संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९६१
📿 उपजोनि प्राणी गुंतला
2961.
उपजोनि प्राणी गुंतला संसारी । आपुला आपण वैरी होय रया ॥१॥
न कळे पामरा नरकाचे तू मूळ । विषय सुख अमंगळ भोगी रया ॥२॥
नाथिलिया प्रपंचा गुंतला बराडी । सैर वोढावोढी होईल रया ॥३॥
न कळे तयासी जाहला बुद्धिहीन । माझे माझे कवळोन रडे रया ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९६३
📿 तरीच ही केली । दाने
2963.
तरीच ही केली । दाने वाईट चांगली ॥१॥
एक एका शोभवावे । केले कवतुक देवे ॥धृपद॥
काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥
तुका म्हणे धुरे । डोळे भरिले परि खरे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९६५
📿 जळो ते जाणीव जळो ते
2965.
जळो ते जाणीव जळो ते शाहाणीव । राहो माझा भाव विठ्ठलपायी ॥१॥
जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायी ॥धृपद॥
जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचे ॥२॥
जळो हे शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९६६
📿 विश्वास धरूनि राहिलो
2966.
विश्वास धरूनि राहिलो निवांत । ठेवूनिया चित्त तुझे पायी ॥१॥
तरावे बुडावे तुझिया वचने । निर्धार हा मने केला माझा ॥धृपद॥
न कळे हे मज साच चाळविले । देसी ते उगले घेइन देवा ॥२॥
मागणे ते सरे ऐसे करी देवा । नाही तरी सेवा सांगा पुढे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९६८
📿 भरला तो हावे म्हणे म
2968.
भरला तो हावे म्हणे माझे माझे । वाहतसें ओझे संसाराचे ॥१॥
कुंथत कुंथत वेरझारा करी । खराचीये परी पृष्ठीं वाहे ॥२॥
न मिळेचि अन्न बहुत आपदा । परी त्या गोविंदा स्मरेचिना ॥३॥
ऐसे जन्मोनियां दास संसाराचे । एका जनार्दनी त्याचे तोंड काळे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९६९
📿 आम्ही विठ्ठलाचे दास
2969.
आम्ही विठ्ठलाचे दास झालो आता । न चलेचि सत्ता आणिकाची ॥१॥
नावरे तयासी ऐसे नाही दुजे । करिता पंढरिराजे काय नव्हे ॥धृपद॥
कोठे तुज ठाव घ्यावयासी धावा । मना तू विसावा घेई आता ॥२॥
इंद्रियांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगे संचार चाली तुज ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९६९
📿 न कळे पामरा कांही हा
2969.
न कळे पामरा कांही हा विचार । भोगावे अघोर किती जन्म ॥१॥
मरूनी जन्मावें मरूनी जन्मावें । पुनरापि मरावे वेरझारी ॥२॥
एका जनार्दनी न मानी विश्वास । दृढ धरी पाश संसाराचा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७०
📿 सांगतो तुम्हासी भजा
2970.
सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला । नाही तरि गेला जन्म वाया ॥१॥
करिता भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरी वाहावसी ॥२॥
काही न लगे एक भावचि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९७०
📿 पाहता पाहता नेत्र गे
2970.
पाहता पाहता नेत्र गेले । परी भुललेसे मेळे संसाराच्या ॥१॥
जाऊनि धरितो माझे म्हणोनिया । परी ते वाया जाती सर्व ॥२॥
विषय भोगितो गर्दभाचे रितीं । लाभ तो निश्चिती लत्ताप्रहर ॥३॥
एका जनार्दनी मंडुकाचे परी । वटवट खरी संसारी ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७१
📿 शब्द झणी येऊ नेदी दृ
2971.
शब्द झणी येऊ नेदी दृष्टीपुढे । छळवादी कुडे अभक्तते ॥१॥
जळो ते जाणींव जळो त्याचे बंड । जळो तया तोंड दुर्जनाचे ॥२॥
तुका म्हणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडू डोया न धरू भीड ॥३॥
अर्थ :
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७२
📿 भले लोक नाही सांडीत
2972.
भले लोक नाही सांडीत ओळखी । हे तो झाली देखी दुसऱ्याची ॥१॥
असो आता यासी काय चाले बळ । आपुले कपाळ वोढवले ॥धृपद॥
समर्थासी काय कोणे हे म्हणावे । आपुलिया जावे भोगावरी ॥२॥
तुका म्हणे तुम्हा बोल नाही देवा । नाही केली सेवा मनोभावे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७३
📿 देवाचे भजन का रे न क
2973.
देवाचे भजन का रे न करीसी तैसे । अखड हव्यासे पीडतोसी ॥१॥
देवासी शरण का रे नवजासी तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागी ॥धृ॥
देवाचा विश्वास का रे नाही तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥२॥
का रे नाही तैसी देवाची ते गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९७३
📿 काय सुख आहे संसारी ।
2973.
काय सुख आहे संसारी । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशी प्रपंचीं ॥१॥
जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचे ध्यान । नाही कधी आठवण । न ये मुखी रामनाम ॥२॥
ऐसा भार वाही खर । परितया न कळे साचार । आहे पुढे यातना अघोर । हे कांही नाठवीं ॥३॥
ऐसे होता भरले आयुष्य । मृत्युं पुन्हा येत जन्मास । ऐशा भोगी चौर्यांयशी निःशेष । एका जनार्दनी म्हणे त्यास लाज नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७४
📿 मुके होता तुझ्या पदर
2974.
मुके होता तुझ्या पदरीचे जाते । मूर्ख ते भोगिते मीमीपण ॥१॥
आपुलिये घरी मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलो नको ॥२॥
तुका म्हणे तुम्हा सांगतो मी खूण । देवासी ते ध्यान लावुनि बैसा ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९७४
📿 अशाश्वतासाठीं । का र
2974.
अशाश्वतासाठीं । का रे देवासवें तुटीं ॥१॥
अंतकाळींचे बंधन । कोण निवारी पतन ॥२॥
तू म्हणसी हे माझे । खरा ऐसे वाहसी वोझे ॥३॥
पावलिया अवसानी । कोणी नाही बा निर्वाणीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७६
📿 देऊन या प्रेम मागितल
2976.
देऊन या प्रेम मागितले चित्त । झाली फिटा फिट तुम्हा आम्हा ॥१॥
काशाने उदार तुम्हाशी म्हणावे । एक नेसी भावे एक देशी ॥धृपद॥
देऊनिया थोडे नेशील हे फार । कुंठीशी विचार अवघीयांचा ॥२॥
तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त । नेऊनि दुश्चित पाडीयेले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९७६
📿 नेणतां नेणता का रे अ
2976.
नेणतां नेणता का रे अंध होशी । माझे म्हणविशी का रे बळे ॥१॥
तू कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा मी माझे म्हणुनी ॥२॥
रहाट माळ जैसी जात येत वरी । तैशीच ये परी जन्म देही ॥३॥
एका जनार्दनी करी का विचार । वाया हांवभर फिरूं नको ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७७
📿 तातडीची धाव अंगा आणि
2977.
तातडीची धाव अंगा आणि भाग । खोळंबा तो मग निश्चिंतांचा ॥१॥
म्हणउनि वरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥धृपद॥
कोरडे वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचे ते ॥२॥
तुका म्हणे बरी झऱ्याची ते चाली । साठवण्या खोली कासयांची ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९७७
📿 गुंतला सर्प भुलला ना
2977.
गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची ॥१॥
सदा तळमळ मन नाही स्थिर । भोगिती अघोर जन्मोजन्मी ॥२॥
नळिका यंत्रामाजीं सांपडे वानर । संसारी तो नर तैसा गुंते ॥३॥
एका जनार्दनी करिता नाना युक्ति । मागे ही फजिती पुढे होती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९७८
📿 मी तो बहु सुखी आनंदभ
2978.
मी तो बहु सुखी आनंदभरित । आहे साधुसंता मेळींकारी ॥१॥
काही व्हावे ऐसे नाही माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥धृपद॥
न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेता जन्म ऐसे ॥२॥
मृत्युलोकी कोण धरिले वासना । पावावया जनासवे दुःख ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९७८
📿 कासयासी मूढा करिती स
2978.
कासयासी मूढा करिती संसार । पुढे तो अघोर थोर आहे ॥१॥
बळेंचि का रे नागवासी पाहता । विषयभोग भोगिता दुःख बहु ॥२॥
पातकाची राशी हे तो कन्यापुत्र । तू का रे पवित्र त्यांसी म्हणसी ॥३॥
एका जनार्दनी नाशिवंतासाठीं । देवासवें तुटी पाडितोसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९८२
📿 कळो आला भाव माझा मज
2982.
कळो आला भाव माझा मज देवा । वायाविण जीवा आटकेली ॥१॥
जोडूनि अक्षरे केली तोंडपिटी । न लगे शेवटी हाती काही ॥धृपद॥
देव जोडे म्हणोन सांगतसे लोका । माझा मीच देखा दुःख पावे ॥२॥
तुका म्हणे माझे गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९८२
📿 काय ऐसा यासी मानला व
2982.
काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे ॥१॥
बुडता देखती आणि कांसी डोळे । परि नुमजे अंधळे बळे होती ॥२॥
सायांसें शिणती माझे म्हणोनिया । एका जनार्दनी वाया जाती हीन ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९८३
📿 आता तरी मज सांगा साच
2983.
आता तरी मज सांगा साच भावे । काय म्या करावे ऐसे देवा ॥१॥
चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघाचि ॥धृपद॥
कळे म्हणवूनी करीतसे वाद । दिसे भेदाभेद अंतरीचा ॥२॥
तुका म्हणे नको पाहू तू निर्वाण । देई कृपादान याचकासी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९८४
📿 बोल नाही तुझ्या दातृ
2984.
बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी । आम्ही अविश्वासी सर्वभावे ॥१॥
दंभे करी भक्ती सोंग दावी जना । अंतरी भावना वेगळिया ॥धृपद॥
चित्ताचा तू साक्षी तुज कळे सर्व । किती करू गर्व आता पुढे ॥२॥
तुका म्हणे देवा तू काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९८५
📿 का हो पांडुरंगा न कर
2985.
का हो पांडुरंगा न करा धावणे । तरि मज कोणे सोडवावे ॥१॥
तुझा म्हणऊनि आणिकापे उभा । राहो हे तो शोभा नेदी आता ॥धृपद॥
काळे पुरविली पाठी दुरवरी । पुढे पाय स्थिरी राहो नेदी ॥२॥
नको आणू माझे संचित मनासी । पावन आहेसी पतिता तू ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९८५
📿 वाउगाची सोस वाहताती
2985.
वाउगाची सोस वाहताती वोझे । म्हणती माझे माझे हीन भाग्य ॥१॥
जाणती नेणती राहाटी देखती । मरती रडती देखती त्या ॥२॥
एका जनार्दनी भुलले ते वाया । परि देवराया शरण न जाती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९८६
📿 कावळ्याच्या गळा मुक्
2986.
कावळ्याच्या गळा मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागी केला कस्तुरीचा लेप । तिचे तो स्वरूप काय जाणे ॥धृपद॥
बकापुढे सांगे भावार्थे वचन । वाउगाचि सीण होय त्यासी ॥२॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यासी वाया सीण करू नये ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९८७
📿 न कळसी ज्ञाना न कळसी
2987.
न कळसी ज्ञाना न कळसी ध्याना । न कळसी दर्शना धुंडाळिता ॥१॥
न कळसी आगमा न कळसी निगमा । न बोलवे सीमा वेदा पार ॥२॥
तुका म्हणे तुझा नाही अंतपार । म्हणोनि विचार पडिला मज ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९९१
📿 कोण हरी आता संसाराचा
2991.
कोण हरी आता संसाराचा छंद । न स्मरतां गोविंद दुःख बहु ॥१॥
शहाणे बुडती शहाणे बुडती । शहाणे बुडती भवडोहीं ॥२॥
तत्त्वज्ञानाच्या सांगताती गोष्टी । परि संसार हिंपुटी होती मूढ ॥३॥
एका जनार्दनी संसाराचा छंद । टाकुनी गोविंद भजे का रे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९९२
📿 धन मेळवूनि कोटी । सव
2992.
धन मेळवूनि कोटी । सवे नये रे लंगोटी ॥१॥
पाने खाशील उदंड । अंती जासी सुकल्या तोंड ॥धृपद॥
पलंग न्याहाल्या सुपती । शेवटी गोवऱ्या सांगाती ॥२॥
तुका म्हणे राम । एक विसरता श्रम ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९९२
📿 .
२९९२..
संसारासागरी बुडालिया प्राणी । करी सोडवणी कोण त्याची ॥१॥
अविद्यादि पंच क्लेश हे तरंग । बुडाले सर्वांग प्राणियाचें ॥२॥
भ्रमाच्या आवर्तामाजीं सांपडला । सोडवी तयाला कोण आता ॥३॥
स्त्रियापुत्र आप्त बंधु हे सोयरे । ओढताती सारे मत्स्या ऐसी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९९४
📿 किती वेळां जन्म किती
2994.
किती वेळां जन्म किती वेळा मृत्यु । हाचि न कळे अंतु भाग्यहीना ॥१॥
जन्मोनीं संसार मानितां बरवा । परि या राघवा शरण न जाय ॥२॥
पावलिया मरण सहज नरक कुंडीं । कोण तया सोडी अधमासी ॥३॥
स्वप्नामाजी नेणे परमार्थ मानसी । सदा चौर्यांयंशी फेरे भोगी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९९५
📿 का रे प्रेमे (पुंड्य
2995.
का रे प्रेमे (पुंड्या) मातलासी । उभे केले विठ्ठलासी ॥१॥
ऐसा कैसा रे तू धीट । मागे भिरकाविली वीट ॥धृपद॥
युगे झाली अठ्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥२॥
भाव देखोनि निकट । देवे सोडिले वैकुंठ ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९९६
📿 तुज पाहाता समोरी । द
2996.
तुज पाहाता समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडिली पंढरिराया ॥धृपद॥
नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥२॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९९७
📿 उपदेश किती करावा खळा
2997.
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरे काही ॥१॥
शुद्ध का वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणे ॥धृपद॥
नाही भाव मनी नाइके वचन । आपल्या आपण नाडियेले ॥२॥
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रात्रंदिवस ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९९७
📿 आपुले पारखे सांगता न
2997.
आपुले पारखे सांगता नायकती । करितसे खंती संसाराची ॥१॥
काय संसाराचे सुख ते तयासी । कोण फांसा चुकवील ॥२॥
कधी रामनाम नाठवी पामर । भोगिती अघोर जन्म कोटी ॥३॥
एका जनार्दनी एकपणे शरण । जनी जनार्दनी आम्हा आहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. २९९९
📿 आनंदे कीर्तन कथा करी
2999.
आनंदे कीर्तन कथा करी घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥१॥
मज या आवडे वैष्णवाचा संग । तेथे नाही लाग कळिकाळाचा ॥धृपद॥
स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥२॥
उच्चांरिता मज दुजे वाटे लाज । उपदेशे काज आन नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. २९९९
📿 वायांचि कासया करिता
2999.
वायांचि कासया करिता आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी ॥१॥
संसार कर्दमीं गुंतलेली बापा । किती वेळा खेपा कराव्या त्या ॥२॥
मरावे जन्मावें मरावे जन्मावें । खंडन केव्हा व्हावे न धरा शुद्धी ॥३॥
एका जनार्दनी किती ते सांगावे । नायकर्ता हावे भरले जीव ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग २५०१ ते ३०००›
📿 अभंग क्र. ३०००
📿 आता पहाशील काय माझा
3000.
आता पहाशील काय माझा अंत । आलो शरणागत तुज देवा ॥१॥
करी अंगीकार राखे पायापाशी । झणी दिसो देसी केविलवाणे ॥धृपद॥
नाही आइकिली मागे ऐसी मात । जे त्वा शरणागत उपेक्षिले ॥२॥
तुका म्हणे आता धरी अभिमान । आहेसी तू दानशूर दाता ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३०००
📿 जे आसक्त संसारी । ते
3000.
जे आसक्त संसारी । ते अघोरीं पडती ॥१॥
तया नाही सोडविता । सदगुरुनाथावांचुनी ॥२॥
त्याचे चरण धरा चित्ती । मग भीति कासया ॥३॥
एका जनार्दनी शरण । जन्ममरण चुकलें ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००१
📿 होईल तो भोग भोगीन आप
3001.
होईल तो भोग भोगीन आपुला । न घली विठ्ठला भार तुज ॥१॥
तुम्हापासाव हे इच्छीतसे दान । अंतरीचे ध्यान मुखी नाम ॥धृपद॥
नये काकुलती गर्भवासांसाठी । न धरी हे पोटी भय काही ॥२॥
तुका म्हणे मज उदंड एवढे । नाचेन मी पुढे मायबापा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००२
📿 करावा संकोच चित्तासी
3002.
करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥
देवाची पूजा हे भूताचे पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥
रुसावे फुगावे आपुलियावरी । उरला तो हरी सकळ ही ॥२॥
तुका म्हणे संतपण याची नांव । जरी होय जीव सकळांचा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३००२
📿 मागे बहुतांसी सांगित
3002.
मागे बहुतांसी सांगितले संतीं । वाया हे फजिती संसार तो ॥१॥
अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथे ॥२॥
विष खाऊनियां प्रचीत पाहे कोणी । तैसा अधमपणीं गुंतूं नको ॥३॥
एका जनार्दनी जाऊ नको वाया । संसार माया लटिकी ते ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००३
📿 नाही जप तप जीवाची आट
3003.
नाही जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाही केली ॥१॥
निजलिया ठायी पोकारिला धावा । साकडे ते देवा तुझे माझे ॥धृपद॥
नाही आणूनिया समर्पीले जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥२॥
तुका म्हणे आम्ही वेचिली उत्तरे । घेतली उदारे मायबापे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००४
📿 देह तव आहे प्रारब्धा
3004.
देह तव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी का सीण वाहू भार ॥१॥
सरो माझा काळ तुझिया चिंतने । कायावाचामने इच्छीतसे ॥धृपद॥
लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणे जन्मे ॥२॥
तुका म्हणे आलो सोसीत संकटे । मी माझे वोखटे आहे देवा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३००४
📿 अष्टही प्रहर करिसी स
3004.
अष्टही प्रहर करिसी संसाराचा धंदा । का रे त्या गोविंदा स्मरसी ना ॥१॥
अंतकांळी कोण सोडवील तूंते । का रे स्वहितातें विसरलासी ॥२॥
यमाची यातना न चुके बंधन । सोडवील कोण तुजलागीं ॥३॥
एका जनार्दनी गुंतलासी वाया । भजे यादवराया विसरूं नको ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३००५
📿 वायांची सोस संसार का
3005.
वायांची सोस संसार कामाचा । रामनामी वाचा रंगी का रे ॥१॥
यापरती जीवा सोडवण नाही । वेदशास्त्री पाही भाष्य असे ॥२॥
पुराणे डांगोरा पिटती नामाचा । ते तू का रे वाचा न वदसी ॥३॥
सायास साधने न लगे आणीक । एका जनार्दनी ऐक्य मन करी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००६
📿 नये माझा तुम्हा होऊ
3006.
नये माझा तुम्हा होऊ शब्दस्पर्श । विप्रवृंदा तुम्हा ब्राम्हणांसी ॥१॥
म्हणोनिया तुम्हा करितो विनंती । द्यावे शेष हाती उरले ते ॥धृपद॥
वेदी कर्म जैसे बोलिले विहित । करावी ते नीत विचारूनि ॥२॥
तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका म्हणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००७
📿 बहुत असती मागे सुखी
3007.
बहुत असती मागे सुखी केली । अनाथा माउली जिवांची तू ॥१॥
माझिया संकटा न धरी अळस । लावुनिया कासे पार पावी ॥धृपद॥
कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाही पुन्हा ॥२॥
विचारिता नाही दुजा बळिवंत । ऐसा सर्वगत व्याप्य कोणी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३००७
📿 अहा रे मुढा अहा रे म
3007.
अहा रे मुढा अहा रे मूढा । जन्मोनी दगडा काय केले ॥१॥
साठी घाटी करसी संसाराचा छंद । वाचे तो गोविंद नुच्चारिसी ॥२॥
एका जनार्दनी श्रीरामावांचून । चुकवील बंधन कोण मूढ ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३००८
📿 बुडालिया जळीं धावतसे
3008.
बुडालिया जळीं धावतसे कोण । तैसे प्राणी जन बुडताती ॥१॥
संसार हा डोहो दुस्तर पारखा । सांगड ती देखा रामनाम ॥२॥
एका जनार्दनी संतांचा आधार । उतरूं पैलपार भवडोहीं ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३००९
📿 आवडी धरोनी आलेती आका
3009.
आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाठी ॥१॥
ते मी तुझे नाम गाईन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥धृपद॥
वर्म धरावे हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासी ॥२॥
वेगळ्या विचारे वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३००९
📿 अल्प आयुष्य अल्प सर्
3009.
अल्प आयुष्य अल्प सर्व । अल्प वैभव समजेना ॥१॥
म्हणे सदा माझे माझे । परी न लाजे काळासी ॥२॥
त्यासी ऐसे न कळे सदा । संसाराधंदा मिथ्या हा ॥३॥
शरण एका जनार्दनी नाठवई मनी श्रीहरीसी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३०११
📿 न सरे लुटिता मागे बह
3011.
न सरे लुटिता मागे बहुता जनी । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
सद्धि महामुनि साधक संपन्न । तिही हे जतन केले होते ॥धृपद॥
पायाळाच्या गुणे पडिले ठाउके । जगा पुंडलिके दाखविले ॥२॥
तुका म्हणे येथे होतो मी दुबळा । आले या कपाळा थोडे बहु ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 देह - अभंग २८८७ ते ३०१२›
📿 अभंग क्र. ३०११
📿 करू करू म्हणता गेले
3011.
करू करू म्हणता गेले वायांविण संसार तो शीण केला वेगी ॥१॥
अधमा न कळे अधमा न कळे । झांकोनियां डोळे घाणा नेतीं ॥२॥
यमदूत नेती तयांसी तांतडी । मारिती वरी कोडी यमदंडें ॥३॥
एका जनार्दनी चुकवी या यातना । संतांच्या चरणा शरण रिघे ॥४॥