सोळा सहस्र ताटे द्वि
2236.
सोळा सहस्र ताटे द्विजालागी आली । अमृताची गेली चवी तेव्हा ॥१॥
पक्कान्नाचा तरी वाढवू विस्तार । होईल उशीर कथेलागी ॥२॥
हरिरुचि जेवण सुदामा जेविला । वेगी आंचवला संसारासी ॥३॥
नामा म्हणे त्यासी देवे दिल्या विडा । रंगला तो जोडा वैराग्याचा ॥४॥
