पाळी समाधीच्या ॥२॥
निवृत्ति मुक्ताईसी केला नमस्कार | उतरिले पार भवसिंधू ॥३॥
विठ्ठल रखुमाईसी केली प्रदक्षिणा | मग शुद्ध नमना आरंभिले ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११६३
📿 नामाचे महिमान सादर ऐ
1163.
नामाचे महिमान सादर ऐका । तारियेले देखा महापापी ॥१॥
पापाची ते राशी अजामेळ जाण । जपतांचि पावन नामे जाहला ॥२॥
गणिका पांखिरूं नाम जपे सदा । नोहे तिसी बाधा गर्भवासा ॥३॥
एका जनार्दनी कलीमाजी नाम । उत्तम उत्तम जपा आधी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग २›📂 चांगदेव महाराज नमन›
📿 अभंग क्र. ११६५
📿 लाविली कौपीन पितांबर
1165.
लाविली कौपीन पितांबरी एक | त्यागिली अनेक महत् माया ॥१॥
सव्य हाते घेतले संतसाधुजना | केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
समाधीचे पाळी निवृत्ती वनमाळी | अंतरी कळवळी मुक्ताबाई ॥३॥
|आणिकांच्या डोळा अश्रुपात येत | होईल की गुप्त योगिराज ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११६५
📿 नाम पवित्र आणि परिकर
1165.
नाम पवित्र आणि परिकर । नामे तरले दोषी अपार । नामे हेंचि निजसार । आधार वेदशास्त्रांचे ॥१॥
तारक कलिमाजीं नाम । भोळ्याभाविकां सुगम । ज्ञाते पंडित सकाम । नामे तरती श्रीहरींच्या ॥२॥
मनी माझ्या ऐक गोष्टी । नाम जपेंतु सदा कंठी । एका जनार्दनी परिपाठी । नाही गोष्टीं दुसरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १००१ ते १५००›
📿 अभंग क्र. ११६६
📿 माता कापी गळा । तेथे
1166.
माता कापी गळा । तेथे कोण राखी बाळा ॥१॥
हे का नेणा नारायणा । मज चाळविता दिना ॥धृपद॥
नागवी धावणे । तेथे साह्य व्हावे कोणे ॥२॥
राजा सर्व हरी । तेथे दुजा कोण तारी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११६६
📿 नाम ते उत्तम नाम ते
1166.
नाम ते उत्तम नाम ते सगुण । नाम ते निर्गुण सनातन ॥१॥
नाम ते ध्यान नाम ते धारणा । नाम ते हेंजना तारक नाम ॥२॥
नाम ते पावन नाम तं कारण । नामापरतें साधन आन नाही ॥३॥
नाम ध्यानीं मनी गातसे वदनी । एका जनार्दनी श्रेष्ठ नाम ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२›
📿 अभंग क्र. ११६७
📿 नामाचा धारक । हरिहरा
1167.
नामाचा धारक । हरिहरा त्याचा धाक ॥१॥
ऐसे नाम समर्थ । त्रिभुवनी ते विख्यात ॥२॥
नामे यज्ञयाम घडती । नामे उत्तम लोकी गती ॥३॥
नामे भुक्ति मुक्ति तिष्ठें । नामे वरिष्ठा वरिष्ठें ॥४॥