संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. १३
📿 मजसवे आता येऊ नका को
13.
मजसवे आता येऊ नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥
न साहवे तुम्हा या जनाची कूट । बोलती वाईट ओखटे ते ॥२॥
तुका म्हणे जालो उदास मोकळ्या । विचरो गोवळ्यासवे आम्ही ॥३॥
14
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. १३
📿 पंढरीची वारी आहे माझ
13.
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवाशी । गाईन अहर्निशी मुखी नाम ॥२॥
नाम विठोबाचे घेईन मी वाचे । बीज कल्पांतीचे तुका म्हणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 शनिवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १३
📿 काम बांदवडी । काळ घा
13.
काम बांदवडी । काळ घातला तोडरी ॥१॥
तया माझे दंडवत । कपिकुळी हनुमंत ॥२॥
शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥३॥
रामाच्या सेवका । शरण आलो म्हणे तुका ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 नामसंकीर्तन महात्म्य›
📿 अभंग क्र. १३
📿 येऊ ऐसे जाऊ । जनासंग
13.
येऊ ऐसे जाऊ । जनासंगे हेचि दाऊ ॥1॥
आपण करु हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचे जीवन ॥2॥
नाम संशयछेदन । भवपाशाचे मोचन ॥3॥
जनी ह्मणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ॥4॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १३
📿 ऐसा आनंद सोहळा । निर
13.
ऐसा आनंद सोहळा । निर्मळा पाहे आपुले डोळा ॥१॥
आनंद न माय गगनी । वैष्णव नाचती रंगणी ॥२॥
जेथे नाही भेदाभेद । अवघा भरला गोविंद ॥३॥
तया सुखाची सुखराशी । वोळली ती निर्मळेसी ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १३
📿 जीवीचे सांकडे वारी द
13.
जीवीचे सांकडे वारी देवराया । अहो पंढरीराया धांवा वेगी ॥१॥
का बा मोकलिता शरण आलिया । का बा न ये दया तुम्हांलागी ॥२॥
अनाथ परदेशी तुम्हांविण कोण । सुखे समाधान करा माझे ॥३॥
तुमचिया पोटी बहु वाव आहे । अधीर हा होय जीव माझा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १›
📿 अभंग क्र. १३
📿 प्रभु जी तुम दर्शन ब
13.
प्रभु जी तुम दर्शन बिन मोय घड़ी चैन नही आवड़े ॥टेक ॥
अन्न नही भावे नींद न आवे विरह सतावे मोय ।
घायल ज्यू घूमू खड़ी रे म्हारो दर्द न जाने कोय ॥१ ॥
दिन तो खाय गमायो री, रैन गमाई सोय ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १३
📿 आलासि कोठोनि जासिल क
13.
आलासि कोठोनि जासिल कोठे । होतास कवणे ठायी रे ॥
मातापिता बंधू सखी म्हणसी सेवटी नव्हे ती काही रे ।
ऐसिया प्रकारे भुलले जन पावन करित काही रे ॥
सदगुरुसारिखा मातापिता बंधू । भावे शरण त्यासी जाई रे ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 नाथसंप्रदाया बद्दल भाग १ व २›
📿 अभंग क्र. १३
📿 नाथसंप्रदाया बद्दल
13.
13. नाथसंप्रदाया बद्दल
नवनाथ व नाथ संप्रदायची माहिती भाग 1
navnath - नवनाथ, अवतार, श्री दत्त / श्री दत्तांचे साहित्य, श्री नवनाथांचे चरित्र
नवनाथ व नाथ संप्रदायची माहिती व तीर्थक्षेत्र पुढीलप्रमाणे :-
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 बाळक्रीडा स्तुती›
📿 अभंग क्र. १३
📿 बाहूबळे तुवा काढिले
13.
बाहूबळे तुवा काढिले अमृत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥१॥
जननी माझी जेव्हा ज्याकडे बाहत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥२॥
देवा बैसवोनि शुद्ध ते वाढीत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥३॥
क्षीराचा सागर उपमन्यूशी देत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीकृष्ण प्रगटला - अभंग १३ ते १६›
📿 अभंग क्र. १३
📿 श्रीकृष्ण(जन्म) प्रग
13.
श्रीकृष्ण(जन्म) प्रगटला - अभंग १३ ते १६
गोकुळी आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आले अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥ आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥ एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचे लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १३
📿 पंढरिये चोख रुपडे अश
13.
पंढरिये चोख रुपडे अशेख । भीमातीरी देख पुण्यभूमी ॥१॥
आदि पीठ देव ब्रह्म हे स्वंयमेव । पुंडलिक भाव प्रगटला ॥२॥
जन हे कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ । कीर्तनी कळिकाऴ दूरी ठाये ॥३॥
नाम हे विठ्ठल न लगे पै मोल । नित्यता सकळ पांडुरंग ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. १४
📿 सब पैसेके भाई । दिलक
14.
सब पैसेके भाई । दिलका साथी नही कोई ॥धृ॥
खानेपिनेकु पैसा होय तो जोरू बंदगी करे । एक दिन खाना नही मिले तो फिरके जवाब कारे ॥सब. ॥१॥
जबलग अपने पल्लव पैसा तबतलक लोक सलाम करे । आपना पैसा निकल गया तो कोई नही मिठ्ठा बोले ॥२॥
भाईबंद और बहीन साले सब पैसेके भाई । कौन किसीका नही रे प्यारे कहत कबीर सुनाई ॥सब. ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 वेदाध्ययन करिसी तरी
14.
वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परि वष्णव न होसी अरे जना ॥१॥
पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परि वैष्णव न होसी अरे जना ॥२॥
गाय़न करिसी तरी गुणीजन होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 जन हे सुखाचे दिल्याघ
14.
जन हे सुखाचे दिल्याघेतल्याचे । अतंकाळीचे नाही कोणी ॥१॥
झाल्या हीन शक्ति नाक डोळे गळती । सांडोनी पळती रांडा पोरे ॥२॥
बाईल म्हणे खर मरता तरी बरे । नासिले हे घर थुंकोनिया ॥३॥
तुका म्हणे माझे नव्हतील कोणी । तुज चक्रपाणीवाचुनिया ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 भेदवादी जन वदतसे भिन
14.
भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे ते लक्षण भज-नाचे ॥१॥
विश्वी विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचे कौतुक कैसे सांगा ॥२॥
ब्रह्मी नाही ठाव एकपणाचाही । तेथे दुजे कांही समावते ॥३॥
आदि मध्ये अंती खेळूनिया खेळ । उरले ते निखळ अविनाश ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण दुसरे अभंग ८›
📿 अभंग क्र. १४
📿 सदा माझे डोळे जडो तु
14.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥धृ॥
विठो माउलिये हा चि वर देई । संचरोनि राही हृ्दयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांही न मागे आणीक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 कोणे तुझा सांग केला
14.
कोणे तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंती त्वा थोर मानियेली ॥१॥
कोणे ऐसा तूज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊ ॥२॥
तेव्हा तूज कोण घालील पाठीसी । घांसील भूमीसी वदन यम ॥३॥
का रे नागविसी आयुष्य खातो काळ । दिवसे दिवस बळ क्षीण होते ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 सुखसागरी वास झाला ।
14.
सुखसागरी वास झाला । उंच नीच काय त्याला ॥१॥
अहो आपण जैसे व्हावे । देवे तैसेंचि करावे ॥२॥
ऐसा नटनाट्य खेळ । स्थिर नाही एक वेळ ॥३॥
एका पासूनि अनेक झाले । त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 तीर्थ महात्म्य अभंग›📂 पंढरपूर महात्म्य अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 सुखरूप ऐसे कोण दुजे
14.
सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा । माझ्या पांडुरंगा सारिखे ते ॥१॥
नलगे हिंडणे मुंडणे ते कांही । साधनाचा नाही आटाआटी ॥२॥
चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥३॥
तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ । विशेष हा लाभ संतसंगे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 सोमवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १४
📿 हरिहरा भेद । नाही कर
14.
हरिहरा भेद । नाही करू नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयी । गोडी साखरेच्या ठायी ॥धृ॥
भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥
उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥३॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १४
📿 पहा हो नवल गोरियाचे
14.
पहा हो नवल गोरियाचे घरी । कुल्लाळ भीतरी स्वये झाला ॥१॥
त्रैलोकी गमन ते झाले गाढव । आपुले वैभव परते ठेवी ॥२॥
गोणी भरोनिया स्वये आणि हरी । त्याचे साहित्य करी रखुमाई ॥३॥
बंका म्हणे ऐसी आवडी भक्ताची । बोलता वेदांची वाचा मौन्य ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १४
📿 तिही त्रिभुवनी विस्त
14.
तिही त्रिभुवनी विस्तारिली कीर्ती । तो हा श्रीपती उभा विटे ॥१॥
अनाथाचा नाथ पतित पावन । हे आम्हा वचन सांपडले ॥२॥
नाम धारकाच्या लागेन चरणी । घेईन पायवणी पोटभरी ॥३॥
आनंदे निर्भर नाचेन महाद्वारी । संत अधिकारी तेथीचे जे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई :- पदावली भाग १›
📿 अभंग क्र. १४
📿 मेरो मनमोहना, आयो नह
14.
मेरो मनमोहना, आयो नही सखी री॥
कै कहु काज किया संतन का, कै कहु गैल भुलावना॥
कहा करू कित जाऊ मेरी सजनी, लाग्यो है बिरह सतावना॥
मिरा दासी दरसण प्यासी, हरिचरणा चित लावना॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १४
📿 आवडीचे निदसुख नाम मी
14.
आवडीचे निदसुख नाम मी गाईन । अंतरी पाहिन निजरुप ॥
नोहेसी वेगळा या प्राणा सर्वथा । नकळे पंढरीनाथ लीला तुझी ॥
काय उतराई तुझिया उपकारा । माझ्या विश्वंभरा पांडुरंगा ॥
बोधला म्हणे देई प्रेमाची उकळी । गाईन वनमाळी द्वारकेचा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. १४
📿 राम बोले राम बोले ।
१४.
राम बोले राम बोले । राम बिना कोऊ न बोलेरे भाई ॥१॥
एकल मिठी कुंजर चिटी । भाजनहै बहु नाना ।
स्थावर जंगम कीट पतंगा । सब घट राम समाना ॥२॥
एकल चीता रहीले नीता और छुटीले सब आसा ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 बाळक्रीडा स्तुती›
📿 अभंग क्र. १४
📿 रुणझुण पायी वाजताती
14.
रुणझुण पायी वाजताती वाळे । दावी ती पाउले दयानिधी ॥१॥
जनक्र याचे घरी चाळूनिया गेले । दावी ती पा-उले दयानिधी ॥२॥
गजा धरिले नक्रे तेव्हा जे धांवले । दावी ती पाउले दयानिधी ॥३॥
वस्त्रहरणी ज्याते द्रौपदीने चिंतिले । दावी ती पाउले दयानिधी ॥४॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १४
📿 उघडे स्वरुप प्रत्यक्
14.
उघडे स्वरुप प्रत्यक्षाचे दीप । नाम घेता पाप हरे जना ॥१॥
ते रुप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिन काळ पंढरीयेसी ॥२॥
रज तमे दुरी नामाची माधुरी । निशाणी एक सरी रामकृष्ण ॥३॥
भवाब्दि तारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. १५
📿 सब पैसेके भाई । अपना
15.
सब पैसेके भाई । अपना साथी नही कोई ॥धृ॥
अपने पलोंमे पैसा होय तो सबहि खुशामत करते । जब अपनेपर बखत पडेगा तब कोई साथी नही चालते ॥१॥
माय बाप भाई जोरू और बहीन साले । जिसका यारो भला किया है वोही मीठा न बोले ॥२॥
अपने हात पांव रह गये यारो लडका नजीक न आवे । बडा प्यार जोरुपर ओबी दुरसे पानी बतावे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १५
📿 सुखाची विश्रांती सुख
15.
सुखाची विश्रांती सुख समाधान । मनाचे उन्मन नाम गाता ॥१॥
ते हे नाम सोपे रामकृष्णहरि । प्रपंच बोहरी उच्चारिता ॥२॥
अंहभाव व्देष नुरे ती वासना । व्दैताची भावना दुरी ठाके ॥३॥
एका जनार्दनी नाम हे सोपारे । येणेचि पै सरे भवसिंधू ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १५
📿 नाम गाउ नाम घेऊ । ना
15.
नाम गाउ नाम घेऊ । नाम विठ्ठोबाला वाहु ॥१॥
आम्ही दैवाचे दैवाचे । दास पंढरीरायाचे ॥२॥
टाळ विणा घेऊ हाती । विठ्ठल नाम गाउ किती ॥३॥
नामा म्हणे लाखोली सदा । सहस्त्र नामाची गोविंदा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १५
📿 रुणुझुणु रुणुझुणु रे
15.
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
चरण कमळद्ळु रे भ्रमरा । भोगी तु निच्श्रळु रे भ्रमरा ॥२॥
सुमन सुगंध रे भोंवरा । परिमळ विदूगदु रे भोंवरा ॥३॥
सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा । बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण दुसरे अभंग ८›
📿 अभंग क्र. १५
📿 आवडे हे रूप गोजिरे स
15.
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहाता लोचन सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा/वेळोवेळा ॥धृ॥
लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे जाले ॥३॥
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा ॥४॥