258.
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी । विठाई जननी भेटे केव्हा ॥१॥
नलगे त्यांवीण सुखाचा सोहंळा । लागे मज ज्वाला अग्नीचिया ॥२॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जय सर्व माझे ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५८
📿 कीर्तनाचा रस आवडे नर
258.
कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्ही ॥1॥
वारी पंढरीचा निश्चये म्या केला । वारकरी झाला पंढरीचा ॥2॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगु फार ॥3॥.
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २५८
📿 चातकाचे जिवन घनु । त
258.
चातकाचे जिवन घनु । तरी तो साये एकाधिनु ।
आला वेळु भुलावणु । जैसा नलिनिसी नाही भानु ॥
चंद्रासवे चकोर मिळोनिया पूर्णिमेसी विरोधु मांडिला ।
तो योग दुर्मिळ म्हणोनी तो प्रसंगु विपाईला वेळा रया ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २५८
📿 बावरे मन रात्रंदिवस
258.
बावरे मन रात्रंदिवस झाले । नावरे वाहिले काय करू ॥१॥
येणे माझा कैसा घेतिलासे लाहो । आता कोठे जावो देशांतरी ॥२॥
न धरी तयाची संगतीची गोडी । झाली वोढावोढी साच दिसे ॥३॥
चोखा म्हणे याचा न तुटे संबंध । येणे मज बाध लाविलासे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५८
📿 आणीक या काळे न चले उ
258.
आणीक या काळे न चले उपाय । धरावे ते पाय विठोबाचे ॥१॥
अवघेचि पुण्य असे तया पोटी । अवघिया तुटी होय पापा ॥धृपद॥
अवघे मोकळे अवघिया काळे । उद्धरती कुळे नरनारी ॥२॥
काळ वेळ नाही गर्भवासदुःखे । उच्चारिता मुखे नाम एक ॥३॥
259.
जन्ममरणाची विसरलो चिंता । तू माझा अनंता माय बाप ॥१॥
होतील डोळा पाहेन प्रकार । भय आणि भर निसरली ॥२॥
लीगाडाचे मुळे होती पंच भूते । ज्यांचे त्या पुरते विभाविले ॥३॥
तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा । जीवांसी तू सखा पांडुरंगा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६›
📿 अभंग क्र. २५९
📿 जशोदा मैया मै नही दध
259.
जशोदा मैया मै नही दधी खायो॥धृ०॥
प्रात समये गौबनके पांछे । मधुबन मोहे पठायो॥१॥
सारे दिन बन्सी बन भटके । तोरे आगे आयो॥२॥
ले ले अपनी लकुटी कमलिया । बहुतही नाच नचायो॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २५९
📿 न मिळो खावया न वाढो
259.
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकासी हेचि सांगे ॥धृपद॥
विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण ॥२॥
तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित ॥३॥
260.
माझिया देहाची मज नाही चाड । कोठे करू कोड आणिकांचे ॥१॥
इच्छिता ते मान लागा देवापासी । असा संचितासी गुंतले हो ॥२॥
देह आम्ही केला भोगाचे सांभाळी । राहिलो निराळी मानामान ॥३॥
तुका म्हणे कोणे वेचावे वचन । नसता तो सीण वाढवावा ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २६०
📿 दीप दीपिका शशी तारा
260.
दीप दीपिका शशी तारा । होतु का कोटिवरी रे ।
परी न सरे निशी नुगवे दिवसु । दिनकर नाथे जियोपरी रे ॥
नद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजे गोपाळवीण नुद्धरिजे ॥
नगर भ्रमंता जन्म जावो । परी प्रवेशु एक्या द्वारे रे ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २६०
📿 पिंड पोसावे हे अधमाच
260.
पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान । विलास मिष्टान्न करूनिया ॥१॥
शरीर रक्षावे हा धर्म बोलती । काय असे हाती तयाचिया ॥धृपद॥
क्षणभंगुर हे जाय न कळता । ग्रास गिळि सत्ता नाही हाती ॥२॥
कर्वतिली देहे कापियेले मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 काला - अभंग २३२ ते २६३›
📿 अभंग क्र. २६०
📿 कृष्ण देखतांचि गेले
260.
कृष्ण देखतांचि गेले । शेखी बुडविली महिमान ॥१॥
भली नव्हे हे कृष्णगती । सखे पळविले सांगाती ॥२॥
मायेचा करविला बंदु । शमशमादि पळविले बंधु ॥३॥
द्रष्टा दृश्य आदि दर्शन । तिन्ही सांडिलें पुसुन ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २६१
📿 जरी माझी कोणी कापिती
261.
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदो जिव्हे ॥१॥
सकळा इंद्रिया हे माझी विनंती । नका होऊ परती पांडुरंगा ॥धृपद॥
आणिकाची मात नाइकावी कानी । आणीक नयनी न पाहावे ॥२॥
चित्ता तुवा पायी रहावे अखंडित । होउनी निश्चिंत एकविध ॥३॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २६२
📿 मागे बहुताने हेचि वा
262.
मागे बहुताने हेचि वारिले । तेणे ते पावले निजधाम ॥१॥
तयाचिया वाटे चालू जाता सुख । अवधेंचि दु:ख निरसेल ॥२॥
बहुतांचा हाचि आहे उपदेश । तोचि सुखरस सेऊ आता ॥३॥
चोखा म्हणे आम्हा सांपडली वाट । मारग हा नीट येता जाता ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २६२
📿 हाती घेऊनिया काठी |
262.
हाती घेऊनिया काठी | शिकविते श्रीपती |यमुनेंची माती | खासी कांकांकाँ का ॥१॥
हरी तू खोडी नको करू | माझ्या वा वा बा बा ॥ध्रु ॥
धांऊनिया धरिला करी | बैसविला मांडीवरी |मुख पसरोनि करी | आ आ आ आ ॥२॥
विष्णदास नामा म्हणे | मरोतनिया जन्मा येणे |कृष्ण सनातन पाहू | या या या या ॥३॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 कृष्ण जन्म›
📿 अभंग क्र. २६३
📿 ब्रम्हा वंदी ज्याचे
263.
ब्रम्हा वंदी ज्याचे पाय । त्याची यशोदा ते माय ॥1॥
साम राज्याचा जो दानी । मागे यशोदेसी लोणी ॥2॥
क्षीरसागर ज्याचे चरणी । त्याला पायावरते न्हाणी ॥3॥
देव ब्रम्हांड पालकी । त्याची टाळू हाते माखी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २६३
📿 मागे बहुतांनी केलीसे
263.
मागे बहुतांनी केलीसे आटणी । ते मी काचणी करू नेणे ॥१॥
नाही अधिकार तैसा या जीवा । उगेचि धांवा धांवा करू मने ॥२॥
सहावेल ते वोझे वाहावे मस्तकी । भार झाल्या चुकी कुंथा कुंथी ॥३॥
चोखा म्हणे पाहावा आपुला विचार । तरीच पैलपार भवनदी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २६३
📿 म्हणविती ऐसे आइकतो स
263.
म्हणविती ऐसे आइकतो संत । न देखीजे होत डोळा कोणी ॥१॥
ऐसियांचा कोण मानिते विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥धृपद॥
पर्जन्याचे काळी वोहाळाचे नद । ओसरता बुंद न थारेचि ॥२॥
हिऱ्याऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तो ॥३॥
264.
ब्रम्हरस गोडी तयासी फावली । वासना निमाली समूळ ज्याची ॥१॥
नाही त्या विटाळ अखंड सोहंळा । उपाधी वेगळा जाणिवेच्या ॥२॥
मन हे निश्रळ झाले एके ठायी । तया उणे काही निजसुखा ॥३॥
तेचि पुण्यवंत तेचि पर उपकारी । प्रबोधी त्या नारीनर लोका ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २६४
📿 याचिया छंदा जे लागले
264.
याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणे ॥१॥
याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥
स्वार्थ परमार्थ घातिलासे चिरा । किती फजीतखोरा बुझवावे ॥३॥
न जावे तेथे हाटेची जाय । करू नये ते करी स्वये न धरी कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २६४
📿 अतिवाद लावी । एक बोट
264.
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥
त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥धृपद॥
प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥
तुका म्हणे नाही । भूतदया ज्याचे ठायी ॥३॥
265.
भक्ति ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रम्ही भोग ब्रम्ह्तनु ॥१॥
देहाच्या निरसने पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥२॥
उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥३॥
तुका म्हणे मज कळते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥४॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २६५
📿 लिहिले संचिती न चुके
265.
लिहिले संचिती न चुके कल्पांती । वाया कुंथाकुंथी करूनी काय ॥१॥
जन्ममरण सुखदु:खाचे गांठोडे । हे तो मागे पुढे बांधलेंसे ॥२॥
निढळींची अक्षरे साच तेचि खरे । आता वोरबार करील कोण ॥३॥
चोखा म्हणे आमुची जैशी का वासना । तैशीच भावना होत जात ॥४॥
266.
शिख सूत्र तुझा गुंतला जमान । तोवरी तू जाण श्रुतिदास ॥१॥
त्याची तुज काही चुकतांची नीट । होसील पतित नरकवासी ॥२॥
बहु तू झालासी चतुर शहाणा । शुद्ध आचरण चुको नको ॥३॥
शिखा सूत्र यांचा तोडी तू संबंध । मग तुज बाघ नाही काही ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २६६
📿 रुणुझुणु रुणुझुणु रे
266.
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तु अवगुणु रे भ्रमरा ॥
चरणकमळदळु रे भ्रमरा । भोगी तू निश्चळु रे भ्रमरा ॥
सुमनसुगधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥
सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा । बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 उपदेश›
📿 अभंग क्र. २६६
📿 वाढले शरीर काळाचे है
266.
वाढले शरीर काळाचे है ग्वाजे । काय माझे तुझे म्हणतोसी ॥१॥
बाळ-तरूण दशा आपुलेच अंगी । आपणची भोगी वृध्दपण ॥२॥
आपुला आपण न करी विचार।काय हे अमर शरीर याचे ॥३॥
चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी । मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २६६
📿 भुंकती ती द्यावी भुं
266.
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥१॥
भाविकांनी दुर्जनाचे । काही मानू नये साचे ॥धृपद॥
होईल तैसे बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २६६
📿 वारी तो दशवंती आपुला
266.
वारी तो दशवंती आपुला तू बाळ | विकटू हा खेळ खेळतसे ॥१॥
धाकुटिया मुला घेतो हा चिमोरे | काय करू धुरे भीत असो ॥२॥
घरीचा म्हातारा हाणितला येणे | काय सांगू उणे तुजपाशी ॥३॥
मी वो लटिकी तरी नामयासी पुसा | तुझा बाळू कैसा आसंदत ॥४॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५›
📿 अभंग क्र. २६७
📿 आनंदु रे आजी आनंदु र
267.
आनंदु रे आजी आनंदु रे । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे ॥
एक दोन तीन चारी पाच सहा । इतुके विचारूनि मग परमानंदी रहा ॥
सातवा अवतार आठवा वेळोवेळा । बापरखुमादेविवरू विठ्ठलु जवळा ॥
अर्थ :
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 गौळणी›
📿 अभंग क्र. २६७
📿 कान्हा तू आजि का जाल
267.
कान्हा तू आजि का जालासि बेभान ॥धृ॥तू तो आमुचा गडी | म्हणोनी मी केली खोडी |घालू हुंबर यमुनेची मोडू मान ॥१॥
होसी तू आमुचा बळी | म्हणोनि म्या केली कळी |तेथे कशाचा काय गुमान ॥२॥
जरी तू होसी सखा | होऊ दे जाला वाखा |चल रूपवती घरी घेऊ मान ॥३॥
समजूनिया देव | येक नामा नामदेव |जाले ते हरपले | या द्वैत भान ॥४॥