वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

देखिला सांवळा राजा द

🙏 4. संत नामदेव · ABH-083958 · अभंग क्र. २२३३

2233.
देखिला सांवळा राजा द्वारकेचा । सर्वही सुखाचा ठेवा दिसे ॥१॥
माथा तो मुगुट कुंडले श्रवणी । प्रभा दिनमणी तुच्छ जेथे ॥२॥
कोटी मन्मथांची झाडणी करावी । ऐसी ते बरवी अंगकांती ॥३॥
श्रीमुख शोभले पूर्णचंद्रा ऐसे । देखतांचि दोष सर्व जाती ॥४॥
केशराची उटी कस्तुरी मळवटी । माळ रुळे कंठी वैजयंती ॥५॥
श्रीवच्छलांछन मुद्रिका भूषण । झळकती आन भुजादंड ॥६॥
नामा म्हणे ऐसा देखियेला देव । तयाचा अनुभव काय वानू ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग