🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६९५
📿 गडी गेले रडी । कान्ह
3695.
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तू चढी ॥१॥
आम्ही न खेळो न खेळो । आला भाव तुझा कळो ॥धृपद॥
न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥
तुका आला रागे । येऊ नेदी मागे मागे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६९६
📿 यमुनेतटी मांडिला खेळ
3696.
यमुनेतटी मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥
हाल मांडा हाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥धृपद॥
नावे ठेवूनि वाटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥
तुका म्हणे कान्हो तिळया-तांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३६९८
📿 कवळाचिया सुखे । परब्
3698.
कवळाचिया सुखे । परब्रम्ह झाले गोरखे । हात गोवुनि खाय मुखे । बोटासांदी लोणची ॥१॥
कोण जाणे तेथे कोण लाभ । का ते ब्रम्हादिका दुर्लभ ॥धृपद॥
घाली हमामा हुंबरी । पावा वाजवी मोहरी । गोपाळांचे फेरी । हरी छंदे नाचतसे ॥२॥
काय नव्हते त्या घरी खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवे तया । आम्ही ही सोंकलो ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७००
📿 बहु काळी बहु काळी ।
3700.
बहु काळी बहु काळी । आम्ही देवाची गोवळी ॥१॥
नाही विट देतो भाते । जेऊ बैसवु सांगाते ॥धृपद॥
बहु काळे बहु काळे । माझे पाघरे कांबळे ॥२॥
तुका म्हणे नाही नाही । त्याचे आमचे से काही ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७०४
📿 म्हणती धालो धणीवरी ।
3704.
म्हणती धालो धणीवरी । आता न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आता यास विसंबो ॥१॥
चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडू रानी । बैसवू गोठणी । गाई जमा करूनि ॥धृपद॥
न लगे जावे घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तू आम्हा ॥२॥
तुका म्हणे धाले पोट । आता कशाचा बोभाट । पाहाणे ते वाट । मागे पुढे राहिली ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७०५
📿 तुझिये संगति । झाली
3705.
तुझिये संगति । झाली आमुची निश्चिंति ॥१॥
नाही देखिले ते मिळे । भोग सुखाचे सोहंळे ॥धृपद॥
घरी ताकाचे सरोवर । येथे नवनीताचे पूर ॥२॥
तुका म्हणे आता । आम्ही न वजो दवडिता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७०६
📿 कामे पीडिलो माया । ब
3706.
कामे पीडिलो माया । बहु मारी नाही दया ॥१॥
तुझ्या राहिलो आधारे । झाले अवघेचि बरे ॥धृपद॥
तुझे लागलो संगती । आता येतो काकुळती ॥२॥
तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७०७
📿 खेळ मांडियेला वाळवंट
3707.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायी रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळी । पवित्र गाणे नामावळी रे ।
कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥धृपद॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७०८
📿 एके घाई खेळता न पडसी
3708.
एके घाई खेळता न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।
त्रिगुणाचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघासी तरी धरी सोई रे ॥१॥
खेळ खेळोनिया निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।
तेणे चि खेळे बसवंत होसी । ऐसे सत्य जाणे माझ्या भाई रे ॥धृपद॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७१०
📿 (खेळावरील रूपके : टि
3710.
(खेळावरील रूपके : टिपरी)
दोन्ही टिपरी एकचि नाद । सगुण निर्गुण नाही भेद रे ।
कुसरी अंगे मोडितील परी । मेळविति एक एका छंदे रे ॥१॥
काहीच न वजे वाया रे । खेळिया एकचि बसवंत अवघिया रे ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७११
📿 (खेळावरील रूपके : टि
3711.
(खेळावरील रूपके : टिपरी)
या रे गडे हो धरू घाई जाणता ही नेणता । नाम गाऊ टाळी वाहू अपुलिया हिता ॥१॥
फावले ते घ्यारे आता प्रेमदाता पांडुरंग । आजि दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥धृपद॥
हिंडती रानोरान भुजंग ते कांट्यावन । सुख तयांहून आम्हा गाता नाचता रे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आंधळा ३७१० ते ३७१२›
📿 अभंग क्र. ३७११
📿 आधी देखत होतो सकळ ।
3711.
आधी देखत होतो सकळ । मग हीमें दृष्टि गेली आले पडळ । चालता मार्ग न दिसे । केवळ । आता मज करा कृपा मी दीन तुम्हीदयाळ ॥१॥ दाते हो दान करा तुम्ही संत उदार । चालता मार्ग दाखवा मज निर्धार । गुंतलों लोभआशा न कळे विचार । दृष्टीतें फिरवुनि द्या मुखींनामाचा उच्चार ॥२॥ त्रैलोक्यांत तुमची थोरीपुराणें वर्णिती साचार । वेदही तुम्हा गाती तया नकळे निर्धार । कीर्ति गाती सनकादिक तो दाखवाश्रीधर । म्हणोनि धरिला मार्ग नका करू अव्हेर ॥३॥ अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार । तेणे पंथेंचालतांना फिटला मायामोह अंधार । एका जनार्दनीदेखिला परेपरता पर । श्रीगुरुजनार्दन कृपेनें दाविलेंनिजघर ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७१२
📿 (खेळावरील रूपके : टि
3712.
(खेळावरील रूपके : टिपरी)
भीमातीरी एक वसविले नगर । त्याचे नांव पंढरपुर रे ।
तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥
नाचत जाऊ त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 आंधळा ३७१० ते ३७१२›
📿 अभंग क्र. ३७१२
📿 पंढरपुर पाटणीं गा मह
3712.
पंढरपुर पाटणीं गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचे ते नाम ॥१॥ अंधळ्याजीवीचें तो जाणतो धर्म । म्हणोनि आलो गा देईमाझें मज वर्म ॥धृ.॥ असोनि हात पाय डोळेजाहलों मी अंधळा । मुखी नाम तुझे लागलावाचेसी चाळा ॥२॥ देउनी दान माते नाम सांगेये काळी । विठोबाचें दान आले ऐसी देईनआरोळी ॥३॥ दान पावले संतसंगे भक्तीचें । एका जनार्दनी अखंड नाम वाचे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७१३
📿 (काला)
3713.
(काला)
ब्रम्हादिका न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली ॥१॥
मोहरी पावा वाहे काठी । धावे पाठी गाईचे ॥धृपद॥
उच्छिष्ट जे न लभे देवा । ते हे सदैवा गोवळ्या ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांगुळ ३७१३ ते ३७१५›
📿 अभंग क्र. ३७१३
📿 पांगुळ ३७१३ ते ३७१५
3713.
पांगुळ ३७१३ ते ३७१५
मी माझे कल्पनेने जाहलोंसे पांगुळ । चालता न चलवेचि कोठे न मिळे स्थळ । हिंडलों
दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण हीभ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागोगुरुमहिमा देही दाविला देव । निवारुनी भवरजाळे अवघा निरसला भेव ॥धृ.॥ कर्म त्याअकर्माच्या लागती वाटे ठेसा । संपत्ती विपत्तीचामानिला भरंवसा । कन्या पुत्र आप्त जन हा तोसहज वोळसा । या भ्रमडोहीं बुडालों धांवे गुरुरायासर्वेशा ॥२॥ येउनी गुरुनाथें माथा ठेविला करू । अज्ञानतिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू । गर्जतचालियेलों फिटला अज्ञान अंधारू । एका जनार्दनीमाझा श्रीगुरु उदारू ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७१४
📿 (दळण)
3714.
(दळण)
शुद्ध दळणाचे सुख सांगो । मानवत असे सईबाई ॥१॥
शुद्ध ते वळण लवकरी पावे । डोलविता निवे अष्टांग ते ॥धृपद॥
शुद्ध हे जेविता तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांगुळ ३७१३ ते ३७१५›
📿 अभंग क्र. ३७१४
📿 मृत्यूलोकी एक नगर त्
3714.
मृत्यूलोकी एक नगर त्यांचे नांवपंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर ।
पुंडलीक भक्तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती
साधुसंत जीवा वाटेहुरहुर ॥१॥ तुम्ही संतमायबाप
एवढा उपकार करा । न्या मज तेथवरी । दाखवा
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७१८
📿 नेणो वेळ काळ । धालो
3718.
नेणो वेळ काळ । धालो तुझ्याने सकळ ॥१॥
नाही नाही रे कान्होबा भय आम्हापाशी ।
वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥धृपद॥
तुजपाशी भय । हे तो बोलो परी नये ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७२०
📿 कोंडिला गे माज । निर
3720.
कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण ते बरे । येथे करा कारण ॥१॥
हा गे हा गे हरी । करिता सापडला चोरी । घाला गाठी धरी । जीवे माय त्रासाया ॥धृपद॥
तेचि पुढे आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावे ॥२॥
संशयाचे बिरडे । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आता घेता फावेल ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७२३
📿 मेळउनि सकळ गोपाळ । क
3723.
मेळउनि सकळ गोपाळ । काही करिती विचार ॥१॥
जाऊ चोरू लोणी । आजि घेऊ चंद्रधणी ।
चला वेळ लावियेला अझुणी । एकाकरिता गडे हो ॥धृपद॥
वाट काढिली गोविंदी । मागे गोपाळांची मांदी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पिसा ३७२२ ते ३७२३›
📿 अभंग क्र. ३७२३
📿 राम रामम्हणोनि सदा र
3723.
राम रामम्हणोनि सदा रडे । जे जे देखे"त्याच्या पाया पडे ॥१॥ देव देखत पिसे पाही । आपुलेपारखेंनोळखे कांही ॥२॥ बोलामाजीं घालीमौनाची मिठी । शून्याहीवरील सांगतो गोष्टी ॥३॥ आपुलियां माथा आपण मारी । त्याच्या पिसेपणाकोण आवरी ॥४॥ एका जनार्दनी पिसा झालाखरा । आपुल्या आपण नाशी शरीरा ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७२४
📿 का रे गमाविल्या गाई
3724.
का रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागे झाले काई । एका ते का नेणसी ॥१॥
केलासी फजित । मागे पुढे ही बहुत । लाज नाही नित्य । नित्य दंड पावता ॥धृपद॥
वोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तये काढी । धावेल कापडी । तुझी आधी वोढाळा ॥२॥
चाले चाल धावे । मी ही येतो तुजसवे । तुका म्हणे जव । तेथे नाही पावली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 खेळीया ३७२४ ते ३७२५›
📿 अभंग क्र. ३७२४
📿 खेळीया ३७२४ ते ३७२५
3724.
खेळीया ३७२४ ते ३७२५
देव छिनालका छिनालका । खेळखेळाडी बांका ॥१॥ छंद बडा सुरवर को वाटा । जाके झरूके में बैठा । बड़ा धरम का दाता । नहींजात पात कुच नाता ॥२॥ एकनाथ का वाली । उसे कोण देवे गाली ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 खेळीया ३७२४ ते ३७२५›
📿 अभंग क्र. ३७२५
📿 जनी वनी एक जनार्दन द
3725.
जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासीनमन करू आता रे । मन उन्मन जयासी पहाता । त्याच्या चरणावरी माथा रे ॥१॥ जाचत पंढरीसीजाऊंरेखेळीया । क्षराक्षरातीत पाहू रे । टाळ मृदंगमेळवुनि मेळा । गुरूवचनी खेळ खेळा रे॥ध्रु॥भक्ती वैराग्य कुंडले श्रवणी । ज्ञानांकुशमुगुटमणीरे । सप्रेम उटी अंगी चंदनाची । सत्वाची कासनिर्वाणी रे ॥२॥ अष्टभावेंखेळिये खेळताती ठायी । घागऱ्या वाजती पायी रे । दया क्षमा दोन्ही चवऱ्याढाळती । शांती सत्रावी छाई रे ॥३॥ वाद निमालाशब्द खुंटला । त्रिभुवनी आनंद झाला रे । एकाजनार्दनीं शरण गेला । तो एकपण विसरला रे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७२७
📿 पैल आली आगी कान्हो क
3727.
पैल आली आगी कान्हो काय रे करावे । न कळे ते कैसे आजि वांचो आम्ही जीवे ॥१॥
धाव रे हरी सापडलो संधी । वोणव्याचे मधी बुद्धि काही करावी ॥धृपद॥
अवचिता ज्वाळा येता देखिल्या वरी । परतोनि पाहता आधी होतो पाठमोरी ॥२॥
सभोवता फेर रीग न होय पळता । तुका म्हणे जाणसी ते करावे अनंता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७२८
📿 भिऊ नका बोले झाकुनिय
3728.
भिऊ नका बोले झाकुनिया राहा डोळे । चालवील देव धाक नाही येणे वेळे ॥१॥
बाप रे हा देवाचा ही देव कळो । नेदी माव काय करी करवीतो ॥धृपद॥
पसरूनि मुख विश्वरूप खाय ज्वाळ । सारूनिया संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागे भ्यालो वायाविण । कळो आले आता या सांगाते नाही शिण ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७२९
📿 नेणती तयांसि साच भाव
3729.
नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाही नाचे पावा वाजवी मोहरी ॥१॥
चला रे याच्या पाया लागो आता । राखिले जळता महा आगीपासूनि ॥धृपद॥
कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखो पोळला तुज तोंडी कोठे अंगी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही का रे करिता नवल । आमची सिदोरी खातो त्याचे आले बळ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सरोदा ३७२९ ते ३७३०›
📿 अभंग क्र. ३७२९
📿 सरोदा ३७२९ ते ३७३०
3729.
सरोदा ३७२९ ते ३७३०
डुगडुगडुग जाती ब्रह्मांड युग । त्या अहं ममतेच्या पोटी । नका की जीजाराजांनो ॥१॥ अहो त्या अहं ममतेच्या पोटी । उद्भवल्या ब्रह्मांड कोटी । त्यांची समुळ सांगेन गोलीमाझेसरोद्याचे बोलचावटीनम्हणावेंकीजीराजांनीशमी निजानंदपुरीचा रहिवाशी । धांवोनी आलोंतम्हां संतापाशी । शकुन सांगेन निश्चयेसी । ऐकाश्रवणेसी सादर की जी राजांनो ॥३॥ मी जे बोलणेते बोल । ते समुद्रापरीस खोल । धरी अबोलणे तेबोल । इंद्रिया बोल असु द्या की जी राजांनो ॥४॥ आता सांगतो एक वचन । सर्वांगासी करुनी कान । श्रोती व्हावे सावधान । निजात्म खुण पावोनी कीजी राजांनो ॥५॥ मुळींची जे स्फुरली अहंता । ब्रह्मीची सांगेन समुळ वार्ता । अव्यक्त आले व्यक्तां । माया तत्वता या नांव की जी राजांनो ॥६॥ अहोत्या मायेचिया कुशीं । उत्पत्ती झाली त्रिगुणांसी । ते विये अकार उकार मकरांसी । आउट ओंकार कीजीराजांनो ॥७॥ अकार भूमिका विशेषता । उकारीजाणगता यात्रा । भकारी संश्लिष्टता । सुलिनताअर्धमात्री की जी राजांनो ॥८॥ अकारी रजोगुणाचीवस्ती । उकारी तैजस म्हणतीं । मकारी प्राज्ञअभिमानी बोलती । प्रत्यगात्म्याची वरती अर्धमात्रींचकी जी राजांनो ॥९॥ अकार तो ऋग्वेद जाण॥उकार यजुर्वेद प्रमाण । मकार सामवेद ओळखण । अथर्वण वेद अर्धमात्री की जी राजांनो ॥१०॥ ऐसाॐकाराचा विस्तार । सांगितला सविस्तर जाणोनिअर्थसार । सुखी सुखरूप असावे की जी राजांनी ॥११॥ आता सांगतो एक शकुन बरा । काही मजसरवद्यास दान करा । दान द्यावयाची सोय धरा । चौऱ्याऐंशी लक्ष फेरा चुकेल की जीराजांनो ॥१२॥ वासनेचे काळे चिरगुट । मीपणााची बांधोनी मोट । विषयवासनेची सोडोनी गांठ । दान श्रेष्ठ मज कराकीजी राजांनो ॥१३॥ आकाशाची घेऊनी वाटी । त्रिगुण तेल भरुनी तार्टी । दान करिता उठाउठी । वोखटी पीडा टळेल की जी राजांनो ॥१४॥ म्याशकुन सांगितला जनकरायाप्रती । त्यांची कैसीजाहली देहस्थिती । देहीच असोनी विदेह प्राप्ती । याशकुनाचेनि बोले की जी राजांनो ॥१५॥ आणखीऋषीश्वर थोर थोर । वसिष्ठादी विश्वामित्र । .सनकादिक पराशर । याच विचारे नांदले की जीराजांनो॥१६।आणखी संतमहंतादी पती । याचविचारें नांदले किती । अल्पही करिता त्यांची संगती । नपवे जन्ममृत्युची गती की जी राजांनो ॥१७॥ निवृत्ती सोपान ज्ञानदेव । ते आनंदले याचि वैभवे । खेचर विसोबा नामदेव । चांगा वटेश्वर की जीराजांनो ॥१८॥ परसा भागवत गोरा कुंभार । चोखामेळा महार । रोहिदास चांभार । जुल्हाई कबीरकरिती विचार शकुनाचेंनीं की जी राजांनो ॥१९॥ परी एक बायकोचा संग खोटा । इने भुलविलेश्रेष्ठाश्रेष्ठा । थोर थोर पडिले अव्हाटा । भुलले वाटास्वहितांच्या की जी राजांनो ॥२०॥ जो कासृष्टीकर्ता चतुरानन । इचा पदर लागतांची जाण । स्वकन्येसी देखुनी आपण । तोचि जाण वेडावलाकी जी राजांनो ॥२१॥ जो का विष्णु सृष्टी पाळीता । त्याची कैशी झाली अवस्था । तोही झाला लोळता।वृंदेच्या स्मशानी की जी राजांनो ॥२२॥ जो कांश्रेष्ठ ईश्वर । तोही झाला मोहिनीचा किंकर । बायकोचा लागता पदर । हरिहर ब्रह्मा वेडा झालाकी जी राजांनो॥२३॥याकरितां संग नका करूंइचा । बोल ऐका मज सरवद्याचा । माझिया बोलाविश्वास साचा । तो परब्रह्मींचा रहिवासी की जीराजांनो ॥२४॥ डाकुलता झाला चालता । परंतुनये बोलवितां । निर्मळ पदी वास्तव्यता । झालाडाकुलता की जीराजांनो ॥२५॥ एका जनार्दनींचाएकुलता एका । शकुन गाठी बांधिले देखा । तेव्हांसाधिली सत्वभुमिका । परमार्थ फुका आला हातांकी जी राजांनो ॥२६॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७३०
📿 त्यांनी धणीवरी संग क
3730.
त्यांनी धणीवरी संग केला हरीसवे । देऊनि आपुले तोचि देईल ते खावे ॥१॥
न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥धृपद॥
कान्होबा तू जेवी घासोघासी आळविती । आरुष गोपाळे त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥
तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा । तोय वांचविले ऐसे सांगो रे दातारा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७३१
📿 घ्या रे भोंकरे भाकरी
3731.
घ्या रे भोंकरे भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडा दुरी । असेल ते तयापे ॥१॥
येथे द्यावे तैसे घ्यावे । थोडे परी निरे व्हावे । सांगतो हे ठावे । असो द्या रे सकळा ॥धृपद॥
माझे आहे तैसे पाहे । नाही तरी घरा जाये । चोरोनिया माये । नवनीत आणावे ॥२॥
तुका म्हणे घरी । माझे कोणी नाही हरी । नका करू दुरी । मज पाया वेगळे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 दिवटा ३७३१›
📿 अभंग क्र. ३७३१
📿 दिवटा ३७३१
3731.
दिवटा ३७३१
जागे जागे या वाडियामध्ये जागे । यावाडिया बाहेर जागे । किती एक तळमळ करीत गेले
। हेचि खिंडाराचे खिंडार ॥धृ.॥ कोण्या गृहस्थाच्यावाड्या । कोण्या गृहस्थाच्या पेढ्या । लवकरी काढाबैसावया घोडा । करी या शब्दांचा आडा मोडा । तरीच लेकुराचा खेळ की रे रया ॥१॥ पैल लंकेचाचोहटा । तेथे मी एक बोलीलो दिवटा । तो रांडेचारावण म्हणे हा दिवटा खोटा । राक्षसावाणीच बोले ॥२॥ तेव्हा राम अवतरला त्याने एकचि खांडे । दहा शिरांची मुंडे । विसा भुजांची खांडे । त्या लंकेपुढेघोष मांडिले ॥३॥ आणखी त्या बायकोच्या छंदे । हिरण्यकश्यपाला फुटला फांटा । तो रांडेचा म्हणेहा दिवटा खोटा । मी म्हणे मरण नाही मला । तेम्हणे जीवेमारीन तुला । इतक्यामध्ये नरसोबाम्हणेअवतरला । डोळे फिरवीगरगरां । दांत खाय करकरां।कोंभा चकचक वला । हळु गांड्याळीचे द्वारी । देदान मज दिवट्याला । नाही तरी नागवसी याबोलाला । आणखी दानदेगावच्या जोशाला ॥४॥ तेणे विघ्न टळेल तुझे । मणपांच कणिकेचा दिवा । मध्ये मणपांचघृत । सोळा हातपासोडा । दीडतोळासोन्याचा माकोडा । ऐसे द्यावया दान । एक दाताजनार्दन । इतर लंडी काय देऊं जाणे । एकाजनार्दनाचा दिवटा । भक्तीच्या वसविल्या पेठा । सायुज्यताची नरदेही ॥५॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७३२
📿 काल्याचिये आसे । देव
3732.
काल्याचिये आसे । देव जळी जाले मासे । पुसोनिया हासे । टिरीसांगाते हात ॥१॥
लाजे त्यासि वाटा नाही । जाणे अंतरीचे ते ही । दीन होता काही । होऊ नेदी वेगळे ॥धृपद॥
उपाय अपाय यापुढे । खोटे निवडितो कुडे । जोडुनिया पुढे । हात उभे नुपेक्षी ॥२॥
ते घ्या रे सावकाशे । जया फावेल तो तैसे । तुका म्हणे रसे । प्रेमाचिया आनंदे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 कोल्हाटी ३७३२ ते ३७३३›
📿 अभंग क्र. ३७३२
📿 कोल्हाटी ३७३२ ते ३७३
3732.
कोल्हाटी ३७३२ ते ३७३३
आम्ही कोलाटी कोलाटी । आमुचीउडी उलटी सुलटी । शुन्य स्थावर दिधली गांठी । त्यास जंगम केली उफराटी गा ॥१॥ सोहं शब्दढोलकें पिटी । आमचे वास्तव्य तिरपुटी । आमच्याखेळांत पडली मिठी । पहावी कसबाची आटाआटीगा।शा आली कोल्हाटी प्रेमळु ब्रह्माविष्णु जयाचेबाळु । महाप्रपंच रोविला वेळु खेळ केला त्यानेतुंबळु गा ॥३॥ आमुचा खेळ हो पाहुन । सगुणांसीलागलें ध्यान । त्याने केले निर्गुण । ऐसे बोले एका
जनार्दन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७३३
📿 गोपाळ म्हणती कान्होब
3733.
गोपाळ म्हणती कान्होबा या रे काही मागो । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगो ।
एक म्हणती उगे रे उगे रे उगे रे मागेचि लागो । निजो नका कोणी घरी रे आजि अवघेचि जागो ॥१॥
जाणोनि नेणता हरी रे मध्ये उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे ।
एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसे । पोटीचे होटा आणवी देतो तयांसि तैसे ॥धृपद॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 डोंबारी ३७३४›
📿 अभंग क्र. ३७३४
📿 डोंबारी ३७३४
3734.
डोंबारी ३७३४
लगे ढोल लगे ढोला जरी तुझा वस्तादखोल । तरीच मशीं बोल । नाही तरी वाया फोला
जाईजाईरेगव्हारा ॥१॥ मी निराकाराचा डोंबारीतिही लोकी माझी फेरी । चार युगांच्या खबरी । तज सांगेन रेगव्हारा ॥२॥ प्रथमखेळ कैलासगिरी।वेळ रोविला निर्धारी । शंभु राजा राज्य करी । त्याचे उदारत्व भारी । तुज सांगेन रे गव्हारा ॥३॥ आत्मलिंग आणि पार्वती । ती दिधली दशकंधराप्रतीत्याच्या उदारत्वाची ख्याती । नाही नाही त्रिजगतींधन्य त्या शंभुची याद कर ॥४॥ दुसरा खेळ वैकुंठीश्रीमंत महाराज विष्णुजगजेठी । तेणे दैत्य मारिलेंकपटी । क्षीरसागर तटी रहिवास केला । धन्य त्याविष्णुची याद कर ॥५॥ अवतार धरिले मच्छ कच्छवराह नारसिंह वामन फरशधरा । तिसरा खेळअयोध्यापुरा । धाक दराराशत्रुसी । धन्य त्या विष्णुचीयाद कर ॥६॥ सुर्यवंशी राजेभले । शिभिने मांसदान केले । वैकुंठनाथा संतोषविले । नगर नेलेंमोक्षाप्रती । धन्य त्या शिभ्रीची याद कर ॥७॥ तैसाची हरिश्चंद्र राजा पुण्यराशी । राज्य देऊनीब्राह्मणासी । आपण जाऊनी वाराणशी । पुत्रपत्नीशीं विकीलें । धन्य त्या हरिश्चंद्राची यादकर ॥८॥ दैत्यवंशी राजा बळी । तेणे तप्त केलावनमाळी । देहवान देऊनी पाताळी । देवआपणाजवळी ठेविला । धन्य त्या बळींची याद कर ॥९॥ राजा अजपाल भगीरथा दशरथवंशीजन्मलेरघुनाथ । त्याच्या औदार्याची मात । पहातांवेदशास्त्र शिणले । धन्य त्या रामाची याद कर ॥१०॥ त्या खेळाचा नवलाहो । देवा नकळेअभिप्रावो । वेदा श्रुतींशी नवलावो । अगम्य पहाहोसनकादिकां । धन्य त्या श्रीकृष्णाची याद कर ॥११॥ ऐसा गुलाबराव महाबळी । तेणेभल्याभल्याशी केली रळी । खेळ मांडीला गोकुळी । कृष्ण वनमाळी खेळत । धन्य त्या कृष्णाची यादकर ॥१२॥ तसरीपा दिधल्या अमुप । त्यासी नाहींपुनरावृत्तींचे माप आपण राहनी साम्यप । रुपारुपमेळविलें । धन्य त्या महाराजांची याद कर ॥१३॥ पुढे द्वापारयुगाचा उदयो । म्या बरोबर घेतिलाकामाजी गुलाबरावो । तेणे ठकविले मोठेमोठे पहाहो । तुज सांगेन रे गव्हारा ॥१४॥ नारदासी डोळाघातिला । विश्वमित्र फारच नागविला । पराशर वस्त्रटाकुनि पळाला । लबाडी नव्हे माझिया बोला । तुजसांगेन रेगव्हारा ॥१५॥ ब्रह्मयाची घेतली लंगोटी । इंद्र पळाला कपाटीं । चंद्रासी काळोखी मोठी । अद्यापी जन दृष्टी । पहाती रे गव्हारा ॥१६॥ पुढेकलियुगा माझारी । भुवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरी । पुंडलिकपाटलांचे द्वारी । खेळ जोडीला लवकरी । मागितलाधन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर ॥१७॥ नगरांत डोंबारी आले । उदंड खेळ खेळोनी गेले । परी पुंडलिक भाग्य श्री विठ्ठले । न कळे ऐश्वर्यकोणासी । धन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर।१८॥खेळ खेळतां अंग हारपलें । चित्त मन उन्मनझालें । कीर्तनसुखें निवालें । एका जनार्दनी ऐसे केले- धन्य त्या श्रीविठ्ठलरायांची याद कर ॥१९॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७३९
📿 झालो आता एके ठायी ।
3739.
झालो आता एके ठायी । न वंचू काही एकमेका ॥१॥
सरलो हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥धृपद॥
सोडोनिया गाठी पाहे । काय आहे त्यांत ते ॥२॥
तुका म्हणे झालो निराळा । आता गोपाळा देऊ बोभा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२›
📿 अभंग क्र. ३७४१
📿 वोळलीचा दोहू पान्हा
3741.
वोळलीचा दोहू पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥
घ्या जि हेंगे क्षीर हाती । निगुतीने वाढावे ॥धृपद॥
केले सांगितले काम । नव्हे धर्म सत्तेचा ॥२॥
तुका म्हणे नवे जुने । ऐसे कोणे सोसावे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पोर ३७४३ ते ३७४४›
📿 अभंग क्र. ३७४४
📿 आरता येरे धाकुट्या म
3744.
आरता येरे धाकुट्या मुला । कशानेथोरपण तुला । उलीसेंच की रे दिसते पोर । ब्रह्मींनाही लहान थोर । तुला ब्रह्म ठाऊके आहे । सर्वांघटीं तेंचि पाहे । ब्रह्मी नाही भेदाभेद । ऐसेबोलती चारी वेद । तुझा भेद गळाला । सद्गुरुनेंबोध केला । भेद म्हणजे काय रे गड्या । आत्मस्वरूपपाही रे वेड्या । उलीसेच पोर चावट मोठे । थोरपण असून चहाड खोटे । माझे मन चहाडझालें । ज्ञानामुळे गर्वासी आले । गर्व जाईलकैशापरी । सद्गुरुचें दास्य करी । सद्गुरुकृपातुलाच झाली । भूतमात्रे भरूनि उरली । तरी कायएक एक नेलें । अविश्वासी बुडूनि मेले । विश्वासकाय साच केला । हा तो निश्चय पुराणी झाला । सद्गुरुविना तरेना प्राणी । सांगे तरला आहेकोण । भजन तरी करावे केव्हा । सोहं मंत्री नाहींगोंवा । जपावे तरी कोणे दिवशी । नेम नाहींदिवसनिशी । सद्गुरुसी शरण जाईना तरी । चौऱ्यांशींचे पडशील फेरीं । म्हातारपणी भक्तिकरूं । आयुष्य काय तुझे आज्ञाधारू । धाकटेपणींभक्ति केली । सद्गुरुची संगत जाहली । संगतीनेकोण कोण तरले । महापातकी उद्धरिले । पहिलेते कोळ्याचे पोर । अजामेळ चोखा महार । ऐसेतरले किती एक पोरा । मिती नाही रे गव्हारा । जाबास जाब फार देतोस । बोलू नये ते बोलतोस । उगाच रहा नाही तर देईन दोन काठ्या । अहंकाराहोशील खोट्या । तुझा माझा वाद झाला की रेफार । पांच पोरांनी घेतलें घर । पांच पोरें कोणाचीं । आत्माराम गड्याचीं । सारा खेळ त्याचाच कायरे । खेळ खेळुन निराळाच की रे । हा खेळ तुलाकशानें कळला । एका जनार्दन कृपें फळाशीआला ॥१॥