248.
नामाचे चिंतन प्रगट पसारा । असाल त करा जेथे जेथे ॥१॥
सोडवील माझा स्वामी निश्र्येसि । प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही ॥२॥
गुण दोष नाही पहात कीर्तनी । प्रेमे चक्रपाणी वश्य होय ॥३॥
तुका म्हणे कडू वाटतो प्रापंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २४८
📿 हे पृथ्वी तुझे लंकेस
248.
हे पृथ्वी तुझे लंकेसी आधारू रे रावणा ते तो अपराधे बाधकेवीण आणिली ।
नेणो किजी वानरपद्ये देखतांची रविशशी गिळिले रया ॥
विरोध न कीजे विरोध न किजे पाडु न पाहाता मागे करिसी ते नव्हे रे रावणा ।
प्राणुचि पारखा जाला रे गव्हारा जिणे केवी सिद्धि जाईल रे रया ॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५›
📿 अभंग क्र. २४८
📿 सामळोजी मारी बात । ब
248.
सामळोजी मारी बात । बाई तमे सामळोजी मारी बात॥धृ०॥
राधा सखी सुंदर घरमा । कुबजाने घर जात॥१॥
नवलाख धेनु घरमा दुभाय । घर घर गोरस खात॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । चरणकमलपर हात॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २४८
📿 न लगे हे मज तुझे ब्र
248.
न लगे हे मज तुझे ब्रम्हज्ञान । गोजिरे सगुण रूप पुरे ॥१॥
लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥धृपद॥
जाळोनि संसार बैसलो अंगणी । तुझे नाही मनी मानसी हे ॥२॥
तुका म्हणे नको रागेजु विठ्ठला । उठी देई मला भेटी आता ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २४८
📿 जाऊ पाण्या निसुरवाण्
248.
जाऊ पाण्या निसुरवाण्या । आळवीती गोड राण्या ॥ध्रु०॥
गोविंद गीती गाऊ गोविंद गीती गाऊ । आनंदे जाऊ पाण्या ॥१॥
खाऊ कंदमुळे आम्ही असो वनी । न देखो श्रीकृष्ण न ऐको कानी ॥२॥
आम्ही गोड भिल्लिणी काय ऐसी बोली । तुझिया नामाची लागली आवडी ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २४९
📿 भजन करी महादेव । राम
249.
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥1॥
दोघे देव एक पाही । तया ऐक्य दुजे नाही ॥2॥
शिवा रामा नाही भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥3॥
जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटी तो व्यापक ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २४९
📿 चुकलीया चुके आपादिलि
249.
चुकलीया चुके आपादिलिया भले होय । तरी दुःख दारिद्र भोगी कवण ।
तरी अवघेंचि विश्व का सुखी नव्हे रया ॥म्हणोनिया भ्रम सांडि नाथिला ।
जे जे काही करीन म्हणसी होणार ते होईल । न होणार ते नव्हेल ।
तू फुकाची का वाळिसी रया ॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५›
📿 अभंग क्र. २४९
📿 बन जाऊ चरणकी दासी रे
249.
बन जाऊ चरणकी दासी रे । दासी मै भई उदासी॥धृ०॥
और देव कोई न जाणू । हरिबिन भई उदासी॥१॥
नही न्हावू गंगा नही न्हावू जमुना । नही न्हावू प्रयाग कासी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । चरनकमलकी प्यासी॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५०
📿 धिक् तो आचर धिक् तो
250.
धिक् तो आचर धिक् तो विचार । धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥
धिक् ते पठण धिक् तेंपुराण । धिक् यज्ञ हवन केले तेणे ॥२॥
धिक् ब्रह्मज्ञान वाउग्या ह्या गोष्टी । दया क्षमा पोटी शांति नाही ॥३॥
धिक् ते आसन जटाभार माथा । वायंचि हे क था धरिली जेणे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५०
📿 काय सांगो तुझ्या चरण
250.
काय सांगो तुझ्या चरणीच्या सुखा । अनुभव ठाउका नाही तुज ॥१॥
बोलता हे वाटे कैसे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥धृपद॥
आम्ही एकएका ग्वाही मायपुते । जाणो ते निरुते सुख दोघे ॥२॥
तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा । का तुम्ही गोपाळा नेणा ऐसे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २५०
📿 ऐकता तो नाद मोहिलेसे
250.
ऐकता तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिही लोका ॥१॥
सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥
एकाजनार्दनी ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥
🙏 संत निळोबाराय›📚 संत निळोबाराय अभंग गाथा›📖 संत निळोबा गाथा भाग १›📂 खेळ›
📿 अभंग क्र. २५०
📿 लगोरिया मांडूनि पोरा
250.
लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी ।
निर्बळाच्या संगे डाव देता येसी रडी ॥१॥
न करी ऐसे आता । करी गडी श्रीअनंता ॥२॥
मारिताचि लगोया आधी येतो हाता डाव ।
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २५१
📿 त्रिभुवनापरते दाविसी
251.
त्रिभुवनापरते दाविसी दुरी । आधी तू आपुली शुध्दी करी ।
उदयो अस्तु कवणिये घरी । पिंडा माझारी सांग बापा ॥
जागृती मध्ये कवण जागत । सुषुप्ती मध्ये कवण निद्रिस्त ।
दोघे भ्रमलिया स्वप्न देखत । जीव की मन सांग पा रे ॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २५१
📿 मेरो मन हरलियो राज र
251.
मेरो मन हरलियो राज रणछोड । मेरो मन०॥धृ०॥
त्रिकम माधव और पुरुषोत्तम ने । कुबेर कल्याणनी जोड॥१॥
राधा रुक्मिणी और सतभामा । जांबुक करणी जोड॥२॥
चार मास रत्नागर गाजे । गोमती करत कलोल॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५१
📿 देखोनिया तुझा सगुण आ
251.
देखोनिया तुझा सगुण आकार । उभा कटी कर ठेवूनिया ॥१॥
तेणे माझ्या चित्ता झाले समाधान । वाटते चरण न सोडावे ॥धृपद॥
मुखे गातो गीत वाजवितो टाळी । नाचतो राउळी प्रेमसुखे ॥२॥
तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे । तुच्छ हे बापुडे सकळही ॥३॥
252.
नाम घेता वाया गेला । ऐसा कोणी आईकीला ॥१॥
सांगा विनवितो तुम्हांसी । संत महंत सिद्धू ऋषी ॥२॥
नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥३॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५२
📿 विवेकाची पेंठ । उघडी
252.
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥1॥
तेथे नाही काही धोका । उठाउठी भेटे सखा ॥2॥
मरोनिया जावे । शरण विठोबासी व्हावे ॥3॥
म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २५२
📿 अजब सलुनी प्यारी मृग
252.
अजब सलुनी प्यारी मृगया नैनो । ते मोहन वश कीधोरे॥धृ०॥
गोकुळमा सौ बात करेरे बाला का न कुबजे वश लीधोरे॥१॥
मनको सो करी ते लाल अंबाडी अंकुशे वश कीधोरे॥२॥
लवींग सोपारी ने पानना बीदला राधांसु रारुयो कीनोरे॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५२
📿 आता येणेविण नाही मज
252.
आता येणेविण नाही मज चाड । कोण बडबड करील वाया ॥१॥
सुख तेचि दुःख पुण्यपाप खरे । हे तो आम्हा बरे कळो आले ॥धृपद॥
तुका म्हणे वाचा वाहिली अनंता । बोलायाचे आता काम नाही ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २५२
📿 पेंदा म्हणे देवा बाऊ
252.
पेंदा म्हणे देवा बाऊ तो पळाला । आमुचे भेणेम गेला देशोधडी ॥१॥
देव म्हणे गोपाळ धन्य तुम्ही बळी । पळविला बळी बाऊ तुम्ही ॥२॥
ऐसे समाधान करी मनमोहन । एका जनार्दनी चरणी लागे ॥३॥
253.
नाशिवंत देह नसेल हा जाणा । कांरे उच्चाराना वाचे नाम ॥१॥
नामेंची तारिले कोट्यानाही कोटी । नामे हे वैकुंठी बैसविले ॥२॥
नामा परते सर नाही त्रिभुवनी । ते का तुम्ही मनी आठवाना ॥३॥
तुका म्हणे नाम वेदांसी आगळे । ते दिले गोपाळे फुकासाठी ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५३
📿 नेणपणे मिठी घालीन पद
253.
नेणपणे मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगाते । निचेष्ट न्िरू ते भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हाती । मग काय चिंता करणे काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड । आणिक नाही चाड दुजी कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २५३
📿 वाऊगे ते वाया । कुंथ
253.
वाऊगे ते वाया । कुंथाकुंथी खेळावया ॥१॥
हा खेळ नोहेरे बरा । गाई आधी ते आवरा ॥२॥
करा आपुले स्वाधीन तेणे तुटेल बंधन ॥३॥
एका गुंतू वाया । एका जनार्दनी लागे पाया ॥४॥
254.
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले ॥२॥
मूळ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥३॥
तुका म्हणे खरे जाले । एका बोले संताच्या ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २५४
📿 अरज करे छे मिरा रोकड
254.
अरज करे छे मिरा रोकडी । उभी उभी अरज॥धृ०॥
माणिगर स्वामी मारे मंदिर पाधारो सेवा करू दिनरातडी॥१॥
फूलनारे तुरा ने फूलनारे गजरे फूलना ते हार फूल पांखडी॥२॥
फूलनी ते गादी रे फूलना तकीया फूलनी ते पाथरी पीछोडी॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५४
📿 अधिकार तैसा दावियेला
254.
अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालता हे मग कळो येते ॥१॥
जाळू नये नांव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे रोग वैद्याचे अंगी । नाही करी जगी उपकार ॥३॥
अर्थ :
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २५४
📿 खेळता सांवळा गडियांस
254.
खेळता सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणे ॥१॥
आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणे खेळ सांडावया भाई ॥२॥
धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥
येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनी तया पाहता प्रेम चढें ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५५
📿 शूराचे ते शस्त्र कृ
255.
शूराचे ते शस्त्र कृपणाचे धन । विध्वंसिल्या प्राण हाता नये ॥1॥
गजमाथा मोती सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हाता नये ॥2॥
सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन । गेलियाही प्राण हाता नये ॥3॥
विराल्यावाचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हाता नये ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २५५
📿 आज मारे साधुजननो संग
255.
आज मारे साधुजननो संगरे राणा । मारा भाग्ये मळ्यो॥धृ०॥
साधुजननो संग जो करीये पियाजी चडे चोगणो रंग रे॥१॥
सीकुटीजननो संग न करीये पियाजी पाडे भजनमा भंगरे॥२॥
अडसट तीर्थ संतोने चरणे पियाजी कोटी काशी ने कोटी गंगरे॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५५
📿 संसार तीही केला पाठम
255.
संसार तीही केला पाठमोरा । नाही द्रव्य दारा जया चित्ती ॥१॥
शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी । जनार्दन जगी होउनि ठेला ॥२॥
तुका म्हणे देहे दिला एकसरे । जयासि दुसरे नाही मग ॥३॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २५५
📿 रात्र काळी घागर काळी
255.
रात्र काळी घागर काळी | यमुनाजळेंही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवर काळी | गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी | कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाणीया नवजाय साजणी | सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५६
📿 संसारी निधान लाधले ज
256.
संसारी निधान लाधले जना । सद्गुरुचरणा सेवी बापा ॥1॥
कायावाचामने तयास देवावी । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥2॥
ते गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण । एर्हवी ते आपणा माजी आहे ॥3॥
असता सम्यक परि जना चुकामुक । भुलली निष्टंक मंत्रतंत्रे ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५६
📿 पांडुरंगी लागो मन ।
256.
पांडुरंगी लागो मन । कोण चिंतन करी ऐसे ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथे भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाही । कैचा राही विठाळ ॥8॥