विनंति करी मंदोदरी ।
2244.
विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि ॥१॥
वांया आणिली जानकी घरी । लाज झाली तिही लोकी ॥२॥
मज पाहाता हे विवसी । क्षय आणिला कुळासी ॥३॥
आभिलाषिता पर सती । हे तो नव्हे राजनीती ॥४॥
कोण आमुचा हितकरू । सांगे निर्मळ विचारू ॥५॥
नामया स्वामीसी शरण जावे । स्वहित आपुले करावे ॥६॥
