संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०६५
📿 जन्ममरणाचें तुटले सा
2065.
जन्ममरणाचें तुटले सांकडें । कैवल्य रोकडें उभे असे ॥१॥
डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥
एका जनार्दनी संशयाचें नाही । जन्ममरण देही पुन्हा नये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६६
📿 यमपुरी त्यांणी वसविल
2066.
यमपुरी त्यांणी वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगता । सुलभ बहुता गोड वाटे ॥धृपद॥
काय ते नेणते होते मागे ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥
द्रव्य दारा कोणे स्थापियेले धन । पिंडाचे पाळण विषयभोग ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६७
📿 न कळता कोणी मोडियेले
2067.
न कळता कोणी मोडियेले व्रत । तया प्रायिश्चत्त चाले काही ॥१॥
जाणतिया वज्रलेप जाले थोर । तयास अघोर कुंभपाक ॥धृपद॥
आता जरी कोणी नाइके सांगता । तया शिकविता ते चि पाप ॥२॥
काय करू मज देवे बोलविले । माझे खोळंबिले काय होते ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मनांस उपदेश›
📿 अभंग क्र. २०६७
📿 अरे अलगटा माझिया तू
2067.
अरे अलगटा माझिया तू मना | किती रानोरांना हिंडविसी ॥१॥
रे विठोबाचे पायी दृढ घाली मिठी | का होतसी हिपुटी वायांविण ॥२॥
क्रिया कम धर्म तुज काय चाड | जवळी असता गोड प्रेमसुख ॥३॥
संकल्प विकल्प सांडी तू समूळ | राहे रे निश्चळ क्षणभरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६८
📿 वाचे विठ्ठल नाही । त
2068.
वाचे विठ्ठल नाही । तोचि प्रेतरूप पाही ॥१॥
धिग त्याचे ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥धृपद॥
न बैसे कीर्तनी । गुण नाइके जो कानी ॥२॥
जाता कांटाळे देउळा । तोचि सुना मुखकाळा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०६८
📿 नागर गोमटें रुप ते ग
2068.
नागर गोमटें रुप ते गोजिरे । उभे ते साजिरे भीमातटीं ॥१॥
पहाता विश्रांति देहा होय शांती । अनुपम्य मूर्ति विठ्ठल देव ॥२॥
भक्ताचिया काजा राहिलासे उभा । कैवाल्याचा गाभा बालमूर्ति ॥३॥
आनंदाचा कंद उभा परमानंद । एका जनार्दनी छंद मज त्याचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०६९
📿 तारिली बहुते चुकवूनि
2069.
तारिली बहुते चुकवूनि घात । नाम हे अमृत स्वीकारिता ॥१॥
नेणता सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाठी ॥धृपद॥
जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा । आकार कारणा या च साठी ॥२॥
असुरी दाटली पाप होता फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७१
📿 उभाउभी फळ । अंगी मंत
2071.
उभाउभी फळ । अंगी मंत्राचे या बळ ॥१॥
म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥धृपद॥
कळी काळाची बाधा । नव्हे उच्चारिता सदा ॥२॥
तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मनांस उपदेश›
📿 अभंग क्र. २०७१
📿 उत्कंठित तप एक विठठु
2071.
उत्कंठित तप एक विठठुलनाम | आता क्रियाकम कोणालागी ॥१॥
राहे रे तू मना राहे रे निवांत | ध्याई अखंडित नारायण ॥२॥
संतसमागमे साधी हे साधन | पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥
नामा म्हणे तू सहज सुखरूप | होऊनि निविकल्प विचारी पा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०७१
📿 पाहता पाहता परतले मन
2071.
पाहता पाहता परतले मन । जाले समाधान चित्ती माझे ॥१॥
संताचें संगतीं लाभ येवढा झाला । पंढरीये पाहिला विठ्ठल देवो ॥२॥
एका जनार्दनी मनींच बैसला । नवजे संचला दीपु जैसा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७२
📿 पाहोनिया अधिकार । तै
2072.
पाहोनिया अधिकार । तैसे बोलावे उत्तर ॥१॥
काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥धृपद॥
आम्ही जाणो एका देवा । जैसी तैसी करू सेवा ॥२॥
तुका म्हणे भावे । माझे पुढे पडेल ठावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७३
📿 न वजाता घरा । आम्ही
2073.
न वजाता घरा । आम्ही कोणाच्या दातारा ॥१॥
का हे छळू येती लोक । दाट बळे चि कंटक ॥धृपद॥
नाही आम्ही खात । काही कोणाचे लागत ॥२॥
कळे तैसी सेवा । तुका म्हणे करू देवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मनांस उपदेश›
📿 अभंग क्र. २०७३
📿 वासनेची करणी ऐके तू
2073.
वासनेची करणी ऐके तू रे मना | 'या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥
निर्गुण चैतन्य सदा सुखरासी | त्या दिली चौर््यांशी लक्ष सोंगे ॥२॥
ऐसी' हे लाघवी खेळे नाना खेळ | तेथे तू दुर्बळ काय करिसी ॥३॥
क्षण एक चंचळ क्षण एक निदचळ | क्षण एक विफळ*सावध करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७५
📿 काय जाणो वेद । आम्ही
2075.
काय जाणो वेद । आम्ही आगमाचे भेद ॥१॥
एक रूप तुझे मनी । धरूनि राहिलो चिंतनी ॥धृपद॥
कोठे अधिकार । नाही रानट विचार ॥२॥
तुका म्हणे दीना । नुपेक्षावे नारायणा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७६
📿 धर्माचे पाळण । करणे
2076.
धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ॥१॥
हे चि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ॥धृपद॥
तिक्षण उत्तरे । हाती घेउनि बाण फिरे ॥२॥
नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७७
📿 निवडावे खडे । तरी दळ
2077.
निवडावे खडे । तरी दळणा वोजे घडे ॥१॥
नाही तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥धृपद॥
निवडावे तन । सेती करावे राखण ॥२॥
तुका म्हणे नीत । न विचारिता नव्हे हित ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०७७
📿 अवघे ते दैवाचे । विठ
2077.
अवघे ते दैवाचे । विठ्ठल विठ्ठल वदती वाचे ॥१॥
अवघा धंदा दुजा नाही । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
अवघा संसार करिती । वाचे अवघे विठ्ठल म्हणती ॥३॥
अवघी कर्मे घडलीं तया । अवघे विठ्ठलाचि पाया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०७९
📿 नका धरू कोणी । राग व
2079.
नका धरू कोणी । राग वचनाचा मनी ॥१॥
येथे बहुतांचे हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥धृपद॥
नाही केली निंदा । आह्मी दुसिलेसे भेदा ॥२॥
तुका म्हणे मज । येणे विण काय काज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०८१
📿 सदा सुरवर सुख ते इच्
2081.
सदा सुरवर सुख ते इच्छिती । ऐसा लक्ष्मीपती का रे न भजा ॥१॥
सोइरा धाइरा आन दुजा नाही । गुरु पिता पाही हाचि बंधु ॥२॥
सज्जन सांगती आन नाही आम्हा । एका जनार्दनी प्रेमा वसे देही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०८२
📿 एक मागे एक पुढे । उभ
2082.
एक मागे एक पुढे । उभे रोकडें असती ॥१॥
चला जाऊ तया ठाया । पाहुं सखया आवडी ॥२॥
एक एकाचें करुनि मीस । रहिवासले सावकाश ॥३॥
बहु युगे जाहलीं पाहता । खाली न बैसती उभयतां ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०८३
📿 नित्य मनासी करितो वि
2083.
नित्य मनासी करितो विचार । तो हे अनावर विषयलोभी ॥१॥
आता मज राखे आपुलिया बळे । न देखे हे जाळे उगवता ॥धृपद॥
सापडला गळी नाही त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥२॥
तुका म्हणे मी तो अज्ञान चि आहे । परि तुझी पाहे वास देवा ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मनांस उपदेश›
📿 अभंग क्र. २०८३
📿 मन धांवे सैरावरा | म
2083.
मन धांवे सैरावरा | मन मारुनि केले एकमोह्रा ॥१॥
मत केले तैसे होय | धावडिले तेथे जाय ॥२॥
मत लांचावले न राहे | तत्त्वी बैसले कधि नवजाये ॥३॥
नामा म्हणे सोहंशब्दी | मन वेधले गोविदी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०८४
📿 दुर्बळाचे हाती सापडल
2084.
दुर्बळाचे हाती सापडले धन । करिता जतन नये त्यासी ॥१॥
तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणा तुम्ही आता ॥धृपद॥
खाता लेता नये मिरविता वरी । राजा दंड करी जनराग ॥२॥
तुका म्हणे मग तळमळ उरे । देखिले ते झुरे पाहावया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०८५
📿 मागे जैसा होता माझे
2085.
मागे जैसा होता माझे अंगी भाव । तैसा एक ठाव नाही आता ॥१॥
ऐसे ग्वही माझे मन मजपाशी । तुटी मुदलेंसी दिसे पुढे ॥धृपद॥
पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥२॥
तुका म्हणे जाली कोंबड्याची परी । पुढे चि उकरी लाभ नेणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०८६
📿 किती तुजपाशी देऊ परि
2086.
किती तुजपाशी देऊ परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥१॥
आता माझे हाती देई हित । करी माझे चित्त समाधान ॥धृपद॥
राग आला तरी कापू नये मान । बाळा मायेविण कोण दुजे ॥२॥
तुका म्हणे तैसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०८६
📿 भक्त देव एके ठायी ते
2086.
भक्त देव एके ठायी ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊ तेथे ॥१॥
पाहू चरनकमळ वोवाळू श्रीमुख । होईल तेणे सुख चौदेहांसी ॥२॥
संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥
एका जनार्दनी आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०८७
📿 लाज वाटे पुढे तोंड द
2087.
लाज वाटे पुढे तोंड दाखविता । परि जाऊ आता कोणापाशी ॥१॥
चुकलिया कामा मागतो मुशारा । लाज फजितखोरा नाही मज ॥धृपद॥
पाय सांडूनिया फिरतो बासर । स्वामिसेवे चोर होऊनिया ॥२॥
तुका म्हणे मज पाहिजे दंडिले । पुढे हे घडले न पाहिजे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०८७
📿 योगयाग तप जयासाठी कर
2087.
योगयाग तप जयासाठी करणे । ते उभे कोणे पंढरीसी ॥१॥
काउलाची पेठ पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वानकरी ॥२॥
पताकांचे भार गर्जती हरिदास । होऊनी उदास सर्वभावे ॥३॥
एका जनार्दनी नाही कामक्रोध । अवघा गोविंद हृदयी त्यांचे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०८८
📿 पुढे गेले हरीचे दास
2088.
पुढे गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥
त्याची मार्गीं आम्ही जाऊ । वाचे गाऊ विठ्ठला ॥२॥
संसाराचा न करु धंदा । हरुषे सदा नाम गाऊ ॥३॥
एका जनार्दनी डोळे । पहाती पाउले कोंवळें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०८९
📿 आता गुण दोष काय विचा
2089.
आता गुण दोष काय विचारिसी । मी तो आहे रासी पातकांची ॥१॥
पतितपावनासवे समागम । अपुलाले धर्म चालवीजे ॥धृपद॥
घनघाये भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥२॥
तुका म्हणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 मनांस उपदेश›
📿 अभंग क्र. २०८९
📿 संसारी असता जीवनमुक्
2089.
संसारी असता जीवनमुक्त आम्ही | विठ्ठल हे नामी विनटलो ॥१॥
काया क्लेश करणे शरीर दंडगे | न लगे हिंडणे दाही दिशा ॥२॥
कोण वाहे मंत्र वाउगी खटपट | गाऊ निष्कपट रामनाम ॥३॥
नामा म्हणे मज आहे हा भरंवसा | मना तू विश्वासा दृढ धरी ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 समाधी योग निषेध›
📿 अभंग क्र. २०९३
📿 सोळा त्या समाधि औट प
2093.
सोळा त्या समाधि औट पोठामाझारी | तेथ नरहरि देव नांदे ॥१॥
बारा गुंफेमाजी भ्रमर गुंफे मध्ये | तेथे आत्मा शुद्ध ज्ञान नांदे ॥२॥
गोल्हाटाचा भेद असेची आघवा | शुद्ध ज्ञानदिवा | अलक्ष तो ॥३॥
नामा म्हणे आम्हा तेजाच्या उजेडा | देव केला घोडा बेसावया ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०९३
📿 प्रेमळ प्रेमळ अंतरी
2093.
प्रेमळ प्रेमळ अंतरी प्रेमळ । नाही काळ वेळ तयालागीं ॥१॥
प्रेमभावे गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥
जनार्दनाचा एक रंगला चरणी । निजरंगीं रंगोनि मिळोनि गेला ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०९४
📿 कथा सुख करी कथा मुक्
2094.
कथा सुख करी कथा मुक्त करी । कथा याची बरी विठोबाची ॥१॥
कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥धृपद॥
कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरीकथा ॥२॥
कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी काप कळीकाळासी ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 समाधी योग निषेध›
📿 अभंग क्र. २०९६
📿 सत्य ज्ञानानंत गगनाच
2096.
सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण | नाही. रूप गुण 'गुणातीत ॥१॥
भाद ना भेद ना छंदे निरंतर | दोहींच्या विचारे ब्रह्म नांदे ॥२॥
येकवटी ब्रह्म आत्माराम लूप | ते पाहा स्वरूप लावण्याचे ॥३॥
नामा म्हणे केले चैतन्य जवळ, | मांडियेला खेळ संती तेथे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०९६
📿 गोमटेंक नागर कटी धरु
2096.
गोमटेंक नागर कटी धरुनि कर । उभा तो सुकुमार वैकुंठींचा ॥१॥
रूपाचें रूपस पाहता सावकाश । धणी धाय मनास तया पाहता ॥२॥
नाठवे कल्पना मनाचिया मना । बुद्धि ते चरणा विनटली ॥३॥
एका जनार्दनी इंद्रियांची चाली । सर्व हारपली पंढरी पाहता ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 समाधी योग निषेध›
📿 अभंग क्र. २०९७
📿 चैतन्याचा खेळ एकवट ब
2097.
चैतन्याचा खेळ एकवट ब्रह्म | तिर्गुणासी गुण खूप जाहले ॥१॥
चैतन्य त्या कळा रूपा आले संत | निर्गुणाचा हेत रामकृष्ण ॥२॥
खेळ मांडियेला गोल्हाट शिखरी | गोलांगुळांगुळी समाधिस्थ ॥३॥
समाधी साधन अखंड उन्मनी | औटपीठ ध्वनी नाद होय ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२›
📿 अभंग क्र. २०९७
📿 उपवास पारणे न लागे स
2097.
उपवास पारणे न लागे समाधी । वायांचि उपाधि कोण धरी ॥१॥
आम्हा विष्णुदासा कळलेंसे वर्म । मुखी गावे नाम हाती टाळी ॥२॥
आनंदे बागडे जाती पंढरीसी । पहाती विठोबासी दृष्टीभरी ॥३॥
एका जनार्दनी मनाचे उन्मन । एका दरुशने मुक्तिपद ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २००१ ते २५००›
📿 अभंग क्र. २०९८
📿 उचिताचा दाता । कृपाव
2098.
उचिताचा दाता । कृपावंता तू अनंता ॥१॥
का रे न घालिसी धाव । तुझे उच्चारिता नांव ॥धृपद॥
काय बळयुक्ती । नाही तुझे अंगी शक्ती ॥२॥
तुका म्हणे तू विश्वंभर । ओस माझे का अंतर ॥३॥