🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६३
📿 पतिव्रता ऐसी जगामध्य
3063.
पतिव्रता ऐसी जगामध्ये मात । भोगी पाच सात अंधारी ते ॥१॥
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषी मन संभ्रम तो ॥२॥
तुका म्हणे तिच्या दोषा नाही पार । भोगील अघोर कुंभपाक ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०६३
📿 श्वानाचा तो धर्म करा
3063.
श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भले बुरे त्यास कळे कांही ॥१॥
वेश्यांचा धर्म द्रव्य ते हरावें । भलें बुरे भोगावें न कळे कांही ॥२॥
निंदकाचा धर्म निंदा ती करावी । भलें बुरें त्यागावी न कळे कांही ॥३॥
सज्जानांचा धर्म सर्वाभुतीं दया । भेदाभेद तया न कळे कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६४
📿 सिंदळीसी नाही पोराची
3064.
सिंदळीसी नाही पोराची पै आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥
अथवा सेती बीज पेरिले भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥
तुका म्हणे नाही राखायाची चाड । तरि का लिगाड करुनी घेतो ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६५
📿 संसारा आलिया एक सुख
3065.
संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥१॥
येणे होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश काही ॥धृपद॥
घेतील तयासी सोपे आहे सुख । बोलियेले मुखे नारायण ॥२॥
सांगितली सोय करुणासागरे । तुम्हा काहो बरे न वाटते ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६६
📿 चाले हे शरीर कोणाचिय
3066.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीविण ॥१॥
देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नको ॥धृपद॥
मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्त्ता म्हणो नये ॥२॥
वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६७
📿 मायारूपे ऐसे मोहिलेस
3067.
मायारूपे ऐसे मोहिलेसे जन । भोगिती पतन नानाकर्मे ॥१॥
काय याची प्रीती करिता आदर । दुराविता दूर तेचि भले ॥धृपद॥
नाना छंदे अंगी वसती विकार । छळियेले फार तपोनिधि ॥२॥
तुका म्हणे ऐसे सिकवितो तुज । आता धरी लाज मना पुढे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६८
📿 जेजे काही मज होईल वा
3068.
जेजे काही मज होईल वासना । तेते नारायणा व्हावे तुम्ही ॥१॥
काय भाव एक निवडू निराळा । जाणसी तू कळा अंतरीचे ॥धृपद॥
तुजविण मज कोण आहे सखा । जे सांगा आणिका जीवभाव ॥२॥
अवघे पिशुन झाले असे जन । आपपर कोण नाठवे हे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०६८
📿 दुःखाचिया भोगी कोडी
3068.
दुःखाचिया भोगी कोडी । रसना गोडी बाधक ॥१॥
पाहता रस उत्तम दिसत । भीतरी रोगाचें गळ गुप्त ॥२॥
गळी अडकला जो मासा । तो जीत ना मरे चरफडी जैसा ॥३॥
जन्ममरण लागले खांदीं । एका जनार्दनी धरा शुद्धी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०६९
📿 कैसी करू आता सांग तु
3069.
कैसी करू आता सांग तुझी सेवा । शब्दज्ञाने देवा नाश केला ॥१॥
आता तुझे वर्म न कळे अनंता । तुज न संगता बुडू पाहे ॥धृपद॥
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासी म्हणती एक ॥२॥
बुडविली भक्ती म्हणीते पाषाण । पिंडाचे पाळण स्थापुनिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०७०
📿 नमो नमो तुज माझे हे
3070.
नमो नमो तुज माझे हे कारणे । काय झाले उणे करिता स्नान ॥१॥
संतांचा मारग चालतो झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥धृपद॥
न करिसी तरि हेचि कोडे मज । भक्ती गोड काज आणीक नाही ॥२॥
करी सेवा कथा नाचेन रंगणी । प्रेमसुखधणी पुरेल तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०७०
📿 साकरेची गोडी साकर सा
3070.
साकरेची गोडी साकर सांडुनि उभी घडी । तैसे आयुष्य जोडिले जोडी नरदेहा ॥१॥
मातियाचें आवदाणें घालिताती अंगी । भोगावयालागीं विषयसुख ॥२॥
गेले गेले बापा हित हातोहाती । पुढे आली राती काळवंखी ॥३॥
आयुष्याच्या शेवटी सुखाचिया गोष्टी । काळा नळा पोटी पडसील बापा ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०७१
📿 विषयाचे सुख मानितो प
3071.
विषयाचे सुख मानितो पामर । भोगितो अघोर नरकगती ॥१॥
मारिती ताडिती यमाचे किंकर । कोण सोडी साचार त्यासी तेथे ॥२॥
कळोनी पडती न कळोनी पडती । कोण होईल गती न कळे तया ॥३॥
एका जनार्दनी येतसे करुणा । म्हणोनि वचना बोलणें हे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०७४
📿 छेदी विषयांचा समुळ क
3074.
छेदी विषयांचा समुळ कंदु । मग भेदु तुटेल ॥१॥
मूळ छेदिता वृक्ष खुडें । तै समुळ विषय उडे ॥२॥
ऐसा अनुराग धरी मनी । देई विषयासी पाणी ॥३॥
एका जनार्दनी गोडी । सहज परमार्थ उघाडी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०७६
📿 कल्पनेचे जळीं वासना
3076.
कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥
तयाच्या धांवण्या कोण धांवे देव । ऐसा तो उपाव नेणेचिना ॥२॥
दुःखाचे डोंगर भोगिती बापुडी । कोण काढाकाढी करील त्यांची ॥३॥
एका जनार्दनी संतावांचूनिया । त्या अभाग्याची दया कोण करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०७७
📿 लावूनिया मुद्रा बांध
3077.
लावूनिया मुद्रा बांधोनिया कंठी । हिंडे पोटासाठी देशोदेशी ॥१॥
नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण । पाहाती पक्वान्न क्षेत्रींचे ते ॥धृपद॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥२॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०७९
📿 स्त्रिया पुत्र कलत्र
3079.
स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत । शेवटींचा अंत नाही कोणी ॥१॥
यमाचिये हाती बांधोनिया देती । भूषणे ही घेती काढूनिया ॥२॥
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०७९
📿 आवडी विष खाउनी मेला
3079.
आवडी विष खाउनी मेला । तो स्वये नरका गेला ॥१॥
कवणा कवण ठेवी दोष । ऐसा मूर्ख तो तामस ॥२॥
अमृत सांडुनी कांजी प्याला । तैसा नर देह गमाविला ॥३॥
लाहूनि उत्तम शरीर । गमाविले परिकर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८०
📿 न लगती मज शब्दब्रम्ह
3080.
न लगती मज शब्दब्रम्हज्ञान । तुझिया दर्शनावाचूनिया ॥१॥
म्हणऊनि तुझे करितो चिंतन । नावडे वचन आणिकाचे ॥धृपद॥
काय ते महत्वे करावी मान्यता । तुज न देखता पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे तुज भेटल्यावाचूनि । न राहे त्याहून होइन वेडा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विषय - अभंग ३०५२ ते ३०८२›
📿 अभंग क्र. ३०८०
📿 हे तो अवघे फजितीचें
3080.
हे तो अवघे फजितीचें भांड । अंतकाळीं तोंड काळे करती ॥१॥
चालता इंदियें म्हणती माझे माझे । अंतकाळीचें वोझे न घेती हे ॥२॥
जरा आलिया निकट भरुनी । जाती हे पळोनि आपुले गृहा ॥३॥
एका जनार्दनी धरी हा विश्वास । रामनामी ध्यास सुखे करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८२
📿 आता माझ्या दुःखा कोण
3082.
आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाईचा पति पावेचि ना ॥१॥
कायविधा त्याने घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होयचि ॥२॥
तुका म्हणे माझी विसरू नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८३
📿 जन्म मृत्यू फार झाले
3083.
जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धावा पांडुरंगा ॥१॥
सिणलो बहुत करिता येरझारा । रखुमाईच्या वरा पावे वेगी ॥२॥
तुका म्हणे तू गा पतितपावन । घेई माझा शीण जन्मांतर ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८४
📿 पंढरीसी जावे ऐसे माझ
3084.
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी । विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
न लगे त्याविण सुखाचा सोहंळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझे ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०८४
📿 धन मानबळे नाठविसी दे
3084.
धन मानबळे नाठविसी देवा । अंतकाळीं तेव्हा कोण आहे ॥१॥
यमाचे ते दंद बैसतील माथा । मग तुज रक्षितां कोण आहे ॥२॥
माता पिता बंधु सोइरे धाईरे । जोंवरी इंद्रियें चालताती ॥३॥
सर्वस्व कामिनी म्हणविसी कांता । ती ही केश देता रडुं लागे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८५
📿 तन मन धन दिले पंढरिर
3085.
तन मन धन दिले पंढरिराया । आता सांगावया उरले नाही ॥१॥
आर्त चाड चिंता नाही मनी आशा । तोडियेला फासा उपाधीचा ॥२॥
तुका म्हणे एक विठोबाचे नाम । आहे जवळी दाम नाही रुका ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८६
📿 आलिया संसारा उठा वेग
3086.
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हे काळाचे धन कुबेराचे । तेथे मनुष्याचे काय आहे ॥धृपद॥
देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे ॥२॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०८८
📿 बारा वर्ष बाळपणक गेल
3088.
बारा वर्ष बाळपणक गेले । परि रामराम मुखी नाही आले ॥१॥
अहा रे मूढा जन्मलासी दगड । गमाविलेंक वाड आयुष्यासी ॥२॥
बारा वर्ष तारुण्य अवस्था । कामक्रोधें लाहो घेतला पुरता ॥३॥
बारा वरुषे वृद्धाप्य आले समुळी । जराव्याधीं देहासी कवळी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०८९
📿 तुज दिला देह । आजूनि
3089.
तुज दिला देह । आजूनि वागवितो भय ॥१॥
ऐसा विश्वासघातकी । घडली कळता हे चुकी ॥धृपद॥
बोलतो जे तोंडे । नाही अनुभविले लंडे ॥२॥
दंड लाहे केला । तुका म्हणे जी विठ्ठला ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०८९
📿 देहो जै पासुनी झाला
3089.
देहो जै पासुनी झाला । तै पासुनी मृत्यु लागला ॥१॥
साप बेडुकाते गिळी । बेडुक मुखें माशी कवळी ॥२॥
ऐसा काळ गिळितो जना । न कळेचि बुद्धिहीना ॥३॥
मरण जाणतो बापुडीं । धरिती प्रपंचीं आवडी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९०
📿 जन्मले ते बाळ । परी
3090.
जन्मले ते बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥
नाही संतसमागम । सदाविषयाचें काम ॥२॥
मुखी रामनाम नाही । सदा संसार प्रवाहीं ॥३॥
एका जनार्दनी भुलोन । स्त्रीआधीन जाहला दीन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९१
📿 गाढव शृंगारिले कोडे
3091.
गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ॥१॥
त्याचे भुंकणे न राहे । स्वभावासी करील काय ॥धृपद॥
श्वान शिबिके बैसविले । भुंकता न राहे उगले ॥२॥
तुका म्हणे स्वभावकर्म । काही केल्या न सुटे धर्म ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९२
📿 आवडे सकळा मिष्टान्न
3092.
आवडे सकळा मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥
काय तया एका साठी । कामे केली अवघी खोटी ॥धृपद॥
दर्पण नलगे एका । ठाव नाही ज्याच्या नाका ॥२॥
तुका म्हणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९३
📿 अखंड संत निंदी । ऐसी
3093.
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धी ॥१॥
काय म्हणावे तयासी । तो केवळ पापरासि ॥धृपद॥
जो स्मरे राम नामा । तयासी म्हणती रिकामा ॥२॥
जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणताती भिकारी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९३
📿 धनदारापुत्र अपत्यें
3093.
धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझे । परी हे काळाचे खाजे बापा ॥१॥
गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥
तैसा याचा विश्वास न धरी तू; मनी । यमाची जांचणी तुजसी होय ॥३॥
एका जनार्दनी सोडोनि देई संग । नाम तू अभंग हरीचे वदे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९४
📿 या रे नाचो अवघेजण ।
3094.
या रे नाचो अवघेजण । भावे आनंदे करून ॥१॥
गाऊ पंढरीचा राणा । क्षेम देऊन संतजना ॥धृपद॥
सुख फुका साठी । साधे हरीनाम बोभाटी ॥२॥
प्रेम वाटीतो उदार । देता नाही सान थोर ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९४
📿 ज्यांचें आयुष्य नोहे
3094.
ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले ॥१॥
इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके ते ॥२॥
आणिले ते उसनें साचा । देणे तयाचा प्रकार ॥३॥
शरण एका जनार्दनी करी विनवणी सर्वांसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९५
📿 पिता पुत्र नातु सर्व
3095.
पिता पुत्र नातु सर्व काळे ग्रासिले । उरले ते गेले काळमुखीं ॥१॥
सायास करूनि वाढविती माझे । परि काळाचे ते खाजे नेणती ते ॥२॥
बाळतरुण वृद्धदशातें पावती । परी न म्हणती रामराम ॥३॥
एका जनार्दनी भुलला गव्हार । न करी स्वहिताचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९६
📿 माझे मन पाहे कसून ।
3096.
माझे मन पाहे कसून । चित्त न ढळे तुजपासून ॥१॥
कापुनि देइन शिर । पाहा कृपण की उदार ॥धृपद॥
मजवरी घाली घण । परि मी न सोडी चरण ॥२॥
तुका म्हणे अंती । तुजवाचूनि नाही गति ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९६
📿 एक पाठी एक पुढा । आह
3096.
एक पाठी एक पुढा । आहे मरणाचा हुडा ॥१॥
आज मेले उद्यां मरती । मागे राहाती तेही रडती ॥२॥
मरण जाणोनिया पाही । उगेच बोलती प्रवाहीं ॥३॥
ऐसी उगेच भुली पडली देखा । एका जनार्दनी भुलले एका ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९७
📿 भूमीवरी कोण ऐसा । गा
3097.
भूमीवरी कोण ऐसा । गांजू शके हरीच्या दासा ॥१॥
सुखे नाचा हो कीर्त्तनी । जयजयकारे गर्जा वाणी ॥धृपद॥
काळा सुटे पळ । जाती दुरिते सकळ ॥२॥
तुका म्हणे चित्ती । साच माना हे निश्चिंती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९८
📿 झाला जीवासी उदार । त
3098.
झाला जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥
करीन आडक्या घोंगडे । उभ्या बाजारी उघडे ॥धृपद॥
जो जो धरिली भीड । तो तो बहु केली चीड ॥२॥
तुका म्हणे मूळ । तुझे उच्चारीन कुळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९८
📿 इष्ट मित्र बंधु चुलत
3098.
इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणे सर्व देख ॥१॥
यमाची यातना पडता जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥
जोंवरी आहे तुज जवळी धन । तोंवरी पिशून म्हणती माझे ॥३॥
एका जनार्दनी जवळी आला काळ । तेव्हा ते निर्बळ सर्व होती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०९९
📿 मिळे हरीदासांची दाटी
3099.
मिळे हरीदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥
तेथे म्या काय करावे । माझे कोणे आइकावे ॥धृपद॥
कैसे तुज लाजवावे । भक्त म्हणोनिया भावे ॥२॥
नाचता नये ताली । वाजविता नये टाळी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३०९९
📿 एक एक मरती पहाती । द
3099.
एक एक मरती पहाती । दुजियासी भ्रांति कैशी बापा ॥१॥
अरे ग्रासिले शरीर काळे देखा । परि तया मूर्खा न कळे कांही ॥२॥
एका जनार्दनी भुलला प्रपंचा । कोण दुःखा त्याच्या सोडवील ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०१
📿 पहा पहा उसां बैसलासे
3101.
पहा पहा उसां बैसलासे काळ । भरली ते वेळ न चुके मग ॥१॥
सर्वही संबंधीं असता जवळी । नेईल तात्काळीं तुजलागीं ॥२॥
पाहे पा तो बोका बैसतो टपूनी । जातो उचलोनी घेउनी अंश ॥३॥
एका जनार्दनी किती भाकूं कींव । नायकती जीव गुंतले ते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०२
📿 काळाचे आहारीं । पडसी
3102.
काळाचे आहारीं । पडसी शेवटी निर्धारी ॥१॥
ऐसे असोनि ठाउक मना । परि न स्मरे रामराणा ॥२॥
गुंतले ते मायाजाळीं । न कळे गळी लागती ॥३॥
एका जनार्दनी शरण । वाचे न म्हणती नारायण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०३
📿 कठिण नारळाचे अंग । ब
3103.
कठिण नारळाचे अंग । बाहेरी भीतरीचे चांग ॥१॥
तैसा करी का विचार । शुद्ध कारण अंतर ॥धृपद॥
वरी काटे फणसफळा । माजि अंतरी जिव्हाळा ॥२॥
मिठे रुचविले अन्न । नये सतंत कारण ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०३
📿 नेमिला काळ लागला पाठ
3103.
नेमिला काळ लागला पाठी । हे तो दिठी पाहती ॥१॥
एकापाठीं दुसरे जाय । वाया हाय हाय उरते ॥२॥
न सोडी तो लागला मागे । शिणते वाउगे मूर्ख ते ॥३॥
शरण एका जनार्दनी । पडती वदनी काळाचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०४
📿 बाळ माते निष्ठुर होय
3104.
बाळ माते निष्ठुर होय । परि ते स्नेह करीत आहे ॥१॥
तैसा तू गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हा ॥धृपद॥
नेणती भागली । कडे घेता अंग घाली ॥२॥
भूक साहे तहान । त्याचे राखे समाधान ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०४
📿 अगाध जीवनी मत्स्य ते
3104.
अगाध जीवनी मत्स्य ते असती । नाही दुःखप्राप्ति तया कधी ॥१॥
परि आलिया ढीवर घालितसे गळ । मग तळतळ करुनी काय ॥२॥
आमीष देखोनी भक्षावया जाय । परिनेणे काळ आहे म्हणोनिया ॥३॥
एका जनार्दनी प्राणी तेक भुलले । आमिषा गुंतले मीनापरी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०५
📿 दाता लक्षुमीचा पति ।
3105.
दाता लक्षुमीचा पति । माझे मागणे ते किती ॥१॥
जाणे तान्हेल्याची तहान । पीता गंगा नव्हे न्यून ॥धृ॥
कल्पतरु झाला देता । तेथे पोटाचा मागता ॥२॥
तुका म्हणे संता ध्याता । परब्रम्हची आले हाता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०५
📿 देखती निमाले आपुले प
3105.
देखती निमाले आपुले पुर्वज । पितापुत्र सहज तेही गेले ॥१॥
नाही त्या यमासी करुणा कवणाची । भोगविती दुःखाची नाना योनी ॥२॥
सुकृत पदरी मूळ नाही दोरा । घालिता अघोरा अंत न लगे ॥३॥
एका जनार्दनी नाही तेथे सुख । भोगविती दुःख न सांगवे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०६
📿 कुरुवंडी करीन काया ।
3106.
कुरुवंडी करीन काया । वरोनि पाया गोजिरिया ॥१॥
बैसले ते रूप डोळा । मन चाळा लागले ॥धृपद॥
परते न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥
तुका म्हणे विसावलो । येथे धालो धणीवरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०६
📿 आयुष्य जाते पळ पळ तु
3106.
आयुष्य जाते पळ पळ तुजला कैसे कळेना । दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा ॥१॥
चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना । आयुष्य खातो काळ तुम्ही राम का रे म्हणाना ॥२॥
नरदेह पांचाचा आणिलासे उसना । कांही तरी स्वहित करा व्यर्थ का रे वल्गना ॥३॥
राम दृढ धरशील तरी तुटेल यातना । भ्रांति माया काढी नको पडुं बंधना ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०७
📿 साधनाचे कष्ट मोठे ।
3107.
साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हे ॥१॥
मुखे गावे भावे गीत । सर्व हित बैसलिया ॥धृपद॥
दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥
तुका म्हणे आत्मनिष्ठा । भोग चेष्टा मनाची ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०८
📿 घेता आणिकाचा जीव । त
3108.
घेता आणिकाचा जीव । तेव्हा कीव कराना ॥१॥
आपले ते वरदळ नेदा । हे गोविंदा कृपणता ॥धृपद॥
सेवा तरी इच्छा सांग । चोरिले अंग साहेना ॥२॥
तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०८
📿 घटिका भरता न लगे वेळ
3108.
घटिका भरता न लगे वेळ । उभा काल वाट पाहे ॥१॥
कोणी न ये रे संगाती । वाया होतसे फजिती ॥२॥
माप भरता नाही गुंती । वाया कुंथी फळ काय ॥३॥
शरण रिघा जनार्दनी । मोक्षदानीं उदार ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१०९
📿 आम्हा केले गुणवंत ।
3109.
आम्हा केले गुणवंत । ते उचित राखावे ॥१॥
तुम्हासी तो चाड नाही । आणिका काही सुखदुःखा ॥धृपद॥
दासांचे तो देखो नये । उणे काय होईल ते ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा । दृष्टि करा सामोरी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३१०९
📿 देह अवसानी काळाची तो
3109.
देह अवसानी काळाची तो संधी । पोहोंचली आधी येवोनियां ॥१॥
कोण सोडवील तुजलागीं बापा । श्रीराम जपा लवलाही ॥२॥
छाया जैशी हाले नाशिवंत खरी । तैशीच ही परी देहाचिया ॥३॥
एका जनार्दनी भुलूं नको माया । काळ तो लवलाह्मा नेईल बापा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३११०
📿 अगत्य ज्या नरका जाणे
3110.
अगत्य ज्या नरका जाणे । वीट मानणे कीर्तने ॥१॥
नावडेसा झाला बाप । आले पाप वस्तीसि ॥धृपद॥
नारायण नाही वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥
तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जगझोडी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३१११
📿 पहा ते पांडव अखंड वन
3111.
पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥१॥
प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनी नारायण ॥धृपद॥
सुदामा ब्राम्हण दरिद्रे पीडिला । नाही विसरला पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर झाले तरी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३११२
📿 जन्ममरणांची कायसी चि
3112.
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागता पंढरीराया ॥१॥
वदनी तुझे नाम अमृतसंजीवनी । असता चक्रपाणी भय काय ॥धृपद॥
हृदयी तुझे रूप बिंबले साकार । तेथे कोण पार संसाराचा ॥२॥
तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असता कळिकाळ पाया तळी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संसार - अभंग ३०८३ ते ३१७७›
📿 अभंग क्र. ३११२
📿 नरदेहीं सुख सोहळा सं
3112.
नरदेहीं सुख सोहळा संस्कार । परितेथें विकार दैवयोगे ॥१॥
बालत्वाचें सुख अज्ञान दशेंत । रामनाम मुखांत न ये कधी ॥२॥
तरुण अवस्था विषयांचे ध्यान । न ये ते भजन मुखी कदा ॥३॥
जरेनें वेष्टिलें जाले वृद्धपण । एका जनार्दन भजन नेणे ॥४॥